राम राम मिपाकरहो,
शनिवार दिनांक १ ऑगस्ट २००९ रोजी मिपाचा ठाणे कट्टा आयोजित करण्यात आला आहे. एकमेकांना भेटणे, ओळखी करून घेणे, गाणी-गोष्टी-मनमुराद गप्पा, शाकाहारी-मांसाहारी हास्यविनोद इत्यादी हेतूने हा कट्टा भरवला जात आहे...
कट्टा संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल आणि रात्री ११/१२ च्या आसपास संपेल..
मिपाचेच एक सभासद श्रीयुत संतोष जोशी यांनी या कट्ट्याच्या आयोजनाची जिम्मेदारी स्विकारली आहे.
कट्टा स्थळ -
लक्ष्मी-केशव कार्यालय
कोलबाड रोड, प्रताप चित्रपटगृहाजवळ,
खोपट, ठाणे.
जेवणाचा खर्च -
शाकाहारींकरता ७५ रु प्रती इसम
मांसाहारींकरता १०० रु प्रती इसम
दारूचा खर्च वेगळा...!
चकण्याचा खर्च तात्या अभ्यंकरांकडून प्रायोजित केला जाईल.. (केवळ चणे-फुटाणे-भाजलेला पापड!) :)
सबब, कट्ट्याला येऊ इच्छिणार्यांनी आपण शाकाहारी की मांसाहारी, दारू पिणार की पिणार नाही या माहितीसह आम्हाला शुक्रवार दि ३१ जुलै २००९, रात्रौ १२ च्या आत व्य नि करून अथवा ९८२०४९४७२० या भ्रमणध्वनीवर कळवावे..
धन्यवाद,
आपला,
(कट्टा प्रस्तावक) तात्या.
प्रतिक्रिया
29 Jul 2009 - 11:14 am | टारझन
मी येणार आहे :)
मांसाहाराचे ३०० रुपये पोष्टाणे पाठवण्यात येतील :)
चकणा फ्री आहे म्हंटल्यावर काही हरकत नाही :)
वेळेच्या एक तास आधी पोहोचू !!
- टारझन
(सदस्य , मिसळपाव कट्टा मंडळ )
30 Jul 2009 - 11:32 am | संजय अभ्यंकर
ह्याला म्हणतात आधुनीक भीम!
जय भीम!
नोंदः तात्या, कृपया टारझन साठी तिप्पट चकण्याची व्यवस्था वेगळी करणे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
29 Jul 2009 - 11:17 am | निखिल देशपांडे
मी पण येणारच आहे..
फक्त शाकाहार आणी फुकटचा चकणा :-)
आयोजनास मदत करायला तयार
निखिल
29 Jul 2009 - 11:17 am | विजुभाऊ
आम्ही पण येणार.
29 Jul 2009 - 11:21 am | पाषाणभेद
श्रावण पाळत नाही काय?
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
29 Jul 2009 - 11:24 am | घाशीराम कोतवाल १.२
आम्ही पण येणार आहोत.
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
29 Jul 2009 - 11:27 am | टारझन
ऐन वेळी गोळी देणार्याचे एका मनापासून लिहीलेल्या लेखाचे एक हिण आणि हिणकस विडंबण पाडण्यात येईल .. मग त्यानंतर चपल्या घालाव्या लागल्या तरी बाहत्तर त्र्याहत्तर !!
- (माजी हिणकस विडंबक) टारझन
29 Jul 2009 - 11:36 am | निखिल देशपांडे
अरे बापरे आता तर जायचे का नाही विचार करावा लागेल त्या निमित्याने तरी हि& हि विडंबन वाचायला मिळेल
बाकी टारु शेठ मागच्या वेळेस तुम्हीच गोळी दिली होती आता कोण करणार तुमच्या लेखाचे विडंबन
29 Jul 2009 - 11:47 am | स्वाती दिनेश
कट्ट्याला शुभेच्छा... नंतर फोटो सकट वृत्तांत वाचायला मिळेल अशी आशा.. :)
स्वाती
29 Jul 2009 - 12:02 pm | विनायक प्रभू
ठाणे कट्टा आहे म्ह्णजे मास्तर येणारच.
मास्तरकडुन खारे काजू प्रायोजीत करण्यात येतील.
मास्तर मांसाहारी आहे.
मांसाहार करुन मांसाहारी (नॉन्वेज) चर्चेत भाग घेण्याची इच्छा असेल त्यानी आधी कळवावे.
(घा.को ने नोंद घ्यावी)
29 Jul 2009 - 12:13 pm | आशिष सुर्वे
असेच म्हणतो! >>
''कट्ट्याला शुभेच्छा... नंतर फोटो सकट वृत्तांत वाचायला मिळेल अशी आशा..''
तात्या आणि समस्त मिपाकरांना शुभेच्छा!!
(शाकाहारी पदार्थांमध्ये 'मिसळ-पाव' असेलच ना?)
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
29 Jul 2009 - 12:18 pm | नीलकांत
ठाण्याच्या मिपा कट्ट्याला हजेरी लावतो... :)
अट्टल मांसाहारी असून सुध्दा सध्या शाकाहार करणार आहे. :(
- नीलकांत
29 Jul 2009 - 12:24 pm | आनंदयात्री
हेssss शाब्बास !!
-
श्रावणयात्री
29 Jul 2009 - 12:22 pm | देवदत्त
ह्म्म्म्म..
ह्या वेळचा कट्टा हुकणार....
असो,
तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.. :)
29 Jul 2009 - 12:24 pm | सुनील
कट्ट्याचा प्रस्ताव उत्तम आहे. काही किरकोळ अडचणी आहेत पण त्यावर मात करून उपस्थिती लावता येईल असे वाटते.
(कोंबड्या-बकरे पाळत नसला तरी श्रावण पाळणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Jul 2009 - 1:52 pm | काजुकतली
फक्त पुरूष मिपा सभासदांकरताच आहे का हो हा कट्टा?? एकाही स्त्री मिपा सभासदाने अजुन 'मी ही आहे हो' असे म्हटले नाहीये वर......
(मांसाहारी हास्यविनोद......... रात्री ११/१२ च्या आसपास संपेल.......दारू........ हे शब्द वाचुनच पळाल्या वाटते...)
29 Jul 2009 - 5:22 pm | नम्रता राणे
(मांसाहारी हास्यविनोद......... रात्री ११/१२ च्या आसपास संपेल.......दारू........ हे शब्द वाचुनच पळाल्या वाटते...)
ह्या असल्या कार्यक्रमास मिपा वरचे किती पुरुष सभासद आपल्या बायकोला /बहीणीला/ मुलीला परवानगी देतील याचा उहापोह जरुर व्हावा हि नम्र विनंती!
29 Jul 2009 - 6:40 pm | विसोबा खेचर
उहापोह करण्याची काहीच गरज नाही. कट्ट्याची रूपरेषा स्पष्टपणे लिहिलेली आहे..
ज्यांना यायचं ते येतील. न येऊ इच्छिणार्यांना कोणताही आग्रह नाही...
कुणीच नाही आलं तर कट्टा होणार नाही.. शिंपल...!
आपला,
(स्पष्ट) तात्या.
29 Jul 2009 - 6:43 pm | विनायक प्रभू
बायकोला घेउन येइन म्हणतो.
30 Jul 2009 - 12:44 am | विसोबा खेचर
मास्तर, जियो..!
ह्याला म्हणतात maturity and that always counts..!
तात्या.
30 Jul 2009 - 7:17 am | काळा डॉन
ओ मास्तर नको...तिच्यायला ते नॉन्वेज जोक कोण सांगणार मग ? ;)
29 Jul 2009 - 2:26 pm | सखाराम_गटणे™
मी पण येईन शक्यतो.
29 Jul 2009 - 9:51 pm | विजुभाऊ
नवीन
प्रेषक विनायक प्रभू ( बुध, 07/29/2009 - 18:43) .
बायकोला घेउन येइन म्हणतो.
»
उत्तर द्या
मी पण येईन
प्रेषक सखाराम_गटणे™ ( बुध, 07/29/2009 - 14:26) .
मी पण येईन शक्यतो.
अभिनन्दन गटणेमामा.....
29 Jul 2009 - 5:14 pm | सोहम_व
ठाण्यातल्या मिपाकराना भेट्ण्यास ऊत्सुक.
29 Jul 2009 - 5:45 pm | ऋषिकेश
अरेच्या! नेमके ह्या विकांताला मुंबईबाहेर असल्याने येणे शक्य नाहि :(
डु मज्जा! (ती तर करालच...)
फोटो पाहून जळवा मात्र नक्की!
(जळका)ऋषिकेश
------------------
चांदण्या शिंपीत जाशी लिहिता अवांतरे!
30 Jul 2009 - 7:11 pm | प्रदीप
चला रे, कट्टा ऋषिकेश मुंबईत असेल त्या वीकांताला त्याला विचारून ठेवा! बघू या, काय एस्केप रूट मिळतो त्याला ते :)
30 Jul 2009 - 7:22 pm | ऋषिकेश
पूढील विकांताला दिनांक ८-९ मी (चक्क) मुंबईतच आहे. (तोही मोकळा!)
तेव्हा भेटायचं का बोला?
नाहितर त्यापुढील विकांत पुणे! (अर्थात पूर्ण मोकळा नाही ;) )
प्रदीपराव, तुमची वारी कधी आहे इथे? नक्की वेळ काढून ठेवतो :)
(वक्तशीर)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून २१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
31 Jul 2009 - 8:06 pm | नितिन थत्ते
नाशिकला गेलो नाही तर नक्की येईन.
(कट्टा माझ्या घरापासून चालत ५-७ मिनिटांवर आहे. त्यामुळे ठाण्यात असलो तर येणारच).
लेटेस्ट अपडेट. नाशिक क्यान्सल. कट्ट्यावर येणार ...येणार्...येणार.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
29 Jul 2009 - 7:16 pm | हरकाम्या
ठाण्यात " मिपाकट्टा " हे ठिक आहे पण आम्हा " पुणेरी मिपाकरांचे " काय. पुण्यात कोणी असे ठरवेल का ????
29 Jul 2009 - 7:18 pm | नितिन थत्ते
टारोबा पुण्याहून येणार म्हणतायत. तुम्ही पण या.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
1 Aug 2009 - 1:47 am | हरकाम्या
आलो असतो, पण सध्या 2 nd. shift चालु आहे. शिवाय मुंबैतल्या
गटारांच काही खर नाही राव, फुल्ल लोड झाल्यानंतर समजा एखाद्या
गटारगंगेला मला भेटावस वाटल तर २ तारखेची सकाळ एखाद्या नरकातच उगवायची.
1 Aug 2009 - 8:46 am | विसोबा खेचर
शिवाय मुंबैतल्या गटारांच काही खर नाही राव, फुल्ल लोड झाल्यानंतर समजा एखाद्या गटारगंगेला मला भेटावस वाटल तर २ तारखेची सकाळ एखाद्या नरकातच उगवायची.
खरंय बॉ तुमचं! नकाच येऊ कट्ट्याला...
आपला,
(मुंबैप्रेमी) तात्या.
29 Jul 2009 - 9:55 pm | विजुभाऊ
टारोबा पुण्याचा नाही तो बेलापूरहून येणार आहे.
(बेलापूर का दो रुपया और रामगड का एक रुपया. पुछो पुछो क्युं?
क्योकी टांगा भी रामगड का और बसन्ती भी रामगड की. चल धन्नो)
29 Jul 2009 - 10:11 pm | पिवळा डांबिस
मिपा ठाणे कट्ट्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा!!
खूप मजा करा!!!!
आपला,
पिवळा डांबिस
29 Jul 2009 - 10:35 pm | टुकुल
माझ्याही शुभेच्छा !! .. मजा करा
--ठाण्यात नसलेला ठाणेकर
टुकुल
30 Jul 2009 - 3:27 am | प्रअका१२३
माझ्यापण शुभेच्छा(च)..... जमणार नाही यायला.
इथे आल्यापासून प्रथमच पाहतोय कट्ट्याचा बेत.
पुणेकर मंडळी.... पुण्यात कधी करताय कट्टा?
नायतर फुकट स्काइपवर तरी हाणूया गफ्फा आणि आखुया बेत.
29 Jul 2009 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते
*&#%$@*#)@$%#!(#&%
अवांतर: कट्ट्याला मनापासून शुभेच्छा!!! मजा करा लेको. फोटोगिटो टाका. वृत्तांत लिवा नीटपणे. :D
बिपिन कार्यकर्ते
31 Jul 2009 - 1:33 am | धनंजय
*&#%$@*#)@$%#!(#&%
शुभेच्छा! माझ्या मूळ गावचा कट्टा मस्तच होणार. (माझे मूळ गाव असूनही ;-) )
30 Jul 2009 - 12:41 am | मयुरा गुप्ते
छान्,हा ही कट्टा 'मिसणार' तर. ईट्,ईट्,डु मज्जा!! (ऋषिकेशभाऊं कडुन उधार) .
धमाल करा. फोटोंची वाट बघत आहोत.
-मयुरा
30 Jul 2009 - 1:05 am | घाटावरचे भट
कट्ट्यास माझ्याही हार्दिक शुभेच्छा. धमाल करा आणि झकासपैकी वृत्तांत लिव्हा कोणीतरी.
30 Jul 2009 - 6:59 am | वैशाली हसमनीस
ठाणे कट्ट्यास हार्दिक शुभेच्छा .
30 Jul 2009 - 7:15 am | काळा डॉन
वावावा! कट्ट्याला शुभेच्छा.
आमाला दारू पेयल्यावर जेवन लागत नाही. त्यात चकना फुकट असल्यावर कामच संपला!! तेवड दारुचं किती द्यायच सांगा तात्या...म्हणजे आमी हजेरी लावलाय मोकळे.
काळू
30 Jul 2009 - 7:35 am | एकलव्य
मजा करा! आमची संधी मात्र हुकणार!! चीअर्स!!!
30 Jul 2009 - 11:11 am | ब्रिटिश टिंग्या
जेवण : शाकाहार.
दारु : इल्ले.
चकणा : FTP
अवांतर : कोणी टेशनवर घ्यायला येईल काय?
30 Jul 2009 - 11:58 am | घाशीराम कोतवाल १.२
टिंग्या मी येतो टेशनात न्यायला तुला
कोणत्या गाडीने येशील येताना धम्याला पण आण बरोबर ;)
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
30 Jul 2009 - 11:22 am | mamuvinod
चालु द्या
पन टारुभाउसाटी एक मोट्टा ??????????? मारावा लागेल
फोटो पाटवा मिपावर
30 Jul 2009 - 11:23 am | ब्रिटिश टिंग्या
काय?
30 Jul 2009 - 12:05 pm | घाशीराम कोतवाल १.२
पन टारुभाउसाटी एक मोट्टा ??????????? मारावा लागेल
काय मारावा बा? :? ह्या टार्या साठी कोंबडा बकरा कि आणखी काही
जरा ईस्काटुन सांगा राव
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
30 Jul 2009 - 11:30 am | वेताळ
असाच बेत कोल्हापुरला पण एकदा होवुन जावुदे तात्या. कट्ट्याचा वृतांत व फोटो टाकायला विसरु नका.
वेताळ
30 Jul 2009 - 4:57 pm | चिरोटा
मिपावर बेंगळुरुचे किती पब्लिक आहे? ईथेही कट्टा करता येइल.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
30 Jul 2009 - 5:43 pm | ऍडीजोशी (not verified)
ओसरी ढोसरी सगळं सगळं झालंय करून आणि ह्या पुढेही होत राहील
30 Jul 2009 - 6:59 pm | संकेतजी कळके
येणार ना येणार. नक्की येणार.
30 Jul 2009 - 7:10 pm | दिनेश५७
यायची खूप इच्छा आहे, पण....
कट्टा संपल्यावर घरी सोडायची काही व्यवस्था आहे का?
31 Jul 2009 - 10:47 pm | डॉ.प्रसाद दाढे
तात्या, ते कुठलंसं कलम विसरू नका हो ! नायतर कोणीतरी मिपाकर उर्वरीत रात्र पोलीस टेशनात काढायचा..
मिपा कट्ट्यास (ग्लास) भरभरून शुभेच्छा!
1 Aug 2009 - 12:28 am | विसोबा खेचर
मोटर वाहन कायदा कलम १८५..!
आपला,
(आरोपी) तात्या.
30 Jul 2009 - 8:01 pm | धमाल मुलगा
करा तिच्यामारी मज्जा!
फुल्टू दंगा करा दोस्ताहो :)
आम्ही काय येऊ नाय शकत ह्या टैमाला. पुढच्या वेळी जमवायलाच हवं. लक्ष्मी-केशवमधला चुकलेला हा दुसरा कट्टा :(
आता कायतरी करायलाच पायजे..इजा बिजा तिजा नको व्हायला.
अवांतरः आमच्या नावानं तिर्थ शिंपडायला आणि चखण्याचे चार दाणे काढून ठेवायला विसरु नका बरं ;)
31 Jul 2009 - 12:07 am | संदीप चित्रे
खाओ, पीओ, मजे करो :)
31 Jul 2009 - 5:27 pm | आनंद घारे
नेमक्या त्याच दिवशी आमच्याकडे वाशीला एक वेगळी जत्रा भरणार आहे. अनेक जुने दोस्तयार तिथे भेटणार आहेत, त्यामुळे मिपाच्या कट्ट्याला येता येणार नाही. माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
1 Aug 2009 - 7:58 am | अजय भागवत
कट्ट्याला शुभेच्छा.
कट्ट्याच्या स्नेहसंमेलनातील मेन्युला दारु वर्ज्य असा नियम करावा अशी एक नम्र सुचना
1 Aug 2009 - 8:48 am | विसोबा खेचर
कट्ट्याच्या स्नेहसंमेलनातील मेन्युला दारु वर्ज्य असा नियम करावा अशी एक नम्र सुचना
चांगली सूचना आहे. विनादारूचे कट्टेही भरवता येतील...
तात्या.
1 Aug 2009 - 9:00 am | नाखु
धमाल करा आणि झकासपैकी सचित्र वृत्तांत अपेक्षीत...
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"