शंका

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Jul 2009 - 1:00 pm

मित्रानो आपल्या लहानपणी अनेक शन्का असतात. सर्वच शंकांचे निरसन नीट होतेच असे नाही . बरेचदा असला प्रश्न का विचारलास म्हणून छड्या / रट्टे/ धपाटे ही खावे लागले असतील. त्या शंका नंतर सूप्त होतात. तुम्हालाही अशा काही शंका आठवत असतील तर त्या इथे लिहाव्यात. बघु एखाद्या सूप्त शंकेचे उत्तर मिळून जाईल

माझ्या शंका

१) मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्याची प्रथा कोणत्या समाजात आहे/ होती. ती प्रथा का सुरु झाली असेल/ कोणी केली असेल?मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्यासाठी मढ्याचे डोके कोणत्या स्थितीत ठेवावे?

२) साता जन्माचे नाते जोडणार्‍या लग्न प्रसंगासाठी जाताना वर्‍हाडासाठी जी बस ठरवतात त्या बसवर" प्रासंगीक करार " अशी पाटी का लावली जाते?

३) हिन्दी भाषीक लोक नाव विचारताना "आपका शुभ नाम?" असे विचारतात . माणसाला "अशुभ नाम" असते का?

४) लघवीला जाणे या साठी लघुशंका असा शब्द प्रयोग का वापरतात? दीर्घशंका हा शब्दप्रयोग कशासाठी वापरतात?

उत्तरे माहीत असतील तर लिहा.....काही अशाच शंका असतील तर त्याही लिहा.
अवांतरः ही चर्चा गमतीखातर सुरु केलेले आहे. विषय व्यापक असल्याने चर्चा भरकटू शकते. हे अपेक्षीत आहे.

वावरविचार

प्रतिक्रिया

अश्विनि३३७९'s picture

23 Jul 2009 - 1:23 pm | अश्विनि३३७९

अवांतर प्रतिसाद येउन चांद्ण्या मिळाव्यात म्हणून
हा धागा काढ्लेला दिसतोय.. :?

दत्ता काळे's picture

23 Jul 2009 - 1:24 pm | दत्ता काळे

पूर्वीच्या काळी मेलेली व्यक्ती , नक्की मेलेली आहे किंवा नाही हि शंका असल्यास, मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवर लोणी ठेवत असंत. व्यक्तीमध्ये जराही धुगधुगी शिल्लक असेल, तर लोणी पाघळू लागे.

बेचवसुमार's picture

23 Jul 2009 - 1:36 pm | बेचवसुमार

मढ्याच्या टाळुला लोणी लावणे हा प्रकार फक्त दहनविधी करणार्या जाती/जमातींमध्ये आहे की इतर पध्दतींने अंत्यक्रिया करणार्या जाती/जमातींमध्येही आहे.?
(माझ्या मते फक्त दहनविधी करणार्या जातींमध्ये असावा.)

विश्वेश's picture

23 Jul 2009 - 2:27 pm | विश्वेश

आगगाडित शौचास गेल्यास सर्व घाण रुळावर पड़ते ... मग विमानात शौचास गेल्यास सर्व घाण खाली पडत असेल का ?
आमचे घर लोहगाव विमान तळाजवळ होते तेव्हा मी आमच्या बिल्डिंगच्या गच्चीत जायला घाबरायचो ....

सुनील's picture

23 Jul 2009 - 3:06 pm | सुनील

नैसर्गिक खताच्या फवारणीची कल्पना भन्नाट आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

23 Jul 2009 - 3:23 pm | सुनील

१) मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्याची प्रथा कोणत्या समाजात आहे/ होती. ती प्रथा का सुरु झाली असेल/ कोणी केली असेल?मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्यासाठी मढ्याचे डोके कोणत्या स्थितीत ठेवावे?
तिरडीवर आडव्या पडलेल्या व्यक्तीच्या टाळूवर लोणी लावले तरी ते तेथे राहणे कठीण. त्या साठी त्या व्यक्तीस बसवावे लागेल. मृत व्यक्तीचे शरीर ताठ असल्यामुळे ते शक्य होणार नाही. कर्नाटकातील लिंगायत समाजात मृत व्यक्तीस खुर्चीवर बसवून पुरण्याची प्रथा आहे (चुभुदेघे). त्या समाजात ही लोणी ठेवण्याची प्रथा आहे का, ते पहावे लागेल.

२) साता जन्माचे नाते जोडणार्‍या लग्न प्रसंगासाठी जाताना वर्‍हाडासाठी जी बस ठरवतात त्या बसवर" प्रासंगीक करार " अशी पाटी का लावली जाते?
"प्रासंगिक करार" हा बस कंपनी आणि उतारू यांच्यातील करार असतो. त्याचा उतारूंच्या आपापसातील करार्-मदाराशी काहीही संबंध नाही. मयताला जाणार्‍या मंडळींनीही जर बस भाड्याने घेतली तरी त्यावर "प्रासंगिक करार"ही पाटी लागेल.

३) हिन्दी भाषीक लोक नाव विचारताना "आपका शुभ नाम?" असे विचारतात . माणसाला "अशुभ नाम" असते का?
ही बहुधा What's your good name चे शब्दशः भाषांतर असावे!

४) लघवीला जाणे या साठी लघुशंका असा शब्द प्रयोग का वापरतात? दीर्घशंका हा शब्दप्रयोग कशासाठी वापरतात?
दीर्घशंका हा शब्द मी आजतागायत ऐकला नव्हता. कृपया वाक्यात उपयोग करून उदाहरण द्यावे.

कुणालाही चांदणी मिळू नये म्हणून मुद्दम गंभीर उत्तरे दिली आहेत. अन्यथा टवाळकीचा मोह आवरत नव्हता! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ's picture

23 Jul 2009 - 3:48 pm | विजुभाऊ

What's your good name
इंग्रजी भाषीकाला हे वाक्य फारच खटकते. त्याना हे असे काही असते याची कल्पना नसते . गूड नेम हे हिन्दीतल्या शब्दा॑चे शब्दशः भाषान्तर आहे

वामन देशमुख's picture

6 Oct 2013 - 2:38 pm | वामन देशमुख

अवांतरः
What's your good name. याला मातृभाषेचा प्रभाव (MTI) म्हणतात.

उदा. When I saw her, my heart became garden garden.

विसोबा खेचर's picture

23 Jul 2009 - 3:55 pm | विसोबा खेचर

कुणालाही चांदणी मिळू नये म्हणून मुद्दम गंभीर उत्तरे दिली आहेत. अन्यथा टवाळकीचा मोह आवरत नव्हता!

अवांतराला, विषयांतराला मनाई आहे. विषयाशी सुंसंगत टवाळकीला मनाई नाही! :)

तात्या.

वाटाड्या...'s picture

23 Jul 2009 - 7:48 pm | वाटाड्या...

१) मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्याची प्रथा कोणत्या समाजात आहे/ होती. ती प्रथा का सुरु झाली असेल/ कोणी केली असेल?मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्यासाठी मढ्याचे डोके कोणत्या स्थितीत ठेवावे?
उ: पुर्वीच्या काळी गेलेल्या माणसाच्या टाळुवर लोणी ठेवत असावेत. त्याचं एक कारण म्हणजे हिंदु अंत्यसंस्कारपद्धतीमधे माणसाचा जीव शिवाकडे डोक्याच्या मार्गातुन जातो असं समजलं जातं. म्हणुन जाताना सुखानं जावं म्हणुन त्याला लोणी (सांकेतीक) दिलं जातं. अर्थात हा सगळा मानण्याचा प्रकार आहे.
आता अवांतरः वरती काहीजणानी म्हटल्याप्रमाणे लोण्याची (आणि कसलीकसली) घसराघसरी करु नये अथवा तसा प्रयोगही करुन पाहु नये..अन्यथा परमेश्वर आपलं भलं करो..
;)
२) साता जन्माचे नाते जोडणार्‍या लग्न प्रसंगासाठी जाताना वर्‍हाडासाठी जी बस ठरवतात त्या बसवर" प्रासंगीक करार " अशी पाटी का लावली जाते?
उ: हा करार बसवाले व वर्‍हाडी मंडळींमधे असतो.
आता अवांतरः असातसा काही प्रसंग आलाच तर नवर्‍या मुलाला/मुलीला करारा नुसार पळण्यासाठी काही वाहन हवे ना?

३) हिन्दी भाषीक लोक नाव विचारताना "आपका शुभ नाम?" असे विचारतात . माणसाला "अशुभ नाम" असते का?
उ: प्रत्येक नाव ज्याच्याशी आपला संबधं येतो ते आपल्या चांगल्यासाठी येवो ही सदिच्छा...
आता अवांतरः विजुभाऊ, तुम्हाला हा प्रश्न का पडतोय? ;) ह. घेणे...

४) लघवीला जाणे या साठी लघुशंका असा शब्द प्रयोग का वापरतात? दीर्घशंका हा शब्दप्रयोग कशासाठी वापरतात?
उ: एखाद्या प्रश्नाचे पटकन उत्तर सुचावे आणि त्या साठी जास्तीत जास्त एकांत पटकन मिळाला तर उत्तर सुचू शकतं अशी भावना असावी..आता दीर्घशंका असेल तर लघुशंकेपेक्षा जास्त वेळ पाहीजे ..म्हणुन आपण हा शब्द मिपावर प्रचलीत करुयात..
आता अवांतरः आजपासुन आपण सं**सला किंवा वजन कमी करायला चाल्लो असं न म्हणता दीर्घशंकेला चाल्लो असं म्हण्णार..

एक शंका: कमोडवर बसल्यावर आत पडायची कधी भीती वाटलीय का ? आणि तरीही तसं बसताना थ्रील वाटलयं का? बोला बोला...:)

- वाटाड्या...

_समीर_'s picture

23 Jul 2009 - 8:14 pm | _समीर_

>>एक शंका: कमोडवर बसल्यावर आत पडायची कधी भीती वाटलीय का ?

नाही! माझे सहसा आतच पडते. पण कधी कधी बाहेर पडायची मात्र भिती वाटली आहे. .

योगी९००'s picture

28 Jul 2009 - 10:43 am | योगी९००

हॅ हॅ हॅ

खादाडमाऊ

हे दोन्ही शब्द मोल्सवर्थच्या शब्दकोशात सापडतात (पानाचा दुवा).

अर्थ अपेक्षित असेच. लघुशंका म्हणजे मूत्रविसर्जन, दीर्घशंका म्हणजे मलविसर्जन.

अभिज्ञ's picture

24 Jul 2009 - 5:05 pm | अभिज्ञ

आताच पेट्रोल पंपावरील गैरव्यवहार ह्या धाग्यात पुनेरी ह्यांनी "घोडचुक" हा शब्द वापरलेला पाहिला.
ह्या "घोडचुक" शब्दाचे उगम काय असावे?
किंबहुना कोणत्या चुकीला "घोडचुक" म्हणता येते?

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

रामपुरी's picture

13 Sep 2013 - 10:44 pm | रामपुरी

घोडचूक हा शब्द घोडचूक असा न लिहिता घोडचुक असा लिहितात तेव्हां त्याला घोडचूक म्हणता येते.

मन's picture

24 Jul 2009 - 5:40 pm | मन

१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?
३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!
४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?
तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?
५)आधी अंडे की आधी कोंबडी ? जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?
७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?
८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?
१०)कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?
११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?
१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?
१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?
१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
१५)कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?
१७)स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?
१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?
१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?
२०)प्रेमात पडालेला प्रेमी जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो की "ये कसम खाये हम हर कसम तोड दे"..ही प्रतिज्ञा त्यानं पाळाअवी का? ती पाळणं म्हणजेच ती मोडणं नव्हे काय?
"I am a liar and I am speaking lie" असं कुणी म्हणत असेल तर त्याचं म्हणणं खरं की खोटं?
२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
२२) हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल माणसाची आयडेंटिटि कुठली? ज्याची स्मृती ट्रांन्सप्लांट करण्यात आली आहे त्याचाच गत भूतकाळ त्याला आठवत राहील, स्वतःचा नाही. मग त्यानं आयुष्य कुणाचं म्हणुन जगायचं?
स्मृतीचं की त्याच्या खर्‍या खुर्‍या भूतकाळाशी निगडित?

हे आणि असं बरचसं संग्रही आणि डोक्यात घेउन फिरणारा
आपलाच,
मनोबा

धमाल मुलगा's picture

24 Jul 2009 - 5:55 pm | धमाल मुलगा

अरे मन्या, लेका मनोबा आहेस की जुदाईमधला परेश रावल?

माझी शंका:
मनोबाला हे असे प्रश्न पडल्यावर त्यांची उत्तरं हा शोधायला हा बिचारा कुणाकडे जात असेल? :?

----------------------------------------------------------------------------------------
चांदण्यात फिरताना माऽझा कापलास प्रतिसाऽऽद........

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jul 2009 - 6:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
बिअर आणि चकणा घेऊन येणार्‍या ट्रक्ससाठी!
२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?

बारा वाजले होते, सर्वात पहिले वेळ घड्याळजीने पाहिली असणार.
३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!

फी नव्हे किंमत!
४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?
तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?

या प्रश्नाचा त्रास होऊ नये म्हणून मी फ्लोटर्स घालते आणि साडी नेसते.
५)आधी अंडे की आधी कोंबडी ? जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
आधी आम्लेट. मी तरी नक्कीच नाही. (अधिक माहितीसाठी प्रभू मास्तरांना विचारा!)
६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?
अल कायदा कडे >:)
७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?
जृंभणश्वानला विचारू या!
८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
नाही, कारण अंधार अस्तित्वातच नाही.
९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?
परवानगी शिवाय वापरून पहा, जो कोणी तुला (इंग्रजी) सू करेल त्याच्याकडे!
१०)कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?
तरीही एक रुपया मोजावाच लागेल.
११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?
शाळेत हल्ली चुकीचंच शिकवतात. माहीत नाही तुला??
१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?
कॅलक्युलेटर पुरूषांसाठी आहे आणि फोन बायकांसाठी! मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस!
१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?
पाणी पितात!
१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
कारण ते लोळत नाहीत.
१५)कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?
कॉर्न ऑईल + व्हेज ऑइल = बेबी ऑईल
१७)स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?
माझी स्मृती जाईल तेव्हा प्रयोग करून उत्तर देईन
१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?
नेहेमी ऐकतो तसाच. रेडीओचं प्रसारण इलेक्ट्रोम्याग्नेटीक वेव्हज करतात.
१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?
करून पहा, लगेच नाही, पण तीन-चार पिढ्यांनंतरही कोर्टाची नोटीस आली नाही तर समजा चालेल.
२०)प्रेमात पडालेला प्रेमी जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो की "ये कसम खाये हम हर कसम तोड दे"..ही प्रतिज्ञा त्यानं पाळाअवी का? ती पाळणं म्हणजेच ती मोडणं नव्हे काय?
"I am a liar and I am speaking lie" असं कुणी म्हणत असेल तर त्याचं म्हणणं खरं की खोटं?

ते त्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून ठरवायचं!
२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
तिरडीवर!
२२) हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल माणसाची आयडेंटिटि कुठली? ज्याची स्मृती ट्रांन्सप्लांट करण्यात आली आहे त्याचाच गत भूतकाळ त्याला आठवत राहील, स्वतःचा नाही. मग त्यानं आयुष्य कुणाचं म्हणुन जगायचं?
स्मृतीचं की त्याच्या खर्‍या खुर्‍या भूतकाळाशी निगडित?

माझं आयुष्य जगत नसला तर मी कशाला पर्वा करू??

अदिती

श्री's picture

24 Jul 2009 - 6:13 pm | श्री

ठार मेलो.........

मन's picture

25 Jul 2009 - 3:22 pm | मन

=)) =)) =)) =)) =))
सर्वात पहिले वेळ घड्याळजीने पाहिली असणार
घड्याळजीचं काम घड्याळ बिघडल्यावर येतं. ते तैय्यर कुणी केलं?
घड्याळजीनं वेळ पहिल्यांदा "बघितली" असेल्,ठरवली "ठरवली"
कुणी?

या प्रश्नाचा त्रास होऊ नये म्हणून मी फ्लोटर्स घालते आणि साडी नेसते.
तोच प्रश्न लागु होतो...तुम्ही अंगात कपडे घालता की कपड्यात अंग घालता?

सर्व पैसा जातो कुठे?
अल कायदा कडे
तिच्यायला मग ते भांडुन काहुन राहिलेत्?चोराला खजिन्याच्या किल्ल्या मिळाल्या, तर भांडाण उरतच कुठं?

कारण अंधार अस्तित्वातच नाही.
ओ म्याडम... केवळ अंधारच कायम, शाश्वत आहे.
प्रकाश हा तात्कालिक आहे....एखाद्या ज्वलनाचा परिणाम म्हणजे प्रकाश... काही कालावधीतच तो प्रकाश कायमचा संपणार आहे.
तेव्हा तुम्हाला दिसेल की अंधारच कायम आहे/...तो अस्तित्वात आहे.

माझी स्मृती जाईल तेव्हा प्रयोग करून उत्तर देईन स्मृती गेली तर प्रयोग करायचं तरी लक्षात कसं राहिल??

नेहेमी ऐकतो तसाच. रेडीओचं प्रसारण इलेक्ट्रोम्याग्नेटीक वेव्हज करतात.
पण तो आवाज ऐकु येइ पर्यंत तुम्ही पुन्हा पुढे गेलेल्या असाल्...अवाज येणार कसा?
=)) =))

आपलाच,
मनोबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2009 - 2:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

घड्याळजीचं काम घड्याळ बिघडल्यावर येतं. ते तैय्यर कुणी केलं? घड्याळजीनं वेळ पहिल्यांदा "बघितली" असेल्,ठरवली "ठरवली"

घड्याळ तयारच घड्याळजीने केलं असणार ना, तयार नाही केलं तर बिघडेल कसं आणि बिघडलं नाही तर याचं पोट भरणार कसं? (कॉन्स्पिरसी थिअरी)
पण कदाचित भास्कराचार्‍यांनी लिलावतीच्या लग्नाच्या वेळेस घड्याळ तयार केलं असेल ... आठवा, मुहूर्त चुकला मग म्हणे लिलावती विधवा झाली.

या प्रश्नाचा त्रास होऊ नये म्हणून मी फ्लोटर्स घालते आणि साडी नेसते.
तोच प्रश्न लागु होतो...तुम्ही अंगात कपडे घालता की कपड्यात अंग घालता?

हे पहा मनोबा, सरळ न शिवलेलं कापड (माहेरची साडी/सासरचं धोतर) गुंडाळा, नसते प्रश्न पडणारच नाहीत. (काय नाठाळ आहे हे साठ्यांचं कार्ट!)

ओ म्याडम... केवळ अंधारच कायम, शाश्वत आहे.
प्रकाश हा तात्कालिक आहे....एखाद्या ज्वलनाचा परिणाम म्हणजे प्रकाश... काही कालावधीतच तो प्रकाश कायमचा संपणार आहे.
तेव्हा तुम्हाला दिसेल की अंधारच कायम आहे/...तोच अस्तित्वात आहे.

छ्या, मी तर त्याआधीच तिरडीवर जाणार, लफ्राच नको, कसं! नाहीतर उद्या ते इंडीया टी.व्ही.वाले माझा जीव खातील, अंधार का झाला म्हणून!

माझी स्मृती जाईल तेव्हा प्रयोग करून उत्तर देईन स्मृती गेली तर प्रयोग करायचं तरी लक्षात कसं राहिल??

एला मनोबा, मग तुम्ही काय कामाचे? एवढीच का तुमची मैत्री?? एवढीही नाही का आठवण करून देणार तुम्ही??? (तेरा इमोसनल अत्याचार ....)

पण तो आवाज ऐकु येइ पर्यंत तुम्ही पुन्हा पुढे गेलेल्या असाल्...अवाज येणार कसा?

अरेच्चा, तुला काहीच माहिती नाही रे! प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असतो. म्हणूनच की काय सुंदर लोकं बघवतात पण याच लोकांनी तोंड उघडलं की बर्‍याचदा पळून जाण्याची वेळ येते!

अदिती

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2009 - 1:32 pm | विशाल कुलकर्णी

हहपुवा झाली. =)) =)) =)) =))

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2009 - 1:36 pm | विशाल कुलकर्णी

=)) =)) =)) =))

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

विजुभाऊ's picture

25 Jul 2009 - 12:22 am | विजुभाऊ

"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?

हा प्रश्न मी एका कॅटलफीड वाल्याला विचारला होता. त्याच्याकडे त्यासाठी दोन म्हशी आणि एक गाय होती. जनावराना चवीची जाणीव मानवापेक्षा जास्त असते. त्यांच्या जिभेवर जास्त ऋची कलीका असतात.

चांदणीस अर्थ नसतो. म्हणून प्रतिसाद देऊच नये असे नाही

स्वाती दिनेश's picture

29 Jul 2009 - 1:16 pm | स्वाती दिनेश

७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?
पेश्शल ट्रेंड 'टेस्टर कुत्रे' ठेवलेले असतात.
स्वाती

वाटाड्या...'s picture

24 Jul 2009 - 11:23 pm | वाटाड्या...

>>>मग बायकांना मंगळसूत्र कानावर अडकवायला का सांगत नसतील?

ह्यात काहीतरी "काळंबेरं" आहे नक्की...:)

- वा

मन's picture

25 Jul 2009 - 3:35 pm | मन

२३)रेल्वे ला स्पीड ब्रेकर का नसतात?

२४)कुत्रा-माण्जर भांडण सोडुन युती का करत नाहित?(संयुक्त शिकारी मध्ये युतीचाच फायदाय हे त्यांच्या ध्यानात का येत नाही?)

२५)उंच तारे आकाशात ताटकळत लोंबकळण्यापेक्षा टपकन् जमिनीवर का पडत नाहित?
२६)लोक मांसाहारी असले तरी कुत्री,उंदीर,मांजर का खात नाहित?
२७)हार्ट अ‍ॅटॅक ह्या हल्लिच्या पॉप्युलर रोगाचा शोध कधी लागला?
२८)हार्ट अ‍ॅटॅक,कॅन्सर,एड्स हे सगळे रोग नसताना माणसं कशानं मरायचे?
२९)कॉम्प्युटर चा शोध कुणी ,कधी लावला?
३०)अंगझाकण्याइतके कपडे घालायचा नियम कधी करण्यात आला?

आपलाच,
मनोबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2009 - 3:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता मी नाय हा, आता दुसर्‍यांना चान्स देते मी!

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2009 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार

२३)रेल्वे ला स्पीड ब्रेकर का नसतात?
>> कारण स्पिडब्रेकर रस्त्यावर असतात आणी रेल्वे रुळावरुन धावते म्हणुन. (अध्ये मध्ये काही माणसे रेल्वेखाली येउन स्पिडब्रेकर बनण्याचा प्रयत्न करतात हा भाग वेगळा.)

२४)कुत्रा-माण्जर भांडण सोडुन युती का करत नाहित?(संयुक्त शिकारी मध्ये युतीचाच फायदाय हे त्यांच्या ध्यानात का येत नाही?)
>> मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ? मांजर उंदरांची व कुत्री माणसे व मांजरांची शिकार करतात त्यामुळे संयुक्त शिकार हा प्रश्नच उदभवत नाही.

२५)उंच तारे आकाशात ताटकळत लोंबकळण्यापेक्षा टपकन् जमिनीवर का पडत नाहित?
>> कारण ते गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेत असतात म्हणुन.

२६)लोक मांसाहारी असले तरी कुत्री,उंदीर,मांजर का खात नाहित?
>>खातात. अफ्रिकेतील अनेक आदीवासी लोक उंदीर व मांजरी खातात. भारतात उंदीर खणार्‍यांना मुसाहारी म्हणतत.

कुत्रा फक्त जगीरा नावाचा डाकु खायचा.
(संदर्भ :०- "मेरे मन भाया मै कुत्ता काट खाया." चायनागेट.

२७)हार्ट अ‍ॅटॅक ह्या हल्लिच्या पॉप्युलर रोगाचा शोध कधी लागला?
>> हल्लीच्या आधी. ख्रिस्तपुर्व १६ व्या शतकात अस्थीदंत वैद्य टार्झ हिणकस्यी यांनी लावला. (वाचा 'हिन अँड हिणकस अ‍ॅटॅक्स इन अपकमींग सेंच्युरी' बाय टार्झ हिणकस्यी)

२८)हार्ट अ‍ॅटॅक,कॅन्सर,एड्स हे सगळे रोग नसताना माणसं कशानं मरायचे?
>> मृत्युने

२९)कॉम्प्युटर चा शोध कुणी ,कधी लावला?
>> बॅबेजने. त्याआधी आर्यभट्टाकडे होता पण त्याचे पुरावे गझनीच्या महंमदाच्या स्वारीत नष्ट झाले. (वाचा 'गझनीदफ्तर' :- वाचस्पती व इतिहास्तज्ञ प.रा. राजवाडे)

३०)अंगझाकण्याइतके कपडे घालायचा नियम कधी करण्यात आला?
>> कपड्याचा शोध लागल तेंव्हा. आधी पान वापरायचे त्यामुळे मोठे मोठी पाने सगळीकडे उपलब्ध होतीच असे नाही.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2009 - 4:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))

२५)उंच तारे आकाशात ताटकळत लोंबकळण्यापेक्षा टपकन् जमिनीवर का पडत नाहित?
>> कारण ते गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेत असतात म्हणुन.

अजिबात नाही. तारे लोंबकळतात कारण:
१. काही तारे लोकलमधल्या प्रवासाचे फ्यान्स असतात.
२. उरलेले वटवाघळांचे फ्यान्स असतात.

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2009 - 6:07 pm | परिकथेतील राजकुमार

हिला आवरा रे कोणीतरी. तु आजकाल फार 'अनआवरेबल' झाली आहेस !!

२५)उंच तारे आकाशात ताटकळत लोंबकळण्यापेक्षा टपकन् जमिनीवर का पडत नाहित?
== कारण त्यांना आपण तारे असतो हे माहित नसते म्हणुन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2009 - 6:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अबे ए, मेरी गली में आके भोंकना मत ... 'दिगंबरा दिगंबरा हो हां'

(मिपाची खगोलाभ्यासक) अदिती

विनायक प्रभू's picture

25 Jul 2009 - 6:12 pm | विनायक प्रभू

जमिनीवर पडायचा विचार होता.
पण अमिर्खान्चा पिच्चर बघितल्यावर त्यांनी तो सोडुन दिला.

१०)कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?
तरीही एक रुपया मोजावाच लागेल.
११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?
शाळेत हल्ली चुकीचंच शिकवतात. माहीत नाही तुला??
१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
कारण ते लोळत नाहीत.
२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
तिरडीवर!

- =)) =)) =)) एक नंबर उत्तरे.

बेचवसुमार's picture

27 Jul 2009 - 1:16 pm | बेचवसुमार

+ १
सहमत...
(लोळणारा) बेचवसुमार..

बेचवसुमार's picture

27 Jul 2009 - 1:16 pm | बेचवसुमार

+ १
सहमत...
(लोळणारा) बेचवसुमार..

बेचवसुमार's picture

27 Jul 2009 - 1:17 pm | बेचवसुमार

+ १
सहमत...
(लोळणारा) बेचवसुमार..

विमुक्त's picture

27 Jul 2009 - 3:00 pm | विमुक्त

१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
- पिउन गाडीत झोपायची मनाइ नाही

२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
- त्या नंतर वाजायल सुरुवात झाली..

४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?
तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?
बूट मी वापरत नाही... आणि शर्ट अंगावर घालतो

५)आधी अंडे की आधी कोंबडी ?
आधी अमिबा
जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
- झाल्यावर कळालं

६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?
- आधी येतो कुठुन ते सांग

८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
- गती आणि वेग गे वेगळे आहेत काय..

९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?
- कॉपीराइटर कडे

१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?
- law of conservation

१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
- करण ते जमिनीवर झोपतात

१५)कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?
- बेबी कॉर्न पसुन

१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?
- समोरच्या वाहनात लावायचा

२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
- मेल्यावर

विजुभाऊ's picture

28 Jul 2009 - 9:54 am | विजुभाऊ

झक मारणे याचा शब्दशः अर्थ मासे मारणे.
पण मग मासे मारणे या अर्थाचा वाक्प्रचार मनस्ताप झाला या अर्थाने का वापरला जातो.
मासे मारण्यात कसला मनस्ताप होतो.

मन's picture

28 Jul 2009 - 10:41 am | मन

म्हणतोय.
"बारा वाजणे" हा वाक्प्रचार कधी आला?
बारा वाजणे म्हणजे काहीतरी अशुभ घडाणे असं का असावं?
सर्वात आधी "तीन्-तेरा " कुणाचे वाजले?
जुन्या मराठीत(शिव कालीन वा पेशवे कालीन कागदपत्रांत) ह्याचा उल्लेख कुठेच कसा नाही?
रावणाला १० डोकी होती,तर कान किती होते?
रावण शौचास जाताना जानवं कुठल्या चेहर्‍याच्या कानात घालाय्चा?

चुंबन घेताना कुठलं तोंड वापरावं ह्याचं त्याला कन्फ्युजन झालं होतं का ?
रोज सकाळी तोंड धुण्यात तो किती वेळ घालवायचा?
त्याच्या दहाही तोंडाला मिशा होत्या का?
तो सगळ्याच चेहर्‍यांची दाढी करायचा का? जिलेट वापरायचा की ७ ओ क्लॉक?
त्याला कह्दी एकटं एकटं वाटाय्चं का?
वाटलं तर दहाही तोंडानी स्वतः शीच गप्पा मारायचा का?
आणि दहा डोकी असल्यामुळं त्याला जगात सर्वप्रथम "मल्टिपल पर्सनॅलिटि डिसऑर्डर" झाला का?
तिबेटी का कुठल्याशा रामायणात "राम -सीता" हे "भाउ बहिण " दाखवलेत, तसं असेल तर आपलं रामायण चूक का?

शिवरायांचा नेमका जन्मदिन कुठला?(टाकली काडी पंडित लोकांच्यात, आता पळा मनोबा.)

आपलाच,
मनोबा

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Jul 2009 - 11:02 am | ब्रिटिश टिंग्या

हे मन्या अंमळ गंडलेलं आहे!

विजुभाऊ's picture

29 Jul 2009 - 2:39 pm | विजुभाऊ

"बारा वाजणे" हा वाक्प्रचार कधी आला?

लॉजिकली घड्याळ्याचा शोध लागल्यानन्तर. एक्झॅक्ट म्हणायचे तर अकरा वाजून ५९ मिनिटानी
असो,
बारा वाजणे / बाराच्या भावात जाणे याचा लक्ष्यार्थ आहे की गावात साधारणतः मंडई ही पहाटे ते मध्यान्ही सूर्य डोक्यावर येईपर्यन्त भरत असे. त्यावेळी टाकाऊ किंवा न खपलेला माल्/भाजी अत्यन्त पडेल भावात विकावी लागते. त्यावरून बाराच्या भावात जाणे / बारा वाजणे हा वाक्प्रचार आला.( दुपारी बारा वाजता अत्यन्त पडेल भावात माल विकला जाणे)
बारा वाजणे/ बाराच्या भावात जाणे याचा अन्वयार्थ बिघडणे/मोडकळीस येणे/ टाकाऊ होणे

विजुभाऊ's picture

28 Jul 2009 - 1:04 pm | विजुभाऊ

डोके दुखत असताना कोणते डोके दुखतय हे रावणला कसे कळत असेल?
रावणाचा न्हावी त्याला डोके भादरायचे चार्जेस कसे लावत असेल?

leo nardo di caprio's picture

29 Jul 2009 - 1:08 pm | leo nardo di caprio

१. श्रावण का पाळ्ला जातो?त्यामागची कारणे काय?

२. देवाने जेव्हा मनुष्यकूळात जन्म घेतला तेव्हा तो उच्च जातितला होता, तर मग उच्च आणि निच्च असा भेदभाव देवानेच केल्यासारखे नाहि का होत पण जी संतमंडळी होउन गेली ती बहुतेक कुंभार, सावतामाळि
ई. होति तर मग उच्च आणि निच्च हा फरक माणसानेच नाही का केला?

*या प्रश्नांमध्ये कोणालाहि त्रास देण्याचा हेतु नाहि.

विजुभाऊ's picture

29 Jul 2009 - 1:56 pm | विजुभाऊ

रामदास सोडले तर बहुतेक संत हे बहुजन समाजातले आहेत.
ज्ञानेश्वर अपवाद पण त्याना सन्याशांची मुले म्हणून वाळीत टाकले होते.
तथाकथीत उच्चवर्णीयांनी बहुजन समाजाला विद्येच्या सामर्थ्यामुळे नाडले / सोसायला लावले.
संतानी फार दु:ख सोसले म्हणून ते बंडखोर झाले ;संतपदाला पोहोचले.

रामदास सोडले तर बहुतेक संत हे बहुजन समाजातले आहेत.

तथाकथीत उच्चवर्णीयांनी बहुजन समाजाला विद्येच्या सामर्थ्यामुळे नाडले / सोसायला लावले.

म्हणजे राज्यकारभार, जमीनदारी, पैसाअडका एत्यादी "तथाकथीत उच्चवर्णीय" समाजाकडे होतं का? गावचे पाटील, देशमुख इत्यादी "तथाकथीत उच्चवर्णीय" समाजातले होते का? भोसले, देसाई, पाटील, देश्मुख, जाधव, मोरे, सावंत इत्यादी इतिहासातील पॉवरफूल मंडळी "तथाकथीत उच्चवर्णीय" समाजातली का? बाकी स्वातंत्र्य मिळून साठ वर्षं झाली. पूर्वीच्या एका वर्षाची प्रगती आता एक दिवसाएवढी आहे. का नाही बहुजनांना विद्येचा लाभ घेवून प्रगती करता आली? सध्या काय स्थिती आहे महराष्त्रातली? युपी बिहार मधले कामगार महाराष्त्रातल्या कामगारांपेक्शा जास्त काम करतात. महराष्त्रातले कामगार म्हणजे कमी काम, ज्यादा डोकेदुखी आणि जातिय वादी आणि प्रांतवादी भांडणं. तिकडे कोरिया मधल्या तीन कंपन्या जगावर राज्य करतायत. इथले बहुजन बसू देत गणपती समोर आणि नवरात्रीत दारू पीत आणि ढोल बडवत. आपल्याला काम करायचं नाहीये आणि ती कुवत ही नाही म्हटल्यावर कुणाला तरी दोष द्यायला पाहीजे ना!!

विटेकर's picture

9 Oct 2013 - 3:55 pm | विटेकर

प्रतिसादाशी शत प्रतिशत सहमत !

पूजादीप's picture

29 Jul 2009 - 1:37 pm | पूजादीप

फक्त दोनाच्या पाढ्यालाच बे चा पाढा अस का म्हणतात? हा मला बालपणी पासुन पडलेला प्रश्न आहे

पक्या's picture

10 Oct 2013 - 6:53 am | पक्या

बे हा शब्द गुजराथी आहे. गुजराथी मध्ये दोनाला बे म्हणतात. तो मराठी पाढ्यांमध्ये कसा घुसला माहीत नाही .

फक्त दोनाच्या पाढ्यालाच बे चा पाढा अस का म्हणतात?
हे खरे नाही.
फक्त तीनाच्या पाढ्याला तीनाचा पाढा असे म्हणतात.
अवांतर : सात सखं बेचाळीस. मात्र साही सत्ता असे का म्हणतात.
एकोण सत्तर, एकोण ऐंशी , एकोण नव्वद सारखे एकोण शंभर असे का म्हणत नाहीत? ( एकोण वीस च्या अगोदर चे म्हणजे ९ ला एकोण दहा असे का म्हणत नाहीत? )

क्रेडिट कार्डावर पैसे क्रेडिट होतात
डेबिट कार्डावर मात्र ते डेबिट होतात?

काळा पहाड's picture

6 Oct 2013 - 4:30 pm | काळा पहाड

८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?

नक्किच. प्रकाशाची गती सेकंदाला तीन लाख कि.मी. आहे. अवकाश विस्तारीकरणाचा वेग याच्या काही पट अधीक असावा. या अवकाशात जिथे प्रकाश अद्याप पोचलेला नाही, तिथे अंधाराचे साम्राज्य आहे. म्हणजे अंधार सुद्धा प्रकाशाच्या वेगापेक्शा अधिक वेगाने विस्तारत आहे.

विजुभाऊ's picture

9 Oct 2013 - 2:24 pm | विजुभाऊ

काळा पहाड काका ( का प काका)
आईनस्टाईनच्या मते अंधाराला स्वतन्त्र आस्तित्व नाही. प्रकाशाचे नसणे म्हणजे अंधार्.कोणत्याहे भाषेत आपण प्रकाशाची इन्टेन्सिटी वाढव असे म्हणतो. (उदा: थोडा उजेड वाढव किंवा कमी कर)
उजेड पाडाण्यासाठी बल्ब मिळतात. अंधार करण्यासाठी मिळत नाहीत. ( पडदे वगैरे उजेड अडवतात. त्यामुळे अंधार पडतो)

क्रेझी's picture

9 Oct 2013 - 4:38 pm | क्रेझी

विजुभाऊ थोडा बदल सुचवते. अंधार करण्यासाठी सुध्दा बल्ब मिळतात, बहुतेककरून नाटकामधे ह्याचा उपयोग केला जातो - असं कुठेतरी वाचलेलं आठवलं.

दादा कोंडके's picture

10 Oct 2013 - 9:07 am | दादा कोंडके

अंधार करण्यासाठी सुध्दा बल्ब मिळतात

सहमत. कृष्णविवराचे बारीक कण अंधार करण्यासाठी वापरण्यात येउ शकतात. :D

बहुतेककरून नाटकामधे ह्याचा उपयोग केला जातो

याबद्दल साशंक आहे.

असं कुठेतरी वाचलेलं आठवलं.

आपण संध्यानंद किंवा विचित्र विश्व वाचता का?

कृष्णविवराचे बारीक कण अंधार करण्यासाठी वापरण्यात येउ शकतात.

कृष्णविवराचे कण उल्हासनगर आणि करोलबाग इथे म्यान्युफॅक्चर करुन मिळतात. ==))

अहो जिथे नोबेल पारितोषिकासाठी कोचिंग क्लासेस सुरू झालेत तिथे कृष्णविवरच काय अख्खी ग्यालक्सीही बनवून देणे आजिबात अशक्य नाही.

http://www.fakingnews.firstpost.com/2013/10/coaching-institute-launched-...

अंधार करण्यासाठी सुध्दा बल्ब मिळतात, बहुतेककरून नाटकामधे ह्याचा उपयोग केला जातो - असं कुठेतरी वाचलेलं आठवलं.

नाय बॉ. असे बल्ब ( प्रकाश शोषक नसतात. नाटकात स्पॉटलाईट वापरतात. त्यात वापरलेल्या भिंगामुळे ते एका ठरावीक भागाबाहेर उजेड पसरू देत नाहीत.
लाईट बाउन्स होउ नये म्हणून काळ्या चादरी वगैरे वापरले आहेत. काही प्रकाश किरण ( उदा जांभळा / अल्ट्रा व्हायोलेट) उजेड देत नाहीत मात्र ते ठरावीक रम्ग चमकवू शकतात/ दाखवू शकतात. मात्र ते प्रकाश शोषक नाहीत.

विजुभाऊ's picture

23 Nov 2020 - 10:28 pm | विजुभाऊ

संपले प्रश्न