प्रासंगिक

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
22 Jul 2009 - 12:36 pm

प्रासंगिक

येथ ’पौरुषास अटक’, सांगून गेले जे तिथे ।
’कोरडे’ पाहून जगणे, क्रंदू लागती ते तिथे ॥
सुहृदांनो काय सांगू, भावना आमच्या इथे ।
तेव्हाही होतो ’थक्क’, ’चकीत’ झालो या इथे ॥ १ ॥

जे खुशीने विहरती वा, सुखे संचरती तिथे ।
तेच वैभव मातृभूचे वाढवू शकती तिथे ॥
खंत खुलवत नांदणे, तिथले बरे ना येथले ।
नांदा खुशीने तेथ वा, सत्वर निघुनी या इथे ॥ २ ॥

वाहिले लाटेवरी अन्‌ पोहोचले, असती जिथे ।
ओढ घेऊन जे घराची, पाहती स्वप्ने तिथे ॥
त्यांस सल्ला हाच की, सावरा वल्ही तिथे ।
सत्वरे ती वल्हवा अन्‌, लवकरी पोहोचा इथे ॥ ३ ॥

भावना तुमच्या समजल्या, आम्हीही व्याकुळ इथे ।
काय राहणे ते विदेशी, तुमचे आम्हा रुचते 'असे' ॥
या इथे आयुष्य फुलवा, साथीला आम्हीही असू ।
या शिकवू या सर्व विश्वा, जगण्यात सौष्ठव ते कसे ॥ ४ ॥

देशांतरसमाजराहणी

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

22 Jul 2009 - 1:18 pm | श्रावण मोडक

मार्मिक. योग्य वेळी. चांगली.

लिखाळ's picture

22 Jul 2009 - 6:49 pm | लिखाळ

सौष्ठवपूर्ण जीवनाचा योग्य विचार वेळेवर सुचला पाहिजे.
कविता छान आहे.
-- (खुष्कीच्या मार्गाने प्रवास करणारा)लिखाळ. :)
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

नरेंद्र गोळे's picture

15 Sep 2009 - 7:11 am | नरेंद्र गोळे

सौष्ठवपूर्ण जीवनाचा योग्य विचार वेळेवर सुचला पाहिजे.>>

हे कळणे अवघड असतेच. आणि तो प्रसंग जर जुना झाला की मग प्रासंगिकाला तरी अर्थ काय उरेल! नाही का?

प्रतिसादाखातर धन्यवाद.

मदनबाण's picture

15 Sep 2009 - 8:16 am | मदनबाण

कविता छान आहे. :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha