फोक

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
8 Jul 2009 - 9:19 am

तोच जुलै महीना, तेच पालक, तोच मी ,तेच तेच प्रश्न.
एक शिक्षण सम्राटांनी माझ्या सर्व अटी मान्य करुन १० वी पास विद्यार्थी आणि त्यांच्या पालका़करता २० कार्यक्रम ठेवले आहेत. कुठल्याही प्रकारची जाहीरात बाजी न करता हे कार्यक्रम होणार होते. सुमारे १ तासाचा कार्यक्रम, दिवसाला पाच्(ऑफिस संभाळुन).
असाच एक कार्यक्रम.
नेहेमी विचारला जाणार एक प्रश्न.
चांगले कॉलेज कोणते?
शक्यतो मी 'असा काही प्रकार माझ्या बघण्यात आला नाही' असे उत्तर देतो.
पालक चक्रावतात.
मग सुरु होते ते तेच तेच संभाषण.
" असे कसे, मागच्या वेळी अमुक तमुक कॉलेज मधे कट ऑफ ९२% होता"
त्याचा कॉलेज चांगले असण्याशी काय संबंध.
"असे कसे, सर्व म्हणतात की"
सांगोसांगी वडाला वांगी
"अहो, परवाच गोल्डन ज्युबीली झाली"केवढा मोठा कार्यक्रम झाला"
मॅनेजमेंट कोटा चे पैसे वाढणार.

हल्ली जरा वेगळ्या प्रकाराने उत्तर देतो.
"यम. बी. ये. केलेले ४ सुशिक्षित बेकार ह्या कामावर लावले आहेत. त्यांचा रिपोर्ट आला की कळवतो".
ह्या उत्तराने पुढचा प्रश्न आपोआप थंडावतो.
"मुलांनी यम.बी.ये. कशात करावे", कुठल्या लाईनीला स्कोप जास्त आहे"? यच. आर का बँकींग, का फायनान्स.
सुत ना भोवरा आत्ताच 'गुंय' सुरु.

मग सुरु होते ते 'वोकेशनल'
लय भारी फॅड पसरले आहे ह्या वोकेशनल चे.
१२ वी ला काय होणार ते माहीत नसताना पालक आधीच स्कोप कुणातरी समुपदेशकाला विचारुन किवा न विचारता ठरवुन मोकळे झालेले असतात. इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कंप्युटर इंजिनियरीग ह्या शाखा आधीच निवडल्या जातात. आणि मेरीट नसताना मॅनेजमेंट सोटा डोक्यात घालुन घेतात.
ह्या सर्व प्रचाराना बळी पडू नका हे मी सागितले तर मलाच "खरबुड्या "ठरवतात.
१०० मधे ५ जणाना जरी कळाले तर त्यात मी आनंद मानतो.

कार्यक्रम संपवुन निघणार इतक्यात एक आई आणि मुलगी ची जोडी कोपर्‍यात वाट बघत असलेली दिसली.
"सर, फक्त पाचच मिनीटे"आई
आता अर्थ्या तासाने वेळापत्रक कोलमडणार होते.
आणि आईने हातात गुणपत्रिका दिली.
९५.५% मार्क होते मुलीला.
मुलीच्या चेहेर्‍याकडे बघितल्यावर न सांगता सर्व काही कळाले.
'बोर्डात पहीली 'काही मार्काने चुकले होते.
" मला आणि हीला त्याचे फारसे विषेश काही नाही हो, पण निकाल लागल्या पासुन बाबा हिच्याकडे एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. फक्त दगा झाला असे म्हणतात. एवढ घवघवीत यश मिळुन सुद्धा आमच्या घरात सुतकी वातावरण आहे. बाबा पहिल्या मुलीच्या मुलाखतीची, फोटोची , आणि सत्काराची कात्रणे गोळा क्ररत आहेत. ऑफिस मधुन आल्यावर परत परत बघत बसतात. पोरीच्या डोळ्यातले पाणी थांबले नाही हो.
काय करु सांगा" आई भडाभडा बोलत होते. मुलगी मान खाली घालुन उभी होती.
**^$%#&((*^*%%*^%%***&%^&^)&(^^%$@!%%^&(**)))_)*))))))_))___))^%
(सर्व शिव्या मनातल्या मनात)
" माझ्या संग्रहात पहीलीचा माझ्याबरोबरचा एक लॅमिनेट केलेला मोठा फोटो आहे. तो त्यांना द्यायचा आहे मला.मला फोन करायला सांगा."
जाता जाता: पिवळ्या डांबीसाने अशा वाकड्या करता पाठवलेला पेशल अमेरिकन चिंचेचा फोक तयार ठेवला आहे. ये साल्या, तुझी आतुरेतेने वाट बघतो आहे. नाही वळ उठवला तर बापाचे नाव नाय सांगणार.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

8 Jul 2009 - 9:39 am | पाषाणभेद

जास्त मार्क्स म्हणजेच यश हे सुत्र कधी नाहीसे होईल प्रभू जाणे.

" माझ्या संग्रहात पहीलीचा माझ्याबरोबरचा एक लॅमिनेट केलेला मोठा फोटो आहे. "

सर हे काही समजले नाही हो या अज्ञान बालकाला.

त्या मुलीच्या वडीलांबरोबरचा फोटो होता का?

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.

प्रश्नधारी व - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विनायक प्रभू's picture

8 Jul 2009 - 9:45 am | विनायक प्रभू

मुंबईत पहिल्या आलेल्या मुलीचा मास्तर बरोबरचा फोटो.
मास्तरची विद्यार्थीनी.

यशोधरा's picture

8 Jul 2009 - 9:50 am | यशोधरा

९५% मिळवलेल्या विद्यार्थिनीला खूप खूप अभिनंदन कळवा!

महेश हतोळकर's picture

8 Jul 2009 - 10:00 am | महेश हतोळकर

माझ्या कडूनही अभिनंदन कळवा.

अवांतरः पिडा काकांनी पाठवलेला फोक मिळायला ऊशीर होणार असेल तर सांगा, मी पुण्यातून पाठवतो.

------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
------------------------------

सहज's picture

8 Jul 2009 - 9:56 am | सहज

कसला नालायक बाप आहे.

निखिल देशपांडे's picture

8 Jul 2009 - 10:14 am | निखिल देशपांडे

९५% टक्के मार्क मिळवले तरी पालकांच्या अजुन अपेक्षा आहेतच!!!
त्या विद्यार्थिनीला अभिनंदन सांगा. तिच्या वडिलां बद्दल काय बोलायचे तुमचा फोकच बरा

==निखिल

विजुभाऊ's picture

8 Jul 2009 - 10:00 am | विजुभाऊ

माझ्या बारावीच्या रीझल्टनन्तर घरातले सुतकी वातावरण आठवले.
हे असे घडणे म्हणजे अब्रू जाणे. वगैरे.....गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही अशा चेहेर्‍याने माझे पालक बरेच दिवस वावरत होते.
मी आर्ट्सला जातो म्हणालो तर बहुतेक मी कुलबुडवा / हात भट्टीची पिउन गटारी साजर करताना त्याना दिसलो असतो त्यानन्तर केला असता तसा गहजब झाला होता. माझे काय चुकले होते तेच मला कळत नव्हते
घरातल्या अशा बीकट परीस्थितीमुळे मला इंजीनीअर व्हावे लागले.
इंजीनीअरींगला अ‍ॅडमिशन मिळल्यानन्तर कोठे घरातले वातावरण निवळले.
तेच माझे पालक माझ्या मुलीच्या १०वीच्या मार्कानन्तरही तीच्या बाबतीत तू अजून इतका शान्त कसा असे विचारतात.

विशाल कुलकर्णी's picture

8 Jul 2009 - 10:40 am | विशाल कुलकर्णी

आमच्या नशिबाने आमच्या पिताश्रींची वागणुक अशी कधीच नव्हती. (कारण आम्हाला जेमतेम प्रथमवर्ग मिळवणेही अवघड असायचे.) त्यामुळे इंजीनिअरिंगला डिस्टिंक्शन मिळाल्यावर त्यांच्या उंचावलेल्या भुवया बघताना मजा आली होती.......
(नंतर त्या भुवयांखालुन ओघळलेल्या अश्रूंनी आम्हाला सांगितले की आमच्या पितांश्रींचे आमच्यावर किती प्रेम होते ते!)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

नंदन's picture

8 Jul 2009 - 10:15 am | नंदन

>>> जाता जाता: पिवळ्या डांबीसाने अशा वाकड्या करता पाठवलेला पेशल अमेरिकन चिंचेचा फोक तयार ठेवला आहे. ये साल्या, तुझी आतुरेतेने वाट बघतो आहे. नाही वळ उठवला तर बापाचे नाव नाय सांगणार.

- याचा पुढचा भाग फोक डान्स या शीर्षकाखाली यावा ही प्रभूचरणी प्रार्थना :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पाषाणभेद's picture

8 Jul 2009 - 10:47 am | पाषाणभेद

ह्याच चालीवर ज्याला फोकाने बडवतात त्याला फोकलीच्या म्हणता येईल का?

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

मराठी_माणूस's picture

8 Jul 2009 - 10:32 am | मराठी_माणूस

पेशल अमेरिकन चिंचेचा फोक तयार ठेवला आहे.

योग्य निर्णय.
पोरीचे कौतुक करायचे सोडुन हा कसला दळ्भद्रिपणा

मराठी_माणूस's picture

8 Jul 2009 - 10:41 am | मराठी_माणूस

प्रकाटाआ

सुबक ठेंगणी's picture

8 Jul 2009 - 10:49 am | सुबक ठेंगणी

ला तिच्या पुढच्या आयुष्यात (बापाच्या पाठबळाशिवाय) असंच काहीतरी करून दाखवण्यासाठी खूप शुभेच्छा!

हर्षद आनंदी's picture

8 Jul 2009 - 10:50 am | हर्षद आनंदी

अश्या बापाला चांगला बडवा, आणि पोरिच्या यशासाठी चांगले १० किलो केशर पेढे वाटायला लावा .....

स्वगत - स्वत: काय दीवे लावले हे पालक का विसरतात?

त्या मुलीला अनंत शुभेच्छा !!

टारझन's picture

8 Jul 2009 - 11:00 am | टारझन

लोकांच्या एकेक टोकाच्या आणि कैच्याकै प्रतिक्रिया वाचून अंमळ हसू आलं !!

असो .. मास्तर हल्ली लेखांची क्वालिटी डाऊन झाली आहे ! सबब लेख आवडलेला नाही ! आता हा "भिती दाखवा आणि विका " असा प्रकार झाला आहे

विनायक प्रभू's picture

8 Jul 2009 - 11:41 am | विनायक प्रभू

भिती ?कुणी कुणाला दाखवली.?
कुणी विकले? कुणी विकत घेतले?
स्पष्ट बोल की रे टारझना.
त्यात काय.

पक्या's picture

8 Jul 2009 - 1:12 pm | पक्या

काय एकेक पालकांच्या अपेक्षा असतात.

>> असो .. मास्तर हल्ली लेखांची क्वालिटी डाऊन झाली आहे ! -
मास्तर , लेखाची क्वालिटी कशीही असली तरी तुमचे अनुभव वाचायला आवडतात. येऊ द्यात अजुन.

सखाराम_गटणे™'s picture

9 Jul 2009 - 10:33 am | सखाराम_गटणे™

>>मास्तर , लेखाची क्वालिटी कशीही असली तरी तुमचे अनुभव वाचायला आवडतात. येऊ द्यात अजुन.

+१
----
एप्रिल मिपा संगीतकट्टा प्रयोजन: http://misalpav.com/node/6487

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jul 2009 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार

त्या प्रेमळ बापाचा 'सत्कार' करा हो गुर्जी.

अवांतर :- लेखाचे शिर्षक वाचुन आधी कोणा निग्रोवरचा लेख लिहिला आहे असे वाटले होते.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

आमचे राज्य

कुंदन's picture

8 Jul 2009 - 12:47 pm | कुंदन

लेकीला ९५ % मिळाले , बापाने काय दिवे लावले होते ते पण कळु द्यात जरा.
--
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?

अवलिया's picture

8 Jul 2009 - 1:18 pm | अवलिया

मास्तर ! एस ओ आर आर वाय !

लेख जमला पण विषय अजिबात पटला नाही.

अहो जर बापाला वाटत असेल तर त्याची लेक पहिली यावी आणि नाही आली म्हणुन जर तो नाराज होत असेल तर त्याच्या अशा नाराजीला नावे ठेवणारे आपण कोण? त्याला मारण्याच्या भलत्या गोष्टी करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? कायदा हातात घेवु नका !

फोकाने मारणे हे अती होत आहे. कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर आघात करणारे असले वर्तन आपणाकडुन अपेक्षित नाही. अजिबात अपेक्षाभंग झाला आहे माझा तुमच्या या असल्या विचारसरणीमुळे.

बापाने मुलीकडुन काय अपेक्षा ठेवाव्या? त्याने तिच्याशी कसे वागावे हे सांगणारे आपण कोण? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असे आपणास वाटत नाही का? अशा प्रकारे आपण त्यांच्या वर्तनावर आक्षेप घेवुन फोकाने बडवु लागलो तर आपल्यात आणि सामान्य जनांमधे काय फरक ? सांगा मास्तर! सांगा, काय फरक उरला ?

अहो ते सामान्यजन सुद्धा जुनाट कुठल्या दाखल्यांच्या आधारे कसे वागावे हे सांगत असतात आणि आपणही तेच करु लागलो तर भारताला २२ व्या शतकात कसे आणि कधी नेणार ह्या प्रश्नाने मी अतिशय व्यथित झालो आहे.

असो.

--अवलिया

काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! स्वतःला आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

विनायक प्रभू's picture

8 Jul 2009 - 1:29 pm | विनायक प्रभू

जेंव्हा भारतात येईल तेंव्हा ती मुलगी पोलीस स्टेशनमधे बापाला नेउन मेंटल टॉर्चर ची तक्रार करेल.
एक वेळ एक बाप म्हणुन एक लाफा मारला. विषय संपवला तर चालले असते. पण हा प्रकार भयानक.
जे २२ व्या शतकात आहेत तिथे नाही चालत हे.
फोकाने मारीन ही त्या वेळची क्षणिक ,व्यथित प्रतिक्रिया.
मी कोण मारणारा हो.
तुम्ही मुलीच्या चेहेर्‍याकडे बघितले असते तर स्वःत फोकाने मारायचा पुढाकार घेतला असता ह्याची मला खात्री वाटते.
तेवढे माणुस तुम्ही नक्कीच आहात.
इथे फोक म्हणजे वर्बल लॅशीग टू करेक्ट राँग अ‍ॅटीट्युड एवढे समजावे.
शेवटी त्याची पोर, त्याने जन्माला घातलेली.
काय पण करा.

स्वाती२'s picture

8 Jul 2009 - 5:15 pm | स्वाती२

सर त्या मुलीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्या बापाला खरच बडवा. या बाबतीत मी खूप भाग्यवान याची जाणिव तुमच्या लेखाने पुन्हा एकदा करून दिली.

विकास's picture

8 Jul 2009 - 7:19 pm | विकास

असल्या कोणाच्याही बाबतीत, "तुका म्हणे ऐशा नरा.." असेच वागले पाहीजे. वडील म्हणून काय जबाबदारी असते हेच न कळल्याचे हे द्योतक आहे. "बोल बाबी बोल" या नाटकाची आणि त्यावर आधारीत मालीकेची आठवण झाली.

सुदैवाने असला वैयक्तिक अनुभव मला घरच्यांकडून (आई-बाबांकडून) आणि माझ्याकडून आमच्या घरच्यांना (म्हणजे काही मार्क्सने बोर्ड जाणे वगैरे) आला नाही. (तसा मी लहानपणापासूनच मार्क्सवादी नाही ;) ). मात्र असल्या पद्धतीचे पालक मात्र मी बरेच पाहीले आहेत.

माझ्या वडीलांच्या कामामुळे असले समुपदेशन, त्या नावाने नाही, पण बर्‍याचदा त्यांना करायला लागायचे. आणि तो काळ असा होता (आता कसा आहे ते माहीत नाही, पण बदलला असावा) की सकाळी सात पासून रात्री दहा पर्यंत कधिही येऊन लोकं चर्चा करायचे. मग वडील कामावर असले तर थोडीफार आईशी पण आणि मग (जर कामावर भेटले नाहीत तर) परत येऊन घरी...मात्र पालकांची अ‍ॅक्झायटी लक्षात घेता आमचे दरवाजे उघडेच असायचे.

एकदा एका मुलाला चांगले मार्क मिळाले असले तरी सिव्हील इंजिनियरींगलाच प्रवेश मिळणार होता त्यामुळे त्याच्या आईच्या दृष्टीने जगबुडी होणार होती. तो बिचारा मुलगा गप्प असायचा. तीने किमान २-३ वेळेस येऊन विविध चर्चेत विचारले, "तुमचा मुलगा या ठिकाणी असता तर काय केले असते?" (तेंव्हा मी १०-११वीत असेन.) वडलांचे उत्तर साधे असायचे: "त्याला मी सगळे ऑप्शन्स सांगितलेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिखरावर हवा विरळ असते. अर्थात जितका (क्वालीटीने, कर्तुत्वाने) वर जाशील तितकी तुझ्याबद्दलची मागणी वाढेल, तुझ्या या कागदाच्या पुंगळीने नाही. इतके सांगून झाले असल्याने आता तो निर्णय घेईल आणि मी त्याला पाठींबा देईन." ते वास्तवातपण तसेच वागले. मात्र हे उत्तर अशा पालकांना कधीच पटले अथवा रुचले नाही.

मला वाटते मी आधीकधी येथे लिहीले असावे. पण एमाआयटी, हार्वर्ड अशा विश्वविख्यात संस्थांमधे प्रवेश मिळवताना खूपच काँपिटीशन असते हे सांगायला नको. प्रवेश अर्जाबरोबर निबंध लिहीणे पण महत्वाचे असते.तिथे जाउन कधी कधी तिथल्या समुपदेशकाला, प्राध्यापकाला पण भेटणे महत्वाचे असते. मात्र असे करत असताना त्यांना जर असे वाटले की पालक जास्त मधे मधे करत आहेत, तेच जास्त बोलत आहेत, तर त्या मुलाला/मुलीस प्रवेश मिळत नाही. कारण त्याचा अर्थ असा की जो मुलगा/मुलगी विद्यापिठात जात असताना देखील घरच्यांवर अवलंबून राहणार असेल तो/ती स्वतंत्र विचार कशी करू शकेल?

आपल्याकडे पालकांना खूप बदलावे लागणार आहे. वास्तवीक त्यासाठी समुपदेशन कोणी करते का?

रेवती's picture

8 Jul 2009 - 8:49 pm | रेवती

लेख आवडला, समजला.........म्हणजे चांगलाच समजला.
सर, एका फोकाने काय होणार हो?
अजून लागले तर कळवा, मोळीच पाठवून देते.
आपण मुलीकडून अपेक्षा केल्या.......समजा नाही पूर्ण झाल्या.......दु:ख झालं ना? आता मुलीला आधाराची गरज आहे.......तिच्या बापाकडून असलेल्या अपेक्षा कुठं पूर्ण होताहेत्?.......तिनंही बारश्यापासून काढलेले फोटो घेउन बसायचं का?
विकास यांचा प्रतिसाद आवडला. मला इतका संतुलित प्रतिसाद देता येणार नाही.

रेवती

स्वाती२'s picture

8 Jul 2009 - 8:50 pm | स्वाती२

>>आपल्याकडे पालकांना खूप बदलावे लागणार आहे.
हे असे पालक इथे अमरिकेतही असतात फक्त फरक इतकाच की भारतात जसं पालकांना आपलं मूल बोर्डात यावं, मेडीकल, इंजिनिर, एम.बी.ए. अशा रस्त्याने जावं अस वाटत राहत तस इथे मूल खेळात चमकावं ही अपेक्षा. मग कोवळ्या शरीराला न झेपणारा सराव, त्यातून होणारी दुखापत, गोल केला नाही म्हणून १००-१५० लोकांसमोर मुलावर ओरडणारा बाप हे सर्व बघायला मिळतं. मुलीने आपल्यासारख चिअरलिडर व्हाव म्हणून धडपड करणारी आई इथे पावलोपावली दिसते. ६-७ वर्षाच्या पोरींना या आया चक्क डायेट वर ठेवतात. मूर्ख आई-बाप सगळीकडे असतात.

रेवती's picture

8 Jul 2009 - 8:52 pm | रेवती

हो हे मात्र मी थोडंसंच, पण पाहिलयं.
आपल्याकडेही आपला मुलगा सचिन तेंडूलकर व्हावा असा अट्टाहास असतो.
रेवती

सखाराम_गटणे™'s picture

9 Jul 2009 - 10:33 am | सखाराम_गटणे™

>>आपल्याकडेही आपला मुलगा सचिन तेंडूलकर व्हावा असा अट्टाहास असतो.
त्यात काय अवघड आहे???/
नाव सचिन ठेवाय्चे आणि आडनाव बदलायचे.

ह. घेणे.

विकास's picture

8 Jul 2009 - 9:10 pm | विकास

>>आपल्याकडे पालकांना खूप बदलावे लागणार आहे.

"आपल्याकडे" म्हणल्यामुळे इतरत्र शहाणे आहेत असा गैरसमज होणे साहजीक आहे पण तसा उद्देश नव्हता. मात्र शिक्षणाच्या बाबतीत बोलणे चालले असल्याने साहजीक त्यात "आपल्याकडे" आले. सर्वगुणदोषांसहीत भारतीय (तसेच चायनीज) आईबाप हे मुलांच्या शिक्षणासंदर्भात जास्त कॉन्शस असावेत असे वाटते (हे वाक्य अमेरिकेसंदर्भात आहे).

लिखाळ's picture

8 Jul 2009 - 9:05 pm | लिखाळ

विचित्र आई-बाप, आपण स्वतः किती क्षमतेचे होतो हे न पाहता मुलांकडुन आपेक्षा ठवतात. सर्वजण वेगवेगळ्या क्षमतेचे आवडीचे-निवडीचे असतात ही समज त्यांना नसतेच.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

विकास's picture

8 Jul 2009 - 9:17 pm | विकास

>>>आपण स्वतः किती क्षमतेचे होतो हे न पाहता मुलांकडुन आपेक्षा ठवतात.<<<

या संदर्भात इंजिनियरींग विद्यालयांमधील (जेंव्हा मुंबईत दोनच इंजिनियरींग कॉलेजे होती) काही प्राध्यापक हे व्हायव्हा/तोंडी परीक्षा घेताना मुलांना अक्षरशः रडवायचे. अशा वेळेस दोन्ही विद्यालयात असे काही (विद्यार्थीप्रिय) प्राध्यापक होते जे जर त्यात जोडगोळीने बसले असले, तर एकदोन प्रसंगानंतर अशा तर्कट प्राध्यापकाला (जो या "चांगल्या" प्राध्यापकांचा कधी काळचा विद्यार्थीच असायचा अथवा तेव्हढा वयातला फरक!) उलट तांत्रिक प्रश्न विचारून उत्तर मागायचे. ते आले नाही की मग म्हणायचे तुला आज हे येत नाही आहे, तू विद्यार्थी असताना काय येयचे हे मला माहीत आहे, कशाला आता त्या मुलांना छळतोयस! :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jul 2009 - 9:26 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर खणखणीत लेख. ही समस्या कालातीत आहे. यावर पालकशिक्षण हा एकमेव उपाय. मला वाटते तुम्हालाही मुलांपेक्षा पालकांनाच जास्त समुपदेशन करावे लागत असेल.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

8 Jul 2009 - 10:30 pm | चतुरंग

मास्तर, 'येथे स्वस्त दरात फोकलून मिळेल' अशी पाटी लावून व्यवसाय सुरु करावा म्हणतोय! ;)

विनोदाचा भाग सोडा पण ही समस्या मी पालकांच्या मानसिकतेची आहे असे नक्की सांगतो.
एक अनुभव -
माझी आई गेली २० वर्षे बालवाडी चालवते. ४ ते ६ वर्षांची मुलं हा वयोगट. पालक अ‍ॅडमिशनला येतात तेव्हा प्रश्नोत्तरे साधारण अशी
पालक : मॅडम इथे तुम्ही काय काय शिकवता?"
आई : "खेळ, गाणी, गोष्टी, प्रार्थना, एकत्र डबे खाणे, चांगल्या सवयी".
पालक : "बास इतकंच! ए, बी, सी, डी, आकडे असं काही नाही?"
आई : "नाही! त्यांचं ते वय नाही. त्यांनी खेळायला हवं."
पालक: " अहो पण काँपिटिशन किती वाढली आहे. पुढे त्याला/तिला डॉक्टर/इंजिनिअर करायचं तर आत्तापासूनच अभ्यास नको का करायला?"
आई: " तुम्ही कधी अभ्यास केला होतात?"
पालक : " अं..नाही म्हणजे तसा उशिराच असेल पण आताचे दिवस..."
आई : "तुम्ही काय शिकलात? कुठे काम करता?"
पालक : बी. कॉम. बँकेत."
आई: "तुमचं स्वतःचं घर आहे?"
पालक : "हो. मागच्याच वर्षी फ्लॅट घेतला."
आई : तुमचं काही वाईट झालंय? तुम्ही पैसे मिळवताच ना?
पालक : नाही काही वाईट झालं नाही. हो मिळवतो.
आई : मुलांना तुम्हाला सुखी बघायचंय का दु:खी?
पालकः "काय बोलता मॅडम? अहो सुखीच!"
आई : "मग त्यांच्या वयाप्रमाणे एकेक गोष्टी त्यांना करूद्या त्यांचं जे काय व्हायचं आहे ते बरोबर होईल. तुम्ही फक्त लक्ष ठेवा. फोर्स करु नका!"
जवळजवळ १००% पालकांना पटतं. ज्यांना पटत नाही ते मान हलवत निघून जातात.
आईच्या शाळेतल्या पहिल्या बॅचची मुलं मुली आज ग्रॅज्यूएट आहेत २० वर्षात त्यातली बरीचशी अजूनही आईला रस्त्यात भेटली तर ओळखतात. निकालाचे पेढे द्यायला घरी येतात. इतकेच सांगतो.

चतुरंग

माझ्या बहीणीच्या मुलीला लहानपणी अंगात एकशे चार ताप होता.रात्री अडीच वाजताची वेळ.गोळी देऊन ताप कमी झाला. पण तिला शाळेच्या बाईंची आठवण झाली आणि नंतर तासभर रडून गोंधळ.रडं थांबेना तेव्हा नाईलाजानी बाईंना फोन केला.बिचार्‍या आल्या घरी. मग त्यांच्या हातून दूध पिणं ,गाणी म्हणणं वगैरे कार्यक्रम झाला.त्या सकाळी साडेचार वाजता घरी गेल्या.

चतुरंग's picture

8 Jul 2009 - 11:14 pm | चतुरंग

माझीही एक आठवण जागी झाली.

मी चौथीत होतो. ५ फेब्रुवारी १९७६. वसंतपंचमीचा दिवस. माझी मुंज होती. दुसर्‍याच दिवशी स्कॉलरशिपची परीक्षा. मुंजा मुलाने घराबाहेर जायचे नाही म्हणून दुसर्‍या दिवशीच्या परीक्षेसाठी शाळेत तयारी सुरु होती त्याला मला जाता आले नाही. मी हट्टच धरला की आमच्या रसाळ बाईंना मला भेटायचं आहे. आत्ताच आणी लगेच. बाई मुंजीला येणारच होत्या पण माझ्यासाठी त्या शाळेतला वर्ग संपवून आधी आल्या. आम्ही दोघे बराच वेळ बोलत होतो. त्यांनी माझा अभ्यास घेतला. मायेने माझी समजूत काढली की आज मुंजीमुळे तुला अभ्यासाला वेळ झाला नाही तरी काळजी करु नकोस उद्याची परीक्षा नीट होईल.
माझी समजूत पटली आणि उत्तम गुणांनी परीक्षेत पास झालो.
विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम हा शिक्षकांचा गुण विद्यार्थ्यांना आयुष्यभराची शिदोरी देऊन जातो!

(विद्यार्थी)चतुरंग

दशानन's picture

8 Jul 2009 - 11:18 pm | दशानन

>>>>
विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम हा शिक्षकांचा गुण विद्यार्थ्यांना आयुष्यभराची शिदोरी देऊन जातो!

१००% सहमत.

काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jul 2009 - 11:28 pm | बिपिन कार्यकर्ते

रामदास आणि चतुरंगच्या आठवणी मस्त आहेत. खूप काही शिकण्यासारखं आहे. माझी आई बरीच वर्षे पाळणाघर चालवत असे. त्यातली बहुतेक मुलं आता मोठी झाली आहेत. काहींची लग्नंही झाली आहेत नुकतीच. पण काकू बद्दल अजूनही प्रेम माया जिव्हाळा कायम आहे. एक मुलगी लहान असताना आजारी होती तर काकूच्या हातचा आमटीभात खायचा म्हणून आमच्या घरून डबा जात असे काही दिवस. नाव जरी पाळणाघर असले तरी तो एक संस्कारवर्गच होता.

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

8 Jul 2009 - 11:07 pm | यशोधरा

>>पुढे त्याला/तिला डॉक्टर/इंजिनिअर करायचं तर आत्तापासूनच अभ्यास नको का करायला?"

आँ??? बालवाडीतच?? :O

रेवती's picture

9 Jul 2009 - 1:53 am | रेवती

पालकशिक्षण हे व्हायलाच हवं पण बालवाडीतल्या आपल्या लगानग्यांना कुठले कपडे घालावेत याबद्दलही प्रशिक्षण वर्ग चालू करायला हवेत. थंडीच्या कडाक्यात पातळ, झिरझीरीत कपड्यात छान दिसते म्हणून आपल्या 'करिश्मा' नाव ठेवलेल्या मुलीला पाठवण्याचा पराक्रम केलेली आईही बघितली आहे. "आम्हाला परवडतात असे कपडे खरेदी करायला" असाही माज असतो.

रेवती

विनायक प्रभू's picture

9 Jul 2009 - 10:57 am | विनायक प्रभू

अहो हे निर्णय बारशाला किंवा पहील्या वाढदिवसाला घेतले जातात.
उदा: एखाद्या व्रात्य मुलाने केरसुणीची काडी पृष्ठ्भागाला टोचली रे टोचली कि कौतुकाने "डॉक्टर होणार वाटते" चे मुक्ताफळ येतेच.

विशाल कुलकर्णी's picture

9 Jul 2009 - 12:00 pm | विशाल कुलकर्णी

आहात कुठे? आजकाल लग्न व्हायच्या आधीच दोघात चर्चा होते...
ए मुलगा झाला तर त्याला डॉक्टर बनवायचे हा, अगदी गेला बाजार इंजिनीअर तरी झालाच पाहीजे सांगुन ठेवतो.
आणि मुलगी झाली तर मी तिला मॉडेल बनवणार, गेला बाजार एअर होस्टेस तरी नक्कीच..!

हे राम !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

विसोबा खेचर's picture

8 Jul 2009 - 11:48 pm | विसोबा खेचर

त्या मुलीचा बाप चुत्या आहे साला! :)

तात्या.

टारझन's picture

8 Jul 2009 - 11:56 pm | टारझन

=)) =)) =))

वेताळ's picture

9 Jul 2009 - 11:28 am | वेताळ

प्रथम आलेल्या मुलीचे फोटो व मुलाखती जमवत होता. कशाला ?त्याला मिरवायला मिळाले नाही म्हणुन साला दु:खी झाला असेल.
फोकच कशाला पाहिजे. तात्याने लावलेल्या कोल्हापुरीचा वापर करा मास्तर.
वेताळ

ऋषिकेश's picture

9 Jul 2009 - 1:33 am | ऋषिकेश

फफोक! काय हा बाप! :(

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2009 - 2:03 am | मिसळभोक्ता

मला शीर्षक बघून आधी बंगाली लेख आहे असे वाटले.

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)