केल्याने होत आहे रे आधी....

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
7 Jul 2009 - 9:04 am

Congratulations
You are too young for the job.
But I have relied on my experience and instincts to select you.
Do not disappoint me.- साहेब.
Yes Sir, I will try my best.मी
____________________________________________________________
१९७२ साली World Health Organisation मधे निवड झाल्यावर साहेबांबरोबरचा पहीला संवाद. आई जाउन २० दिवस झाले होते. इंजीनियरिंग, पायलट वगैरे स्वप्ने राख झाली होती. इंजीनीयरीग चा वर्षाला ५ हजार परवडणार नव्हते, तर पायलट्चे महीना ५ हजार परवड्ण्याचा प्रश्नच नव्हता. बी.एस्.सी करता करता नोकरी करायचे ठरवले. आठ तासाचे कॉलेज, सहा तासाची नौकरी. शीकतो आहे म्हणुन दोन तासाची सुट.
Do you know typing?. If not, you have about 10 days to learn it. Althouh its not job requirement, It will be better if you know it.
I will try. मी
साहेबांनी चेहेरा वाकडा केला. आणि त्यानंतर आयुष्यभर न संपणारा ठेवा हातात दीला.
त्यांनी टेबलवरचे एक पेन हातात घेतले आणि मला म्हणाले, "ट्राय टु टेक धिस पेन फ्रॉम माय हॅड."
मी पुढे झालो आणि ते पेन हातातुन काढून घेतले.
तू फक्त प्रयत्न करतोस म्हणाला होतास. -साहेब
परत करुया हा प्रयोग.
त्यांनी परत हातात पेन घेतले आणि म्हणाले " कर प्रयत्न"
मी हात पुढे घेतला, पेनाला हात लावला, परत ठेवले, परत अर्धवट घेतले, परत ठेवले.

साहेब हसले, " कळले का तुला, तु जेंव्हा प्रयत्न हा शब्द वापरतोस तेंव्हा एक गोष्ट नक्की होते ती म्हणजे अपयश. तहान लागली की आपण पाणी पितो. प्रयत्न नाही करत पिण्याचा. पितो. भुक लागली की खातो. खाण्याचा प्रयत्न नाही करत. खातो. You are allowed to use word try only in two places.1. when you want to loose your virginity 2. 1st day of marriage.ये दोन तारखेपासुन कामावर.

दोन तारखेला परेल ला ऑफिसमधे पोचल्यावर एक कागद टेबलवर तयार होता टाईपींग साठी.
३ महीन्याचा कोर्स मी दहा दिवसात पुर्ण केला होता.
साहेब पोचण्याच्या आधी बिनचुक टाइप करुन टेबलवर ठेवले.
त्यानंतर परत टाइप राईटरशी संबध आला नाही.
हा प्रयोग मी माझ्या शाळेच्या कार्यक्रमात न चुकता करतो.
मुलांना निरोप बरोब्बर पोचतो.
जाता जाता: टारझन चा "न "चा "ण "बघुन बघुन रामदास म्हणाले मास्तर"ल "चा "ळ" करा. निरोप लौकर पोचेल.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

सहज's picture

7 Jul 2009 - 9:52 am | सहज

चांगळा ळेख ळीहायचे तुमचे प्रयत्ण असेच चाळू ठेवा, णक्की जमेळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2009 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, या लेखातून काय बोध घ्यायचा काय कल्लं नाय ! :(

पेन घेतले...अर्धवट घेतले...परत ठेवले...नौकरी पक्की झाली... ~X(

येऊ दे अजून..!!! (|:

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

7 Jul 2009 - 9:55 am | विनायक प्रभू

प्रयत्न करायचा नाही.
करायच.

वाटाड्या...'s picture

7 Jul 2009 - 9:58 am | वाटाड्या...

मेसेज तर मिळाला (का मिलाळा ?) ;)

पण हे नाय कलळं "जाता जाता: टारझन चा "न "चा "ण "बघुन बघुन रामदास म्हणाले मास्तर"ल "चा "ळ" करा. निरोप लौकर पोचेल."

वाटाड्या...

पक्या's picture

7 Jul 2009 - 1:54 pm | पक्या

काय हे वाटाड्या भाऊ ! शिर्षकात ल च्या जागी ळ ठेवा म्हणजे कळेल आणि तरीही नाही कळाले तर बसा डोके खाजवत. ;)

मास्तर उपयुक्त मेसेज. करायचेच म्हटले एखादी गोष्ट तर नक्की होते पण करतो , बघतो प्रयत्न करून म्हटले की चालढकल , अळंटळ्म होते असा बरेचदा अनुभव आलेला.

नितिन थत्ते's picture

7 Jul 2009 - 10:11 am | नितिन थत्ते

प्र का टा आ.
लिहायचे नाही असे ठरवले असूनही लिहिले. काढून टाकले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jul 2009 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

गुर्जी एका वाक्यात भावना पोचल्या.

जबरदस्त लेख. :)

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

7 Jul 2009 - 12:12 pm | प्रकाश घाटपांडे

केल्याशिवाय कसं व्हनार? आन झालय म्हजी कुनीतरी 'केल' असनारच ना? कंची बी गोष्ट आपाक नाय व्हत. काईतरी कार्यकारन भाव अस्तोयच ना. हा आपन फक्त त्यो शोदायचा
ल चा ळ नको ब्वॉ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

7 Jul 2009 - 1:25 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ

--अवलिया

काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Jul 2009 - 4:05 pm | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ

--अवलिया

असेच म्हणतो!

-- टिंग्यालिया