कुरुक्षेत्र

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
3 Jul 2009 - 12:41 pm

मास्तरने आजवर महाभारताबद्दल पुस्तकात वाचलेले आणि मोठ्यानी (बी. आर. चोप्रा) सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता. मिपावर आल्यानंतर त्याच्या भोळ्या मनाल तडा गेला. मिपा वरच्या काही सद्स्यानी त्याने ५० वर्ष बाळगलेल्या कल्पनांचा चुराडा केला. 'साडी सप्लाय", करुन गेला गाव आणि देवांचे नाव (पांडव जन्म) व इतर कल्पनांच्या मिपावरच्या खुलाशांनी मास्तरखंतावला.
___________________________________________________________
शेवटी अर्जुन कुरकुर करत एकदाचा युद्धाला तयार झाला.कृष्ण घाम पुसत आत्ता येतो म्हणून रथ आणायला गेला.अर्जुनानी धार लावायचा
दगड घेऊन बाणांना टोकं काढायला सुरुवात केली. बाण घासता घासता त्याच्या लक्षात आलं की धनुष्याची दोरी लावायची राहीली. मग त्यानी दोरी घेऊन पिळायला सुरुवात केली .आणि मागून हाक आली "मग करायची का सुरुवात"?
अर्जुन दचकला.टँव असा आवाज करत मास्तर त्याच्या पुढे उभे राहीले.
स्साला एक स्मुपदेशक पिळून गेला तो दुसरा हजर.
मास्तर म्हणले माझं स्मुपदेशन ऐकशील का?
फुकट आहे.
त्याची जाहीरात पण मी फुकटात करतो.
कपाळला हात लावत अर्जुन म्हणाला "बोंबला ".
मास्तरानी धनुष्य त्याच्या हातातून काढून घेतलं.
टँवकन आवाज काढत म्हणाले नाही ब्वॉ, पिळ थोडसं अजून
तुला माहीती आहे का?लांबडा इज इक्वल टु .. हीअर लांबडा= फ्रीक्वेन्सी
अर्जुन मॅडच झाला म्हणाला "ए मास्तरा मला काय अ‍ॅडमिशन नाय घ्यायची"
लवकर कायते बोल ब्बाबा.
तु कोणासाठी लढतोयस रे बाबा.
घरी जा .
का म्हणून ?
आताच भगवंत म्हणाले
काय म्हणाले ..मास्तर बेल वाजवणारच होते
ज्यानी तुझं समुपदेशन केलं ना त्याला सांग आधी तुझ्या यादंवाना शिकवं अक्कल नाहीतर पुढच्या युगात फक्त पार्लमेंटात युद्ध करतील किंवा अपहरणाचा खेळ करत राहतील.
हे बघ
(मास्तरानी बाणाच्या टोकानी दात कोरत एक चिकनचा तुकडा लांब उडवला.)
अर्जुनानी मान डोलावली.
काय बघू
एक तर तुमच्या घरातला हा गोंधळ तुम्हीच निस्तरायचा सोडून बाहेरच्या ओंबड्समनला तुम्ही आणलच कशाला ?
आधी तो समुपदेशक आणि त्यातून ओंबड्स्मन ...म्हणजे करेला और नीम चढा.
काय रे ही इस्टेट काय तुमच्या बापानी बनवली होती का रे ?
बाबानो भांडाल तर पुढचा जन्म खाडीची जमीन विकण्यात वाया जाईल. "त्या ब्रिटीशाला विचार" असं म्हणत मास्तर ब्रिटीशाला बोलावणार तेव्हढ्यात अर्जुन म्हणाला जाउ द्या ना मास्तर
एकदा तुमच्या हातात माईक दिला की तुम्ही सोडतच नाही
अरे आम्ही काय लहान मुलं आहोत का ?पण समोरची पार्टी ऐकतच नाही त्या आपण काय करणार ?
आता त्याला आंधळ्याची पोरे आंधळी म्हणुन उंगली करायचे काम होते का तुम्हाला?
पाण्यात पडल्यावर पहील्या माळ्यावरुन फिदिफिदी हसल्यामुळे हा राडा पुढे वाढला. मास्तर म्हणाला,
अरे मांडवली करायची .आतापासून तयारी करा पुढच्या जन्मात इलेक्षनच्या सीट ,मतदारसंघ वाटून घ्यायचे आहेत .लक्षात आहे ना ?
बाबा रे तो तुझा समुपदेशक म्हणजे मोहल्ला कमीटीचा अध्यक्ष आहे. मतदान झालं की हात झटकून मोकळा.
पण समोरची पार्टी ...
अरे पार्टी गेली ...
हे बघ आत्ता नाही मांडवली केली तर पुढच्या जन्मात तू मलेशीयाला आणि समोरची पार्टी दुबईला आणि तुमची एरीआ भलत्याकडे जाईल. तुला ना मला घाल कुत्र्याला.
अर्जुनानी गच्च बांधलेली दोरी परत मोकळी केली आणि म्हणाला मग मी करू तरी काय ?
हांगाशी आत्ता कसा बोललास मास्तर म्हणाला.
हे बघ ह्या युद्धाच्या भानगडी कशासाठी ?
जमीनीसाठी आणि काय ?
आता तू कोणाच्या भरवशावर काम करणार हे ?
आमचे बंधू आहेत ?
मास्तर खवळलाच.
म्हणजे तुझा दादा ना ?
मुर्खा... एक नंबरचा जुगारी तो.आता तू करणार युध्द .क्रेडीट त्याला .परत जुगार खेळून गावभर उधार्‍या करायला तो मोकळा.
नाही तसं नाही आमचा दुसरा भाऊ आहे ना ?
कोण तो पैलवान ?तो तर रेम्याडोक्याचा आहे.वरचा मजला रीकामा .त्याला अजून माहीती नाही की द्रौपदीचा पहीला चोईस अर्जून आहे.
त्याला कळलं ना तर गदा घेऊन चेचून काढेल तुझ्या.....मास्तर मॉडेस्टीखातर थांबलाच.
अर्जून मात्र मुद्दा पटल्यासारखा मान डोलवत होता.
आता राहीले ते दोन धाकटे ?
त्यांना मॉडेलींग खेरीज आणखी काही जॉब नाही .दिसायला बरे आहेत म्हणून नाहीतर पुढच्या जन्मात किशन कुमार झाले असते.
तु कंपनीचा तसा बघायला एकच शार्प शुटर, बाकी सगळे नावाचेच.
आता मात्र अर्जुन कान देऊन ऐकायला लागला.
त्याचं काय आहे मास्तर द्रौपदी आणि मी युध्द संपल्यावर वेगळच बिर्‍हाड करणार आहोत.
मास्तरानी वैतागून एक बाण मोडला आणि मातीत काहीतरी गणित मांडायला लागले .
हे बघ , ज्या बायलीच्या नादाला तू लागतो आहे ती आहे शेअर्ड फॅसीलीटी .तुझा मोनोपली आयटम नाहीय्ये तो.
त्यापेक्षा बाकीच्या बायका घे साउथमध्ये जा जमीनीत भराव टाक. नविन लाईन टाक.
अर्जुनानी बाण भात्यात भरायला सुरवात केली.
मास्तर खूश झाला .बघ तुला बाणात वगैरे इंटरेस्ट आहे ना ?
तू शिवकाशीला जा आणि बाणांची फ्याक्टरी टाक.
पण आईला काय सांगू ?
आईला काय सांगायचं .आता ती म्हातारी राहील आळीपाळीनी तुमच्या पाच भावाकडे.
आणि लक्षात ठेवा एक गोष्ट.जिथे द्रौपदी असेल तिथे म्हातारी नसेल हे करा. नाहीतर सासूसुनेच्या भानगडीत अ‍ॅलोटेड स्लॉट वाया जाईल.
नाही मास्तर तुम्ही म्हणता आहे ते ठिकच आहे.पण आईला नाही आवडणार नाही.
काय नाही आवडणार .एक तर तिच्या लग्नाआधीच्या प्रतापामुळे ह्या सगळ्या भानगडी झाल्या.
'संकट विमोचन केंद्रात' जायची सोय होती की.
तुमचा बाप झूरून मेला.म्हणून तुम्ही पाच च
नाहीतर तुमच्या चुलत्याकडे बघ.
तो बिचारा आंधळा पण बायकोनी पट्टी बांधून घेतली आहे.दिवसरात्रीतला काही फरक तो कळतच नाही झाली की नाही फटाफट शंभर पोरं ?
अर्जुनानी आता पायातल्या बुटाच्या नाड्या सोडायला सुरुवात केली .
पण मास्तर मामाला काय सांगू ?
मामाची चिंता सोड मी आहे तोपर्यंत तो इकडे फिरकायचा नाही.एक समुपदेशक असताना दुसरा तिकडे फिरकत नाही.प्रोफेशनल कर्टसी आही बाबा .
मास्तर सिगरेटच्या चटक्यानी जागा झाला.च्यायला आजकाल दुसर्‍या पेगातच गाडी उलाल व्हायला लागली आपली.
साहेब बील .वेटर नम्रपणे उभा होता.
मास्तरेनी खिसे चाचपले .कार्ड चालेल का ?
चालेल ना .
कार्ड देता देता मास्तरनी वेटरला विचारलं काय रे तुझं कोणी समुपदेशन केलं की नाय ?
वेटर लाजला .गेल्या महीन्यातच केलं मास्तर.ठाण्याला मुक्ती लॉजमध्ये .पण आता थोड चालायला त्रास होतोय.
मास्तरची नशा एकदम उतरली ,वा.वा. चल आता तुला मी प्रतिबंधकाच्या उपकरणाबद्द्ल समुपदेशन करतो.
आधी नाव काय ते सांग .
अर्जुन पांडूरंग.....
मास्तरची नशा खाली उतरली.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

3 Jul 2009 - 1:03 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ

--अवलिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Jul 2009 - 1:19 pm | घाशीराम कोतवाल १.२

लगे रहो मास्तर !
लहे रहो मास्तर !!
आज सकाळी सकाळी धुवांधार बॅटिंग चालु आहे
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

धमाल मुलगा's picture

3 Jul 2009 - 1:34 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

बाझवला तिच्याआयला!! मास्तर म्हणजे खरच अशक्य रसायन आहे होऽऽ!!!!!
काय एकेक पंच काढलेत..वाचता वाचता आम्ही पार खटक्यावर बोट आन् काटाकिर्र होऊन गेलो राव. :)

पण...मजाक मजाक मध्ये मास्तरनं बरंच काही गंभीर सांगुन टाकलं. जियो मास्तर! यु आर ग्रेट!!!

-(पालथी समुपदेशनं करणार्‍या किस्नाचा पेंद्या) ध मा ल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

नितिन थत्ते's picture

3 Jul 2009 - 2:33 pm | नितिन थत्ते

मास्तर, हे बराय.
आधी काहीही ही आणि हि लिहायचं आणि नंतर नशेत्/स्वप्नात म्हणायचं.

पण आवडलं. =))

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू's picture

3 Jul 2009 - 2:43 pm | विनायक प्रभू

पैलवान,
मिपावर वाचले, सांगितले गेले त्याला मी फक्त शब्द दीलेत.
आता नावे सांगितली की राडा होईल.

अवलिया's picture

3 Jul 2009 - 2:53 pm | अवलिया

होवुन जावु द्या... बोला नावे पटापटा

--अवलिया

विनायक प्रभू's picture

3 Jul 2009 - 3:11 pm | विनायक प्रभू

तुम्हीच.
जुहु चौपाटीवर महाभारातावरचे स्मुपदेशन विसरलासा.
आण्खी एक तै. आजकाल दिसत नाहीत.
त्यामुळे त्यांच्याविषयी न बोललेले बरे.

अवलिया's picture

3 Jul 2009 - 3:26 pm | अवलिया

आर्रर्रर्र माझे नाव नका घेवु खरड टाकायला विसरलो बर का!

--अवलिया

घाटावरचे भट's picture

3 Jul 2009 - 2:50 pm | घाटावरचे भट

आयला, धमाल आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jul 2009 - 3:34 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा वा गुर्जी.

अचुक बाण मारलेत हो ;) लै लै म्हणजे लैच आवडुन गेले आपल्याला दे धक्का लिखाण.

असो... ते तुम्हाला असे स्वप्न पडले होते ह्याला पुरावा काय ?

º°¨¨°º© परालिया ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सहज's picture

3 Jul 2009 - 3:47 pm | सहज

हेच म्हणतो.

बारमधला एक फोटो तरी टाकायचा मास्तर.

धमाल मुलगा's picture

3 Jul 2009 - 3:58 pm | धमाल मुलगा

वा र लो !!!
=)) =)) =))
ओ साहेब, काय जीव घेता का आज? झक मारली आणि पाणी पिताना हा प्रतिसाद वाचला....तोंडात पाणी...नाकात पाणी...बाटलीत पाणी.....पार गुदमरलो ना ठसक्यानं!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

सँडी's picture

3 Jul 2009 - 10:42 pm | सँडी

जबरा!!!
:? :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2009 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, थोडं कळलं थोडं नाय कळ्ळं :(
पण लिव्हित राव्हा ! :)

-दिलीप बिरुटे
(आपला संसारात दबलेला अर्जून)

वेताळ's picture

4 Jul 2009 - 10:58 am | वेताळ

बाकी तुम्ही लिहित रहा.

वेताळ

अनंता's picture

4 Jul 2009 - 2:20 pm | अनंता

बाबांनो भांडाल तर पुढचा जन्म खाडीची जमीन विकण्यात वाया जाईल. "त्या ब्रिटीशाला विचार" असं म्हणत मास्तर ब्रिटीशाला बोलावणार तेव्हढ्यात अर्जुन म्हणाला जाऊ द्या ना मास्तर.
अशी बरीचशी उदा. पाहण्यात आहेत. टोला छानच.
बाकी लेख अजून समजून घेतो आहे.

एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)