भारताचा डेट्रॉईटमधे चंचूप्रवेश

विकास's picture
विकास in काथ्याकूट
24 Jun 2009 - 6:41 pm
गाभा: 

मिशिगन राज्यातील डेट्रॉईटला अमेरिकेची गाड्यांच्या उद्योगाची राजधानी मानले जाते. फोर्ड, क्रायस्लर, जनरल मोटर्स सर्व येथे आहेत. पण मुख्य मुद्दा हा प्रवासी गाड्या तयार करण्यात आणि त्याहीपेक्षा जास्त वापरण्यात अमेरिका जगाच्या (नको इतकी) पुढे आहे. अर्थात म्हणून ती गाडी/वाहन उद्योग धंद्यास मोठी बाजारपेठ आहे. मात्र येथील सेफ्टी आणि पर्यावरणीय कायदे पाळत गाडी तयार करणे हे खर्चिक आहे, सोपे नक्कीच नाही.

सीएनएन वर आत्ताच "Indian automakers aim to eat Detroit's lunch" वाचल्याप्रमाणे वर्षाअखेरीपर्यंत महिंद्रचे डिझेलवर चालणारे ट्रक्स येथे दिसायला लागणार आहेत. ३५० वितरकांनी आधीच करार केले आहेत. येथे उपलब्ध असलेल्या ट्रक्सपेक्षा अधिक पॉवर, अधिक माइल्स पर गॅलन आणि येथील पर्यावरणीय कायद्यात बसणार्‍या गाड्या स्वस्त किंमतीत उपलब्ध केल्या जाणार आहेत.

अर्थात ही भारतीय कंपन्यांसाठी मोठी चाचणी ठरणार आहे - प्रॉडक्टसंदर्भात, व्यवस्थापनसंदर्भात, आणि आफ्टरसेल्स संदर्भात.

२०११ साली नॅनोपण अमेरिकेत प्रवेश करणार आहे.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jun 2009 - 7:08 pm | बिपिन कार्यकर्ते

की, बातमी खूपच महत्वाची आहे. आणि भारतीय कंपन्यांसाथी ही एक खूप मोठी परिक्षा ठरणार आहे. प्रॉडक्ट, व्यवस्थापन आणि आफ्टरसेल्सच्या बरोबरीने धंद्यातले राजकारण वगैरे पण सांभाळावे लागेल त्यांना. कळेलच लवकर. अब दिल्ली दूर नही...

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

24 Jun 2009 - 11:36 pm | श्रावण मोडक

सहमत. ट्रक : अमेरिकन की भारतीय संदर्भात? दोन्ही वेगळे असतात ना? म्हणजे तिथे विशिष्ट कारनाही जीपसारख्या ट्रक म्हणतात असे काही ऐकले आहे.

छोटा डॉन's picture

25 Jun 2009 - 9:05 am | छोटा डॉन

>>ट्रक : अमेरिकन की भारतीय संदर्भात? दोन्ही वेगळे असतात ना?
बरोबर, दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत.
आपले ट्रक म्हणजे उगीच आपले चिंगळुसे मुन्शिपाल्टीचे कचरा उचलणारे वहान अथवा सरदारजींना बसायला/उठायला/झोपायला असावे म्हणुन तयार केलेली सोय ....
त्यांचे म्हणजे फारच अवाढव्य , आपल्या लोणावळ्या/खंडाळ्याच्या घाटात व्यवस्थित टर्नसुद्धा घेणार नाही असे ...

>>म्हणजे तिथे विशिष्ट कारनाही जीपसारख्या ट्रक म्हणतात असे काही ऐकले आहे.
होय, हे ही बरोबर आहे.
जी एम ने एक "हमर" नावाचे पेट्रोल खायचे यंत्र बनवले होते, त्याला काही लोक हौसेने ट्रक म्हणत.
लँड रोव्हरचे ही काही ट्रक्स आहेत बाजारात ...

बाकी विकासरावांचा लेख मस्त ...
माहिती महत्वाची व मनोरंजक वाटली, पण हे ट्रक म्हणजे आपल्याकडच्या "निमी पिक-अप व्हॅन्स अथ्वा ट्रक " आहेत हे लक्षात घ्यावे, आपण नॉर्मल ज्याला ट्रक समजतो तसा हा प्रकार नाही.
हे मिडसाईज सेगमेंटमधले आहे ...

महत्वाचा मुद्दा असा की "डिसेल व्हर्जन" तिकडे लाँच होणार आहे.
अर्थात इथे ट्रॅक्शन अ‍ॅडव्हँटेज मिळाला तरी डिसेलची उपलब्धता किती आहे ह्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, कारण अमेरिकेत डिसेल अ‍ॅप्लिकेशन्स ही फक्त खासकरुन "कमर्शियल आणि हेवी अ‍ॅप्लिकेशन्स"साठीच वापरली जातात ...
बाकी डिस्साईन, प्रोडक्सन, मार्केटिंग वगैरे बाबी संभाळता येतील ...

मातर अमेरिकन मानसिकता लक्षात घेऊन "विक्री पश्चात सेवा" हे गुणोत्तर जमवायला महिंद्राला कष्ट करावे लागतील, तिकडे थोदे काय बिघडले की कोर्टात जातात म्हणे.... ;)

बाकी सविस्तर सवडीने ... ;)

------
(पुणेरी टांगेवाला)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

संदीप चित्रे's picture

25 Jun 2009 - 1:25 am | संदीप चित्रे

>> बातमी खूपच महत्वाची आहे.
असेच म्हणतो.
नॅनो येणार असा विषय परवाच एका मित्राशी बोलताना निघाला.
आता एकदा एम ८०, स्कूटर आणि बाईक आली की जवळपास फिरायला बरं पडेल ... मग पुढची पायरी म्हणजे 'रिक्षा'... घरातून बाहेर पडलं की ,"रिक्षा !" म्हणून हाक मारायची आणि ओक ट्री रोडला जाऊन भेळ, वडा-पाव असं काही एन्जॉयून घरी परतण्यासाठी पुन्हा एकदा हाक मारायची, "रिक्षा !"
(ये मुंगेरीलाल के हसीन सपने सच होवो रे बावा !)

विकास's picture

25 Jun 2009 - 3:59 am | विकास

>>>मग पुढची पायरी म्हणजे 'रिक्षा'

रिक्षा आणाल हो, पण पुणेरी रिक्षेवाल्याची सर थोडीच येथे येणार! :)

सुनील's picture

25 Jun 2009 - 7:07 am | सुनील

इंग्लंडमधील ब्रायटन ह्या नगरात एकाने रिक्षाचा व्यवसाय सुरू केल्याची बातमी सुमारे दोन वर्षांपूर्वी वाचली होती. दारे, सीटबेल्ट वगैरे लावलेल्या त्याच्या रिक्षाचे फोटोदेखिल पाहिले होते. गेल्या वर्षी ब्रायटनला जाण्याचा योग आला होता परंतु ती रिक्षा मात्र शोधूनही सापडली नाही!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिरत भिरभि-या's picture

24 Jun 2009 - 7:11 pm | अभिरत भिरभि-या

ही भारताची प्रगती म्हणायची का अमेरिकेची अधोगती... का बहुतेक दोन्ही थोडे थोडे ??
अवांतर : अमेरिकेचे उतरते साम्राज्य भारताला कसे डोकेदुखी ठरू शकते यावरचा प्रा वैद्यनाथन यांचा
हा एक वाचनीय लेख
अभिरत

सहज's picture

25 Jun 2009 - 7:09 am | सहज

भारतीय वाहन उद्योगाला शुभेच्छा. बघुया काय होतेय.

प्रतिसाद मजेदार आहेत. :-)

अमेरिकन बाजारात त्याना कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणे महत्वाचे आहे.मुळातच अमेरिकन कंपन्या इतक्या मोठ्या,व सुप्रसिध्द असताना कोसळल्या कशा हेच कळत नाही. ह्यावर जरा प्रकाश टाकला तर उत्तम होईल.

वेताळ

विकास's picture

25 Jun 2009 - 6:26 pm | विकास

>>>अमेरिकन बाजारात त्याना कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणे महत्वाचे आहे.मुळातच अमेरिकन कंपन्या इतक्या मोठ्या,व सुप्रसिध्द असताना कोसळल्या कशा हेच कळत नाही.<<<

हा मोठा विषय आहे आणि यावर अनेक पद्धतीने लिहीता येऊ शकेल. पण एका ओळीत, दोन शब्दात वगैरे लिहायचे झाले तर - "विचारातला (अ‍ॅटीट्यूडमधील) फरक".

हा फरक कसा याचे एक साधे उदाहरण माजी उपराष्ट्राध्यक्ष अ‍ॅल गोर यांनी त्यांच्या गेल्या वर्षातील अमेरिकन कॉंग्रेसमधील पर्यावरणीय बदलाच्या संदर्भातील समितीसमोर सांगितले: (आठवणीवर आधारीत) "नव्वदच्या दशकाच्या सुरवातीस क्लिन एयर अ‍ॅक्टमधे" बदल झाले. त्यामुळे तसेच क्योयोटो प्रोटोकोलमुळे वाहन (कार) उद्योगांना गाड्यांच्या घडवणीत (मॅन्युफॅक्चरींग) मधे अनेक कायदेशीर बदल घडवून आणावे लागणार होते. आमच्या वाहन उद्योगांनी काय केले? - लगेच ५० वकीलांची फौज तैनात केली आणि त्यांच्या शुल्कांमधे पैसे गुंतवले. आणि जपानी (विशेष करुन होंडा, टोयोटा) वाहन उद्योगांनी काय केले? - लगेच ५० अभियंता-शास्त्रज्ञांची फौज तैनात करून नवीन प्रकल्प तयार केले आणि त्यात पैसे गुंतवले."

या धोरणामुले नजीकच्या भविष्यात अमेरिकन उद्योग यशस्वी ठरला तर दूरच्या भविष्यात...

सुनील's picture

25 Jun 2009 - 10:48 am | सुनील

अगडबंब पण अकार्यक्षम आणि महाग अमेरिकन गाड्यांना जपानने अधिक कार्यक्षम गाड्यांचा पर्याय ८० च्या दशकात दिला होता. भारतीय कंपन्यांपुढेदेखिल तेच आव्हान आता आहे.

ताशी शंभर मैलांपेक्षाही अधिक वेगाने बराच काळ विनातक्रार धाऊ शकणारे इंजिन, सुरक्षित बॉडी, आकर्षक अंतर्गत सुविधा यांचबरोबर उत्तम विक्रीपश्चात सेवा (कित्येक भारतीय कंपन्यांना असे काही असते हे ठाऊकच नाही!) दिली तर भारतीय गाड्यादेखिल मोठ्या दिमाखाने अमेरिकेतील फ्रीवेवरून दौडू लागतील!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विंजिनेर's picture

25 Jun 2009 - 11:16 am | विंजिनेर

महिंद्रा, टाटा इ.ना अमेरिकेच्या मंदी आणि दिवाळखोरींनी कमकुवत झालेल्या वाहन-बाजारपेठेत प्रवेश करण्याची ही योग्य वेळ आहे हे खरे आहे पण त्यांची ट्टकर फार पूर्वी येऊन स्थिरावलेल्या टोयोटा/निस्सान इ. जपानी आणि चिनी उपर्‍यांशी आहे - बल्याढ्य जनरल मोटर्स्/क्रायस्लर इ. शी नव्हे.
अजुन एक म्हणजे हा बाजारपेठेतला प्रवेश प्रदीर्घ काळासाठी केलेल्या गुंतवणुकीची केवळ (छोटी) सुरुवात आहे.

त्यात उत्तमोत्तम गाड्या तयार करणे, / अमेरिकन गिर्‍हाईकाची नस ओळखून नवनवीन मॉडेल बाजारात आणणे हे तर आहेच पण वाहन उद्योग अमेरिकेत अती संवेदनशील आहे, त्याची प्रचंड मोठी लॉबी सुद्धा आहे. त्यांना जिंकून घेणे सुद्धा आलेच. तेव्हा उत्पादन/रोजगार अमेरिकेबाहेर गेल्यानंतर जो विरोध होणार त्याला तोंड देणे सोपे नाही.
(भारतात सिंगूर मधे ह्याच्या उलट परिस्थिती आहे म्हणा . इथे लोक रोजगार नव्या कारखान्याच्या रूपाने आपल्या पायांनी चालत आला तर विरोध करतात. असो. :) )
शिवाय विक्रीपश्चात सेवा, विक्रीपूर्व जाहिरात हे एकूणच फार मोठ्या प्रमाणात आहे. धंदा वाढवायचा म्हटले की प्रस्थापितांना टक्कर देणे येतेच म्हणा..

पिवळा डांबिस's picture

26 Jun 2009 - 3:11 am | पिवळा डांबिस

मला वाटतं की इथे ट्रक्स म्हणजे पिक-अप ट्रक्स असा संदर्भ असावा....
असे डिझेलवर चालणारे अनेक कंपन्यांचे (त्यात काही अमेरिकनही) ट्रक्स उपलब्ध आहेत. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतीय वहानांना फोर्ड/ जीएम्-ख्रायस्लर नव्हे तर जपानी आणि कोरियन वहान कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे...
बाकी कसाही असला तरी सर्वसामान्य अमेरिकन हा आपल्या गाडीच्या बाबतीत खूपच चोखंदळ असतो. फक्त किंमत कमी पडते म्हणून तो क्वालिटी, आराम आणि आफ्टरसेल सर्विस काँप्रोमाईज करेल असे मला वाटत नाही. इथे नव्या गाडीला कमीतकमी तीन वर्षांची वॉरंटी असते. त्यादरम्यान गाडीला काही झालं तर ते विनाचौकशी फुकट दुरुस्त करून दिलं जातं. हे सर्व भारतीय कंपन्यांनाही पाळावं लागेल. त्यानिमित्ताने त्यांच्या मनोवृत्तीमध्ये चांगला बदल घडेल ही आनंदाची गोष्ट!
बाकी नॅनो इंटरस्टेट हायवेवरून कशी काय धावते हे पहायला मी उत्सुक आहे!!!

नॅनोला टेलगेट करायची इच्छा बाळगणारा,
पिवळा डांबिस
:)

अनामिक's picture

26 Jun 2009 - 5:43 am | अनामिक

>>नॅनोला टेलगेट करायची इच्छा बाळगणारा,

:D :D :D
म्हणजे तुम्हाला फ्रीवेवर लोअर स्पीड लिमिट पेक्षाही कमी स्पीडने कार चालवल्याचं तिकिट मिळेल!

-अनामिक

मराठी_माणूस's picture

26 Jun 2009 - 11:58 am | मराठी_माणूस

भारतीय उत्पादना बद्दलची मते ऐकुन आनंद झाला

विकास's picture

26 Jun 2009 - 11:12 am | विकास

हा पहा महींद्रचा पिकअप ट्रकः

>>>सर्वसामान्य अमेरिकन हा आपल्या गाडीच्या बाबतीत खूपच चोखंदळ असतो.<<

एकदम मान्य! म्हणूनच गंमत म्हणून सीएनएन वरील खालील ओळी वाचा :-)

Who's going to drive Indian? While it's targeted at a core part of America's vehicle market, Mahindra's truck is unusual by American standards. Global Vehicles hopes the trucks' unique features will appeal to cost-conscious but open-minded truck buyers.

The typical customer will be an "independent thinker" with an active lifestyle, said Larry Daniel, Global Vehicles' vice-president for sales. (हा मला मोठ्ठा विनोद वाटला!)

बाकी त्या ट्रकची (चांगली) बातमी सीएनएनच्या आधी दिलेल्या दुव्यात आहेच!

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 2:05 pm | विसोबा खेचर

मग?

आमचा भारत म्हणजे लेको वाटलं काय त्या अमेरीकनांना?! :)

जय हिंद..!

तात्या.