मोटरसायकलसाठी रदबदली.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
21 Jun 2009 - 9:45 am

काल प्रो.देसायांचा नातू माझ्या जवळ येऊन आजोबांची तक्रार करीत होता.कारण काय तर त्याला मोटासायकल घ्यायची आहे आणि कसंतरी त्याने आपल्या आईबाबांना समजूतीने पटवून दिलं.पण त्याचे आईबाबा म्हणाले की आजोबांचा होकार मिळे पर्यंत काही खरं नाही.
मला म्हणाला,
"काका,तुम्ही जर का आजोबांची समजूत घातली तरंच हे शक्य आहे.कारण तुमचं ते कसंतरी ऐकतात."
मी त्याला म्हणालो,
"बाबारे,असल्याबाबतीत ते माझं कसं ऐकतील? कारण मी कधीही मोटरसायकल चालवली नाही.आणि तोच प्रश्न मला ते प्रथम विचारणार."
"मग काय करायचं? तुम्हाला काही युक्ति सुचते का?
कारण बि.एम.डब्ल्यु. सेलवर आल्या आहेत.आणि मला तिच दुचाकी घ्यायची आहे."
असं तो अगदी हताश होऊन म्हणाला.

"एक आठवलं. माझा एक मित्र आहे श्रीधर टिपणीस म्हणून.आम्ही कॉलेजात असताना तो मोटरसायकल घेऊन यायचा.आणि बरीच वर्षं दुचाकी चालवायचा.
त्याचा सल्ला घेतो.त्याला हा तुझा प्रॉबलेम सांगतो.बघू या यातून काय निष्पन्न निघतं ते?"
हे माझं बोलणं ऐकून तो बराच आशाळभूत झाला.
मी श्रीधरकडे गेल्यावर हा मोटरसायकलचा विषय मुद्दाम काढला.
श्रीधर मला म्हणाला,
"हल्ली मोटरसायकल चालवण्याची प्रवृत्ति जास्त बळावत चाललेली दिसते. फार पूर्वी शाळेत असताना आणि नंतर कॉलेजमधे गेल्यावर मोटरसायकल चालवायला पेशा समजून अनेकामधे माझ्यासारखा तिचा वापर करायचा.
त्या दिवसात मी जीवाची नीट काळजी न घेता सैर करायचो.मोटरसायकलींची पण हवी तशी देखभाल होत नसायची.
कशी चालवायची ह्याचं शिक्षण पण यतातथाच असायचं.आमचं सुरक्षतेचं साज-सामान हास्योत्पादक असायचं.आणि आमच्यापैकी बरेचसे वयस्कता गाठीत नव्हते.
मी त्याला म्हणालो,
"पण आता तसं नाही.मोटारचंच घे,अलीकडच्या नव्याघाटाच्या मोटारगाड्यामधे, पाहिल्यावर त्यातील मजबूत पॅसिंजर सीट्स,थ्री पॉइंट बेल्ट्स,पूढे आणि बाजूला असलेल्या एअरबॅग्स, गाडीचा चक्काचूर होऊ नये म्हणून फ्रेममधे घेतलेली काळजी,हे सर्व पाहिल्यावर एखाद्या अचंबीत करणार्‍या अपघातातून सहीसलामत वाचण्याचा प्रसंग ह्यात येऊ शकतो हे सत्य आहे."
ह्या बाबतीत श्रीधर माझ्याशी सहमत झाला.
मला म्हणाला,
"दुचाकी किंचीत वेगळी आहे.मात्र ही दुचाकी तुमच्या आईने किंवा आणखी कुणी तुम्हाला न चालवण्याचं पटवून देऊन झाल्यावर तुमचा तिच्या म्हणण्यावर विश्वास बसण्याइतकी ती भ्रांत नसावी. मोटरसायकल जरी अपघातापासून संरक्षण विरहीत आणि निष्क्रीय प्रकारातली असली तरी तुमची तुम्ही आपघातापासून बचावण्याच्या सुस्पष्ट संभावनेत सुधारणा करू शकता.

कसलीच दारू पिऊन चालवायची नाही, नेहमीच अतिशय सुधारीत अशी संरक्षण करणारी साधन- सामुग्री वापरायची,दुचाकी चालवायला अंगात खरी निपुणता येईल अशी कला आत्मसात करायची,आणि डोकं ठिकाणावर ठेऊन चालवायची. शेवटी बचावाची, संरक्षणाची आयुधं वापरणं हे तुमच्या चातुर्यावर आहे आणि ती वापरली पाहिजे हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे."
"पण नंतर कॉलेज संपल्यावर तुला कधी मोटरसायकल चालवताना मी पाहिलं नाही.का असं काय झालं?" मी.

"नंतर आम्ही कुटूंबवत्सल झालो. त्यावेळी पैशाची तंगी असल्याने,घरची बंधनं आल्याने,नोकरीच्या दबावामुळे मोटरसायकल चालवण्यापासून दूरच राहिलो.थोडक्यात बाईक घ्यायला पैसे नसायचे आणि चालवायला वेळ नसायचा. मोटरसायकल चालवण्याबाबत एक ना एक कानावर सतत किरकीर यायची.कुणा कुणाची किरकीर अशी असायची की हे दुचाकी वाहन म्हणजे भयग्रस्त वाटणार्‍या मनस्थितीत ठेवणारी ही एक वस्तु आहे.
आणि गंमत म्हणजे असा प्रचार करण्यात भाग घेणार्‍या व्यक्ति म्हणजे,आई,सासु किंवा पत्नी."
"आणि आता आजोबा."
मी मधेच म्हणालो.
"हे कोण आजोबा मला कळलं नाही.?"
ह्या श्रीधरच्या प्रश्नावर प्रो.देसायांची आणि त्यांच्या नातवाची मोटरसायकल विकत घेण्यासंबंधाने निर्माण झालेली मतभिन्नता आणि माझ्याकडून त्याच्या आजोबाना वशिला लावण्याबद्दलची त्याची विनंती याची हकिकत मी त्याला सांगितली.
"माझ्या बाबतीत असंच झालं.सडाफटींग असताना हे दुचाकी वाहन भरपूर वापरलं जातं. पण आता पुन्हा वापरण्याची इच्छा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास,
"पण आता तुझ्यावर कुटूंबाची जबाबदारी आहे.समजा बरं वाईट झालं तर?"
हे वाक्य घरातल्या माणसांकडून ऐकल्यावर डोक्यात येणारी भन्नाड कल्पना मग ती बि.एम.ड्ब्ल्यु साठी असो की आणि कुठच्या तरी दुचाकीसाठी असो,ती क्ल्पना बासनात जाऊन पडायची."

जरी ह्या लोकांची सुरक्षतेची भावना असली तरी आणि ती कल्पना कितीही विचारात घेण्यायोग्य असली तरी ती जरा अतिरंजीत वाटायची.सत्यतेत जास्त स्वारस्य असणं आवश्यक आहे हे मात्र खरं.प्रश्नच नाही की दुचाकी चालवण्यात कसलंही अपघातातून संरक्षण नसल्याने त्यात जादा जोखिम असते."

"मग नव्याने दुचाकी चालवू पहाणार्‍या एखाद्या तरूणाला तू काय उपदेश देशील?"
असा मी प्रश्न केल्यावर श्रीधर पुढे म्हणाला,
"मी नेहमीच माझ्या मोटरसायकल चालवणार्‍या मित्राला म्हणायचो की,काही झालं तर झालं पण सर्वांत सुखदायी वाटणारी गोष्ट म्हणजे तू दुचाकीवर बसून बाहेर पडला आहेस त्यातंच तुला सूख आहे.त्या वाहनाला आता सामोरा जा.
मनात जरी संभ्रम आला तरी त्यातून दिलासा मिळणारी गोष्ट अशी की,त्या दुचाकीवर बसून ऐन पावसाच्या दिवसात शंभरएक मैलावर गेल्यावर अचानक डोक्यावर येणारे ते वादळाचे ढग पहाण्याचं अपूर्व समाधान.
जोपर्यंत तुमच्याजवळ दुचाकी चालवण्याचं कौशल्य आहे आणि जोपर्यंत तुम्ही मजल मारण्यासाठी तिची रीतसर डागडूजी केली आहे तोपर्यंत हा सगळा आनंद घेण्यासारखा आहे.मी त्यामानाने त्यावेळी तरूण असल्याने जीवनात असलेली अनिश्चितता आणि येणारी आव्हानं यांना खूशीने तोंड द्यायला लागणार्‍या इतरांच्या मानसिक समाधानीचं मला काही फारसं कौतुक वाटत नव्हतं. मध्यम वयातल्या जीवनात मात्र मला काहीतरी स्वारस्य ठेवावं असं वाटायचं. कधी कधी ते अत्युत्सुक आणि जोखमीचं वाटायचं.

सध्याच्या आपल्या जीवनाला आधूनिक संस्कृतीचा मुलामा चढवलेला जरी असला तरी हे जीवन सदैव हानी विरहित नसतं. आपण सध्या पहात असलेले अत्याचार आणि जीवनाची हानी पाहून असंच मला वाटतं.
अगदी खर्‍या अर्थाने मला वाटतं मोटारसायकल हे एक जीवनाचं असंच एक छोटसं लक्षण आहे.
त्यावेळी माझ्या मित्राला माझा संदेश असा असायचा,
"गड्या! शेवटी काय तुझ्या वाहानावर तू आहेस."

श्रीधरचं सांगून संपलं आहे असं पाहून मी त्याला म्हणालो,
"प्रो.देसायांचा नातू तू त्यावेळी होतास तसाच सध्या सडाफटींग आहे.आणि त्याला सेलवर आलेली मोटरर्बाईक घ्यायचीच आहे.एकदिवस तू माझ्याबरोबर त्यांच्या घरी चल.आणि तुझा अनुभव त्यांना सांग.माझी खात्री आहे की तू त्यांचं मतपरिवर्तन करू शकशील. त्याचे आईवडिल त्याला परवानगी द्यायला तयार झाले आहेत. पण प्रो.देसाई त्यांच्याही मागच्या जनरेशनचे आहेत.त्यामुळे ते जास्त खंबीर आहेत."

एक दिवस आजोबा मागे आणि नातू पुढे बसून नवी बी.एम.डब्ल्यु चालवीत माझ्या घरी आले.आणि नातू म्हणाला,
"काका हे पेढे तुम्हाल घ्या आणि हे श्रीधरकाकांना द्या. मिशन ऍकंप्लीश्ड "
प्रो.देसायांच्या चेहर्‍याकडे बघत बघत मी समजायचं ते समजलो.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

त्यासगळ्याची आठवण झाली . माझ्या पहिल्या बाईकची आर एक्स १०० ची आठवण झाली.
त्या दुचाकीवर बसून ऐन पावसाच्या दिवसात शंभरएक मैलावर गेल्यावर अचानक डोक्यावर येणारे ते वादळाचे ढग पहाण्याचं अपूर्व समाधान

मस्तच........१०० मैल जाण्यापेक्षा श्रावणात मोटरबाईक वरुन उन्हपावसात पन्हाळ्याला जायला खुप मजा येते.
जुने दिवस परत एकदा आठवले. मस्त लेख सांमतकाका.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2009 - 3:44 pm | मिसळभोक्ता

प्रो. देसाई आणि नातवाचे अभिनंदन. पेढे मिळाल्याबद्दल तुमचेही अभिनंदन. देसायांचा नातू जेव्हा मोटरसायकलवाल्यांची ग्यांग जॉईन करेल, तेव्हा ग्यांगचे नाव नक्की कळवा. आणि बर्फी वाटा.

-- मिसळभोक्ता