आमचे पण फोटू....

अनिकेत's picture
अनिकेत in जनातलं, मनातलं
15 Feb 2008 - 2:55 pm

पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो.

केरळात अनेक लोक जातात, पण बहुतेक सर्व कोची च्या दक्षिणेकडचेच प्रदेश पहातात.
उत्तर केरळातील जिल्हे... कन्नूर, वायनाड, कोळिकोड, माही, पल्लक्कड बहुदा पहात नाहीत.... त्यामुळे तिथे छान निसर्ग पहायला मिळतो.
मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही.

नुकतेच आम्ही पुन्हा एकदा वायनाड ला गेलो होतो... त्याचे फोटू पिकासा वर टाकले आहेत. बघण्यासाठी इथे टिचकी द्या:
http://picasaweb.google.com/aniket.bhanu/ColorsOfKeralaWaynad

अनिकेत

देशांतरशिफारस

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

15 Feb 2008 - 3:26 pm | मनस्वी

खूपच मस्त आहेत फोटो..
मी कन्नूर पाहिले आहे.. एकदम सहीईईईईईईच आहे.

चहाचे मळे, डोंगरातून जाणारे छोटे छोटे हिरवेगार रस्ते, गार गार हवा, थंड वातावरण, गरम मसाल्याची शेती ...

(मल्याळम) मनस्वी

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 10:33 pm | सुधीर कांदळकर

माहे केरळात नाही. मी तीन वेळा तेल्लीचेरी माहे मार्गे केरळात गेलो आहे. माहे सुंदर तर नक्कीच नाही. माहे म्हणजे भेंडीबाजारासारखे बकाल वाटले. केंद्रशासित प्रदेश आहे. युनिअन टेरिटरी ऑफ माहे ऍड पाँडिचेरी. परंतु बाकी संपूर्ण केरळातील निसर्गसौंदर्याच्या बाबतीत मी तुमच्या मताशी सहमत आहे. पलक्कड उर्फ पालघाट पाहिले. कालडीला गेलात की नाही?

अनिकेत's picture

16 Feb 2008 - 12:59 am | अनिकेत

माहि हे जनरल लोकान्साठी म्हटले.....
मुळ्ळपिल्न्गाड्......जाणकार लोकान्साठी...माहि.... जनतेसाठी.....
कालडी..... आद्य शन्करर्यान्चे स्थान...... respect.

अनिकेत.

प्राजु's picture

16 Feb 2008 - 12:07 am | प्राजु

खूपच सुंदर... चहाचे मळे, डोंगर... खूपच छान.
मी कूर्गला गेले आहे. तिथे मोठ्ठा धबधबा आहे..

-प्राजु

ऋषिकेश's picture

16 Feb 2008 - 12:50 am | ऋषिकेश

अनिकेत राव!

पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो.
खरच नशीबवान!
मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही.
हे मात्र मान्य नाहि. मी इतकंच म्हणेन की तुम्ही खरा कोकण पाहिलेला नसावा म्हणून असं बोलु शकताय. केवळ गर्दीने डबडबलेली पर्यटनस्थळे म्हणजे कोकण नव्हे! एकदा कोकण मनापासून पूर्वग्रह न ठेवता फिरा आणि बोला

बाकी फोटु सुंदर.. त्यातहि डर्ट रोड वाला सह्हीच आला आहे. अजुन येऊ देत :)

-ऋषिकेश

अनिकेत's picture

16 Feb 2008 - 1:03 am | अनिकेत

गुस्त्ताफी माफ असावी हुजूर............

आपण कदाचित खरा केरळ पाहिला नसावा.
क्षमस्व..

अनिकेत...

ऋषिकेश's picture

16 Feb 2008 - 1:11 am | ऋषिकेश

केरळ मी कोकणाइतके फिरलो नसलो तरी तुलना करु शकेन इतका बघितला आहे. म्हणूनच म्हणतो कोकण ते कोकणच!.. कोणा केरळाला ती सर येणार नाहि. याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते. पण करायची झाली तर मी अजूनहि म्हणेन कोकण ते कोकणच! :)

तेव्हा सादर नमुद करु इच्छीतो की (एक दारिद्रय सोडल्यास) निसर्ग सौदर्याच्या बाबतीत कोकण केरळाच्या खचितच काकणभर सरसच आहे!

काय वो गावकर्‍यांनु म्या म्हणतो ते खरं का न्हाय?

-(कोकणी) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

16 Feb 2008 - 9:26 am | विसोबा खेचर

याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते.

ऋशिकेशा, तुझ्याशी सहमत आहे..!

अर्थात, माझे व्यक्तिगत मत विचाराल तर केरळच काय, आमच्या कोकणापुढे सर्वच प्रदेश फिके आहेत!

आपला,
(आंब्या-फणसातला) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2008 - 9:07 am | प्रभाकर पेठकर

सर्व फोटो आवडले. परंतु, चहाच्या रोपट्यांवर झोपून काढून घेतलेला फोटो मात्र अल्बमच्या सौंदर्यास बाधा आणणारा आहे असे वाटले.
बाकी, अभिनंदन.