पहीला पाउस

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
21 Jun 2009 - 9:17 am

एक होता राजपुत्र.
त्याला पहील्या पावसाचे खुपच आकर्षण होते.
चाळीतल्या गजाच्या खिडकीवर उभा राहुन तो पहील्या पावसाची वाट बघायचा.
राजपुत्राचे शेजारी पंजाबी घर होते.
फाळ्णीत कराचीमधुन पळुन आलेले.
त्या घरात एक परी होती.
राजपुत्राची जिवलग मैत्रीण.
परीच्या आईच्या हातात एक जाड सोन्याचे कडे होते. राजपुत्राला ते फार आवडायचे.
परीच्या आईलासुद्धा राजपुत्रावर खुप लोभ होता. ११ इंच उंचीच्या चांदीच्या पेल्यात जाड जाड लस्सी मिळायची राजपुत्राला.
'जमाइ राजा' म्हणायची परीची आई.
आभाळ भरुन आले होते. ढ्ग एकमेकांशी मस्ती करत होते. भर दुपारचा अंधार. उल्हासीत करणारा गारवा. पण पहीला पाउस सुरु झालेला नव्हता.
राजपुत्र तयार होता पावसाच्या स्वागताला.
इतक्यात परी आली.
तीने पण पहील्या पावसात भिजायचा हट्ट सुरु केला.
मग पावसाची टोपी घालुन ती पण तयार झाली.
म्हणता म्हणता पाउस सुरु झाला.
धो, धो पडु लागला.
सुमारे एक तास परी आणि राजपुत्र मनसोक्त खेळली.
एका तासानंतर आईची हाक आली.
हुडहुडलेल्या अंगानी दोघेही वर आली.
जीन्यातुन वर येताना परीने राजपुत्राचा हात धरला आणि म्हणाली, '"भिगे हुए तुम कितने चंगे दिखते हो"
आणि परीने राजपुत्राचा एक गोड पापा घेतला.
घरी आल्यावर कोरड्या रुमालाने दोन्ही आयांनी मुलांना पुसले.
राजपुत्राच्या आईने गरम गरम कांदाभजी आणि आल्याचा चहा केला होता.
दोघाना बाजुबाजुला बसवुन भरपुर खायला दीली.
हे बघत असताना परीच्या आईच्या डोळ्यात पाणी का हे राजपुत्राला काही कळाले नाही.
हा कार्यक्रम दर पावसाला नक्की ठरला. आणि ३ पावसाळे चालला.
राजपुत्र ५ वीत असताना मे महीन्याच्या सुट्टीत गावाला गेला होता.
गावचे आपले गतवैभव बघुन चकित झाला.
गावावरुन आला तर परी कुठे दिसेना. राजपुत्राने खुप चौकशी केली. पण नीट उत्तर मिळेना.
राजपुत्राच्या आईने एकदा म्ह्टले, " खुप लांब गेली रे ती"
त्याच महीन्यात राजपुत्राच्या बाबानी घर बदलायचे ठरवले.
घर सोडायच्या दिवशी परीची आई राजपुत्राला पोटाशी धरुन ढसाडसा रडली.
"मेरे दोनो पुत्तड मुझे अकेला छोड रहे है"
_________________________________________________________
नविन घरी आल्यावर सुद्धा राजपुत्राने पहील्या पावसाचे तसेच स्वागत केले.
पण ह्या वेळी परी नव्हती.
दिवस जात राहीले. पहीला पाउस येत राहीला.
राजपुत्र तसाच पहील्या पावसात भिजायचा. आईच्या हातची कांदा भजी आणि आल्याचा वाफाळलेला चहा घेउन झाल्यावर दोन तास मस्त झोपायचा.
त्या झोपेत छान छान स्वप्ने पडायची.
ढगांच्या घोड्यावर स्वार होउन मोठ्या दौडीला निघायचा. अर्थात परी पण साथीला असायचीच.
नेहेमीच्या जगात राजपुत्राने परीची आठवण कधीच सोडली नाही. कुणा मुलीकडे ढूंकुनही बघायचा नाही.
सर्व गराड्यात तो परीला शोधायचा.
_________________________________________________________
म्हणता म्हणता राजपुत्र मोठा झाला. राजपुत्राला कुठलीही मुलगी पसंद पडेना. अगदी सुंदर असली तरी सुद्धा नाकारायचा.एकदा अशाच एका बघायच्या कार्यक्रमात मात्र माजघरातुन बाहेर आलेली मुलगी बघुन राजपुत्र आश्चर्यचकित झाला.
"अरे, ही तर माझी परी"
घरी आल्यावर त्याने सर्वांना स्प्ष्ट सांगितले, "हुंडा , जुळणारे गुण वगैरे गेले गाढवाच्या शेपटीत., लग्न करेन तर हीच्याशीच, नाहीतर केंव्हाही नाही"
__________________________________________________________ आजही राजपुत्र पहील्या पावसाचे जंगी स्वागत करतो. बघणारे म्हणतात, म्हातारा खुळावला. पण त्याला पर्वा नसते त्याची.
पावसात भिजुन आल्यावर तीच गरमागरम कांदा भ़जी, तोच आल्याचा वाफाळलेला चहा आणि वर परीची साथ. मग राहीलेल्या पुर्ण वर्षाची ३६३ दिवसांची लढाई लढायला हा पहील्या पावसाचा दिवस राजपुत्राला पुरतो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Jun 2009 - 9:21 am | अवलिया

वा! मस्त !!
राजपुत्राला जूने दिवस आठवत आहेत....
राजपुत्र म्हातारा झाला असे समजायचे काय?
कारण, काल पर्यत राजपुत्र "रात गयी बात गयी" बोलत बोलत होता..
आज अचानक "गेले ते दिन गेले".
असे कसे ‍? :?

--अवलिया

विनायक प्रभू's picture

21 Jun 2009 - 9:32 am | विनायक प्रभू

म्हातारा फक्त शरीराने.
एखादा दिवस 'शेंटी'मेंट्ल' होणे कोण चुकवु शकतो.

वेताळ's picture

21 Jun 2009 - 9:38 am | वेताळ

अजुन पाऊस सुरु झाला नसल्यामुळे राजपुत्राचा हिरमोड झाला असेल नाही? बाकी बिना पाऊसाचे कांदाभजी खाऊन वैताग आला आहे.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सहज's picture

21 Jun 2009 - 9:43 am | सहज

पुढचा पाउस-भजी-चहा कॉम्बो जमले की राजपुत्राला चियर्स नक्की म्हणणार!!

तोवर हे ऐका

:-)

टारझन's picture

21 Jun 2009 - 10:21 am | टारझन

हल्ली कोणी तोतया बाळासाहेब ठाकरे फिरतोय म्हणे ठाण्यात फ्रेंची वाढवून =)) =)) =))
हल्ली विधानसभेच्या णिवडणूका आल्याने प्रचार देखिल चालू आहे म्हणे ;)

अवांतर : अकरा इंचाच्या चांदीच्या ग्लासात लस्सी पिणारा राजपुत्र आणि परी आवडली !! असे पालकही विरळंच !! ते ही विना समुपदेशन ;)

असो , चालु द्या मास्तर !!

(एकफुटी काळ्या बाटलीतून कोक पिणारा) टारझन वखारे

अनंता's picture

21 Jun 2009 - 10:29 am | अनंता

ओळखीचा वाटतोय.

एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

टारझन's picture

21 Jun 2009 - 10:34 am | टारझन

वाटून झाला की सांगा :) उरला तर दुसरी कडे वाटू :)

तुम्ही एक पाहिलं का ? पुरातन काळी सुद्धा राजपुत्राने समुपदेशनाने बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले होते .. नाय तर आम्ही तेच्यामायला .. गॅलरीत उभ र्‍हायची चोरी ... रुपाली केसं विचरायला आली की आम्ही आपले केस खाजवत (डोक्यावरचे) घरात मान घालून .. नाय तर घरातनं आमची आय नं खालून तिची आय .. असं पघायचे जसं काय ....... असो ....

(गॅलरीतून एकटाच पावसात भिजलेला) टाराजपुत्र

निखिल देशपांडे's picture

21 Jun 2009 - 10:48 am | निखिल देशपांडे

काय मास्तर आज एकदम सेंटी????
काय आठवण काढली आहे पावसाची.....
आवडले मास्तर...
==निखिल

छोटा डॉन's picture

21 Jun 2009 - 10:53 am | छोटा डॉन

वा वा मास्तर, सकाळ सकाळ ही काय नवी टुम काढलीत ...

एकदम "पावसात फिरताना धरला मी हात तुझा" चे गान सुरु केलेत.
लेख नॉस्टलेजीक समजावा काय ?
जरुर गान गात रहा, काही हरकत नाही ...

सुरेश भटांचे " ... वय निघुन गेले" ही गझल आपल्यासाठी नाहीच असेच मानुन धुंद पावसाचे स्वागत करत रहा ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2009 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघणारे म्हणतात, म्हातारा खुळावला. पण त्याला पर्वा नसते त्याची.
पावसात भिजुन आल्यावर तीच गरमागरम कांदा भ़जी, तोच आल्याचा वाफाळलेला चहा आणि वर परीची साथ. मग राहीलेल्या पुर्ण वर्षाची ३६३ दिवसांची लढाई लढायला हा पहील्या पावसाचा दिवस राजपुत्राला पुरतो.

अहाहा, क्या बात कही सर, लगे रहो !

-दिलीप बिरुटे

प्रमोद देव's picture

21 Jun 2009 - 11:11 am | प्रमोद देव

आजही राजपुत्र पहील्या पावसाचे जंगी स्वागत करतो. बघणारे म्हणतात, म्हातारा खुळावला. पण त्याला पर्वा नसते त्याची.


तद्माताय! म्हातारा झाला तरी अजूनही राजपुत्र की राजपुत्तर ?
मंग राजा कधी व्हनार म्हन्तो म्या?

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

टारझन's picture

21 Jun 2009 - 11:41 am | टारझन

राजपुत्राला "बॉन्साय" केलं असेल काका ;)

(इस्पिक राजा) टार्‍या

पिवळा डांबिस's picture

21 Jun 2009 - 9:25 pm | पिवळा डांबिस

तद्माताय! म्हातारा झाला तरी अजूनही राजपुत्र की राजपुत्तर ?
मंग राजा कधी व्हनार म्हन्तो म्या?
ते ठाण्याचे प्रिन्स चार्ल्स आहेत, प्रमोदराव!
आजन्म राजपुत्र!!!!:)

प्रमोद देव's picture

21 Jun 2009 - 11:20 pm | प्रमोद देव

असं इस्कटून सांगितल्यावर डोस्क्यात घुसलं! :)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

विजुभाऊ's picture

8 Jul 2009 - 2:26 pm | विजुभाऊ

बरसते बारीश की हर याद के साथ
मै भीगा हुं
वो कमसे कम ख्वाबों मे तो मिले इस आस मे
अनगिनत राते जागा हुं
उन पुरानी यादों को कैसे मै मिटाऊ यारो
वो कुछ चन्द पल ही तो मेरी महेफील बनाते है

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jul 2009 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार

आहु आहु .. मास्तरु आहु आहु ....

च्यायला मी आणी गटणे सध्या आमची नाव देऊन टाकायच्या विचारत आहे. माझे परिकथेतील राजकुमार तुम्ही घ्या आणी गटणेंचे नाव 'आणी हो' घेणारेत म्हणे.

º©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.

आमचे राज्य