तुझा हळवा पाऊस

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
8 Jun 2009 - 5:31 pm

माझ्या ह्या कवितेला देवकी पंडितांचा स्वरसाज लाभलाय "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधलं हे गाणं ! हे गाणं ह्या लिंक वर ऐकता येईल.

http://maanbindu.com/showMusic.do?field=sangeet&name=Sare-Tuzyat-Aahe

तुझा हळवा पाऊस
आज आठवतो मला
चिंब सरीनं तयाच्या आज
भिजवतो मला

कधी बरसणं तुझं
रिमझिम अलवार
नखशिखान्त भिजते
त्यात मी रे हळुवार

कधी तुफानी कोसळ
गरजत बरसत
कधी झिम्माड झिम्माड
द्वाड प्रीत फुलवत

आता कधी रे येशील
मनी सारखा सवाल
घन दाटता नभात
पुकारते वेडी प्रीत

तुझ्याविना हा पाऊस
आसू आणतो डोळ्यात
धरा कोरडी कोरडी
परी डोळे वाहतात

जयश्री अंबासकर

प्रेमकाव्यप्रतिभा

प्रतिक्रिया

सुबक ठेंगणी's picture

8 Jun 2009 - 7:25 pm | सुबक ठेंगणी

धरा कोरडी कोरडी
परी डोळे वाहतात

हे खूप आवडलं!
चाल कुणी केली आहे गं?

प्रमोद देव's picture

8 Jun 2009 - 7:52 pm | प्रमोद देव

संगीतकार आहे अभिजित राणे!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

संदीप चित्रे's picture

8 Jun 2009 - 7:49 pm | संदीप चित्रे

अधूनमधून पारायणं चालू असतातच :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्राजु's picture

8 Jun 2009 - 8:35 pm | प्राजु

मस्त कविता आहेत सगळ्याच.
सुंदर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

निशिगंध's picture

8 Jun 2009 - 9:41 pm | निशिगंध

एकतच रहावा असा अल्बम..
सर्व गाणी आवडली..
मस्तच..

रेवती's picture

9 Jun 2009 - 12:17 am | रेवती

कविता फारच मस्त!
देवकी पंडित यांच्या आवाजामध्ये इतकं सुंदर वाटतय गाणं.
रेवती

बहुगुणी's picture

9 Jun 2009 - 5:30 am | बहुगुणी

...आणि तितकीच मधुर संगीतरचना, सर्वांचंच कौतुक!

चन्द्रशेखर गोखले's picture

9 Jun 2009 - 6:51 am | चन्द्रशेखर गोखले

गाणं ऐकलेलं नाही ! गीत अप्रतिम ! या रखरखाटात जरा असं भिजलं कि खूप बरं वाटतं !!

दत्ता काळे's picture

9 Jun 2009 - 11:18 am | दत्ता काळे

कविता आणि गाणं दोन्हीही छान.

विसोबा खेचर's picture

9 Jun 2009 - 11:49 am | विसोबा खेचर

जयूची कविता? नेहमीप्रमाणेच सुरेख..!

ऐकता मात्र आली नाही..

तात्या.

जागु's picture

9 Jun 2009 - 2:11 pm | जागु

खुपच छान आहे कविता.

जागु's picture

9 Jun 2009 - 2:14 pm | जागु

खुपच छान आहे कविता.

जयवी's picture

9 Jun 2009 - 2:27 pm | जयवी

तहे दिल से शुक्रिया यारो :)