माझी चित्रे - भाग १

सायली पानसे's picture
सायली पानसे in कलादालन
7 Jun 2009 - 8:22 am

चित्रकला माझा आवडीचा विषय ...नेहमी चांगलेच मार्क मिळायचे शाळेत पण तेंव्हा करीयर म्हणुन पण ह्याचा वापर करता येईल असा विचार केला नव्हता...
कॉलेजात गेल्यावर हळु हळु फक्त मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाची कार्ड बनवणे इतकाच काय तो चित्रकलेशी संबध यायचा... पुढे एम बी ए करताना हि प्रॉजेक्ट्स बनवताना थोडी फार क्रिएटिव्हिटी पाजळुन घ्यायचे. पण खर्‍या अर्थाने शिकले ते माझ्या एक जिवलग मैत्रिणी कडे ..ती कमर्शियल आर्टिस्ट होती आणी क्लासेस घ्यायची.. एकदा आइच्या वाढदिवसाला एखादे पेंटिंग विकत घेउन द्यावे म्हणुन तिच्या कडे गेले... तर तिने मला पटवले कि विकत घेण्यापेक्षा तुच बनव मी शिकवते.... आणि तिथे माझा क्लास सुरु झाला...
आई च्या नकळत नोकरी वरुन परस्पर तिच्याकडे जाउन जसा वेळ मिळेल तसा एक गणपती चे म्युरल बनवले.... एक महिना लागला कधी एक तास कधी अर्धा तास मिळेल तसा पण ते करुन आईला गिफ्ट दिले आणि आई इतकी खुश झाली कि बास...
तेव्हा पासुन जस जमत गेला तसे शिकत गेले ... म्युरल.. ग्लास पेंटिंग..ईजिप्शियन ..थाई पेंटिंग्स्...एकदा वारली पेंटिंग चे पण वर्कशॉप केले.
ऑईल आणि ऍक्रिलिक पेंटिंग मात्र राहुन गेले होते शिकायचे.
ईथे दुबई ला आल्यावर संधी मिळाली आणि नवर्‍याने पण पाठिंबा दिला आणी माझा क्लास सुरु झाला...
मी काढलेली काहि चित्रे इथे देत आहे .

हे चित्र फक्त निळया रंगात केले आहे.. सिंगल कलर थीम... ह्यात निळ्या रंगाच्या हव्या त्या शेडस मिळवण्यासाठी पांढरा आणी थोडासा लाल रंग वापरला आहे.
हे ऍक्रिलिक कलर्स वापरुन कॅनव्हास वर बनवले आहे.

हे चित्र मेमरी ड्रॉईंग आहे... केरळ मधिल मंदीरे मला अतिशय आवडतात्..तिथुन प्रेरणा घेउन मी हे चित्र बनवले आहे. ह्यात एक्रिलिक कलर्स वॉटरकलर पध्दती प्रमाणे वापरले आहेत.

हे माझे पहिले ऑईल पेंटिंग.... Abstract style.

तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. बाकि चित्रांविषयी पुढच्या भागात.

कला

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

7 Jun 2009 - 8:54 am | सायली पानसे

आपल्या सर्व प्रतिक्रियांसाठी मनापासुन धन्यवाद!
४ तारखेचा लेख आज पुन्हा येथे प्रकाशित करत आहे.

टारझन's picture

7 Jun 2009 - 1:30 pm | टारझन

कुठे तरी पाहिली होती ही चित्र .... कुठे बरं ...
अं हो इथेच पाहिलेली =)) आत्ताच नोट्स पाहिल्या .. .छाण आहेत हो चित्र !! अजुन येउ द्या ..

- (गजनी) टारझन

प्रमोद देव's picture

7 Jun 2009 - 8:51 am | प्रमोद देव

मस्त आहेत सगळी चित्रं!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

विसोबा खेचर's picture

7 Jun 2009 - 8:57 am | विसोबा खेचर

चित्रे छानच आहेत!

तात्या.

घाटावरचे भट's picture

7 Jun 2009 - 9:00 am | घाटावरचे भट

चित्रे आवडली.

अवलिया's picture

7 Jun 2009 - 9:06 am | अवलिया

वा! मस्त आहेत चित्रे !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

मदनबाण's picture

7 Jun 2009 - 1:13 pm | मदनबाण

छान... :)
दुसर्‍या चित्रात तुलसी वृदावन आहे का काही दुसरे ???

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

सायली पानसे's picture

7 Jun 2009 - 1:23 pm | सायली पानसे

केरळच्या देवळांमधे मुख्य मंदीरा समोर एक दगडी समई असते ती रोज लावली जाते ति आहे. त्या समई च्या नक्कि प्रकारला काय म्हणतात ते माहित नाहि.

माधुरी दिक्षित's picture

7 Jun 2009 - 1:32 pm | माधुरी दिक्षित

मस्त आहेत ग सगळी चित्र !!!
आता छान फ्रेम करुन घे सगळ्यांना.

सायली पानसे's picture

8 Jun 2009 - 8:37 am | सायली पानसे

राहिले आहे फ्रेम करायच अजुन पण लवकरच करिन.

यशोधरा's picture

7 Jun 2009 - 3:21 pm | यशोधरा

सुरेख जमली आहेत चित्रं. पहिलं चित्र सर्वत आवडलं. पाण्यामधे दिसणारी झाडा गवताची आणि होड्यांची प्रतिबिंबंही सुरेख! अजून काढ चित्रं आणि इथे टाक आम्हांला पहायला :)

पोलिसकाका_जयहिन्द's picture

7 Jun 2009 - 3:36 pm | पोलिसकाका_जयहिन्द

अजून चित्रं पहायला आवडतील....

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

क्रान्ति's picture

7 Jun 2009 - 9:18 pm | क्रान्ति

सगळीच चित्रं सुरेख! पहिलं अगदीच खास. रंगसंगती खूप मस्त आहे.

:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2009 - 11:04 am | परिकथेतील राजकुमार

अगदी असेच म्हनतो. रंगसंगती झकासच.

राजा परा वर्मा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

शाल्मली's picture

7 Jun 2009 - 9:43 pm | शाल्मली

वा!
चित्रं छान आहेत.
पहिलं विशेष आवडलं.

--शाल्मली.

जागु's picture

8 Jun 2009 - 10:57 am | जागु

सायली खुप सुंदर आहेत ग चित्र. आईला स्वतःच्या हाताने केलेल पेंटींग तु गिफ्ट दिलस तेंव्हा आईला खुप आनंद आणि तुझा अभिमानही वाटला असेल.

कच्चा कान्दा's picture

3 Jul 2009 - 1:46 am | कच्चा कान्दा

मला पेंटींग मधले काही कळत नाही.
पण एक वाटते थोडी सजीवता कमी आहे.
उदा. देवळाचे दार बन्द आहे. एकही माणूस/पक्षी नाही. समई विझलेली वाटते(कलर मिकस होतो आहे?)
पण एकुण चित्रे मस्तच आहेत.... ही समि़क्षा पुढील कलेसाठी.

कृपा करून गैरसमज करुन घेऊ नये ही विनंती...

कच्चा कांदा..