पालकचे रायते

जागु's picture
जागु in पाककृती
1 Jun 2009 - 12:42 pm

साहित्य :
१ जुडी पालक निवडून, स्वच्छ धुवून
१ मिरची
१ अर्धा वाटी दही
चविपुरते मिठ, साखर
फोडणीसाठी : २ चमचे तुप, जिर, कढीपत्ता.

प्रथम पालक, मिरची थोड्याश्या पाण्यात शिजवावे. शिजल्यावर स्मॅश करून त्यात दही, मिठ, साखर घालायची व त्यावर वरील फोडणी घालायची. झटपट व चविष्ट रायते तयार.

टिप : फोटो काढलेला नाही त्यामूळे इथे देता आला नाही.

प्रतिक्रिया

काजुकतली's picture

18 Jun 2009 - 3:38 pm | काजुकतली

वाटतेय चांगले, पण चवीला कसे असेल?? पालक उकडला की उग्रट वास येतो त्याला.

तु कुकरला शिजवला की बाहेर? आणि मिक्सरमध्ये वाटलास??

साधना

जागु's picture

20 Jun 2009 - 3:30 pm | जागु

अग अजिबात वास येत नाही दही घातल्यावर. खुप छान लागत हे रायत. एकदा करुनच बघ. कुकरला शिजवण्याची गरज नाही उकळी आल्यावर ५ मिनीटांत शिजतो पालक. मिक्सरमध्ये वाटायचा किंवा भांड्यातच कुस्करायचा.

स्मार्ट बनी's picture

17 Sep 2009 - 8:24 am | स्मार्ट बनी

ह्यात थोडा कान्दा टाकलत तर आणि छान लागते मी गेले कित्येक वर्षे हे रायते कान्दा घालुन करते....

सखाराम_गटणे™'s picture

17 Sep 2009 - 8:40 am | सखाराम_गटणे™

मला वातले शालेतला पालक

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2009 - 12:45 pm | प्रभाकर पेठकर

पालक रायते खाल्ले आहे. ठीक लागते. मला विशेष आवडले नाही. पण काही बदल करून पाहिला पाहिजे. कदाचीत आवडेल. कारण मुळात, पालक खुप आवडतो.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.