जमा खर्च

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 May 2009 - 12:00 pm

त्याच्या समाधीवरची फुले
समाधीवर उधळलेला गुलाल...
सोबत,
रंग उडालेले;
फिकुटलेले कुंकू,
तिच्या कपाळावरले.....

तिने ढाळलेली
असंख्य कढत कढत आंसवे!
त्यावर
तिच्या वाट्याला,...
सहानुभूतीचे फक्त कोरडे शब्द;
त्याच्या हौतात्म्याची किंमत म्हणून.... !!

ह्या बलिदानाचा
जमाखर्च कधी लागणार?

सुकल्या आंसवांशिवाय
तिच्या ओच्यात
काहीच नाही का पडणार?........

विशाल

कविता

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

22 May 2009 - 12:05 pm | आनंदयात्री

पहिले कडवे छानच जमलेय .. पकड घेते !!

परिकथेतील राजकुमार's picture

22 May 2009 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म्म्म्म्म
एक वेगळ्याच विषयाला हात घालणारी दाहक कविता.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

जागु's picture

22 May 2009 - 2:33 pm | जागु

त्याच्या समाधीवरची फुले
समाधीवर उधळलेला गुलाल...
सोबत,
रंग उडालेले;
फिकुटलेले कुंकू,
तिच्या कपाळावरले.....

विशालदा, हे जास्त आवडले.

क्रान्ति's picture

22 May 2009 - 3:53 pm | क्रान्ति

तिने ढाळलेली
असंख्य कढत कढत आंसवे!
त्यावर
तिच्या वाट्याला,...
सहानुभूतीचे फक्त कोरडे शब्द;
त्याच्या हौतात्म्याची किंमत म्हणून.... !!
सुन्न केलं कवितेनं. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी कविता.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा