यावा अशात साजण

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
21 May 2009 - 12:21 pm

सुटे बेभान हा वारा
फुले उरात शहारा
यावा अशात साजण
देत गुलाबी इशारा

हृदयाच्या सागरात
लाटा उठाव्या खट्‍याळ
प्रीतीशरांनी सख्याच्या
व्हावे पुरते घायाळ

सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

निळाईने पसरावे
आकाशाच्या कुरणात
गाणी गावी अवखळ
द्वाड वा-याने कानात

खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात

नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध

जयश्री अंबासकर

प्रेमकाव्यप्रकटन

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

21 May 2009 - 1:52 pm | मराठमोळा

सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

क्या बात है.
अप्रतिम काव्य. आवडले. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2009 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियकराच्या भेटीच्या कल्पनेने वेड्या झालेल्या प्रेयसीला काय काय वाटते, काय सुंदर चित्रण केलं आहे.
व्वा ! आवडली कविता. केवळ सुंदर !

नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध

कवितेतील या चार ओळी खास वाटल्या. और भी आने दो !

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

21 May 2009 - 4:30 pm | नितिन थत्ते

+१
असेच म्हणतो.

खराटा
(रंग माझा वेगळा)

क्रान्ति's picture

21 May 2009 - 5:46 pm | क्रान्ति

गोड कविता! क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

ऋषिकेश's picture

21 May 2009 - 5:49 pm | ऋषिकेश

वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

ही कल्पनाच लै भारी

खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात

हाय हाय!.. सुंदरच कल्पना आहेत प्रत्येक कडव्यात

कविता खूप आवडली. अजून येऊ दे

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

अवलिया's picture

21 May 2009 - 6:23 pm | अवलिया

कविता खूप आवडली. अजून येऊ दे

--अवलिया

संदीप चित्रे's picture

21 May 2009 - 6:31 pm | संदीप चित्रे

>> सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

मस्त लिहिलयस जयश्री...

गंधाळावी शब्द खूप आवडला :)

प्राजु's picture

21 May 2009 - 8:00 pm | प्राजु

सुपर्ब!!!!

नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध

अप्रतिम!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

21 May 2009 - 8:50 pm | मदनबाण

खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात

क्लासच...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

स्वातीदेव's picture

21 May 2009 - 11:34 pm | स्वातीदेव

छान कविता :)

पोलिसकाका_जयहिन्द's picture

22 May 2009 - 3:22 am | पोलिसकाका_जयहिन्द

सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

अप्रतिम....

काय-द्याच बोला.....

जयवी's picture

22 May 2009 - 3:21 pm | जयवी

मनापासून धन्यवाद सगळ्यांचे :)