खेळ मनाचा

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
17 May 2009 - 4:15 pm

कधी कधी मन.... एक नाचरा मोर
फुलवतं पिसारा इंद्रधनुषी, होऊन भावविभोर
जगलेले काही क्षण...
काही आठवणी विलक्षण...
येतात उचंबळून वर
आणि देऊन जातात असीम सुख
अगदी तस्सेच .....पुन्हा एकदा !
त्या सरींचा कोसळ
आणतो शहारा नवा
नवी हुरहुर, नवी थरथर
गंधही नवा नवा !

कधी हेच मन झाकोळतं
होतं हताश....निराश
गढूळ बुडबुडे आठवणींचे
करतात नकोसे सारे पाश.
सारं काही गडद काळं
दीनवाणं....उदास उदास
गुदमरलेला जीव.....
अन्‌ सारं काही भकास !

खेळ सारा मनाचा
डाव कधी जिंकलेला
कधी दुबळ्या हातांनी
स्वत:च घालवलेला.
हसरा, नाचरा मोर
की खिन्न काळोख...
असतं आपल्यालाच ठरवायचं
मनाला ताब्यात ठेवून
जिंकायचं की हरायचं.

जयश्री अंबासकर

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 May 2009 - 5:01 pm | विसोबा खेचर

हसरा, नाचरा मोर
की खिन्न काळोख...
असतं आपल्यालाच ठरवायचं
मनाला ताब्यात ठेवून
जिंकायचं की हरायचं.

क्या बात है!

तात्या.

मदनबाण's picture

17 May 2009 - 5:06 pm | मदनबाण

सुंदर मुक्तक. :)

खेळ सारा मनाचा
कधीच न-उमगणारा
वेग मात्र असावा याचा
कुणालाच न-मोजता येणारा...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अरुण वडुलेकर's picture

17 May 2009 - 6:58 pm | अरुण वडुलेकर

ही मनाला दिलेली उपमा फार आवडली.
मोर हसरा नाचरा असला तरी काळजांत
एक वेदना घेऊनच हासत नाचत असतो.
(निदान अशी एक कविकल्पना आहे)

जियो.

स्वप्नयोगी's picture

17 May 2009 - 6:59 pm | स्वप्नयोगी

खेळ सारा मनाचा
डाव कधी जिंकलेला
कधी दुबळ्या हातांनी
स्वत:च घालवलेला.

सुरेखच

पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.

यन्ना _रास्कला's picture

17 May 2009 - 9:11 pm | यन्ना _रास्कला

खेळ सारा मनाचा
डाव कधी जिंकलेला
कधी दुबळ्या हातांनी
स्वत:च घालवलेला.

मलाबी त्याच ओली आवड्ल्या

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

प्राजु's picture

17 May 2009 - 7:05 pm | प्राजु

मनाच्या मोराची रूपं आवडली.
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

17 May 2009 - 10:45 pm | पिवळा डांबिस

सुंदर, जयवी सुंदर!!!
"मन एव मनुषः" म्हणतात ते काही खोटं नाही.....
कविता आवडली...
(अवांतरः आमच्याकडून एखाद्या कवितेला 'आवडली' हा प्रतिसाद मिळणं हे एखाद्या शाकाहारी जैनाने मटण "आवडलं" म्हणण्याइतकंच दुर्मिळ आहे!!:))

बहुगुणी's picture

18 May 2009 - 1:21 am | बहुगुणी

थोडीशी या सुंदर गाण्याची आठवण झाली.

क्रान्ति's picture

18 May 2009 - 8:32 pm | क्रान्ति

अप्रतिम कविता! :)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

जयवी's picture

22 May 2009 - 3:25 pm | जयवी

शुक्रिया दोस्तो :)