प्रतिसाद

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
11 May 2009 - 12:49 pm

कोणी आपुलाची
बोलु वाचे कौतुके
वात येईल इतुके
प्रतिसादे चौफेर
रांधे जैसे भातुके
खेळे नृपकन्या
बोलाची कढी
बोलाचेची बोलु
बोलाचेची खापरें
पुसोनी तैया
ताजी होई
.....ये काव्यखेचर आज रोजी मिपा मुकामी मिपा संस्थळी विजुभाऊ करवी अवांतरी प्रतिसाधका प्रत मस्तकी हाणीतले

वावरसद्भावना

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 May 2009 - 12:52 pm | अवलिया

=))

वा! विजुभौ !! वा !!
च्यामारी, तुम्ही नसता तर आम्हाला करमत नाही !!
येत चला निदान काव्य खेचर मारायला !!!

अवांतर - या काव्यखेचराचे लगेच संदर्भासह रसग्रहण पण टाकले असते तर चालले नसते का? ;)

--अवलिया

दशानन's picture

11 May 2009 - 12:55 pm | दशानन

सहमत.

;)

फेकून काव्य मारणे ही नवीन पध्दत आवडली =))

थोडेसं नवीन !

चंबा मुतनाळ's picture

11 May 2009 - 2:48 pm | चंबा मुतनाळ

विजूभाव, आपल्याला काव्य खेटर तर नाही म्हणायचेय?
हल्ली खेटरं मारायची फॅसन आहे म्हणून म्हंटले

-चंबा

जागु's picture

11 May 2009 - 12:58 pm | जागु

=)) =))

सहज's picture

11 May 2009 - 1:03 pm | सहज

शोले मधे धर्मेंद्रची नाटके चालू असताना अमिताभचा चेहरा व साला नौटंकी शेरा आठवला.

:-)

अवलिया's picture

11 May 2009 - 1:06 pm | अवलिया

=))
हाणा तिच्यायला !! सहजराव आज काही ऐकत नाही !!

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

11 May 2009 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार

शॉल्लीड काव्यखेचर !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मिंटी's picture

11 May 2009 - 3:53 pm | मिंटी

असेच म्हणते.
मस्त हो विजु भाऊ. :)

आनंदयात्री's picture

11 May 2009 - 1:07 pm | आनंदयात्री

श्रेय अधिकारः

सदर खरडींमधुन येणार्‍या काव्यात्मक अत्याचाराला आम्ही आमच्या सुमार बुद्धीने काव्यखेचर असे नाव साधारण वर्षभरापुर्वी दिल्याचे स्मरते !!
या लेखनातुन किंवा येथिल प्रतिसादातुन हा शब्द प्रचलित न होता हा शब्द आधीच प्रचलित आहे आणी तोही आमच्याकरवी झाला आहे याची समस्त जालकरांनी नोंद घ्यावी.

-
आपलाच

(विजुभाउंना घाबरनारा)
आनंदयात्री

अवलिया's picture

11 May 2009 - 1:09 pm | अवलिया

पुरावा काय ?

--अवलिया

अनंता's picture

11 May 2009 - 1:30 pm | अनंता

आख्खा गाडा!!!

विजुभाऊ's picture

12 May 2009 - 10:26 am | विजुभाऊ

आम्ही आमच्या सुमार बुद्धीने काव्यखेचर असे नाव साधारण वर्षभरापुर्वी दिल्याचे स्मरते
काव्यखेचर आणि तदमाताय या दोन शब्दांचे इंटलेक्च्युअल राइट्स धमाल मुलाने तो मुलगा असतानाच घेतले होते त्याने ते तो स्वतःलग्न होउन बाप्या झाल्यानन्तरही अन्य कोणास दिल्याचे ऐकीवात नाही.
सदरहु कोणतेही लेखव्य( वक्तव्य च्या धर्तीवर) करताना नीट स्मरण करुन करावे.

क्रान्ति's picture

11 May 2009 - 9:11 pm | क्रान्ति

मा. विजूभाऊकरवी प्रस्तुत प्रतिसाद नामे बखरकाव्य [काव्यखेचर] मनास आत्यंत भावले. तै निमित्ते कैक दिसांनी हास्यरसाची प्राप्ती जाली, प्रीत्यर्थ मा. विजूभाऊ यांस बालिकेकरवी धन्यवाद! =)) =)) =)) =)) =)) =))
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com