आय लव चप्पाती :)

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
7 May 2009 - 6:01 pm

पोळ्यांचा नकाशा तिला
कळला नाही
पोळपाटाची अदा
मला वळली नाही
वाटत होत मला
(स्वयंपाक)घरात बोलायचं काम नसतं
पण नंतर कळलं
कितीही बोल्ल तरी
कणीकान फक्त तींबूनच घ्यायच आसत
आता असं वाटतंय
तिला भेटावं .सर्व काही सांगाव
(मी पीठ/पाणी घालाव)
तीने कणीक फक्त तेवढ मळाव
नाही मिळाली हेल्प तरी
बोलण्याच समाधान मिळणार आहे
''आज मी फक्त चपात्याच करणार आहे ''
असं (एकदा स्वप्नात तरी)मी तिला ठणकावणार आहे .

पाकक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

7 May 2009 - 6:04 pm | पर्नल नेने मराठे

आम्ही पोळी म्हणतो.
चुचु

रेवती's picture

7 May 2009 - 10:10 pm | रेवती

''आज मी फक्त चपात्याच करणार आहे ''
असं (एकदा स्वप्नात तरी)मी तिला ठणकावणार आहे .
आपले मुखदुर्बळ हे नाव सार्थ करणारी कविता.
स्वप्नात तरी सांगितलेत हे काय कमी आहे? ;)

रेवती