महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

विकि's picture
विकि in जनातलं, मनातलं
1 May 2009 - 11:17 am

सर्व मिपाकरांना " १ मे महाराष्ट्रदिन व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा " !!

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

अनंता's picture

1 May 2009 - 11:26 am | अनंता

माझ्याही सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राचे गौरवगीत इथे ऐका.
www.marathifm.com/Maharashtrachi%20Lokdhara/Jay%20Maharashtra.htm

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

प्रमोद देव's picture

1 May 2009 - 11:37 am | प्रमोद देव

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मिपाकरांना माझ्याही हार्दिक शुभेच्छा!
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मे झालेल्या समस्त बंधु-भगिनींना माझी विनम्र आदरांजली.

विकि,दोन्ही चित्रे छानच आहेत.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

विकि's picture

1 May 2009 - 11:58 am | विकि

विकि,दोन्ही चित्रे छानच आहेत.
धन्यवाद.

प्रशु's picture

1 May 2009 - 11:44 am | प्रशु

जय महाराष्ट्र

अभिज्ञ's picture

1 May 2009 - 1:09 pm | अभिज्ञ

सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
गोवा-कारवार-गोकाक-निपाणी-बेळगाव-हुबळी-धारवाड सह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न लवकर
पुर्ण होवो हीच अपेक्षा.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

>>गोवा-कारवार-गोकाक-निपाणी-बेळगाव-हुबळी-धारवाड सह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न लवकर पुर्ण होवो हीच अपेक्षा.
सहमत!

आंबोळी

भडकमकर मास्तर's picture

1 May 2009 - 5:03 pm | भडकमकर मास्तर

गोव्यासकट हुबळी-धारवाड सुद्धा पायजे का? लै बेस्ट
:)
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.. :)
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

अवलिया's picture

1 May 2009 - 1:22 pm | अवलिया

सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जागतिक कामगार दिनाच्या सर्व कामगारांना हार्दिक शुभेच्छा!
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मे झालेल्या समस्त बंधु-भगिनींना माझी विनम्र आदरांजली.

मराठी माणसाची संस्कृती जपणा-या मराठी बांधवांना विशेष शुभेच्छा !
शुभाशुभ न मानण्याची परंपरा मोडीत काढुन निदान आजच्या दिवसाला शुभ मानणा-या आधुनिकतेची कास धरत पुरातन वारशाला न विसरणा-या बांधवांचे आभार !!!

--अवलिया

अविनाशकुलकर्णी's picture

1 May 2009 - 3:24 pm | अविनाशकुलकर्णी
नितिन थत्ते's picture

1 May 2009 - 3:45 pm | नितिन थत्ते

लेख वाचून गंमत वाटली. गंमत कशाची? तर त्यातल्या लॉजिकची.
एक शंका आली ती म्हणजे हा लिहिलेला इतिहास उत्तर भारतीयाने सांगितलेला की डोईफोडे यांना वाटतो तसा?

खराटा
(रंग माझा वेगळा)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 May 2009 - 4:21 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख वाचला. सगळेच पटले नाही.

उत्तरेत मराठ्यांबद्दल असेच काहीसे मत आहे हे माहित होते. मराठे म्हणजे लूटालूट, मराठे म्हणजे युद्ध, मराठे म्हणजे जाळपोळ असे काहीसे. अर्थात उत्तरेकडे म्हणजे खासकरून पूर्व यु.पी आणि बिहार वगैरे भागात.

गांधीवधानंतर बर्‍याच वर्षांनी एक मराठी गृहस्थ बिहारमधील एका लहान शहरात एक लॉज शोधत होते, पण त्यांना जागा मिळेना. कारण काय तर ते मराठी ब्राह्मण होते म्हणून. (ही एक हकिकत फार पूर्वी एका कुटुंबसदस्याकडून ऐकली होती.)

बिपिन कार्यकर्ते

विकास's picture

1 May 2009 - 4:40 pm | विकास

तुम्हा सर्वांनापण महाराष्ट्र दिना निमित्त शुभेच्छा!

विकीरावः चित्र आवडले (हे मनापासून).
(आता आधीच लिहीतो जरा गंमत करतोयः, तेंव्हा टेक इट लाईटली:) विशेष करून त्यात भगवा ध्वज दिसल्यामुळे ;)

सागर's picture

1 May 2009 - 5:11 pm | सागर

माझ्याही तर्फे सर्व मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. :)

महाराष्ट्र दिन चिरायू होवो....

- सागर

सँडी's picture

1 May 2009 - 5:37 pm | सँडी

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाकीच्या २७ राज्ये आणि ७ केन्द्रशासित प्रदेशांसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पायजे!

नितिन थत्ते's picture

1 May 2009 - 5:49 pm | नितिन थत्ते

=)) =)) =)) =))

(महाराष्ट्रवादी भारत पक्षाचा) खराटा

कलंत्री's picture

1 May 2009 - 5:48 pm | कलंत्री

महाराष्ट्रदिनाच्या निमित्त्याने अत्रे यांचे स्मरण होणे यथोचित राहिल.

बेळगांव आणि इतर भाग महाराष्ट्रात येणे कदाचित अवघड आहे. परंतु बृहत महाराष्ट्राची कल्पना साकार होणे आजही शक्य आहे.

बृहत महाराष्ट्र म्हणजे जेथे जेथे मराठी भाषक आहे त्यांचा संघ होणे.

कोणास ठाऊक असे जर झाले तर मराठी पंतप्रधान अशी कल्पनाही करावी लागणार नाही आपोआप ती साकार होईल हे नक्की.

बेळगांव आणि इतर भाग महाराष्ट्रात येणे कदाचित अवघड आहे.

हे कठिण कार्य "गांधीवाद" वापरून शक्य आहे का ? कृपया एक लेखमाला लिहावी ;)

पिवळा डांबिस's picture

1 May 2009 - 9:48 pm | पिवळा डांबिस

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली!
सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
विकी, एक अतिसुंदर चित्र दिल्याबद्दल तुम्हाला विशेष हार्दिक धन्यवाद!

विकीभाऊ,

तुमच्या कॉम्रेड्सनी जगभर कामगार दिन असा आणि असा साजरा केला. मेक्सिकोतही फ्यूच्या साथीमुळे सरकारने सर्व व्यवहार ५ दिवस बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे त्यावरही तेथील तुमच्या कॉम्रेड्सनी आगपाखड केली आहे. त्याचा दुवा जालावर सापडला नाही, मिळाला की देइन.