(किती धीर ठेवू?)

आंबोळी's picture
आंबोळी in जे न देखे रवी...
29 Apr 2009 - 3:43 pm

आमची प्रेरणा भूषण कटककर यांची रचना

प्रतिसाद कुणाचा मिळावा मलाही
'तिरस्कार वाटू नये आपला' ही

कधी तिला आजार होतो गळ्याचा
कधी थांबतो ना तिचा खोकलाही

किती वाट पाहू? किती धीर ठेवू?
कधी जायची विडंबनाची बला ही?

कशाला अश्या बिड्या ओढायच्या मी?
किती धूर हा तुलाही, मलाही!

अरे काल झाला असे जन्म माझा
जगावे म्हणेतोवरी विडंबलाही

कंदीलसुमार

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

29 Apr 2009 - 5:47 pm | अभिज्ञ

विडंबन ठिक झाले आहे.
मुळ कवितेतच फारसा दम नाहिये,त्यामुळे आपल्याला दोष देता येत नाहि.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Apr 2009 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार

उत्तम विडंबन !

अवांतर :- मी आधी 'दीर' वाचले. =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य