सुपारी की ब्ल्याकमेल

स्वामि's picture
स्वामि in कलादालन
26 Apr 2009 - 7:51 pm

आजपर्यंत कधी ड्रायव्हर सारख्या टुकार माणसाबरोबर डील करण्याचा योग आला नव्हता,ही जात साली परधार्जिणी असते.कधी चुकुनही मालकाच्या गाडीचं कौतुक करणार नाही.झेन चालवत असतील तर स्विफ्टचं कौतुक,स्विफ्ट चालवत असतील तर इनोव्हाचं कौतुक,च्या मायला ह्यांच्या बुडाला गार वाटावं म्हणून घेतली काय गाडी!तर ह्या च्युत्याचं नाव आहे बाबु.असल्या नावांचं एक बरं असतं,म्हटलं तर नाव,नाहीतर टोपण नाव.उद्या गेम झाली की पोलिसांना काय सांगु?माझ्याकडं बाबु नावाचा ड्रायवर होता म्हणुन?कानाखाली आवाज काढतील माझ्या पहील्यांदा.आडनाव काय,राहातो कुठं,त्याचं कुटुंब कुठं असतं,वात पेटवतील शंकांची.आणी 'सुशिक्षित'अशी शिवी पण देतील जाताना.
बाबु आत आला.माझ्या समोर पहील्यांदाच खुर्चीत बसला होता,
"काय घेणार चहा,कॉफी,की सरबत."चहा सोडला तर बाकी काही मिळण्यासारखं नव्हतं.
"सरबत चालेल",बाबु.
"आपण चहाच घेउ,म्हणजे कसं तो गार होता होता आपल्याला निवांत बोलता येइल."
"तुम्हाला कोणी सांगीतलं मी अशी कामं करतो ते?"
"आता कळलय ना?आणि माझं पण तेच काम आहे,किती घेशील."
"पाच"
"फक्त चाल लावून द्यायचे?आणी मेन गेमचे किती घेतात ती लोकं?"
"ते तुम्ही त्यांनाच इचारा"
"एक देइन"
"येतो साहेब"
"दोन लास्ट,बरीच कामं तुंबलीत"
"कोणाची गेम पर"
"ते मी त्यानाच सांगीन,या आता"
दोन दिवसांनी बाबुचा फोन आला,ते भेटायला तयार आहेत म्हणून.शेट्टीच्या फार्महाउसचा पत्ता सांगीतला.शेट्टीला फोन लावला,सामानाला न्यायचय,शनवारच्या रात्रीसाठी पाहीजे म्हणून सांगीतलं.जरा खळखळ केली,पण भाभी काय म्हणतायत,रुचा आठवण काढत होती म्हंटल्यावर तयार झाला.
शनवारी संध्याकाळी टॅक्सीने दीपाला गेलो,सामानाला उचललं,रविवारी सकाळी परत सोडतो म्हणून सांगीतलं,रेग्युलर कस्टमरला जरा कन्सीडर करतात,अजून थोडी माणुसकी शिल्लक आहे या जगात.टॅक्सी सरळ फार्महाउसवर घेतली.पोर भूक लागली करायला लागली,गेस्ट येणार आहेत त्यांच्या बरोबरच जेउ म्हंटलं तर भडकली,'खाली तेरे साथ नाइट की बोली थी ,ये क्या गेस्ट वेस्ट का चक्कर लगा रखा है'म्हणून कुरकुर करायला लागली.मला तिथे पोहोचायची घाइ झाली होती.कसबसं तीला शांत केलं.तेवढ्यात आम्ही फार्महाउअसवर पोहोचलो.
शेट्टीच्या लोकांनी चांगली सोय केली होती.पहीलं बाथरुम गाठलं.गोळ्या नीट आहेतका ते चेक केलं.असले जुने वापरात नसलेले घोडे एनवेळेस दगा देतात.आज गरज पडेल असं काही नव्हतं म्हणा,तरी असु द्यावा एक जवळ सेफ्टीसाठी.
"साहेब कोणीतरी आपल्याला भेटायला आलय."
"बिठाव उनको,मै आता हुं."हिंदी सगळ्यात सेफ.
"येस सर"
दोन जण सोफ्यावर पुस्तक चाळत बसले होते.च्यायला ह्या लोकांना वाचता पण येतं तर.
"नमस्कार साहेब"
मी फक्त हात वर केला.
"जानु,जरा डिस्कस करनेका है,अंदर जाओगी,मै आता हुं"
ती नीट आत गेल्याची खात्री केली,
"बाबु म्हणत होता काही मॅटर आहे"
"हं,घरातलंच आहे."
"बायको,भाउ,बाप की अजुक कोनी"
"बायकोच"
"लय वाइट बगा जमाना साएब,आपन आपल्या कामामंदी बिजी असतो आन या बायका भाइर जाउन शान खात्यात"
"कामाचं बोलु?'
तो वरमला,"पुढचा महीनाभर मी बाहेर आहे,मॅडमच्या डिटेल तुम्हाला बाबु सांगेल,मी परत येइपर्यंत काम करुन टाका,पेमेन्टचं कसं काय?"
"दहा उद्या द्या,उरलेले नंतर द्या"
"नंतर किती उरतील?"
"वीस"
"अवघड आहे,एवढं काही जमायचं नाही"
"जमवायचं असतं साहेब,एकदा उडी घेतली की मागं नाय हटायचं "
"जाउ दे ,नंतर बघु"
पहीला एकदम भडकून उभा राहीला,"च्युत्या समजला का रे भडव्या आमाला,नुस्ते तुला इथून जित्ता जाउंद्यायचे पन पैसे लागतीन आता"
"राम्या,शान बस,मी बोलतोय ना,साहेब तुम्ही पहील्यादाच असलं काम करता दिसतय,बगा ....आमचे पन प्राब्लेम असत्यात,आज तुमाला निस्तं भेटायचं म्हनलं तरी आमाला मोठी रिक्स असती.आता तुमाला पन जरा आमचा इचार करावा लागल.अता काम केलं नाय केलं तरी आमचे पाच फिक्स झाले,बरोबर का नाय"
"ओह शिट,तुम्ही मला ब्ल्याकमेल करताय"
आता कायपन म्हना साहेब,सुपारी का ब्ल्याकमेल तो तुमचा प्राब्लेम."

कथा

प्रतिक्रिया

काळा डॉन's picture

26 Apr 2009 - 8:15 pm | काळा डॉन

कलादालन? गल्ली चुकली की व सुपारीची...

प्राजु's picture

26 Apr 2009 - 8:55 pm | प्राजु

लघुकथेची वातावरण निर्मिती चांगली झाली आहे.
आणि शेवटही आवडला.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/