(आपण...)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
5 Feb 2008 - 3:57 am

आमची प्रेरणा अजब यांची सुरेख कविता आपण...

काव्य स्वतः कशा करावे आपण?
आयत्या जमिनी या कसावे आपण...

कुणी जरी प्रतिसाद टाकले नाही;
विडंबन हे पाडत रहावे आपण...

लिहिणार्‍याचा कुठे का दोष असतो?
वाचकालाच दूषण द्यावे आपण...

इतरांसाठी थोडे आपण लिहितो?
मनी येईल ते खरडावे आपण...

असेल चुकले कधी कधी अपुले पण
मान्य कशाला ते करावे आपण?...

'केश्या' मेल्या तुला कसे ना कळते
किती जगाला इथे छळावे आपण...

विडंबन

प्रतिक्रिया

धनंजय's picture

5 Feb 2008 - 4:28 am | धनंजय

> काव्य स्वतः कशा करावे आपण?
> आयत्या जमिनी या कसावे आपण...
हे विडंबनकाराचे शल्य.

> कुणी जरी प्रतिसाद टाकले नाही;
> ...
> किती जगाला इथे छळावे आपण...
आम्ही प्रतिसाद न टाकताही वाचतो, बहुतेक (कधीकधी स्वगृहाच्या पहिल्या पानावरून सरले, तर नाही वाचणे होत.) तर जरूर छळा.

हं - हे बरे लक्षात आले. गझलेचे प्रत्येक कडवे स्वतंत्र असते हे माहीत होते, पण प्रत्येक ओळ स्वतंत्र मिसळून वाचता येते, हा आज साक्षात्कारच झाला मला! उदाहरणार्थ :

> काव्य स्वतः कशा करावे आपण?
> विडंबन हे पाडत रहावे आपण...
>
> कुणी जरी प्रतिसाद टाकले नाही;
> वाचकालाच दूषण द्यावे आपण...
>
> लिहिणार्‍याचा कुठे का दोष असतो?
> मनी येईल ते खरडावे आपण...
>
> इतरांसाठी थोडे आपण लिहितो?
> मान्य कशाला ते करावे आपण?...
>
> असेल चुकले कधी कधी अपुले पण
> किती जगाला इथे छळावे आपण...
>
> 'केश्या' मेल्या तुला कसे ना कळते
> आयत्या जमिनी या कसावे आपण...

केशवसुमार's picture

6 Feb 2008 - 7:21 pm | केशवसुमार

धनंजयशेठ,
आम्ही लोकांचे शब्द इकडे तिकडे करून विडंबने पाडतो.. तुम्ही आमच्या विडंबनाच्या ओळी इकडे तिकडे करूर अजून एक विडंबन तयार केलेत( चोर के घर मे चोरी) .. विडंबन उत्तम झाले आहे...आवडले...
केशवसुमार

स्वाती दिनेश's picture

6 Feb 2008 - 7:20 pm | स्वाती दिनेश

विडंबन आणि विडंबनाचे विडंबन झकास!
स्वाती