मनात लपलेला दु:शासन!

उमेश कोठीकर's picture
उमेश कोठीकर in जे न देखे रवी...
18 Apr 2009 - 4:13 pm

शरीर स्त्रीचे भासे शाप
डोळे विखारी जगी अमाप
नजर फिरते अंगी जैसी
बुभुक्षित ते कामुक साप!

परस्त्री ती समोर दिसता
दु:शासन तो जागे क्षणात
खेळ मनीचा विकृत चाले
भोग तिचा तो घेई मनात

गर्दी असो! असो एकांत
पदर खेचण्या अधीर हात
हात सराईत जागी लागे
वखवखलेली श्वापद जात!

असो बालिका असो तरूणी
नाते गोते लज्जा नाही
नरमादीचे नाते एकच!
असहाय्य मादी मुकाट साही

असेल कोठे कृष्ण सखा तो?
कवच तुझे दे! शरीरी रक्षक
दग्ध होईल शरीर अमुचे
कामुक नजरा! दाहक मारक

हरएक मनी उदराखाली
दु:शासन हा सुप्त वसतो
पदर खेचण्या अधीर पापी
संधी सावज रोज शोधितो!

दु:शासनास बाहेर खेचून
ठेचून ठेचून ठार करावे
परस्त्री ही बहीण, माता!
रूप थोर हे पूज्य असावे!

कविताविचार

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 Apr 2009 - 8:24 pm | प्राजु

भयंकर!!!

असेल कोठे कृष्ण सखा तो?
कवच तुझे दे! शरीरी रक्षक
दग्ध होईल शरीर अमुचे
कामुक नजरा! दाहक मारक

मस्त लिहिले आहेस. हॅट्स ऑफ!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सूहास's picture

18 Apr 2009 - 8:26 pm | सूहास (not verified)

च्या आयला तु मारून टाकणार बहूतेक

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..

बेसनलाडू's picture

19 Apr 2009 - 2:07 am | बेसनलाडू

(अस्वस्थ)बेसनलाडू

चतुरंग's picture

21 Apr 2009 - 4:28 pm | चतुरंग

मनाचा डोह डुचमळला!

चतुरंग

क्रान्ति's picture

19 Apr 2009 - 5:49 am | क्रान्ति

असं काही वाचलं की शब्दच मुके होतात.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

मराठमोळा's picture

19 Apr 2009 - 10:30 am | मराठमोळा

काय प्रतिसाद द्यावा हेच सुचत नव्हते. अजुनही सुचत नाहिये.
वरील सर्वांशी सहमत. वास्तववादी कविता

आपला(कविता वाचुन मुक झालेला) मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सुधीर कांदळकर's picture

19 Apr 2009 - 8:12 pm | सुधीर कांदळकर

दुश्शासन आठवला.

छान.

सुधीर कांदळकर.

राघव's picture

20 Apr 2009 - 7:47 am | राघव

नि:शब्द केलंत.

राघव

दशानन's picture

20 Apr 2009 - 9:41 am | दशानन

8|

सालोमालो's picture

20 Apr 2009 - 2:08 pm | सालोमालो

पण कवितेच्या रचनेकडे आणि शब्दांकडे अजुन लक्ष हवे असे माझे वैयक्तीक मत आहे.

सालो

उमेश कोठीकर's picture

21 Apr 2009 - 5:43 am | उमेश कोठीकर

सगळ्यांचे धन्यवाद.सालो,प्रयत्न करतोय.

उदय सप्रे's picture

21 Apr 2009 - 4:23 pm | उदय सप्रे

शब्द आणि रचना या केंव्हाही सुधारता येतीलच उमेश , पण उत्कट अश्या भावना पोचवल्यात तुम्ही !
स्पेलबाऊन्ड !......म्हणजे गरगरलो .....

सालोमालो's picture

22 Apr 2009 - 1:57 pm | सालोमालो

उदय,

लहानपणी केशवसूतांचं वाक्य वाचलं होतं.

कविता ही आकाशाची वीज आहे आणि वाणी ही विद्येची देवता आहे. माझी प्रतिक्रिया उमेशला खट्टू करण्यासाठी नव्हती. निंदकाचे घर असावे शेजारी या प्रकारची होती.

सालो

ठकू's picture

21 Apr 2009 - 5:09 pm | ठकू

दुसरं काहीच बोलू शकत नाही.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

महेश हतोळकर's picture

22 Apr 2009 - 3:45 pm | महेश हतोळकर

सुंदर कवीता.
पण.....
मीच द्रौपदी आणि मीच दु:शासन. वाट पाहू कोण्या कृष्णाची?

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2009 - 4:24 pm | भडकमकर मास्तर

कविता वाचली...
काही प्रश्न निर्माण झाले...
परस्त्री ही बहीण आणि माताच का असावी?
साधी मैत्रीण किंवा कलीग वगैरे न मानणं म्हणजे स्वत:वरच महा संशय घेण्यासारखं आहे....
सबब मी काही सर्व परस्त्रिया बहीण माता वगैरे मानत नाही...
( आणि उगीच सर्व परस्त्रियांना बहीण आणि मातेचे आपल्या दृष्टीने उच्च स्टेटस का द्या ?? आणि दु:शासन फ़क्त पुरुषांतच असतील असे थोडेच आहे?)

_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?