हे जीवन इरादा ठेऊन सर्वांना शिकवतं, काय तर -जग.ह्या क्षणी आणि क्षणोक्षणी.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
18 Apr 2009 - 7:58 am

प्रो.देसायांना थोरला भाऊ आहे हे मला हल्लीच कळलं.काल प्रो.देसाई मला म्हणाले,
"माझा थोरला भाऊ माधव काही दिवस माझ्याकडे राहायला येणार आहे.आल्यावर मी त्याला नक्कीच तळ्यावर घेऊन येतो."
कीडकीडीत शरिरयष्टीचे,काठीचा आधार न घेता चालणारे भाऊसाहेबांचा जुळाभाऊ वाटणारे माधव, भाऊसाहेबांपेक्षा दहा वर्षानी मोठे होते.पंचायशी वर्षावर त्यांची ठणठणीत प्रकृती पाहून मी त्यांना म्हणालो,
"तुमचं वय तुम्ही सांगितल्यावर मला कळलं. नाहिपेक्षा तुम्ही एव्हड्या वयाचे दिसत नाही.उलट भाऊसाहेब तुमचे मोठे भाऊ शोभतात."

माधव मला म्हणाले,
चालंय,इतके दिवस काढले त्यात आणखी थोडे दिवस काढायचे.मी एक दिवस मरणार आहे हे निश्चित.आता मी मेल्यानंतर स्वर्गात जाईन की नरकात हे मात्र मला माहित नाही.किंवा कुणा दुसर्‍याची कुडीत जन्म घेईन किंवा कसं.किंवा नष्ट होऊन राख आणि मातीच्या रुपात निघून जाईन.पण एव्हडं मात्र नक्की त्यानंतर "मी" नसणार,कारण माझं शरिर,मन,आणि माझ्या स्मृति काय ते मला माहित झालं आहे.काहीही होवो,कसलाही माझा जीव असो,ज्याला रुढ अर्थाने आपण"अहम" म्हणतो किंवा ज्याला आपलं "मीपण"म्हणतो ते दारूण क्षणभंगूर असतं,ते कालांतराने संपूर्णपणे व्यतीत होतं. कुणाचं तरी स्वप्न असावं जणूं."

"मला तुम्हाला कॉम्प्लीमेंट्स देण्याच्या दृष्टीने म्हणायचं होतं.आपण दीर्घायुषी व्हावं असंच मी देवाला म्हणेन."
माझं हे ऐकून माधव जे मला सांगायला लागले ते त्यांचं सांगणं ऐकून घेणं मला क्रमप्राप्तच होतं.कारण प्रो.देसायांची सांगण्याची लकब,ऐकणारी व्यक्ति ही जणू आपला विद्यार्थी आहे,असं समजून विषयाला धरून सांगोपांग अर्थ विशद करण्याची हातोटी हे सर्व गूण ह्यांच्यात उतरले होते.भाऊसाहेब सुद्धा मला हाताने खुणवून ते काय म्हणतात ते शांतपणे ऐकण्याचा इशारा देत होते.

माधव म्हणाले,
"प्रत्येकाला माहित आहे की,जीवन हे एका क्षणात झालेलं असतं,ज्याला सुरवात,मध्य आणि शेवट आहे.माझ्या तरूण वयात मला वाटायचं,की जीवानाला अंत आहे.पण ही निकृष्ट निंदेची उपधी मला लागू आहे असं वाटत नसायचं.
पण ज्यावेळी मला एक असाध्य रोगाची बाधा झाली आहे हे कळलं तेव्हा मी चांगलाच बदललो.असं मला वाटतं. मनोवैज्ञानीक,तत्वज्ञ आणि कलाकारानी हजारो वर्षे चिंतन करून मृत्युची ही एक चिंताजनक मर्यादा आपल्या आकांक्षां समोर आणि आपल्या यत्ना समोर आणून ठेवली आहे."

मी त्यांना मधेच रोखत म्हणालो,
"म्हणजे आयुष्यात एखादा टर्निंग-पॉइंट आला की मग माणसाचे विचार बदलतात असं वाटतं."
"हो तुम्ही अगदी बरोबर बोललां"
असं म्हणत माधव पूढे सांगू लागले,
"मी ज्यावेळी तरूण होतो,तन्दुरूस्त होतो,साहसी होतो आणि चिरस्थायित्वावर विश्वास ठेवायचो आणि त्यावेळी जसं प्रफुल्लीत वाटायचं त्यापेक्षां आता कमी वाटायला लागलं असून, मृत्यु माझ्या सानिध्यात आहे हे जास्त भासायला लागलंय. त्या माझ्या प्रफुल्लीत तारूण्यात जीवन मला कमी मोहक वाटत नव्हतं.ते आता वाटायला लागलं आहे. कारण माझीच कमजोरी माझ्या जवळच बसून असते. जरी माझी मी धारणा बदलली तरी माझं जीवन मला कमी किमतीचं भासत नाही. आत्ताच तर माझ्या शांती आणि खुशीवर उदासिनतेच्या रंगाची छटा आली आहे त्या उदासिनतेबद्दल माहिती असण्याची पूर्वी मला गरज भासली नाही,आणि माहिती करून घेण्याची आवशक्यता ही नव्हती. जीवन जगण्यात माझी भुमिका त्या ऋतुमधे येणार्‍या फुलांसारखी आहे मोसम संपल्यावर नव्या फुलांना वाट करून द्यावी तशी.तरी पण मला सोडून जावसं वाटत नाही."

त्यांचे हे विचार ऐकून मला जरा त्यांच्या चिंतनात स्वारस्य घ्यावंसं वाटलं.मी त्यांना म्हणालो,
"तुम्ही फारच छान सांगता.तुम्हा दोघा भावामधे ह्या बाबतीत तरी काही फरक वाटत नाही.तुमच्याकडून आणखी ऐकावं असं वाटतं."
मी असं म्हणण्याचीच फुरसद त्यांना हवी होती.

लागलीच माधव म्हणाले,
धारणा असणं ही एक गमतीदार गोष्ट आहे.तो सत्याचा स्विकार असतो.सत्य किंवा मत यांच्या निश्चिततेचा तो आभास असतो.इथे सत्य स्विकारणं महत्वपूर्ण आहे.मला वाटतं ही स्विकाराची वृत्तीच मला बदलूं शकली. अदृश्य होण्याच्या किंवा नष्ट होण्याच्या स्थिती जवळ मी येऊन ठेपलो असताना तसं होणार हे मी आता मानायला लागलो आहे. नष्ट होणं हा प्रस्थापित विचार आता मी नीष्टा राखून स्विकारायला लागलो आहे. ते सत्य मी स्विकारायला लागल्याने ते सत्य आता माझ्या धारणेचा आधारस्तंभ झाला आहे."

भाऊसाहेब मधेच म्हणाले,
"अरे माधव,पण मला एक आठवतं की निसर्ग विनाशाबरोबर उत्पतीची पण सांगड घालीत असतो." असं तुच एकदा म्हणाला होतास."
"अजुनही मी तेच म्हणतो."
असं म्हणत माधव पुढे म्हणाले,
"त्यामुळेच ह्या धारणेविषयी मी क्षणोक्षणी जास्त अभिज्ञ राहिलो आहे की जेव्हडा मी पूर्वी नव्हतो. मृत्युच्या निश्चिततेच्या अभिज्ञतेमुळे ते क्षण काही जास्त म्रुदु झाले अशातला भाग नाही.परंतु,त्यामुळे मला नसण्यापेक्षां असण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायला सहाय्य मिळालं.मृत्युबद्दल मिळालेल्या बोधाने माझं जीवन सुखकर झालं नाही.परंतु,त्याने मला स्मरण करून दिलं आहे की हा मृदु श्वास किंवा ही पावसाची सर,हे प्रेमाचं अलिंगन,ह्या किरंगळीतल्या वेदना ही सर्व माझी सदासर्वदाची अनुभूति आहे.मृत्यु मला असं स्मरण देतो की-
" हे जीवन इरादा ठेऊन सर्वांना शिकवतं, काय तर -जग.ह्या क्षणी आणि क्षणोक्षणी."

मनात मी म्हणालो,
"जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख