प्रभातरंग

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
15 Apr 2009 - 9:32 pm

पहाट झाली उधळले प्रभातरंग
सुखावले नयन मन आनंदात गुंग

सोनेरी किरणे फुला-पानांत ओसंडे
निसर्गसौंदर्यास कळा सतरावी चढे

नवचैतन्य पहाट विखुरते नवरंग
पाण्यात झळाळे नवसुर्य प्रतिबिंब

पक्षी किलबिलाट छेडे सुर हळुवार
वेलीफुलांना येई तारुण्याची बहार

काळोख भेदे प्रकाश जशी निराशेस आशा
सुर्य विराजमान होई संपवुन अंधारी निशा

टीपः कविता आवडल्यास किंवा न आवडल्यास/ बदल करावेसे किंवा विडंबन करावेसे वाटल्यास जरुर कळवावे/ करावे.

आपला (प्रभातरंगप्रेमी)
मराठमोळा.

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

पक्या's picture

15 Apr 2009 - 10:45 pm | पक्या

प्रयत्न चांगला आहे.
>>नवचैतन्य पहाट विखुरते नवरंग
पाण्यात झळाळे नवसुर्य प्रतिबिंब
पक्षी किलबिलाट छेडे सुर हळुवार
वेलीफुलांना येई तारुण्याची बहार
ह्या ओळी आवडल्या.

कळा सतरावी समजले नाही?

प्राजु's picture

15 Apr 2009 - 10:46 pm | प्राजु

पु ले शु.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

15 Apr 2009 - 11:12 pm | क्रान्ति

सुन्दर कविता, प्रसन्न सकाळ! आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

बेसनलाडू's picture

15 Apr 2009 - 11:14 pm | बेसनलाडू

सतरावी कळा काय असते?
(जिज्ञासू)बेसनलाडू

मराठमोळा's picture

16 Apr 2009 - 6:38 am | मराठमोळा

"सौंदर्याला सतरावी कळा चढणे" हे विशेषण प्रामुख्याने स्त्रियांचे सौंदर्य व्यक्त करण्यासाठी वापरले जाते.
उदा. एखाद्या सुंदर ललनेने डोळ्यात काजळ घातल्यास तिच्या सौंदर्यास सतरावी कळा चढते.

हे विशेषण कधीपासुन प्रचलित आहे आणी कसे वापरात आले त्याबद्दल मात्र माहिती नाही.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

राघव's picture

16 Apr 2009 - 7:44 am | राघव

चांगला प्रयत्न आहे रे.. येऊ देत अजून! :)
अवांतरः अरे याला विडंबन सोडून दुसरे काही सुचते आहे हेच काय कमी झाले?? ;)

राघव

सूहास's picture

16 Apr 2009 - 6:26 pm | सूहास (not verified)

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..