कसाबची आई

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in काथ्याकूट
15 Apr 2009 - 3:00 pm
गाभा: 

काल आपले परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांनी कुठेतरी सांगितले की कसाबची आई मुंबईला येणार आहे....
...
ही बातमी टीव्ही वरती वाचून डोके आउट झाले.
कितीही विचार केला तरी ही काय पाकिस्तानवर कुरघोडीची राजकीय चाल वगैरे आहे , असे वाटत नाही...
या सरकारला इतक्या फेनॅटिक दुष्ट गुन्हेगारांचा इतका पुळका का?

आता या नराधमाच्या कथेत एक ह्यूमन अँगल आणायचा विचार आहे काय या लोकांचा?
असे करणे हा हल्ल्यात मृत आणि जखमी लोकांचा अपमान नाही का?

आणि तिला येऊ कशाला देत आहेत हे ? एका परदेशी गुन्हेगाराची आई आपल्या देशात यायचा संबंध काय?
... तिला व्हिसा देणार यांची हीच मिनिस्ट्री ना?
..उद्या यांचे अख्खे कुटुंब बोलवून सर्वांचे पुनर्वसन करून दिले तर नवल वाटू नये.

...कसाबचा तरी अफजल गुरू होणार नाही असे वाटत होते.
..पण हे सारे एकूण त्याच मार्गाने चाललेले दिसते.
________________--
या बातमीचे इतर डीटेल्स बातम्यांमध्ये दिसले नाहीत..
कोणाला ठाउक आहेत काय?
___________
संपादकांना विनंती : हा छोटा काथ्याकूट आहे, म्हणून उडवून टाकायचा असल्यास जरूर उडवा.

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

15 Apr 2009 - 3:06 pm | अमोल केळकर

कदाचीत कसाबच्या आईला भेटीची परवानगी देऊन पाकिस्तान विरुध्द एक सबळ पुरवा गोळा करण्याची रणनिती सरकारची असावी
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा

भडकमकर मास्तर's picture

15 Apr 2009 - 3:30 pm | भडकमकर मास्तर

सबळ पुरावा : आई कसा देणार ?
.. तो पाकिस्तानी आहे हे त्यांच्या देशाने सुद्धा मान्य केलेच आहे...
मग त्या इतर पुराव्यांपेक्षा दर्जाने अधिक पुरावा ही आई काय देणार आहे?

... आता हे फॅमिली मॅटर आणून हे प्रकरण उगीच काँप्लिकेट होणार आहे ...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पाषाणभेद's picture

15 Apr 2009 - 3:11 pm | पाषाणभेद

आपला संताप समजु शकतो पण मला परत जालिंदर सारखे काहीतरी आले आहे हि उत्सुकता म्हणुन हा दुवा उघडला.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

मेघना भुस्कुटे's picture

15 Apr 2009 - 3:14 pm | मेघना भुस्कुटे

मास्तर, संपूर्ण सहमत.
पण मला वाटते, हा प्रसारमाध्यमांचा आचरटपणा अधिक असावा.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2009 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार

कसाबची आई त्याला भेटली आणी मग लहानपणीच योग्यवेळी तु मला का सावरले नाहिस ? का मला गुन्हे करण्यापासुन आडवले नाहिस ? असे विचारुन त्या कसाबाने आपल्या आईचा कान जोरात चावला.

आठवतेना गोष्ट मास्तर ? ;)

पराष्णुशास्त्री
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

15 Apr 2009 - 3:42 pm | भडकमकर मास्तर

लै बेष्ट..
हेच आता आर्थर रोडच्या तुरुंगात घडणार बहुतेक... :(
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चिरोटा's picture

15 Apr 2009 - 4:59 pm | चिरोटा

अमोलने म्हंटल्याप्रमाणे हा सरकारच्या रणनीतीचा भाग असावा.मुलाला बघितल्यावर नक्कीच ती गहिवरून येइल्.मग आणखी काही माहिती मिळते का ,मुख्य म्हणजे कसाब सारख्या दहशतवाद्यांच्या मानसिक जडणघडणीत ,त्यान्च्या पालकांचा किती सहभाग असतो ही माहिती मिळू शकतें.
कुठल्या मानसिकतेवर हे लोक मारायला आणि मरायला तयार होतात हे कळणे मह्त्वाचे आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

महेश हतोळकर's picture

15 Apr 2009 - 5:01 pm | महेश हतोळकर

हे वाचा अफजल गुरूला आजन्म कारावास होणार. आणखी एक कंदहार होणार. फक्त यावेळी मौलाना मसूद अजहर ऐवजी अफजल गुरूचे नाव असणार.

सनविवि's picture

15 Apr 2009 - 5:48 pm | सनविवि

सगळा फालतूपणा चाललाय!

परवाच उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की अगदी रोज जरी case चे कामकाज झाले तरीसुद्धा कमीत कमी सहा महिने लागतील. त्यात भर म्हणून आज कोर्टाने अंजली वाघमारेंकडून वकीलपत्र काढून घेतले आणि कसाबला पाकिस्तानी वकीलच पाहिजे म्हणे! त्यात परत निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील होणार. तिथे फाशी झाली तरी परत अफझल गुरु सारखाच टाईमपास्....म्हणजे अजून २-३ वर्षे तरी कसाब जिवंत आहे.

सूहास's picture

15 Apr 2009 - 5:16 pm | सूहास (not verified)

कसाबच्या आयला...कशाला बोलावल ईथे

सुहास
मिपादर्शनम सुखकारकम..

प्रामाणि़क करदात्यांच्या पैशाने कसाब ,अफजल सारख्या दहशतवाद्यांना फुकट्चे पोसायला केंद्र सरकारचे काय जातेय?
कसाबचे वजन ४ किलो ने वाढल्याचे परवा वृत्त ऐकले आणि एक भारतिय या नात्याने आपण किती आतिथ्यशिल आहोत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला............इथे मेळघाटात,जव्हार मोखाडामधे लहान मुले उपोषणाने मृत्युमुखी पडतायत्.........त्यांना अन्न पुरवठा करायला सरकारचा खजिना कामी येत नाही पण कसाब व अफजल गुरु सारख्या निर्दयी ,क्रूर सैतानांना आजन्म कारावास घडवुन पोसायला हे सरकार (काँग्रेसचे) करदात्यांच्या खिशाला कात्री लावणार..........
वा रे (भंपक)लोकशाही !
वा रे (भंपक)सर्वधर्मसमभाव!
अफजलच्या निवासाची व्यवस्था १० जनपथ वर करणार का?

"अनामिका"

विनायक प्रभू's picture

15 Apr 2009 - 6:16 pm | विनायक प्रभू

नको आई बरोबर?

शितल's picture

15 Apr 2009 - 6:23 pm | शितल

>>..उद्या यांचे अख्खे कुटुंब बोलवून सर्वांचे पुनर्वसन करून दिले तर नवल वाटू नये.
सहमत.
भारतात कोणीही यावे आणि टिकली मारून जावे तसे चालले आहे.

देवदत्त's picture

15 Apr 2009 - 6:59 pm | देवदत्त

सध्या निवडणुकीचा काळ आहे. त्याची आई येऊन निवडणुकीलाही उभी राहिल आणि हे काँग्रेसवाले तिला तिकीटही देतील. काही सांगता येत नाही. X(

योगी९००'s picture

15 Apr 2009 - 7:30 pm | योगी९००

कसाबच्या आईच्या नावाने कोणीही बाई पाकिस्तानहून येऊ शकते आणि त्याचा जीव घेऊ शकते.

किंवा समजा त्यानेच सांगितले की "आई तू दाब माझा गळ"..मग..? बसेल भारत सरकार बोंबलत आणि आंतरराष्ट्रीय नाच्चक्की होईल ते वेगळेच..

बाकी एकंदर भारत सरकारच्या वर्तवणूकीमुळे असे वाटतेय की कसाबची आई नाही, कसाबच मिळवेल निवडणूकीचे तिकीट.

खादाडमाऊ

मराठमोळा's picture

15 Apr 2009 - 7:43 pm | मराठमोळा

कसाब कसाब कसाब... वीट आलाय कसाब आणी मोडलेल्या कायदा आणी सरकारी यंत्रणेचा..
प्रकरण लैच डोक्यात जायला लागलय. भारतात एखादा हिटलर पैदा व्हायला पाहिजे आता.
तिकडे जम्मु- काश्मीरमधे, आसाम मधे रोज जवान मरत आहेत. त्यांच कुणाला घेणं-देणं नाही. ईकडे कसाबपुराण चालु आहे.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अविनाशकुलकर्णी's picture

15 Apr 2009 - 9:07 pm | अविनाशकुलकर्णी

मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्याबाबतचा खटला आर्थर रोड तुरुंगातील विशेष कोर्टात सुरू होण्यास काही तास उरले असताना 'क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबची आई त्याला भेटण्यासाठी मुंबईत येणार आहे' असे वृत्त प्रसारमाध्यमांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हवाल्याने दिले मात्र या वृत्ताचा मुखर्जी यांनी इन्कार केला. मुखर्जी यांच्या या विधानाने पाकमध्ये अस्वस्थता होती तसेच तेथील सत्ताधाऱ्यांना जबर हादरा बसला होता.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4401912.cms

मदनबाण's picture

15 Apr 2009 - 9:10 pm | मदनबाण

कसाबने पाकिस्तानी वकील पण मागितला आहे,,,
उध्या तो म्हणेल जेल मधे राहुन कंटाळा आला आहे जरा मला फिरवुन आणा बाहेर.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

स्वामि's picture

15 Apr 2009 - 9:24 pm | स्वामि

मेरे पास जन्नत हय,हूर हय,आराम हय,तुम्हारे पास क्या हय?

अनुप कोहळे's picture

15 Apr 2009 - 10:20 pm | अनुप कोहळे

स्वातंत्र्य हय..... =))
---मां (कसाब कि)

शिवापा's picture

15 Apr 2009 - 10:45 pm | शिवापा

कॉग्रेस का हाथ हय!

कसाबच्या चेहऱ्यावर कायम हास्य!
राखाडी रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची थ्री-फोर्थ स्पोर्टस्‌ पॅण्ट, गोरापान प्रफुल्लित चेहरा, कपाळावर आलेले केस, दाढीचे वाढलेले खुंट आणि चेहऱ्यावर कायम पसरलेले हास्य अशा वेशभूषेत अजमल कसाब (21) आज न्यायालयात हजर होता.
सकाळी अकरा पस्तीसच्या सुमारास त्याला कडेकोट पोलिस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयामध्ये वकिलांचे युक्तिवाद सुरू असतानाही त्याच्या चेहऱ्यावर हसू कायम होते. वकिलांचे बोलणे ऐकत आहोत, ते आपल्याला समजत आहे, असा आविर्भावही त्याच्या चेहऱ्यावर होता. मध्ये मध्ये काही युक्तिवादांना तो मानही डोलवायचा. त्याच्या बाजूला बसलेला आरोपी फहीम अन्सारीशी तो मधूनच बोलायचा. त्याची बडबड ऐकून अखेर विशेष न्या. ताहिलियानी यांनी त्याला शांत बसण्याची समज दिली. न्यायालयाच्या परवानगीशिवाय अन्य आरोपींशी बोलायचे नाही, अशी ताकीद त्याला देण्यात आली. तुझ्या वकिलांना ओळखतोस का, असे म्हटल्यावर त्याने अन्य महिला कर्मचाऱ्याकडे बोट दाखविले; मात्र त्या अंजली वाघमारे नव्हत्या. यावर तुला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये दाखविले होते ना, असे न्या. ताहिलियानी यांनी विचारले. "भूल गया' असे कसाब म्हणाला. यावर न्यायालयाने त्याची ओळख वाघमारे व ऍड. पवार यांच्याशी करून दिली; मात्र थोड्याच क्षणात वाघमारे यांची नियुक्ती न्यायालयाकडून रद्द झाली.

राखाडी रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची थ्री-फोर्थ स्पोर्टस्‌ पॅण्ट
हे कुणी दिलं? सरकारनेच ना? कशाला? देशावर हल्ला करणार्‍या एखाद्या दहशतवाद्याची एवढी बडदास्त? घालेनाका फाटकेतुटके कपडे? नियम आहे त्याला अप टू डेट ठेवण्याचा?

भाग्यश्री's picture

15 Apr 2009 - 11:33 pm | भाग्यश्री

ई.. इतका गंभीर गुन्हा करणार्‍या गुन्हेगाराचे असे हिरो सारखे साग्रसंगीत वर्णन पाहून अक्षरशः किळस आली.. आपली न्यायव्यवस्था अशी का आहे? सरळ सरळ दिसतेय हा गुन्हेगार आहे.. कधी वाटतं गेला न्याय खड्ड्यात.. मारून टाका त्याला सर्वात वाईट पद्धतीने.. ! तोच न्याय आहे त्याला..

मिसळभोक्ता's picture

15 Apr 2009 - 11:19 pm | मिसळभोक्ता

अगर सहवाग की मां साऊथ आफ्रिका जा सकती है, तो कसाब की मा ईंडीया क्यों नही आ सकती ?

-- मिसळभोक्ता

क्रान्ति's picture

15 Apr 2009 - 11:26 pm | क्रान्ति

"वाघा बॉर्डरवर कसाबच्या आईचे पंचार्ती ओवाळून, हारतु-यांनी स्वागत केले"अशी बातमी सुद्धा येईल उद्या! इट हॅपन्स ओन्ली इन इन्डिया!!!!!!!!!!!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

हरकाम्या's picture

16 Apr 2009 - 12:41 am | हरकाम्या

आपण कसाबच्या आईला मानतो बुवा की जिच्या पोटी हा हिरा ( ?) जन्माला आला. आमच्याकडे अशी एखादी माता
नाही का ? जी अशा एखाद्या हिर्याला जन्म देऊ शकेल. आणि जो हिरा या पाकड्यांना सळो की पळो करेल.