मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कसाबची आई

भडकमकर मास्तर · · काथ्याकूट
काल आपले परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांनी कुठेतरी सांगितले की कसाबची आई मुंबईला येणार आहे.... ... ही बातमी टीव्ही वरती वाचून डोके आउट झाले. कितीही विचार केला तरी ही काय पाकिस्तानवर कुरघोडीची राजकीय चाल वगैरे आहे , असे वाटत नाही... या सरकारला इतक्या फेनॅटिक दुष्ट गुन्हेगारांचा इतका पुळका का? आता या नराधमाच्या कथेत एक ह्यूमन अँगल आणायचा विचार आहे काय या लोकांचा? असे करणे हा हल्ल्यात मृत आणि जखमी लोकांचा अपमान नाही का? आणि तिला येऊ कशाला देत आहेत हे ? एका परदेशी गुन्हेगाराची आई आपल्या देशात यायचा संबंध काय? ... तिला व्हिसा देणार यांची हीच मिनिस्ट्री ना? ..उद्या यांचे अख्खे कुटुंब बोलवून सर्वांचे पुनर्वसन करून दिले तर नवल वाटू नये. ...कसाबचा तरी अफजल गुरू होणार नाही असे वाटत होते. ..पण हे सारे एकूण त्याच मार्गाने चाललेले दिसते. ________________-- या बातमीचे इतर डीटेल्स बातम्यांमध्ये दिसले नाहीत.. कोणाला ठाउक आहेत काय? ___________ संपादकांना विनंती : हा छोटा काथ्याकूट आहे, म्हणून उडवून टाकायचा असल्यास जरूर उडवा.

वाचन 13371 प्रतिक्रिया 0