एंट्री

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
15 Apr 2009 - 12:20 pm

असाच एक मुंबईमधला नाका.
सकाळची १० ची वेळ.
मी थांबलो होतो बस करता.
इतक्यात एक टेंपो येताना दिसला. लक्षात राहायचे कारण असे की त्यात ड्राईवरच्या बाजुला एक पन्नाशीचे गृहस्थ कोंबुन बसले होते.
ड्राईवरने टोल भरला.
जरा पुढे आल्यावर ऑक्ट्रॉयच्या शिपायाने टेंपो अडवला. गृहस्थ खाली उतरले. त्यांनी शिपायाला एक पत्र दाखवले. पण शिपाई काही टेंपो सोडेना. साधारण बोलण्यावरुन गृहस्थ मास्तर असावेत असे वाटले. ही जात कुठुनही ओळखता येते. थोड्या वेळ्याने मास्तर रागारागाने मोठ्या साहेबाला भेटायला ऑफिसमधे गेले. १५ मिनिटाने विलक्षण तापलेला चेहेरा घेउन बाहेर आले.
शिपायाच्या हातावर १० रुपयाच्या दोन नोटा कोंबुन परत टेंपोत बसले.
टेंपो पुढे निघाला.
तुमच्या आमच्या संरक्षणासाठी आजकाल नाक्यावर सिमेंटच्या पोत्यामागे बंदुकधारी पोलीस उभे असतात.
असाच एक पोलीस त्याचा किल्ला सोडुन पुढे आला. त्याने टेंपो थांबवला. मास्तर सारखे घड्याळाकडे बघत होते.
आता ही काय कटकट म्हणुन मास्तर पुन्हा खाली उतरले.
पोलीस म्हणाला "एंट्री"
आता मास्तरला पॅरॅलिसीस चा ऍटक येण्याचेच बा़की होते.
ड्राइवरने परिस्थिती ओळखली.
मास्तरना बाजुला केले आणि पोलिसाशी हस्तांदोलन केले.
टेंपो पुढे निघाला.
मास्तरांनी टेंपोत बसल्यावर आपल्या हातातले पत्र बाहेर भिरकावले.
ते नेमके माझ्या पायाशी.
'स्विकार पत्र' होते ते शाळेचे. मास्तर ने दोन बाके दान दीली होती शाळेला.
जाता जाता: बाळ कोल्हटकरांचे नाटक आठवले. कलीयुगात प्रवेश करायला द्वारपाल देवाकडे सुद्धा 'एंट्री' मागतो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

15 Apr 2009 - 12:23 pm | अवलिया

मास्तर अजुन 'पोचलेला' नाही हेच खरे

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2009 - 12:25 pm | परिकथेतील राजकुमार

असेच म्हणतो.
आजकाल आधी 'हात मिळतात' आणी मग 'माणसाची मने.

पोचलेला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

संदीप चित्रे's picture

15 Apr 2009 - 8:28 pm | संदीप चित्रे

आधी हात मिळतात आणि मग एकमेकांच्या किती कामाचे आहोत हे जोखलं जातं :(

विनायक प्रभू's picture

15 Apr 2009 - 12:25 pm | विनायक प्रभू

उदात्त, उन्नत महन्मधुर तेते मधे अडकलेले

अवलिया's picture

15 Apr 2009 - 12:27 pm | अवलिया

उदात्त वगैरे सगळे परमार्थाच्या वाटेवर
बाकी सगळे परम अर्थातच अडकलेले...
ना बाप बडा ना भैय्या
सबसे बडा रुपैय्या !!!

--अवलिया

दिपक's picture

15 Apr 2009 - 12:33 pm | दिपक

सबसे बडा रुपैय्या !!!
हेच खरे !

विनायक प्रभू's picture

15 Apr 2009 - 12:28 pm | विनायक प्रभू

प्रेतयात्रला पण सोडत नसावेत

अवलिया's picture

15 Apr 2009 - 12:30 pm | अवलिया

तुम्ही डाकटर असते आणि पेशंट मेला असता तर बील माफ केले असते का?

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2009 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

मेलेल्या माणसाला पण जिवंत सांगुन त्याचे ऑपरेशन करतात आणी मग तो ऑपरेशन टेबलवर 'अधिकृतरीत्या' मरण पावतो. दवाखान्याचा मिटर पडला ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

15 Apr 2009 - 12:31 pm | विनायक प्रभू

सावज आणि पारधी ची कथा म्हणा की

अवलिया's picture

15 Apr 2009 - 12:35 pm | अवलिया

मी काल इथे तेच विचारले होते http://www.misalpav.com/node/7243

--अवलिया

पाषाणभेद's picture

15 Apr 2009 - 12:53 pm | पाषाणभेद

मास्तरे
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

चिरोटा's picture

15 Apr 2009 - 12:58 pm | चिरोटा

शाळेच्या जगातून जगाच्या शाळेत यायचे म्हणजे कटकट असते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मराठी_माणूस's picture

15 Apr 2009 - 12:59 pm | मराठी_माणूस

चपखल प्रतीसाद

निखिलराव's picture

15 Apr 2009 - 3:21 pm | निखिलराव

शाळेच्या जगातून जगाच्या शाळेत यायचे म्हणजे कटकट असते.

क्या बात हये...

लिखाळ's picture

15 Apr 2009 - 7:08 pm | लिखाळ

जोरात !
-- लिखाळ.

अनिल हटेला's picture

16 Apr 2009 - 6:53 am | अनिल हटेला

>>>शाळेच्या जगातून जगाच्या शाळेत यायचे म्हणजे कटकट असते<<<

जीयो....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

क्रान्ति's picture

15 Apr 2009 - 7:17 pm | क्रान्ति

देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे!
अवांतर : (काय काय द्यावे आणि काय काय घ्यावे, हे विचारू नये!)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

रेवती's picture

15 Apr 2009 - 8:21 pm | रेवती

तुमच्या आमच्या संरक्षणासाठी आजकाल नाक्यावर सिमेंटच्या पोत्यामागे बंदुकधारी पोलीस उभे असतात.
खरच किती लोकांचं संरक्षण करतात हे पोलीस?
अफाट लोकसंख्येमुळं (आणि वरच्या साहेबांच्या नाकर्तेपणापुढं)त्यांनी कसं संरक्षण करावं?
बाकी आपल्या अनुभवाबाबत काय बोलणार?

रेवती

विनायक प्रभू's picture

16 Apr 2009 - 5:37 am | विनायक प्रभू

वरचा पण 'एंट्री' चा एक भागच की?

प्राजु's picture

15 Apr 2009 - 8:28 pm | प्राजु

देणारे देत आहेत तोवर घेणारे घेणार..
काय होणार दुसरं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

15 Apr 2009 - 9:00 pm | मदनबाण

हे तर मी रोज पहातो !!! जाम चीड येते त्या माणसाची,,,साला ढेरपोट्या गाडी थांबवुन थांबवुन पैसे गोळा करतो.ते ट्रक टेम्पोवाले पण मनात जाम शिव्या घालत असतील त्याला, मी तर घालतोच!!!
पण काय आहे हे लोक पैसे खाण्याच्या लाईनीत उस्ताद झालेले असतात...गाडी ओव्हरलोड आहे,एक टेललाईट बंद आहे,नंबर बरोबर दिसत नाही,पेपर मधे झोल आहे...इ. सर्व हतखंडे वापरले जातात...एकदा पैसे हातात टेकवले के सगळ कसं लगेच लिगल होत.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.