कामवाली!

उमेश कोठीकर's picture
उमेश कोठीकर in जे न देखे रवी...
8 Apr 2009 - 7:33 pm

होती गरीब कष्टमूर्ती ती
साधी निरागस कामवाली
पती मुले आयुष्यच सर्व
कष्टांचा ती डोंगर झेली!

नाही दिवाळी! नाही दसरा
हौस मौज ना ईच्छा काही
पती दारूडा! नरकयातना!
वीजवेदना! चमकून जाई

होती शहाणी! म्हणे हळूच ती
मुले माझी शिकतील ताई
मोठ्ठे होतील तुमच्यासारखे!
नको देवा! दुसरे काही!

मोठ्ठे मोठ्ठे डोळे करून ती
कौतुक सांगे काय बाई!
वळ माराचे लपवून पदरी!
काम करी! सांगे ना काही!

स्वप्न्!नशीब!आयुष्यही फुटले!
लपवे ती अश्रूंचे पाट!
असीम कष्टा फळ मिळे ते
दारूचाच घमघमाट!

झोपड्पट्टीत गलका झाला!
खिडकीत वाकून! काय झाले?
कळले आता दारूड्याने
कामवालीला ठार मारीले!

काळीज चर्र! धावत गेली!
दृष्य पाहूनी ते थिजली!
वर्मी लागता घाव बिचारी!
माऊली ती श्रांत झाली!

पैशांसाठी राक्षस झाला!
मागाहूनी कथा समजली!
बाळाच्या दुधाचे पैसे!
घट्ट मूठ ती नाही उघडली!

पांढरपेशी चर्चा झाली
माणूसकीपण बोर झाली
चला मंडळी! जाऊ द्या हो!
मिळेल दुसरी कामवाली!!

कविताविचार

प्रतिक्रिया

सूहास's picture

8 Apr 2009 - 7:41 pm | सूहास (not verified)

अहो , ईतक कारुण्यमय नका हो लिहु.

सुहास

क्रान्ति's picture

8 Apr 2009 - 9:28 pm | क्रान्ति

उमेश, खरंच या काव्यात मांडलेल्या कथा आणि व्यथा खूप करूण आहेत. मोजक्या शब्दांत ते दु:ख अगदी तंतोतंत व्यक्त केलंय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्राजु's picture

8 Apr 2009 - 9:35 pm | प्राजु

सह्ही! अतिशय करूण..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

8 Apr 2009 - 10:08 pm | रेवती

कविता वाचून वाईट वाटते.
खरं सांगायचं तर मला सुदैवानं बर्‍या कामवाल्या मिळाल्यात.
हैदराबादची कामवाली तर साडीला मॅच होणारे लिपस्टीक,
बांगड्या घालून यायची. आपल्यालाही बरं वाटतं त्यांना बघून.
पुण्यातली कामवाली तर व्यवस्थीत खात्या पित्या ;) घरातली होती.
माझ्या सासूबाईंच्या कामवालीनं तिच्या नवर्‍याला ठोकून काढले होते,
दारू पिऊन आला म्हणून्.......तर अश्याही धाडसी कामवाल्या असतात बरं का!

रेवती

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 11:15 pm | विसोबा खेचर

लै भारी कविता..

आपला,
(अंतर्मुख) तात्या.

मदनबाण's picture

9 Apr 2009 - 4:27 am | मदनबाण

कविता आवडली...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अनिल हटेला's picture

9 Apr 2009 - 5:53 am | अनिल हटेला

आवडली कविता !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अविनाशकुलकर्णी's picture

11 Apr 2009 - 4:46 pm | अविनाशकुलकर्णी

अप्रतिम..डोळे पाणावले

दशानन's picture

11 Apr 2009 - 4:50 pm | दशानन

कविता वाचून वाईट वाटले.

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 5:22 pm | नितिन थत्ते

अप्रतिम कविता.

पांढरपेशी चर्चा झाली
माणूसकीपण बोर झाली
चला मंडळी! जाऊ द्या हो!
मिळेल दुसरी कामवाली!!

हे फारच खास.

खराटा
(रंग माझा वेगळा)

जयेश माधव's picture

11 Apr 2009 - 5:42 pm | जयेश माधव

खुपच छान कवीता!
जयेश माधव

शिवापा's picture

12 Apr 2009 - 2:18 am | शिवापा

दु:ख मांडता येणे खरचं फार मोठी कला आहे.

तुम्हाला सलाम उमेश साहेब!