लतादीदीस सप्रेम.........

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Apr 2009 - 10:32 am

तुझे गाणे तुझे नाही
तुझे असणे तुझे नाही
ते किंचित हंसणे तुझे नाही..

तो गंधार, तो मल्हार
असतील ते सुर तुझे,
पण त्याचे वेड तुझे नाही !

तुझ्या ओठीचा शब्द
तुझ्या गळ्याचे सुर
व्यसन कोकीळे ते तुझे नाही !

तुझ्या सुरातली तंद्री
तुझ्या स्वरातली धुंदी
ते धुंदावणे तुझे नाही !

तानपुर्‍याची मधुर तान
किंचित लवणारी सुरेल मान
ते वेडावणे तुझे नाही !

तुझे सुर श्वासात भिनलेले
त्या स्वरांसह श्वासांची
गती वाढणे तुझे नाही!

तो हक्क आम्हा रसिकांचा
तुझ्या गळ्याच्या गुलामाचा
ते भाग्य कोकिळे तुझे नाही

स्वरकोकिळा मा. लतादीदींच्या एका वाढदिवशी ही कविता केली होती.

विशाल

कथा

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

2 Apr 2009 - 2:03 pm | नितिन थत्ते

टॉप

खराटा
(रंग माझा वेगळा)

अनिल हटेला's picture

2 Apr 2009 - 2:08 pm | अनिल हटेला

असेच म्हणतो !!!

"तो हक्क आम्हा रसिकांचा
तुझ्या गळ्याच्या गुलामाचा
ते भाग्य कोकिळे तुझे नाही "
:-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

क्रान्ति's picture

2 Apr 2009 - 6:50 pm | क्रान्ति

खूपच छान!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

2 Apr 2009 - 7:13 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

5 Apr 2009 - 11:03 am | विसोबा खेचर

छान कविता आहे, परंतु

तानपुर्‍याची मधुर तान

म्हणजे काय?

बाय द वे, दिदीवर आम्हीही एक कविता केली होती ती इथे वाचा.. :)

आपला,
(लताभक्त) तात्या.

विशाल कुलकर्णी's picture

6 Apr 2009 - 11:28 am | विशाल कुलकर्णी

तात्या, मनापासुन धन्यवाद. आपण महान आहात्.....काय लिहीले आहे.
माझ्याबाबतीत म्हणाल तर मी ट ला ट जोडुन कविता करणारा सामान्य प्राणी आहे.
आम्च्या जोड्या तुम्हीच घ्या जुळवुन आणि जमवुन. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 1:37 pm | सुधीर कांदळकर

विशालराव. समस्त रसिकांप्रमाणें माझेंहि दैवतच तें.

तुझ्या ओठीचा शब्द
तुझ्या गळ्याचे सुर
व्यसन कोकीळे ते तुझे नाही !

हे अगदीं खरें. तिचे शब्द (उच्चार) पण अतुलनीय आहेत. 'छुन्नक छुन्नक बाजे' हे शब्द हेडफोनमधून वा होम थिएटरवर असे मस्त ऐकूं येतात कीं जीव ओवाळावा.

तानपुर्‍याची तान या बाबतींत मीं तात्यांशीं सहमत आहे. पण कविता सुरेखच.

सुधीर कांदळकर.

जागु's picture

7 Apr 2009 - 2:18 pm | जागु

विशालजी तुमची कविता छानच आहे. पण लतादिदींवर जितकी स्तुती कराल तितकी कमीच आहे.