चार मायेचे उत्साहाचे शब्द निराश मनाला शांत करण्यास उपयोगी पडतातच. उभारीची ताकद तर पंखात असतेच. जाणिव फक्त परत व्हावी लागते. :)
अजुनी उदास का रे बोलावयास काही?
की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही?
नेहमीच सूर्य दिसतो अस्ताचलास तुजला..
चैतन्य जागवाया, उदयात शोध काही!
पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..
फुलवावयास माती सरतात जन्म काही!
घे कुंचला मनाचा रेखावयास जगणे
रंगांत डुंबणारे आहे अजून काही!
ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू!
भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही!
प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे..
स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!!
शुभम्
प्रतिक्रिया
23 Mar 2009 - 10:16 am | प्रमोद देव
छान आहे कविता.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
23 Mar 2009 - 10:26 am | मनीषा
नेहमीच सुर्य दिसतो अस्ताचलास तुजला..
चैतन्य जागवाया, उदयात शोध काही!
पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..
फुलवावयास माती सरतात जन्म काही! ... खूपच छान
सुंदर (गझल)कविता ... आवडली !!!
23 Mar 2009 - 11:23 am | दशानन
सुंदर !
23 Mar 2009 - 11:30 am | राघव
गझल म्हणावयास मन धजावत नाही. गझलेचे काटेकोर नियम सांभाळायचे अन् गेयताही उत्तम ठेवायची ही तारेवरची कसरत नाय ब्वॉ अजून जमत. त्यामुळे गझलकारांच्या प्रतिभेला (सध्यातरी)दूरूनच सलाम.. कारण अजून ती मंझिल जरा दूर आहे :)
(गझलप्रेमी) राघव
23 Mar 2009 - 12:06 pm | श्रावण मोडक
गझल नाही म्हणत, रचना आवडली.
23 Mar 2009 - 1:44 pm | विशाल कुलकर्णी
वा क्या बात है !
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
23 Mar 2009 - 6:14 pm | बिपिन कार्यकर्ते
नितांत सुंदर कविता!!! सकाळीच बघितली होती. सावकाशीने परत वाचली. खूपच सकारात्मक आणि आशावादी कविता.
बिपिन कार्यकर्ते
23 Mar 2009 - 7:00 pm | क्रान्ति
प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे
स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!
खूपच खास! प्रत्येक ओळीचा अर्थ अप्रतिम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
23 Mar 2009 - 9:57 pm | चतुरंग
अतिशय आशादायी! :)
चतुरंग
23 Mar 2009 - 9:57 pm | अवलिया
सुंदर कविता !!!
--अवलिया
23 Mar 2009 - 10:00 pm | मदनबाण
नेहमीच सुर्य दिसतो अस्ताचलास तुजला..
चैतन्य जागवाया, उदयात शोध काही!
व्वा...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
23 Mar 2009 - 10:02 pm | लिखाळ
वा .. सुंदर कविता ..
उदयात शोध काही फार आवडले.
-- लिखाळ.
23 Mar 2009 - 10:21 pm | बेसनलाडू
वणवा, माती फुलवणे, जन्म सरणे - क्या बात है!
... उदयात शोध काही सुद्धा सुंदर.
कविता फार आवडली.
(उदयोन्मुख)बेसनलाडू
23 Mar 2009 - 10:21 pm | प्राजु
शब्दच नाहीत.
आशादायी आहे कविता/गझल.
पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..
फुलवावयास माती सरतात जन्म काही!
सुरेख.
शिवाय
ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू!
भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही!
हे म्हणजे कळस आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Mar 2009 - 11:35 pm | विसोबा खेचर
पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..
फुलवावयास माती सरतात जन्म काही!
ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू!
भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही!
या ओळी केवळ अप्रतीम!
राघवदादांनी अतिशय सुंदर काव्य केले आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे..
तात्या.
24 Mar 2009 - 11:30 am | जयवी
सुरेख !!
कल्पना फार सुरेख आहेत...!!
24 Mar 2009 - 11:41 am | राघव
तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद वाचून खूप छान वाटले.
सगळयांचे मनापासून आभार. :)
राघव
24 Mar 2009 - 12:00 pm | जागु
प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे..
स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!!
क्या बात है !
24 Mar 2009 - 6:17 pm | मराठमोळा
कविता एकदम छान आहे.. येऊ द्या अशा अजुन..
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!