अर्थ अवर

सहज's picture
सहज in काथ्याकूट
22 Mar 2009 - 12:33 pm
गाभा: 

वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला. सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता यात सामील झाली. सामान्य जनतेबरोबर अनेक उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठे देखील यात सहभागी झाले होते. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. याला मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहून २००८ मधे जगभर हा प्रयोग राबवला गेला.

मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक तास दिवे बंद. २००८ मधील अर्थ अवर कार्यक्रमात ३५ देशातील ४००हून आधीक शहरे सहभागी झाली होती. न्यूयॉर्क मधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रीज सॅन फ्रॅन्सीस्को, (नुकतीच मिपावर पाहीलेली ) स्पेस नीडल सीएटल, सिडनी ऑपरा हाउस, रोम मधील कलोसीयम, असे नेहमीच प्रकाशीत असणार्‍या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते. २००८ मधील या मोहीमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ मधे याप्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.

या वर्षी अर्थ अवर २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० आहे. जवळजवळ ८० देश व हजारावर शहरे यात सामील होणार आहेत. दिल्ली व मुंबई शहरे ही यात सामील होणार आहेत. जवळजवळ १ अब्ज लोकांचा सहभाग अपेक्षीत आहे की त्याद्वारे डिसें २००९ मधे कोपनहेगन येथे होणार्‍या क्लायमेट चेंज वरील परिषदेत जगातील प्रमुख देशांच्या नेत्यांना ठोस उपाययोजनेसाठी एक जोरदार संदेश जावा.

२००८ मधे एक तास वीजवापर कमी झाल्याने होणारी वीजबचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायॉक्साईड प्रदुषण याची पहाणी करण्यात आली. किमान १ टक्का ते ९ टक्के वीजबचत पर्यायाने ६ ते ४० टन कमी कार्बन एमीशन झाल्याचे दावे केले गेले. अर्थात एक तास वीजबंद हा काही ठोस उपाय नक्कीच नाही तर प्रतिकात्मक प्रयोग आहे. ह्या निमित्ताने याविषयावर जनजागृती तसेच प्रत्येकाने एक अल्पसा का होईना पुढाकार म्हणुन नक्कीच पाहीले पाहीजे. केवळ दोन तीन वर्षात या योजनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पहाता जगातील बहुसंख्य जनता पर्यावरण या विषयी जागरुक आहे व संघटीत होत आहे. तसेच भविष्यात आपापल्या सरकारांवर दबाव आणू शकतील हा एक मोठा दिलासा आहे.

आपण ह्यावर्षी या योजनेत सामील होणार? भारतासाठी ह्या प्रकल्पाचे संकेतस्थळ आहे अर्थअवर.इन तसेच मुख्य संस्थळ आहे अर्थअवर.ऑर्ग

एक छोटी चित्रफीत येथे पाहू शकाल - युट्युब दुवा

संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Earth_Hour

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

22 Mar 2009 - 12:59 pm | प्रमोद देव

वीजेची बचत कशी होते?
निर्माण केलेली वीज ही वापरावीच लागते. ती साठवता नाही येत, वापरली नाही तर तर ती फुकट जाते.
हं, आता वीज वापरली नाही तर वीजबील कमी येईल,कार्बन उत्सर्जन कमी होईल; त्यामुळे काही प्रमाणात हवेतले प्रदूषण कमी होईल हे मान्य करण्यासारखे आहे. त्याऐवजी एक तासभर जर विद्युत-जनित्रच बंद ठेवली तर! आपोआपच हे साध्य होईल. वर इंधनही त्याप्रमाणात वाचेल.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

सहज's picture

22 Mar 2009 - 1:09 pm | सहज

अन्यथा त्या एका तासात वापरली गेली असती अश्या अर्थाने बचत. :-)

मराठमोळा's picture

22 Mar 2009 - 1:17 pm | मराठमोळा

निर्माण केलेली वीज ही वापरावीच लागते. ती साठवता नाही येत, वापरली नाही तर तर ती फुकट जाते

मान्य आहे. परंतु डिमांड आणी सप्लाय रेशो विजेबाबत नेहमी डिमांड जास्त आणी सप्लाय कमी असा आहे. एखाद्या भागातली विजेची मागणी लक्षात घेऊन विजेची निर्मीती कमी व जास्त केली जाते. भारतात थर्मल पॉवर प्लांटमधुन वीज निर्माण करण्याचे प्रमाण जास्त आहे. विजेची बचत केली तर निर्मीती कमी करुन लागणारा कोळसा व डिझेल, पेट्रोल वाचवले जाऊ शकते आणी होणार्‍या प्रदुशणावर्सुद्धा नियंत्रण होते.
आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जर एक तासभर जर विद्युत-जनित्रच बंद ठेवली तर ज्या ठिकाणी अविरत उर्जा लागते (उदा. रेलवे, मोठे कारखाने इत्यादी) तिथे उर्जा कशी मिळणार? आणी तुमच्या माहितीसाठी म्हणुन सांगतो कि थर्मल पॉवर प्लांट मधे फक्त जनित्र बंद करता येत नाही. पुर्ण युनिट बंद करावे लागते. एक युनिट बंद किवा चालु करणे याला १५ ते ३० दिवसांचा कालावधी लागु शकतो. :)
वीजबचत करणे ही काळाची गरज आहे हे नक्की, त्यसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जसे सी एफ एल दिवे वापरणे, गरज नसताना फ्रीज, ट्युब बंद ठेवणे, अक्षय उर्जेचा (सोलर, जिओथर्मल) वापर वाढवणे, बिल्डींगमधे पार्किंग, जिने यामधे अतिरिक्त दिवे बसवण्याऐवजी रेफ्लेक्टर (जसे आरसा) वापरणे. असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा अवलंब करावा.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

प्रमोद देव's picture

22 Mar 2009 - 1:30 pm | प्रमोद देव

ममो साहेब आपले मुद्दे अगदी अचूक आहेत किंबहुना ते माझ्या मुद्यांना पुरकच आहेत. म्हणूनच म्हटले की वास्तवात 'वीजबचत' शक्य नाहीये.
एखाद्या ठिकाणी(मोठा विभाग) वीज कमी वापरत असेल तर ती वीज दुसरीकडे जिथे गरज असेल तिथे वळवता येईल; पण ह्यासाठीही पूर्वतयारी,योग्य ते नियोजन आणि अंमलबजावणी हवीच. त्याशिवाय हे शक्य नाहीये.
वैयक्तिक जीवनात वीजेचा काटेकोर वापर करणे हेच सर्वांच्या हिताचे आहे; पण ह्यासाठीही प्रत्येकात स्वयंशिस्त हवी जी आपल्याकडे अभावानेच आढळते.(इथे दिवसभर संगणक सुरु ठेऊन आम्हीही किती वीज वापरतोय...श्शु!!!! )
आपले बहुतेकांचे विचार चांगलेच असतात...पण प्रत्यक्ष आचार? त्याबद्दल न बोललेलेच बरे. (मी तरी त्याला अपवाद कुठेय?)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

नितिन थत्ते's picture

22 Mar 2009 - 8:10 pm | नितिन थत्ते

पॉवर प्लॅण्ट नुसता चालू असणे आणि लोडसहित चालू असणे यात इंधन खर्चात फरक पडतो..
आपण जेव्हा गाडीने जात असतो आणि जेव्हा उतार लागतो तेव्हा इंजिनाचा वेग वाढतो. साहजिकच आपण ऍक्सिलरेटर ढिला सोडतो. त्यावेळी आपण इंजिनाला होणारा इंधनाचा पुरवठा कमी करतो. तशीच गोष्ट पॉवर प्लॅण्टमध्येही घडते.

त्यामुळे सर्व वीजवापर बंद ठेवला तर प्लॅण्ट चालू असला तरी इंधन कमी जळून बचत होते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

छोटा डॉन's picture

22 Mar 2009 - 1:14 pm | छोटा डॉन

सहजराव, उत्तम माहिती देणारा सुंदर लेख.
अशा प्रकारचे लेखन पाहुन आनंद झाला ...

धाग्यात दिलेला व्हिडिओची लिंकही उत्तम आहे, त्यातुन बराच उत्साह मिळतो ...
मागच्या वर्षी २००८ मध्ये आम्ही उत्स्फुर्तपणे हा "अर्थ अवर" साजरा केल्याचे आठवणीत आहे.
मात्र इथे हे एक "सेलिब्रेशन" न समजता एक "जबाबदारी" म्हणुन केले तर उत्तम होईल असे आम्हाला वाटते, कारण आपल्या इथे प्रत्येक गोष्टीचा एक "इव्हेंट" बनवायची वाईट खोड आहे. असो.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सहज's picture

22 Mar 2009 - 1:18 pm | सहज

"सेलिब्रेशन" न समजता एक "जबाबदारी" म्हणुन केले तर उत्तम होईल ..

अगदी बरोबर. पण जोवर हे स्वयंस्फुर्तीने होत नाही तोवर नाइलाजाने चमकधमक ठेवावी लागते. अपरिहार्य वस्तुस्थिती.

दशानन's picture

22 Mar 2009 - 2:03 pm | दशानन

मात्र इथे हे एक "सेलिब्रेशन" न समजता एक "जबाबदारी" म्हणुन केले तर उत्तम होईल असे आम्हाला वाटते

धन्यवाद सहज राव !
आम्ही पण ह्यात आपला सहभाग नोंदवू नक्कीच!

अवलिया's picture

22 Mar 2009 - 1:16 pm | अवलिया

उत्तम माहिती.
'सहज'सुंदर लेखन...:)

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2009 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार

आजच सकाळ मध्ये हि बातमी वाचनात आली पण निटसे आकलन झाले नाही. तुमच्या माहितीपुर्ण लेखामुळे व्यवस्थीत कळाले, धन्याचे वाद :) ह्यात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.

अवांतर :- महाराष्ट्रात विज मंडळ रोजच कमीत कमी ३ तास विज बंद ठेवुन ह्या उपक्रमात आधीच उस्फुर्तपणे सहभागी झालेले आहेच.

पराबत्ती
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

देवदत्त's picture

22 Mar 2009 - 4:10 pm | देवदत्त

महाराष्ट्रात विज मंडळ रोजच कमीत कमी ३ तास विज बंद ठेवुन ह्या उपक्रमात आधीच उस्फुर्तपणे सहभागी झालेले आहेच
मी ही हेच म्हणणार होतो. अर्थात इतर वेळीही मी जमेल तेवढा विजेचा अपव्यय टाळतो. (अपवाद फक्त संगणकाचा, तो जमेल तेवढा चालू असतो, न वापरलेल्या वेळी मॉनिटर बंद ठेवून).

अवांतरः भारनियमन करूनही बोंबाबोंब आहेच. हा लेख त्यांना नका दाखवू. अन्यथा भारनियमन आणखी वाढवतील. ;)

नंदन's picture

22 Mar 2009 - 1:28 pm | नंदन

चांगला आहे. सोप्या शब्दांत, थोडक्यात ओळख करून देणारा. तासभर दिवे मालवून तरी काही 'उजेड' पडतोय का पहायला हवे :). विनोदाचा भाग सोडला, तर अशा प्रतीकात्मक गोष्टींतून निदान पुढच्या मोठ्या प्रमाणावरील उपायांची मानसिकता तयार होईल, हा मोठाच फायदा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2009 - 9:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऊर्जाच काय, पाण्याचा गैरवापर होऊ नये यासाठीही असे प्रतिकात्मक आणि खरे उपाय केले गेले पाहिजेत.
सहजराव, माहिती आणि दुवे आवडले.

मागे 'रेडीओ मिर्ची'ने किमान पुण्याततरी एक तास दिवे वापरू नका असं आवाहन केलं होतं. त्यांच्या निवेदनानुसार अनेक लोकांनी तेव्हा दिवे मालवले होते.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

लिखाळ's picture

22 Mar 2009 - 4:46 pm | लिखाळ

चांगली माहिती सहजराव.
यु ट्युबचा दुवा सुद्धा छान आहे. ज्या ज्या तर्‍हेने प्रयत्न करणे गरजेचे आहे त्या त्या तर्‍हेने ते करतच राहावेत !
-- लिखाळ.

प्राजु's picture

22 Mar 2009 - 8:18 pm | प्राजु

छान माहिती आणि दुवे.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

22 Mar 2009 - 9:36 pm | मदनबाण

सहमत...
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

देवदत्त's picture

28 Mar 2009 - 11:24 pm | देवदत्त

मग कोणी कोणी अर्थ अवर पाळला?
मी तर थोडाफार पाळला. कसे काय ते सविस्तर इथे वाचा :)
(एक लेख आलेला असतानाच पुन्हा माझा लेख नको म्हणून माझ्या लेखनाचा दुवा देत आहे.)

सहज's picture

29 Mar 2009 - 6:14 am | सहज

मी अर्थ अवर पाळला. जितकी हवा मिडीयामधे झाली होती तितका सहभाग आमच्या जवळच्या भागात दिसला नाही :-(

बाय द वे फ्रिज चालू होता तो सोडून सगळे दिवे / बटने बंद होती.

कँडल लाईट डीनर व नंतर खिडकीतून तारे बघणे असा मस्त तास गेला कळलाच नाही. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2009 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबैत ब्लॅक आउट एक बातमी !

दशानन's picture

29 Mar 2009 - 12:19 pm | दशानन

आम्ही पाळला अर्थ अवर !

संध्याकाळी सहा वाजताच सुरवात झाली ती मस्त पैकी वादळी हवा व पाऊसाने व हरयाणा विद्युत मंडळ एवढे भित्रे आहे की कुत्रं जरी भुंकलं तरी सर्व एरियाची लाईट घालवतं येथे तर स्वतः पवन देव तथा इंद्र देवाने थैमान घातल्यावर ह्यांनी मस्त पैकी पुर्ण सिटीची लाईट घालवली, अर्थ अवर ला ह्यांनी नवीनच अर्थ घालून दिला सलग पाच-तास लाईट गुल !

सर्व अपार्टमेंट, मॉल्स मध्ये जनरेटर व घरा मध्ये इन्वर्टर असल्यामुळे सामान्य जनतेला त्रास झाला नाही, काही मॉल्स नी आपली सुरक्षा लाईट सोडून सर्व लाईट बंद केली होती जी उपयोगी नव्हती, आम्ही देखील आमच्या मानलेल्या मामाच्या उत्पाद तथा पॅकींग विभागाची तसेच ऑफिसची सर्व लाईट बंद केली जनरेटर बंद करु शकणे शक्य नव्हते कारण उत्पादन खराब होऊ शकते ह्या भिती मुळे, बाकी आमच्या तर्फे पुर्ण १००% वीज रहित पाच तास हरयाणा विद्युत मंडळामुळे आम्ही अर्थ अवर मध्ये सहभाग नोंदवला ;)

सहज's picture

26 Mar 2011 - 4:59 pm | सहज

आज २६ मार्च रात्री साडे आठ ते साडे नउ यावेळात, आपल्या घरातील वीज बंद ठेवून अर्थ अवर मधे सहभागी व्हा.

आधीक माहीती करता अर्थ अवर भारत हे संकेतस्थळ

कुंदन's picture

26 Mar 2011 - 6:23 pm | कुंदन

आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद सेहेजराव !!!

रात्री साडे आठ ते साडे नऊ या वेळेत आम्हाला वीज लागते..सहभागी होऊ इच्छित नाही !

(नेहमीच काटकसरीने वीज वापरणारा) शाहरुख

राजेश घासकडवी's picture

28 Mar 2011 - 2:23 am | राजेश घासकडवी

भारतातल्या लोकांनी अर्थ अवर वगैरे पाळणं म्हणजे चार वर्षाच्या कुपोषित मुलाला, डायाबेटिक लोकांना होणाऱ्या अतिरेकी साखर खाण्याच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करण्यासारखं आहे (आम्ही साठ वर्षांचे प्रचंड चरबी साठवलेले लोक एक तास साखर न खाता राहाणार, तूही राहा). अमेरिका व युरोपीय देशांनी आपली आर्थिक प्रगती करून घेण्यासाठी गेल्या दोन शतकांत जर पर्यावरणाची नासाडी केली असेल, तर त्याबद्दलची जागरुकता भारतात का व्हावी? अमेरिका भारताच्या सुमारे पंधरापट दरडोई ऊर्जा वापरते. आणि तेसुद्धा २००३ च्या आकडेवारीनुसार, भारताने ऊर्जेचा वापर थोडा वाढवल्यानंतर. गेल्या दोन शतकांमधली सरासरी बघितली तर ती चाळीसपट सहज असू शकेल. मी म्हणतो अमेरिकेतल्यांनी एक तास दिवे बंद ठेवले तर भारतातल्यांनी ते दोन मिनिटं बंद ठेवावेत. भारतात भर उन्हाळ्यात आठ आठ तास लोडशेडींग होत असेल तर अमेरिकेत किती तास करावं?

पर्यावरणवादाविषयी बोलणं, व खरोखरच काटकसरीने राहाणं यात फरक आहे. दुर्दैवाने जे खरोखरच काटकसरीत रहातात त्यांनी वारेमाप ऊर्जा खर्च करणाऱ्यांकडून या प्रथा स्वीकारण्याची एवढ्यात गरज नाही. 'तुमचं चालू द्यात, आम्ही वीस वर्षांनी सुरूवात करू' असं ठामपणे म्हणण्याची आवश्यकता आहे.

घासकडवी यांच्याशी पुर्णपणे सहमत.

अभिज्ञ.

सहज's picture

28 Mar 2011 - 6:26 am | सहज

१) गुर्जी सर्वप्रथम तुम्ही अर्थ अवर २०११ मधे सहभागी होता का? नसल्यास का नाही? असल्यास अभिनंदन, तुमचे म्हणजे 'अजुन' गंभीरपणे घेउ.
२) जनजागृती करता सामान्य लोक आपापल्या परीने विविध कार्यात सहभागी होउन वाटा उचलत आहेत, ज्यांना तसे काही करावेसे वाटते त्यांच्याकरता 'अर्थ अवर' ही एक संधी आहे. अर्थ अवरच्या निमित्ताने सोहळे साजरे होते आहे जे मला वैयक्तिक पटले नाही उदा. म्युझीक शो, एकत्र येउन काउंट डाउन करुन प्रत्येकाने एक एक मेणबत्ती पेटवून इ इ प्रकार. आपल्या पुढच्या पिढी पर्यंत हा प्रश्न अजुन बिकट बनला असु शकतो व निदान आपल्या आई-वडलांनी त्यांचा वाटा उचलला आहे हे लक्षात ठेवून पुढील पिढी अशा प्रश्नांबाबत जागरुक असावी म्हणून हा प्रयत्न करायला फारसा त्रास पडू नये.
३) कँडल लाईट डिनर, घरच्यांबरोबर गप्पा (टिव्ही, संगणक, पुस्तक वाचन इ अपूर्‍या प्रकाशामुळे न करता आल्याने), लहानपणी भारतात पावसाळ्यात संध्याकाळी वीज कडाडली, जरासे वारे सुटले की लगेच वीज जायची व रात्रीचे जेवण मेणबत्ती, कंदील प्रकाशात इ इ आठवण जाग्या होउन अंमळ हळवे होता येते. जनरेटरच्या जमान्यात हा असा आनंद मिळवायची संधी.
४) आधी त्यानी दंगा केला, मी नाही. मला दंगा करायला चान्स कमी मिळाला. जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने... वगैरे बालीश कारणे गुर्जींनी दिल्यामुळे ड्वोळे पाणाव्ले!

राजेश घासकडवी's picture

28 Mar 2011 - 7:40 am | राजेश घासकडवी

सर्वप्रथम तुम्ही अर्थ अवर २०११ मधे सहभागी होता का? नसल्यास का नाही? असल्यास अभिनंदन, तुमचे म्हणजे 'अजुन' गंभीरपणे घेउ.

माझा तात्विक विरोध असल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. थोडक्यात, मी आत्तापर्यंत जी काटकसर केलेली आहे, ती सर्वसाधारण अमेरिकनांच्या मानाने इतकी प्रचंड आहे, की मला असल्या प्रकाराची जाणीव करून घ्यायची गरज नाही असं वाटतं. मात्र विरोधकांची मतं गंभीरपणे घ्यायची नाही, किंवा आपल्याशी सहमत असलेल्यांचीच मतं 'अजुन' गंभीरपणे घ्यायची असं तुमचं धोरण असेल तर पुढे चर्चा करावी का याबाबत मला विचार करावा लागेल. तुमच्या सद्हेतुबद्दल माझी खात्री पटली तर मी माझी कारणं खोलात जाऊन सांगेन.

इ इ आठवण जाग्या होउन अंमळ हळवे होता येते.

पण त्यासाठी अर्थ अवरची गरज नाही. लोडशेडिंगमुळे भारतात अनेक वेळा त्या अनुभवाचा लुत्फ लुटता येत असावा. इतरत्र केव्हाही दिवे बंद करता येतात.

आधी त्यानी दंगा केला, मी नाही. मला दंगा करायला चान्स कमी मिळाला. जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने... वगैरे बालीश कारणे गुर्जींनी दिल्यामुळे ड्वोळे पाणाव्ले!

दंगा? हाच शब्द सापडला तुम्हाला? ऊर्जा वापर हा दंग्यासाठीच नसतो. कारखाने चालवून, उत्पादन करून त्या जीवनावश्यक वस्तूंचा वापर करणं असतं. जेव्हा ही ऊर्जा वापरण्याचं स्वातंत्र्य हिरावलं जातं तेव्हा भारतासारख्या अनेक देशातल्या प्रत्येकाला गुलाम करून, त्यांना उत्पादनाला बंदी करून त्यांच्यावर आपली उत्पादनं लादून कोट्यवधी लोकांचं कित्येक दशकांसाठीचं पद्धतशीर खच्चीकरण येतं.... इंग्लंडने भारताबरोबर जे केलं त्याला दंगा म्हणत असाल, तर आर्थिक बलात्कार म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नाही असंच म्हणावं लागेल. या बलात्कारामुळे कोट्यवधी लोक तडफडून मेले, अनेक दशकोटी लोकांची आयुष्य गरीबीत खितपत पडली.

पाश्चात्य समाजाने पर्यावरणाचा नाश केला, त्याचबरोबर सध्या ज्याला थर्ड वर्ल्ड कंट्रीज असं प्रेमाने संबोधलं जातं त्यांना तिथे कुजवत ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. आता हे सगळं विसरून 'ही पृथ्वी आपल्या सर्वांचीच आहे, तिची काळजी घेण्याची सगळ्यांचीच जबाबदारी आहे' असं म्हणणं शहाजोगपणाचं वाटतं. भारतातल्या लोकांनी हे ऐकून घेण्याची गरज नाही. पाश्चात्यांनी 'आम्ही पृथ्वीची वाट लावली, आम्ही तिची दुरुस्ती करू' असं म्हटलं पाहिजे.

बालिश या शब्दाबद्दल बोलतही नाही.

सहज's picture

28 Mar 2011 - 8:30 am | सहज

>तुमचे म्हणजे 'अजुन' गंभीरपणे घेउ.

अरेरे तुम्ही 'अजुन' हा शब्द लक्षात न घेता, केवळ वेगळे मत असल्याने मी तुमचे मत गंभीर घेत नाही असा साफ चुकीचा अर्थ तुम्ही का बरे घेतलात? मी तुमचे मत गंभीर घेत आहेच पण अजुन गंभीरपणे घ्यायची इच्छा आहेच. असा अर्थ का नाही घेतलात? तसा अ उलट असा अर्थ घेउन अजुन खोलात जाउन समजवून देणे अपेक्षीत होते. असो जरी माझ्या सद्हेतुबद्दल मी तुम्हाला काही पुरावा द्यायची माझी इच्छा नाही. परंतु परंतु पण आणी परंतू जर खरच तुमच्याकडे चांगले मुद्दे असतील व ते केवळ माझ्या सद्हेतुची खातरजमा करुन जगाचे भले होणार असेल तर माझ्या 'इगो' ला मुरड घालून तुमच्या 'कोमल भावनेचा अनादर' करायचा नव्हता. तसा समज झाला असेल तर क्षमा मागतो पण कृपया माझ्यासकट सर्वांना त्या सम्यक ज्ञानापासुन वंचीत ठेवू नका ही विनंती. असो तसा अर्थ का घेतला याचा खुलासा देउ नका पण माझा हेतू साफ आहे हे लक्षात घेउन पुढचे उत्तर द्या ही विनंती.

>पण त्यासाठी अर्थ अवरची गरज नाही.
अर्थ अवरच्या निमित्ताने जर अजुन काही जणांना ही संधी मिळाली व त्यांनी घ्यावी तर त्यालाही तुमचा तात्वीक विरोध दिसतो. बहुदा आपल्या तात्वीक विरोधाच्या मुद्यावरुन मुद्दाम असे प्रयत्न असफल व्हावे अशी तर आपली इच्छा नाही ना?

> पाश्चात्य समाजाने पर्यावरणाचा नाश केला, त्याचबरोबर ... भारतातल्या लोकांनी हे ऐकून घेण्याची गरज नाही.

धन्यवाद! आता आमचा मौका आहे व आम्हाला (पर्यावरणाच्या विनाशाची)आमची संधी घेउ द्या इतकेच तुमच्या युक्तीवादात तुम्हाला म्हणायचे आहे असेच दिसते. एका बाजुला तुम्ही पाश्चात्य देशाने पर्यावरणाचा नाश केला म्हणता व त्याच पावलावर पाउल ठेवून जर विकसनशील देश जाउ लागले आहेत असे चित्र असेल तर ते आत्ताच थांबवून / कमी करुन प्रयत्न करण्यात तुमचा आक्षेप का? अजुनही 'अर्थ अवर' जिथे शक्य आहे तिथे जमेल तशी कपात करा इतकेच म्हणणे आहे. यात मुद्दाम बलप्रयोग नाही तरी तुम्ही नको तसे शब्दप्रयोग करत असे म्हणता की जसे जाचक अटी लादून शोषण चालवले आहे. हे अजिबात पटत नाही.

पाश्चात्य समाज.. आर्थीक शोषण.. इ विषयांतर आहे. अनेक फाटे फुटू शकतात, चर्चा भरकटू शकते. तुमच्या आर्थीक शोषणाच्या मुद्द्याबद्दल तत्वतः सहमत आहे पण ही चर्चा फक्त 'अर्थ अवर' जितक्या लोकांना शक्य आहे त्यांनी पाळला तर काय गहजब होते आहे? तुम्ही इतका विरोध का करत आहात? जर भारतीयांनी /विकसनशील देशातील लोकांनी शक्य तेवढी उर्जा वाचवली तर तुम्हाला नेमके काय आपत्ती कोसळली असे वाटते हे जरुर सांगावे.

पाश्चात्य देशांनी उर्जाबचत करायची गरज आहे असे वारंवार म्हणत असुन सहभाग खरच घेतला नसेल सध्या तरी हा अजब दुटप्पीपणा पाहून माझा आवाज बंद झाला आहे. का असे हे दुटप्पी जालपांडीत्य दाखवून द्यायचा उद्दात्त चर्चा-हेतू होता? माझ्या सदहेतूंबद्दल शंका घेतली आहे म्हणून ही दोन वाक्ये!
मला फाल्तू वादविवाद करुन ह्या धाग्याचे शतक करण्यापेक्षा यापुढे एकही प्रतिसाद न येता तितक्या लोकांनी पुढल्या वर्षी अर्थ अवर मधे सहभागी झालेले जास्त आवडेल.

अभिज्ञ's picture

28 Mar 2011 - 8:48 am | अभिज्ञ

सहजराव अन घासकडवीजी,
लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण चर्चा उगाच भरकटत चालली आहे असे वाटते.
हा विषय खरोखर महत्वाचा आहे अन दोघांकडेही खुप चांगले मुद्दे आहेत.
ह्या पुढे जास्त वैयक्तिक न घेता दोघांनीहि ह्या विषयावर चर्चा अजून पुढे न्यावी हि विनंती.

अभिज्ञ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Mar 2011 - 9:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

... राजेशने मागच्या वर्षी, याच संदर्भात लिहीलेल्या या धाग्यांची आठवण झाली.

ऊर्जेची गणितं १ : प्रास्ताविक
ऊर्जेची गणिते २: पहिला सोप्पा टेरावॉट
ऊर्जेची गणितं ३ : तापमानवाढ - एक पर्स्पेक्टीव्ह

सहजराव, पाणी वाचवण्याची कारणं मागता आहात तशी तासभर ऊर्जा वाचवण्याची कारणंही दिलीत तर वाचायला आवडेल.
राजेश, तू तिसर्‍या भागाच्या शेवटी पुढच्या लेखांचा उल्लेख केला आहेस, ते लेख लिहीवेस अशी विनंती.

मी 'अर्थ अवर' पाळला नाही, पाळणार नाही. ऊजेची नासाडी करणार्‍यांनी एकच तास का, आयुष्यभर पाळावा अर्थ अवर. शाकाहारी असणार्‍या, मधल्या वेळचं खाणं म्हणून फळं खाणार्‍यांना चातुर्मासाचं कसलं कौतुक असणार, त्यातलाच हा ही प्रकार.

सहज's picture

28 Mar 2011 - 10:31 am | सहज

तु व राजेशप्रमाणे (अर्थ अवरला विरोध प्रमाणे)मी पाणी वाचवणार्‍यांना तात्वीक विरोध केला नाही की पाणी वाचवू नका, काय फाल्तूपणा आहे असेही कुठे जाणवून दिले नाही. उलट पाणीटंचाई कपात याबद्दल नेहमीच्याच गप्पा न करता विविध समस्या उपाय, पाणीपुरवठा तंत्रज्ञान इ बद्दल बोलत होतो. एक वेगळा आवाज, एप्रोच म्हणून तसे प्रतिसाद दिले आहेत. प्रतिसाद पुन्हा वाचावेत ही विनंती. कुठेही अमुक लोकांनी इतके पाणी वापरले, अमुकांनी का वाचवावे असे बालीश प्रतिवाद केलेले नाहीत. उलट परकीय कंपन्यांना देशातील पाणी अन्य देशात न्यायला परवानगी असावी का? काय निर्बंध असावे? पाश्चात्यांकडून आजही गरीब देशांचे असे शोषण होत नाही ना? हा कोकाकोलाचा उल्लेख करुन, गुरुजीं म्हणतात त्या आर्थीक असंतुलनाचे बद्दल भाष्य केले आहे.

>पाळला नाही, पाळणार नाही..ऊजेची नासाडी करणार्‍यांनी एकच तास का.....

पुन्हा तेच!! आपण स्वता काडीचीही चूक करत नाही ही टिमकी इथे न गाजवता, एका चांगल्या कामाकरता मी अजुन एक एक्ट्रा माईल जायला तयार आहे असे कमीटमेंट दाखवायला काचकूच करणार्‍या स्वार्थी वृत्तीबद्दल काय म्हणावे!
अश्या व्यक्तीस्वातंत्र्याचे कार्ड आपल्या सोयीने वापरणार्‍या मनुष्याला अमुक समाज किती पिचतो व अमुक लोक किती ऐशोरामात जगतो म्हणायचा तात्वीक हक्क नाही असे माझे मत. प्रत्येकाने आपापली मनमानी केली तर सामुदायीक कामे सुकर कशी होणार? गुर्जी त्यावरही आपली नवी लेखमाला काढतील म्हणा. त्यांनी तशी काढावी ही विनंती. त्यांनी उर्जासमस्येवर उपाय / उत्तर लिहणार असे त्यावेळी एकदा म्हणले होते. पुन्हा वाचली पाहीजे लेखमाला नाहीतर जगाला समस्येतुन सोडवायचे उत्तर दिले व आम्ही करंट्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असे व्हायला नको.

असो जे गरीब आहेत ज्यांच्याकडे वाचवायला वीजच नाही अश्या लोकांना यातून सूट आहे हे स्पष्ट आहेच पण सदा न कदा आपण हतबल, नेहमीच पिचलो जातो असे वाटणार्‍या (तुलनेत) सुखवस्तु लोकांमधे काही प्रबोधन व्हावे हा हेतू आहे. फक्त स्वतापुरते न बघता भावी पिढीला जागरुक करण्याकरता घरुन काही वस्तुपाठ घालून द्यावे हा हेतू आहे. नाहीतर काय हो पुस्तकबाजारात 'कसे वागावे' ह्या विषयावर पुस्तक आहेच की. असे तर म्हणणे नाही ना की ते पुस्तक मुलांना विकत घेउन द्या बालसंगोपनाचा प्रश्न सुटला. ज्याने त्याने वाचून उत्तरे शोधावीत? (पक्षी: अन्य मार्गही आहेत हा प्रतिवाद)

माझे वैयक्तिक मत आहे की, घर असे बांधलेले असावे की ज्यात पावसाचे पाणी साचवून वापरात आणायची, पाण्याचा पुनःवापर करायची यंत्रणा, सौर, वात, बायोगॅस, भू-औष्णीक उर्जा, जैविक इंधन, इ. चा वापर करुन हरीत उर्जा, इंधन, पाणी याबाबत स्वयंपूर्ण व्हावे. पण त्याही वेळेस ह्या एका चांगल्या कारणाकरता समर्थन देण्यासाठी एक तास उर्जावापर बंद करुन सहभागी व्हायला आवडेल.

आणि हो, अदिती इथेच वरच्या एका प्रतिसादात (असे प्रतिकात्मक व खरे उपाय व्हायला हवेत) पासुन मी पाळत नाही, पाळणार नाही असा तुझा प्रवास कसा झाला हे कळुन घ्यायला आवडेल. नंदनने तर लिहले आहे "तर अशा प्रतीकात्मक गोष्टींतून निदान पुढच्या मोठ्या प्रमाणावरील उपायांची मानसिकता तयार होईल, हा मोठाच फायदा. "
---------------------------------------------------------------------------------
स्व:ताचे सुस्पष्ट मत असावे, कधी कंपूतला एक जण असे म्हणतो, कधी दुसरा असे म्हणतो करत फ्लिपफ्लॉप करु नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Mar 2011 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा 'अर्थ अवर'ला मी पाश्चात्य प्रकार (खूळ नव्हे!) म्हणते. एक तास, टोकन म्हणून, वीज वाचवायची असेल तर मग जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात का नाही, जेव्हा आपल्या देशात ए.सी., पंखा, यांच्याशिवाय सामान्य माणसाला जगता येतं. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात, जेव्हा भारतात, अनेक ठिकाणी, रात्रीचं तापमानही २७-२८ अंश सेल्सियसच्या खाली नसेल, (ए.सी.चा विचार मी सध्या करत नाही) पंख्याशिवाय जगणं अशक्य आहे तेव्हाच का आम्ही टोकन म्हणून वीजेचा वापर बंद करायचा?

प्रतीकात्मक उपाय केले पाहिजेत हे माझं मत अजूनही मी अगदीच अडगळीत टाकलेलं नाही; मी आधीही कधी 'अर्थ अवर' पाळला नव्हता. मार्च महिन्यात, भारतात रहात असताना, विजेचा वापर मी कधीच बंद करू शकत नाही. 'अर्थ अवर'साठी नाही, पण कदाचित 'लोड शेडींग'बद्दल सरकार काही करत नाही याचा निषेध आणि/किंवा ग्रामीण भागातल्या भारतीयांबद्दल सॉलिडॅरीटी दाखवण्यासाठी मी तासभर अंधारात बसेन.

व्यक्तिगत माझं मत म्हणाल तर आपण स्वत: नासाडी करत नाही तर त्याबद्दल गिल्ट फील येण्याचंही कारण नाही असं माझं सध्याचं मत आहे. माझी मागची एक सही आठवा सहजराव, "माझ्या विचारांची कसलीही ग्यारेंटी नाही." यालाच 'मोठं होणं' / उत्क्रांती म्हणतात का मोठे लोकं? :-)

राजेश घासकडवी's picture

28 Mar 2011 - 9:33 am | राजेश घासकडवी

तिरकस भाषेकडे दुर्लक्ष करतो व मुद्द्याकडे वळतो.

१. पृथ्वीवासी हे अतिरेकी ऊर्जा वापरून पर्यावरणाची नासाडी करत आहेत हे अजून तरी मला पूर्णपणे पटलेलं नाही. अॅंथ्रोपोसेंट्रिझमचंच हे दुसरं गमतीदार टोक वाटतं. असो. तूर्तास हे गृहितक सत्य आहे असं मानून चर्चा करतो.
२. ऊर्जा वापरण्याचे फायदे - लक्षावधी, कोट्यवधी आयुष्यं वाचतात, व अनेक कोट्यवधी कमी कष्टप्रद होतात.
३. ऊर्जा वापरण्याचे तोटे - येत्या काही दशकांत सरासरी तापमान थोडंसं वाढू वगैरे शकेल.
४. तापमान वाढल्याने काही लाख लोक विस्थापित वगैरे होण्याची व काही दशसहस्र मरण्याची वगैरे शक्यता हातावर मोजण्याइतक्या टक्क्यांत सांगितली जाते. भारतात आर्थिक मागासलेपणामुळे कुपोषणाने, रोगराईने काही कोटी लोक पुढच्या काही वर्षात मरण्याची जवळपास खात्री आहे. अधिक ऊर्जा वापरून संपन्नता आली की ते वाचतील.
५.'आता आमचा मौका आहे व आम्हाला (पर्यावरणाच्या विनाशाची)आमची संधी घेउ द्या' असं नाही. आमचं जीवनमान सुधारण्याची संधी आहे, आमचं जीवन भुकेकंगालपणापासून सुस्थितीपर्यंत नेण्याची संधी आहे.
६. म्हणून भारतासारख्या देशांना ऊर्जा अधिक खर्च करून शक्य तितक्या लवकर सुशिक्षित, सधृढ व संपन्न होण्याची गरज आहे. त्यामुळे भारताला २० वर्षं ऊर्जा वाचवण्याची गरज नाही. इतकंच.
७. अतिरेकी साखर खाऊन मधुमेही असलेल्यांची वागणूक, त्यांना मिळणारा डॉक्टरी सल्ला व कुपोषित बालकाला मिळणारा डॉक्टरी सल्ला हा सारखा असता कामा नये. बालकाने भरपूर खावं, मोठं व्हावं, व मधुमेह टाळण्यासाठी प्रयत्न करावेत (पुढच्यास ठेच या न्यायाने)
८. संपूर्ण आर्थिक चर्चा आली ती मुद्दा क्र. २ ला पुष्टी देण्यासाठी. भारत गरीब आहे कारण आर्थिक गळचेपी, ती झाली याचं कारण उद्योगधंदे फुलले नाहीत (ऊर्जा), ते होण्याचं कारण उद्योग चालवणारे (ऊर्जा वापरणारे) पाश्चात्य वगैरे.

माझ्या सहभागाविषयी एवढंच सांगतो की मला पर्यावरणवाद पटलेला नाही, त्यामुळे अर्थ अवर पाळण्यास मी बांधील नाही. मी ऊर्जावापराबाबत पाश्चात्य नाही - सर्वसाधारण अमेरिकन माणूस माझ्या वयाचा होतो तोपर्यंत जेवढी ऊर्जा वापरतो त्याच्या सुमारे एक पंचमांश मी वापरलेली आहे. तेव्हा मला अर्थ अवर पाळून काही शिकण्याची गरज नाही. यापलिकडे वैयक्तिक टिप्पण्या नकोत. विचाराचं खंडन करावं.

सहज's picture

28 Mar 2011 - 11:00 am | सहज

१) धन्यवाद.
२) त्यात काय मोठा रहस्यभेद? नवीन ते काय?
३) असे काही शास्त्रज्ञ म्हणत आहेत व त्याचे दुष्परिणाम फक्त भारतच नव्हे फक्त मनुष्यच नव्हे तर पृथ्वीवरील अन्य घटकांवर, जीवांवर होणार आहे असे म्हणतात. भारताल्या सगळ्या गरीबांच्या वतीने तुम्ही बोलत आहात काय? भारतातील सर्व गरीबांना इतरांच्या होणार्‍या संभाव्य हानीबाबत तुमच्याच मताशी सहमत असल्याचा दावा तुमचा आहे असे तुमच्या प्रतिसादातून दिसते म्हणुन ही चर्चा
४) >भारतात आर्थिक मागासलेपणामुळे कुपोषणाने, रोगराईने काही कोटी लोक पुढच्या काही वर्षात मरण्याची जवळपास खात्री आहे.
मागील / गत/ घडलेल्या आकडेवारी वरुन कोट्यावधीची हानी तुम्ही दाखवु शकाल पण उद्या ते होईल कशावरुन? भारत सरकार, खुद्द भारतीय अनेक प्रकल्प करीत आहेत ज्याने ही हानी भरुन येईल. रोगराईवर एक लस देउन काम भागू शकते त्याकरता उर्जावापर बंद झाला तर अनिष्ट परिणाम होइल यावर नाकारता येणार नाही असा पुरावा द्यावा.
>अधिक ऊर्जा वापरून संपन्नता आली की ते वाचतील.
अजुन एक तुम्ही तर असे म्हणत आहात की त्या एका तासात सगळे ठप्प जसे काहि इस्पीतळे, औद्योगीक संस्था, कोट्यावधी लोकांचे जीव वाचतील अशी साधन निर्मीती. आपण इथे ज्या लोकांना जितके शक्य आहे तितका कमी उर्जावापर म्हणत आहोत. त्यामुळे हे असे युक्तीवाद जस्ट टू मच वाटत आहेत.

५) पुन्हा एकदा भुकेकंगालाची शेवटची संधी हिरावून घेतली जात आहे ह्या आरोपाच्या पुष्टर्थ पुरावा द्या. निदान नक्की कोण असे करत आहे व केले आहे हे दाखवुन द्या. त्या तुमच्या कोट्यावधी बळींपैकी किती लोक २६ मार्चच्या अर्थ अवर मधे व मुळे गेली याचा विदा तुमच्याकडे तयार असेलच नाही का?
६) >२० वर्षं ऊर्जा वाचवण्याची गरज नाह>. जर एखादे सर्वसामान्य भारतीय कुटूंब साडेआठ ते साडेनउ यावेळात जेवण, एखादी टिव्ही सिरीयल बघत असेल तर त्यांनी दिवा, टिव्ही बंद ठेवल्याने त्यातील किती जण "सुशिक्षित, सधृढ व संपन्न " याचा सांख्यीकी विदा तुम्ही द्यालच अशी आशा.
७) उपाशी माणसाला उपास करा सल्ला दिला नसल्याने केलेली तुलना चुकीची वाटली. एक तास शक्य तेथे वीज बंद ठेवा म्हणजे उपाशी माणसाच्या समोरचा घास काढला हे कै च्या कैच!
८) संपूर्ण आर्थिक चर्चा आली ... मी म्हणेन मूळ सबळ कारण नसताना उगाच विषयांतर, फाटे फोडणे हा प्रयत्न म्हणून ही चर्चा.

बाकी कोण कशाला बांधील आहे हे दिसते आहे. कोणाचे कमीटमेंट किती आहे हेही ह्या निमीत्ताने दिसत आहे. समाजाचा एक घटक म्हणून आपला वाटा उचलणे काही जणांना अजुनही किती अवघड आहे हे दिसत आहे. तसेच दोन्ही समाजात राहून सोयीसाठी असेही व तसेही बोलणे हेही दिसून आले. कोती व स्वार्थी मनोवृत्ती भारताबाहेर जितकी जाईल व राहील तितके भारताचे भविष्य उज्ज्वल आहे हे ही या निमित्ताने दिसून आले. पाश्चात्य समाजातील उर्जावापर कमी व्हावा म्हणून पाश्चात्य समाजाचा घटक म्हणून आलेली संधी न घेणे व भारतातील गरीबांचे प्रतिनिधीत्व करताना पाश्चात्यांना नावे ठेवणे. हे म्हणजे हमे गरीबी हटानी है करत आपल्या मतदारसंघात अंधार ठेवून आपल्या पोराबाळांना परदेशात छानछौकीत ठेवणारे राजकारणी आठवले.

धन्यवाद.

राजेश घासकडवी's picture

28 Mar 2011 - 11:49 am | राजेश घासकडवी

तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. बहुतेक मुद्द्यांमध्ये मला तो एक तास ऊर्जा कमी करणं आक्षेपार्ह आहे असं तुम्ही गृहीत धरलं असावं. आक्षेप त्या एक तासाला नाही, आक्षेप हा विशिष्ट प्रश्न भारताने गळ्यात बांधून घेण्याला आहे. आक्षेप उपदेश स्वीकारण्याला आहे.

मागील / गत/ घडलेल्या आकडेवारी वरुन कोट्यावधीची हानी तुम्ही दाखवु शकाल पण उद्या ते होईल कशावरुन? भारत सरकार, खुद्द भारतीय अनेक प्रकल्प करीत आहेत ज्याने ही हानी भरुन येईल.

खालच्या दुव्यावरचे आलेख पहा. सरकारने प्रयत्न केले तरी हा प्रश्न प्रचंड मोठा आहे. तो सोडवण्यासाठी प्रचंड यंत्रणा हवी. ती चालवण्यासाठी ऊर्जा हवी.

रोगराईवर एक लस देउन काम भागू शकते

मग भारतात इन्फंट मॉर्टॅलिटी दर हजार जन्मांमागे ५० आहे, अमेरिकेत तो ६.८ आहे - हे लशी टोचून का? श्रीमंती, संपन्नता यातून आरोग्य येतं. त्यासाठी उत्पादन वाढवावं लागतं, त्यासाठी ऊर्जा जाळावी लागते. आधी ही मॉर्टॅलिटी दहाच्या खाली आणू मग ऊर्जा वाचवू. नाहीतरी आपण अमेरिकेच्या एक पंधरांश ऊर्जाच वापरतो दरडोई. एवढा साधा मुद्दा आहे.

साडेआठ ते साडेनउ यावेळात जेवण, एखादी टिव्ही सिरीयल बघत असेल तर त्यांनी दिवा, टिव्ही बंद ठेवल्याने

टीव्ही, दिव्याला फार ऊर्जा नाही हो लागत. पोलादाचे, अल्युमिनमचे प्लॅंट्स यांना लागते. फर्टिलायझर्स, ट्रॅक्टर्स, आणि इतर इंडस्ट्रीसाठी लागते. दळणवळणासाठी लागते. भलीथोरली घरं उबदार किंवा थंड ठेवायला लागते.

कोट्यावधी बळींपैकी किती लोक २६ मार्चच्या अर्थ अवर मधे व मुळे गेली

पुन्हा इथे त्या तासातली ऊर्जा व ऊर्जा वाचवण्याचा संदेश यात गोंधळ होतो आहे. दर हजार जन्मांमागे पन्नास बालमृत्यू - पुढच्या वीस वर्षांसाठी इंटिग्रेट करा. किती कोटी येतील ते सांगा. हे थांबवायचं तर ऊर्जा वापरलीच पाहिजे.

बाकी कोण कशाला बांधील आहे हे दिसते आहे. कोणाचे कमीटमेंट किती आहे हेही ह्या निमीत्ताने दिसत आहे.

कृपया बांधीलकीची भाषा करू नका. हे व्यक्तिगत होण्याच्या जवळ चाललेलं आहे. मी माझ्या तत्वांना बांधील आहे.

कोती व स्वार्थी मनोवृत्ती भारताबाहेर जितकी जाईल व राहील तितके भारताचे भविष्य उज्ज्वल आहे हे ही या निमित्ताने दिसून आले

शेवटचा परिच्छेद फारच व्यक्तिगत होत चालला आहे. तेव्हा हा संवाद माझ्यातर्फे इथेच थांबवतो.

सहज's picture

28 Mar 2011 - 3:28 pm | सहज

पुन्हा एकदा मूळ धागा वाचा. प्रतिकात्मक आहे अर्थ अवर. तरी..

१) तुमचाच गैरसमज आहे की भारताच्या गळ्यात हे प्रकार चुकीचे मारण्यात आले आहे. एक तर तुम्ही त्यावर आक्षेप घेतलाच व असल्याच तो एका स्वतंत्र धाग्याचा विषय असताना इथे खुसपटे काढायची गरज नव्हतीच. बरे झाले म्हणा, सो कॉल्ड हुशार लोकांचे एक पितळ उघडे पडले.

२) भारताच्या समस्या हा स्वतंत्र विषय आहे. भारताच्या उर्जावापर व गरज हा वेगळा विषय आहे. अर्थ अवर सारख्या एका सकारात्मक प्रकल्पावर विनाकारण आग पाखड होत आहे.

३) इंफंट मॉर्टॅलिटी स्वतंत्र विषय आहे व त्यावर फक्त वारेमाप उर्जावापर हे उत्तर अजिबात पटत नाही आहे. अभय बंग, आमटे यांच्या प्रकल्पाला भेट देउन आलेले, इशान्य भारतात राहून आलेले. तसेच खेडोपाडी काम करुन आलेल्या मिपाकरांनी सांगावे फक्त २४ तास वीज हेच उत्तर आहे काय?

४) माझा काही गोंधळ होत नाही आहे पण तुमचा सगळे भारंभार मुद्दे एकामेकात घुसळल्याने होतो आहे असे दिसते आहे. त्यामुळे खरच थांबा, तो तुमचा शेवटचा फाटे फोडणारा प्रतिसाद असावा ही इच्छा प्रकट करतो.

नगरीनिरंजन's picture

28 Mar 2011 - 9:12 am | नगरीनिरंजन

>>भारतातल्या लोकांनी हे ऐकून घेण्याची गरज नाही.
हे पटलं नाही. विकासाच्या नावाखाली पाश्चात्य देशानी केलं तेच मॉडेल आपण भविष्यात राबवणार असू तर या म्हणण्याला अर्थ नाही. भारत जर आत्ताच विकासाचा मूलभूत विचार करून पर्यावरण रक्षणासह विकास असे स्वतःचे काही मॉडेल मांडत असेल तरच भारताने ऐकून घ्यायची गरज नाही असे मी म्हणेन.
सद्य परिस्थितीवरून तर असं वाटतंय की अजून १०-२० वर्षांमध्ये भारतातील मध्यमवर्गीय लोकांची क्रयशक्ती अमेरिकेच्या तोडीची होऊन वस्तूंचा वापर त्याच पातळीला पोचू शकतो.
अर्थात अर्थ अवर पाळल्याने हे सगळं बदलेल असं नाही हे ही खरंच आहे.

राजेश घासकडवी's picture

28 Mar 2011 - 10:15 am | राजेश घासकडवी

सद्य परिस्थितीवरून तर असं वाटतंय की अजून १०-२० वर्षांमध्ये भारतातील मध्यमवर्गीय लोकांची क्रयशक्ती अमेरिकेच्या तोडीची होऊन वस्तूंचा वापर त्याच पातळीला पोचू शकतो.

याबद्दलचा संदर्भ द्यावा. भारताचं जीडीपी १.३ ट्रिलियन डॉलर. अमेरिकेचं जीडीपी १४.१ ट्रिलियन डॉलर. भारताची लोकसंख्या अमरिकेच्या साडेतीन पट. पर कॅपिटामध्ये ३० पटीचा फरक. १०-२० वर्षाचं गणित काही जुळत नाही.

नगरीनिरंजन's picture

28 Mar 2011 - 10:52 am | नगरीनिरंजन

भारताचा मध्यमवर्गच अमेरिकेच्या लोकसंख्येएवढा आहे. फक्त त्याकडेच लक्ष दिलं तर ३० पट वगैरे फरक राहणार नाही असे वाटते. माझ्याकडे संख्याशास्त्रीय विदा नाही पण सगळ्या लोकसंख्येचे दरडोई उत्पन्न हा निकष इथे कितपत लागू होईल याबद्दल शंका आहे.
भारताचा जीडीपी कमी असला तरी नैसर्गिक स्त्रोतांची उपलब्धता आणि उपभोग यांचे प्रमाण काढल्यास तेही काही वर्षांत जवळपास सारखेच होईल असे वाटते. शिवाय उर्जा वाटपाच्या विषमतेने जीडीपी सुधारणे अवघड असून फक्त एकाच वर्गाला लठ्ठपणाची सूज येऊन बाकीचे वंचितच राहण्याचा धोका आहे.
म्हणूनच जो पर्यंत भारत स्वतःच्या परिस्थितीवर स्वतःचे उपाय काढत नाही तोवर तरी भारताने लक्ष देऊ नये असे म्हणणे धाडसाचे वाटते.

रमताराम's picture

28 Mar 2011 - 3:11 pm | रमताराम

घासुगुर्जींशी साफ असहमत. च्यायला आपल्याला जी उर्जा लागते त्याला पैसे आपल्याला खर्च करावे लागतात. मसणी अमेरिका काय करते आहे हे आम्हाला काय करायचं आहे. हे म्हणजे उजवे लोक जसे आधी 'त्यांना' सांगा मग आम्ही आमची बेकायदेशीर प्रार्थनास्थळे हटवू म्हणतात तसे आर्ग्युमेंट वाटले. मला वाटते अन्नधान्य नि उर्जेची गरज याबाबत गल्लत होते आहे तुमची. पोटाला किमान अन्न ही गरज आपल्या देशात भागलेली नाही, त्यामुळे त्याच्या अधिक वापराबाबत भारताला दोष दिल्याबद्दल अमेरिकेवर टीका करणे वेगळे नि तोच न्याय उर्जेबाबत लावणे वेगळे. उर्जेचा अमाप गैरवापर आपली शहरे करू लागली आहेतच, त्यालाच चाप बसवणे आवश्यक आहेच.

मी तर म्हणतो आपली उर्जेची उपलब्धता नि खर्च पाहता शक्य होईल तितक्या वेळा असा 'अर्थ अवर' साजरा करावा. त्यातून अनावश्यक खर्च किती होतो हे नि काटकसरीने राहून देखील तितकेच सुखाचे आयुष्य आपल्या वाट्याला येते हे समजले तर ते उपयुक्तच आहे अर्थात यात नासाडी करणार्‍यांना खास करून शहरी मुजोरांना प्राधान्याने असा 'अवर' पाळायला लावावा असे जरा सिलेक्टिव करता आले तर अधिक चांगले.

छोटा डॉन's picture

28 Mar 2011 - 3:36 pm | छोटा डॉन

ररांशी सहमत.
मला जे म्हणायचे आहे ते बहुसंख्य मुद्दे त्यांनी क्लियर केले आहेत आणि ते पुरेसे आहे.

मी तर म्हणतो की पुणे, मुंबई, बंगरुळ, दिल्ली सारख्या शहरांना 'रट्टे देऊन' अर्थ अवर पाळायला सांगावे व त्यात वाचलेली उर्जा ही ग्रामिण भागाकडे वळवुन तिथले शेतपंप चालवावेत.
बरं का, हे खरेखुरे प्रोडक्टिव्ह होईल.

विकेंडला शहरातल्या अलिशान हॉटेल, हँग आउट प्लेसमधली दुकानातील झगमगाट आणि न्युऑन साईन्सची आणि एकुणच १ तास वाचलेली उर्जा ही 'गरजु भारताला' खुप खुप उपयोगाची आहे असे आमचे स्पष्ट मत आहे व म्हणुन आम्ही आमचे जे काही चिल्लर ट्युब, फ्यान आणि तत्सम आहे ते १ तास बंद ठेवतो आणि आम्हाला ते पुर्णपणे पटते, विषय संपला.

- छोटा डॉन

मुंबई तुमची औद्योगीक राजधानी आहे हे विसरु नका. देशाचे किती टक्के उत्त्पन्न ह्या मोठय गावांमधुन येते हे जरा पहा. कीती टक्के लोकसंख्या फक्त ह्या गावांमध्ये राहते हे पहा. इतकं सगळं सहन करायची ताकद आहे का ठरवा आधी आणि मग मोठ्या मोठ्या बाता लावा.

छोटा डॉन's picture

28 Mar 2011 - 3:44 pm | छोटा डॉन

औद्योगिक राजधानी, उत्पन्न, लोकसंख्येचा % ....
गल्लत होते आहे हो बहुतेक ...

मी इकडे "बिझीनेस" करायला आलो नाही त्यामुळे उपरोक्त नॉर्म्स मला लागु होत नाहीत.
इथे मी ह्या प्रश्नाकडे नैतिक दृष्टिकोनातुन पहात आहे, त्या 'बिझीनेसमन अ‍ॅप्रोच'शी मला देणेघेणे नाही.

- छोटा डॉन

वा वा.. तुमची नैतिकता पाहुन ड्वाले पाणावले... लावा बादली लावा थोडं पाणी वाचेल.

देशाचं उत्पन्न बोंबलंल अनं उद्योगधंदे बंद पडले तर कारखान्याच्या कामरांच्या पोरांची पोटं तुमच्या नैतिकतेने भरणार आहेत का?

छोटा डॉन's picture

28 Mar 2011 - 3:54 pm | छोटा डॉन

देशाचं उत्पन्न बोंबलंल अनं उद्योगधंदे बंद पडले तर कारखान्याच्या कामरांच्या पोरांची पोटं तुमच्या नैतिकतेने भरणार आहेत का?

=)) =)) =))
भरु भरु, अहो आम्ही वेळ पडली तर नैतिकतेने आमची पोटं भरु ;)

बाकी ह्यावरुन तुमचे ह्या १ तासाचा काळात" अणु-उर्जाकेंद्राच्या चिलिंग टॉवर्सचा वीजपुरवठा बंद केला जातो, विमानतळावरच्या नेव्हिगेशन आणि कंट्रोल टॉवर्समधले कामकाम विजेअभावी बंद असते, राष्ट्रपती भवन आणि इतर अनेक महत्वाच्या ठिकाणाचे सीसीटिव्ही सर्व्हेलन्स बंद असते, हॉस्पिटलात ईमर्जन्सी वॉर्ड १ तासासाठी देवाच्या भरोश्यावर असतो" असे तर गैरसमज नाहीत ना ?

अहो १ तास उर्जा वाचवा म्हणजे सगळे सरसकट बंद करुन बसा असा नव्हे, योग्य अर्थ तरी समजुन घ्या की राव ;)
शेवटी कसे आहे की हे 'ऐच्छिक' आहे, म्हणजे कसे की ज्याला ज्याला जे जे पटते त्याने त्याने त्या त्या प्रकारे ते ते करावे, ओके ?

- छोटा डॉन

सहज's picture

28 Mar 2011 - 3:56 pm | सहज

तुमचे नेहमीच एक आवडते रेस्टॉरंट आहे. समजा त्यांनी ठरवले आपण अर्थ अवर मधे सहभागी व्हायचे व त्यांनी तो वेळ सोलर पॉवर विजेर्‍या, मेणबत्या इ. वापरुन उर्जावापर कमी केला. तर आपण त्या रेस्टॉरंटवर बहीष्कार टाकाल काय? त्यामुळे त्या रेस्टॉरंटचे उत्पन्न बोंबलून, बंद पडेल काय?

समजा हे रेस्टॉरंट ज्या इमारती मधे आहे त्यावरील मोठ्या गरज नसलेल्या काही निऑन साईन्स बंद झाल्या तर नक्की भारतीय अर्थव्यवस्था कशी ढासळेल?

का केवळ वाद घालायचा म्हणून नको त्या भिती दाखवून उर्जाबचत टाळायची?

समजा हे रेस्टॉरंट ज्या इमारती मधे आहे त्यावरील मोठ्या गरज नसलेल्या काही निऑन साईन्स बंद झाल्या तर नक्की भारतीय अर्थव्यवस्था कशी ढासळेल?

गरज नसलेल्या निऑन साईन्स त्यांनी लावल्याच कशा? त्या वर्षभरच बंद कराव्यात. आम्ही गरज नसलेला दिवा मिनिटभरसुद्धा चालु ठेवत नाही.

रेस्टॉरंट एक धंदा आहे, त्यात नफा तोटा आहे. तोट्यामध्ये खर्चाचे गणित धरलेले असते. खर्चामध्ये मार्केटींग, गिर्‍हाइकं कशी मिळवावी याचा हिशेब असतो. त्यामुळे अनावश्यक दिवे लावुन धंदे करतात कसे हा मुळ प्रश्न आहे. त्यांना तासभर वीज वाचवुन काही फरक पडणार नाहीए.
पण रेस्टॉरंटने अर्थ अवर पाळुन, तशी जाहीरात करुन वीज बजतीच्या अवेअरनेसचे प्रयत्न केले तर ते स्तुत्यच असतील.

का केवळ वाद घालायचा म्हणून नको त्या भिती दाखवून उर्जाबचत टाळायची?

मुद्दा लक्षात घेतलात तर केवळ वाद घालत नसुन आमच्याकडे मुद्दे आहेत हे ध्यानात येइलच.

पाश्चात्य देशात गरजेपेक्षा जास्त उर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. त्याचा ते पुरेपुर वापर करुन उर्जा निरर्थक वाया घालवतात.भारतात किती लोकांना गरजे इतकी उर्जा उपलब्ध आहे? वर्षात एकही दिवस लोड शेडिंग न अनुभवणारे कीती लोक आहेत इथे?

म्हणजे मुळात हवी इतकी उर्जा मिळत नसताना, अरे उर्जा उधळु नका हा संदेश भारताला गरजेचा नाही हा एक मुद्दा.

दुसरा मुद्दा, मॅरेथॉन इ. अवेअरनेस प्रोग्रॅम्स मध्ये तुम्ही रस्त्यावर पळता, रस्त्यावर पळण्यार्‍यांचे फोटो पेप्रात बातम्यांत येतात. म्हणजे याचा प्रचार होतो. असा प्रचार करण्यास काहीच हरकत नाही. असा अर्थ अवर वैयक्तिक पातळीवर पाळुन हा प्रचार साध्य होतंच नाही. त्यात तुम्ही नेहमी काटकसरीने वागणारे असाल, किंवा गरजे इतकी उर्जाच न मिळणारे असाल तर त्यात काहीच हशील नाही हा मुद्दा आहे.

अर्थ अवरचा उद्देश वीज वाचवा असा व्यापक संदेश देणे आहे, ह्या तासातच वीज बंद ठेवा असा संकुचित नाही. जिथे प्यायला पाणी नाही तिथे पाणी जपुन वापरा संदेश देण्याची आवश्यकता नसते असे वाटते.

सहज's picture

28 Mar 2011 - 4:18 pm | सहज

एक तास निऑन साईन्स बंद ठेवल्याने, उद्योगधंदे बंद पडून कामगार देशोधडीला लागत नाहीत असे आडवळणाने कबूल केलेत.

धन्यवाद.

Nile's picture

28 Mar 2011 - 4:22 pm | Nile

बादरायण संबंध लावु नये. वरील विधान डान्रावांच्या खालील विधानावर केलेले होते.

मी तर म्हणतो की पुणे, मुंबई, बंगरुळ, दिल्ली सारख्या शहरांना 'रट्टे देऊन' अर्थ अवर पाळायला सांगावे व त्यात वाचलेली उर्जा ही ग्रामिण भागाकडे वळवुन तिथले शेतपंप चालवावेत.
बरं का, हे खरेखुरे प्रोडक्टिव्ह होईल.

सहज's picture

28 Mar 2011 - 4:33 pm | सहज

खाली लिहता की
१ तासात वाचवलेली वीज म्हणजे

१/२४*३६५=०.०१४१% म्हणजे काहीच नाही.

पुन्हा डॉनरावांच्या वरील विधानावर लिहता देशाचं उत्पन्न बोंबलंल अनं उद्योगधंदे बंद पडले तर कारखान्याच्या कामरांच्या पोरांची पोटं तुमच्या नैतिकतेने भरणार आहेत का?

नक्की काय खरे? फारसा पडणार नाही जरी वीज वाचवली तरी पण तेवढ्यात उद्योगधंदे मात्र रसातळाला जाणार? म्हणजे अर्थ अवर मधे उर्जावापराचा तुमचा जो हट्ट आहे त्यावर परीणाम नाही, उर्जा पुरेशी मिळणारच पण तेवढ्यात देशाची प्रगती बोंबलणार?

खरंच?

उद्योगधंद्यांने वाचवलेली वीज त्यांच्या सरसरीच वार्षिक वापराच्या ०.०१४१%च असेल. पण त्यामुळे होणारे नुकसान कीती असेल? एक तास कंपनी बंद ठेवणे != एक तासाची वीज बचत. वीज कपाती मुळे मुळातच अनेक छोट्या उद्योगधंद्यांना त्यांचे वर्किंग अवर्स लोड शेडींग नुसार ठेवावे लागतात.

मध्येच एखाद्या फ्लोअरवर १ तास वीज बंद ठेवणे म्हणजे १ तास कंप्युटर बंद ठेवण्याइतके सोपे नाही.

सहज's picture

28 Mar 2011 - 4:54 pm | सहज

एकदा सुचीत करु इच्छीतो की कामधंदे बंद पाडून, नुकसान सोसून सहभागी व्हा हा हेका कधीच नव्हता जरी तसा आभास करायचा कोणी जीवापाड प्रयत्न करत असले तरी.

येथे सहभागी व्हायला ज्यांना शक्य आहे त्यांना सांगीतले आहे व असे अनेक भारतीय आहेत ज्यांना हे शक्य आहे. उद्योगधंद्यात फक्त अवजड उद्योग, मशीनरी इ. नव्हे तर छोटी रेस्टॉरंट, तसेच अन्य कंपन्यातील काही दिवे बंद करता येतील इ. देखील सामील होउ शकतात. सगळेच उद्योगधंदे नुकसानीत जातील हा आरोप बिनबुडाचा आहे हे स्पष्ट झाले आहे. सगळे काम ठप्प होउन नुकसान व्हावे असा हेतू अर्थ अवरचा कधीच नव्हता हे पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.

अर्थअवर पाळल्यामुळे भारताच्या, पर्यावरणाच्या समस्या सुटतील असेही नाही किंवा अत्यंत बिकट होतील असेही नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Mar 2011 - 3:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. ज्यांच्याकडे नेहेमीच वीजेची (आणि इतर संसाधनांचीही) उधळपट्टी चालते त्यांच्यासाठी 'अर्थ अवर' हवा का 'हॅव सम सेन्स' हा संदेश हवा? माझ्या मते दुसरा पर्याय.
१.१ (शास्त्रापुरता) एक तास घरातला एक दिवा, पंखा बंद ठेवून किती वीज वाचेल आणि किती वेळ शेतीचे पंप सुरू रहातील?

२. समजा आपल्याकडे पुरेशी ऊर्जा आहे आणि वसुंधरेसाठी आपण एक तासभर वीज वापरली नाही तर त्या वीजेचं नक्की काय होणार? तासाभरापुरती ऊर्जानिर्मिती कमी करता येईल काय? त्याचा खर्च काय होईल? आणि समजा असं करता येत नसेल तर तयार होणार्‍या वीजेचं काय करायचं?

झगमगाट, नीऑन साईन्स इत्यादींवर जी ऊर्जा जळते त्याचं बिल आपल्या घरात येणार्‍या बिलापेक्षा बरंच जास्त असतं. आपल्याला स्वस्तात वीज मिळते ती या लोकांनी जास्त पैसे भरल्यामुळे (निदान कागदोपत्री, प्रत्यक्षात काही वेगळं चालत असेलही!). अर्थात वीजेच्या नासाडीचं हे समर्थन नव्हे. पण हीच नीऑन साईन्स बंद केली तर आपल्याला वीजेचं बिल जास्त येऊ शकतं याची फक्त एक नोंद.

छोटा डॉन's picture

28 Mar 2011 - 4:06 pm | छोटा डॉन

बहुसंख्य प्रश्नांना वर उत्तर दिले आहेच.
पण काही मुद्द्यांवर अजुन लिहितो ...

समजा आपल्याकडे पुरेशी ऊर्जा आहे आणि वसुंधरेसाठी आपण एक तासभर वीज वापरली नाही तर त्या वीजेचं नक्की काय होणार? तासाभरापुरती ऊर्जानिर्मिती कमी करता येईल काय? त्याचा खर्च काय होईल? आणि समजा असं करता येत नसेल तर तयार होणार्‍या वीजेचं काय करायचं?

ते आपण उर्जा कशापासुन मिळवतो त्यावर डिपेंड आहे.
म्हणजे कसे की आपल्या कर्तुत्वाने आपला देश आपल्याला लागणारी १००% उर्जा ही सुर्या / वारा / टायडल एनर्जी पासुन मिळवतो तर आपल्याला हा 'अर्थ अवर' पाळण्याची गरज नाही.
पण आपण समजा कोळसा जाळुन, डिझेल जाळुन, अणु-उर्जा वापरुन हे मिळवत असु तर विचार कराल की नाही ?
१ तासात वाचलेल्या विजेमुळे वाचलेला कोळसा किंवा डिझेल ह्याचा विदा तुर्तास माझ्याकडे नाही पण बिलिव्ह मी ते दखलघेण्यायोग्य नक्कीच असेल.

बाकी काही जणांचा आक्षेप असा आहे की उर्जा साठवुन ठेवता येत नाही मग ती कशी वाचेल.
सोप्पं आहे, मागणी आणि पुरवठा ह्यांचे जे हार्मोनायझिंग आहे ना त्या कामात ह्या '१ तासात वाचलेल्या उर्जेमुळे' पुरेसा 'बफर फॅक्टर' मिळेल. हे बहुतेक फायदेशीरच नाही का ?

झगमगाट, नीऑन साईन्स इत्यादींवर जी ऊर्जा जळते त्याचं बिल आपल्या घरात येणार्‍या बिलापेक्षा बरंच जास्त असतं.

२ गोष्टी आहेत :
१. मी ह्या प्रश्नाकडे 'बिझीनेस' म्हणुन पहात नाही व म्हणुन मी 'रेट्स'ची काळजी करत नाही
२. मला 'निकड' ही जास्त महत्वाची वाटते, न्युऑन साईन्स जरी मला कितीही पैसा मिळवुन देणार असतील तरी उपयुक्ततेच्या बाबतीत माझा ह्या न्युऑन साईन्सना नेहमीच दुय्यम प्रेफरंस असेल. कारण तेच, मी नैतिक मुद्दे बघतो, बिझीनेस नव्हे.
( बाकी हा मुद्दा माझ्या दृष्टीने इथे विसंगत आहे, आपण इथे 'उर्जा वाचवण्याचे' बोलतो आहे न की 'पैसे वाचवणे', असो. )

स्वगत : च्यायला तिकडे १ तासात जेवढी उर्जा मी वाचवली होती ती इथे फुकट टंकण्यात वाया जातेय का काय अशी भिती वाटत आहे ;)

- छोटा डॉन

सोप्पं आहे, मागणी आणि पुरवठा ह्यांचे जे हार्मोनायझिंग आहे ना त्या कामात ह्या '१ तासात वाचलेल्या उर्जेमुळे' पुरेसा 'बफर फॅक्टर' मिळेल. हे बहुतेक फायदेशीरच नाही का ?

असहमत.

१ तासात वाचवलेली वीज म्हणजे

१/२४*३६५=०.०१४१% म्हणजे काहीच नाही.

छोटा डॉन's picture

28 Mar 2011 - 4:33 pm | छोटा डॉन

>>१/२४*३६५=०.०१४१% म्हणजे काहीच नाही.

ओके, नसु शकेल.
बाकी तुम्हाला "Statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital" हे माहित असेलच.
असो, आम्हीही उगाच एक आकडेवारी देतो, तुमच्याइतकी परफेक्ट नाय बरं का पण भारताच्या एकुण उर्जा उत्पादनापैकी आपण ५३% उर्जा कोळश्यापासुन, ८% उर्जा नैसर्गिक वायुपासुन आणि ३१% उर्जा ही तेलापासुन मिळवतो.
आणि बरं का, हे जे सोर्सेस आहेत ना ते एक ना एक दिवस संपणार आहेत, बघा बॉ आता तुम्हीच :)

बाकी तुर्तास नक्की किती उर्जा आणि त्यानुसार कोळसा / ऑईल वाचले हे शोधण्याइतका वेळ जरी असला तरी त्याची गरज वाटत नाही, असो.

- छोटा डॉन

असो, आम्हीही उगाच एक आकडेवारी देतो, तुमच्याइतकी परफेक्ट नाय बरं का पण भारताच्या एकुण उर्जा उत्पादनापैकी आपण ५३% उर्जा कोळश्यापासुन, ८% उर्जा नैसर्गिक वायुपासुन आणि ३१% उर्जा ही तेलापासुन मिळवतो.
आणि बरं का, हे जे सोर्सेस आहेत ना ते एक ना एक दिवस संपणार आहेत, बघा बॉ आता तुम्हीच

हो का, बरं मग असं करा जंगलात जाउन रहा. ह्या कोळसा, वीज वापरुन केलेले कपडे, खाद्य वगैरे वापरु नका. झाडाच्या साली वगैरे वापरा. म्हणजे हे सगळ एका माणसाचं का होईना वाचेल, आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे इटस नॉट अ‍ॅज स्मॉल अ‍ॅज यु कॅन कन्सिल इन बिकिनी नाही का?

छोटा डॉन's picture

28 Mar 2011 - 4:59 pm | छोटा डॉन

>> बरं मग असं करा जंगलात जाउन रहा.
सल्ल्यासाठी आभार ...

आम्ही जरुर ह्याचा विचार करु, मात्र तुम्हीही काळजी घ्या, आधाशीपणे तुम्ही एक दिवस सगळे संपवुन टाकताल आणि उर्जेअभावी मग तुमची शहरे आणि आमचे जंगल ह्यात काहीच फरक राहणार नाही.
इन दॅट केस तुम्हाला आमची जंगली राहणीमान डिफिकल्ट जाईल बरं का मिश्टर ;)

असो, अनावश्यक फाटेफोड आणि चर्चा ह्याला इथे माझ्याकडुन पुर्णविराम, बाकी चालु द्यात :)

- छोटा डॉन

आमची काळजी करु नका, तुमच्या सारखे अनेकांनी वापर थांबवला तर आमचे सात जन्मतरी सुखानी जातील. ;-)

त्यामुळे आम्हाला जंगलात यावे लागणार नाही. आणि हो, तोवर आम्ही अजुन स्वच्छ उर्जेचे स्रोत शोधुनही काढु. ते शोधायलाही उर्जा खर्च होते बर्का.. नाही आधीच सांगतो म्हणजे धक्का नसो बसायला..

उदा. सुर्याची उर्जा वापरु.. तेव्हाही तुम्ही यालच म्हणा.. अरे मेल्यांनो तो सुर्य ३ बिलियन वर्षात संपेल वापरुन म्हनुन ओरडत पण असो असो... ;-)

उतरली का सगळी? चला तिकडे कुंदनसेठनी ग्लास भरलेत.. शल्लोक पाठ करु आपण चला..

बा*** भां**.,. आज दिवसभरात ट्यार्पी शिलेदारचा पार कोतवाल झाला राव आमचा.. असो.

गणपा's picture

28 Mar 2011 - 6:05 am | गणपा

आमच्या नायजेरियात तर २ - ४ दिवसांनी नियमित ३-४ तास विजपुरवठा होतो. त्यामुळे तसेही आम्ही विजेची बचत करतच असतो.
अजुन खास जर अर्ध्या तासासाठी विजबचत करायची असेल तर आधी मुदलातला विजपुरवठा झाला पाहिजे.

विनायक प्रभू's picture

28 Mar 2011 - 11:12 am | विनायक प्रभू

ह्या वर्षी पण कँडल लाईट डिनर केलेत का नाही सहज राव?

सहज's picture

28 Mar 2011 - 11:28 am | सहज

म्हणून तर बोलतोय ना सर! :-)

Nile's picture

28 Mar 2011 - 11:39 am | Nile

वरील संपूर्ण चर्चा वाचली, थोडे आधीच मत द्यायचे होते पण ते व्यापात राहिले.

सर्वात आधी, मी अर्थ अवर पाळला नाही. मुख्य कारणं दोन,
१. मी नेहमीच काटकसर करतो.
२. त्यावेळेला वीज बंद करुन माझ्या कामकाजाचे नुकसान करणे मला जास्त महागात पडले असते.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्थ अवर या प्रकल्पाचा उद्देश काय आहे? माझ्या मते अर्थ अवरचा उद्देश उर्जा वापराच्या काटकसरीबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस पोहचवणे. त्यामुळे माझ्यासारख्या नेहमी काटकसर करणार्‍याने अर्थ अवर पाळुन या उद्देशात साध्य असे काही होत नाही.

याउलट याबद्दल मी प्रसार केला, जसे की असा धागा लिहणे, तो पुन्हा वर आणणे, त्यावर चर्चा करणे इ., करणे मात्र महत्त्वाचे आहे.

त्यामुळे, भारतात जिथे पुरेशी उर्जाच मिळत नाही तिथे उर्जाबजतीचा संदेश देणे एकवेळ ठीक पण त्याच तासाला वीज बंद ठेवा असा हट्ट पटत नाही.

सहज's picture

28 Mar 2011 - 11:56 am | सहज

नाईल तु सर्वात श्रेष्ठ महात्मा आहेस व संस्थळावरचे अन्य सभासद देखील एकसे एक काम करत असतात. आपल्या सगळ्यांचेच तर कार्बन फुटप्रिंट अदृश्य आहे.

एकाच वेळी आपले प्राणांचे मोल देउन स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या स्वातंत्र्य दिले म्हणून त्यांचे आभार मानतो व आपण आपल्या समाजासाठी, पृथ्वी साठी काही करायची वेळ आली की मी अमुक तमुक नेहमीच करतो त्यामुळे मला अमुक तमूक मधून सुटका मिळावी हे कारण देतो.

हरकत नाही. एकतर हे कोणावर सक्तीचे काम नाही आहे. पण कुठल्या चांगल्या कामाला आपली अक्कल हुशारी दाखवुन हिणवणे हे चुकीचे आहे. आपण जगातील सर्व ज्ञान कोळून प्यायलो आहे व प्रत्येक समस्येचे उत्तर व उकल आपल्याकडे आहे ह्या समजुतीत शब्दछल करत रहाणे यामुळे मराठी आंतरजाल प्रचंड प्रकाशीत आहे. येथे 'एक तास बंद' योजना सुरु करायला हवी :-)

नाईल तु सर्वात श्रेष्ठ महात्मा आहेस

धन्यवाद, पण मी नाहीए.

एकाच वेळी आपले प्राणांचे मोल देउन स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या स्वातंत्र्य दिले म्हणून त्यांचे आभार मानतो व आपण आपल्या समाजासाठी, पृथ्वी साठी काही करायची वेळ आली की मी अमुक तमुक नेहमीच करतो त्यामुळे मला अमुक तमूक मधून सुटका मिळावी हे कारण देतो.

मी सुटका मागितलीच नाही. मुळात मला कोणी बंधनात घातलेलंच नाही. मी नेहमीच काटकसर करतो त्यामुळे ह्या एक तास मी पाळला नाही म्हणजे मी पृथ्वीसाठी काही केलं नाही असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. (मी बचत कशी करतो असे मी इथेही अनेकदा इतर धाग्यांवर लिहलेलं आहे)

पण कुठल्या चांगल्या कामाला आपली अक्कल हुशारी दाखवुन हिणवणे हे चुकीचे आहे.

माझ्या प्रतिसादात कुठे कोणाला हिणवले आहे? (हिणवण्यासाठी मला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, हिणवायचे असेल तर मी ते थेटच करतो.)

आपण जगातील सर्व ज्ञान कोळून प्यायलो आहे व प्रत्येक समस्येचे उत्तर व उकल आपल्याकडे आहे ह्या समजुतीत शब्दछल करत रहाणे यामुळे मराठी आंतरजाल प्रचंड प्रकाशीत आहे.

अनावश्यक टिप्पणी. प्रसार करु नये, धागा काढु नये असे लिहलेलेच नाही. थंडपणाने प्रतिसाद वाचलेत तर मुद्दे लक्षात येतील असे वाटते. असो.

कुंदन's picture

28 Mar 2011 - 2:47 pm | कुंदन

>>नाईल तु सर्वात श्रेष्ठ महात्मा आहेस
+११

नितिन थत्ते's picture

28 Mar 2011 - 4:34 pm | नितिन थत्ते

१. लाईट बंद ठेवा हो... पण मेणबत्त्या जाळू नका.
एक मेणबत्ती पेटवण्या ऐवजी झिरोचा बल्ब विजेवरच जाळा. अन्यथा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भरच पडेल. आणि रोगापेक्षा उपाय भरंकर ठरेल. :(

२ अ. अर्थ अवर पाळण्याचा फॉलोअप एरवी ऊर्जेचा अपव्यय करण्याचे टाळून करा. कारने जायच्या ऐवजी स्कूटरने जा, स्कूटरने जायच्या ऐवजी सायकलने जा, सायकलने जायच्या ऐवजी चालत जा.

२ ब. जिममध्ये ट्रेडमिलवर चालायच्या ऐवजी बाहेर चाला. ब्यायामाच्या सायकलला डायनॅमो बसवून थोडी वीज निर्मिती करा.

अवांतर: समजा एखादा जनरेटर १ किलो वॅटचा असेल तो फुल लोडला सुमारे ३ किलोवॅट (औश्णिक) ऊर्जा खर्च करतो. तो बंद न करता (कारण वीज केंद्रातील जनरेटर बंद करणे शक्य नसते) त्यावरचे लोड बंद केले तर तो ३००-४०० वॅट ऊर्जा तरीही जाळत राहील. आणि ही ऊर्जा अर्थ अवरच्या नावाखाली केवळ वाया घालवलेली असेल (शून्य आउटपुट घेऊन) .

कुंदन's picture

28 Mar 2011 - 4:54 pm | कुंदन

व्वा चाचा !!!
अंमळ उशिरा आलात.

सहज तुला साधेच पाणी देतो.
नायल्या तु काय थंड घेणार की गरम ? नाय दोन्ही साठी सारखीच वीज लागते म्हणुन म्हटले.

कंजुषी नको, काढा ते विस्कीची बाटली काढा. सहजकाकांना फारच चिंता असेल तर बॉट्म्स अप घेउ, नाहीतर ऑन द रॉक्स आपल्याला चालेल.

थत्तेचाचांशी फुल्टु सहमत.