अर्थ अवर
In reply to वीजबचत? by प्रमोद देव
In reply to वीजबचत? by प्रमोद देव
In reply to देवसाहेब, by मराठमोळा
In reply to मुद्दे मान्य आहेत. by प्रमोद देव
In reply to सुंदर माहिती ... by छोटा डॉन
In reply to सुंदर माहिती ... by छोटा डॉन

In reply to आजच सकाळ by परिकथेतील राजकुमार
In reply to लेख by नंदन
In reply to छान माहिती by प्राजु
In reply to कोण कोण? by देवदत्त

In reply to आठवण करुन देत आहे by सहज
In reply to आठवण करुन देत आहे by सहज
In reply to तात्विक विरोध by राजेश घासकडवी
In reply to तात्विक विरोध by राजेश घासकडवी
In reply to बरं by सहज
सर्वप्रथम तुम्ही अर्थ अवर २०११ मधे सहभागी होता का? नसल्यास का नाही? असल्यास अभिनंदन, तुमचे म्हणजे 'अजुन' गंभीरपणे घेउ.माझा तात्विक विरोध असल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. थोडक्यात, मी आत्तापर्यंत जी काटकसर केलेली आहे, ती सर्वसाधारण अमेरिकनांच्या मानाने इतकी प्रचंड आहे, की मला असल्या प्रकाराची जाणीव करून घ्यायची गरज नाही असं वाटतं. मात्र विरोधकांची मतं गंभीरपणे घ्यायची नाही, किंवा आपल्याशी सहमत असलेल्यांचीच मतं 'अजुन' गंभीरपणे घ्यायची असं तुमचं धोरण असेल तर पुढे चर्चा करावी का याबाबत मला विचार करावा लागेल. तुमच्या सद्हेतुबद्दल माझी खात्री पटली तर मी माझी कारणं खोलात जाऊन सांगेन.
इ इ आठवण जाग्या होउन अंमळ हळवे होता येते.पण त्यासाठी अर्थ अवरची गरज नाही. लोडशेडिंगमुळे भारतात अनेक वेळा त्या अनुभवाचा लुत्फ लुटता येत असावा. इतरत्र केव्हाही दिवे बंद करता येतात.
आधी त्यानी दंगा केला, मी नाही. मला दंगा करायला चान्स कमी मिळाला. जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने... वगैरे बालीश कारणे गुर्जींनी दिल्यामुळे ड्वोळे पाणाव्ले!दंगा? हाच शब्द सापडला तुम्हाला? ऊर्जा वापर हा दंग्यासाठीच नसतो. कारखाने चालवून, उत्पादन करून त्या जीवनावश्यक वस्तूंचा वापर करणं असतं. जेव्हा ही ऊर्जा वापरण्याचं स्वातंत्र्य हिरावलं जातं तेव्हा भारतासारख्या अनेक देशातल्या प्रत्येकाला गुलाम करून, त्यांना उत्पादनाला बंदी करून त्यांच्यावर आपली उत्पादनं लादून कोट्यवधी लोकांचं कित्येक दशकांसाठीचं पद्धतशीर खच्चीकरण येतं.... इंग्लंडने भारताबरोबर जे केलं त्याला दंगा म्हणत असाल, तर आर्थिक बलात्कार म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नाही असंच म्हणावं लागेल. या बलात्कारामुळे कोट्यवधी लोक तडफडून मेले, अनेक दशकोटी लोकांची आयुष्य गरीबीत खितपत पडली. पाश्चात्य समाजाने पर्यावरणाचा नाश केला, त्याचबरोबर सध्या ज्याला थर्ड वर्ल्ड कंट्रीज असं प्रेमाने संबोधलं जातं त्यांना तिथे कुजवत ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. आता हे सगळं विसरून 'ही पृथ्वी आपल्या सर्वांचीच आहे, तिची काळजी घेण्याची सगळ्यांचीच जबाबदारी आहे' असं म्हणणं शहाजोगपणाचं वाटतं. भारतातल्या लोकांनी हे ऐकून घेण्याची गरज नाही. पाश्चात्यांनी 'आम्ही पृथ्वीची वाट लावली, आम्ही तिची दुरुस्ती करू' असं म्हटलं पाहिजे. बालिश या शब्दाबद्दल बोलतही नाही.
In reply to दंगा???? by राजेश घासकडवी
In reply to वाटलेच by सहज
In reply to वाटलेच by सहज
In reply to सहज नव्हे, मुद्दामच ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पुन्हा तेच by सहज
In reply to वाटलेच by सहज
In reply to अभिज्ञ यांचा सल्ला मानून by राजेश घासकडवी
In reply to पुन्हा कै च्या कैच by सहज
मागील / गत/ घडलेल्या आकडेवारी वरुन कोट्यावधीची हानी तुम्ही दाखवु शकाल पण उद्या ते होईल कशावरुन? भारत सरकार, खुद्द भारतीय अनेक प्रकल्प करीत आहेत ज्याने ही हानी भरुन येईल.खालच्या दुव्यावरचे आलेख पहा. सरकारने प्रयत्न केले तरी हा प्रश्न प्रचंड मोठा आहे. तो सोडवण्यासाठी प्रचंड यंत्रणा हवी. ती चालवण्यासाठी ऊर्जा हवी.
रोगराईवर एक लस देउन काम भागू शकतेमग भारतात इन्फंट मॉर्टॅलिटी दर हजार जन्मांमागे ५० आहे, अमेरिकेत तो ६.८ आहे - हे लशी टोचून का? श्रीमंती, संपन्नता यातून आरोग्य येतं. त्यासाठी उत्पादन वाढवावं लागतं, त्यासाठी ऊर्जा जाळावी लागते. आधी ही मॉर्टॅलिटी दहाच्या खाली आणू मग ऊर्जा वाचवू. नाहीतरी आपण अमेरिकेच्या एक पंधरांश ऊर्जाच वापरतो दरडोई. एवढा साधा मुद्दा आहे.
साडेआठ ते साडेनउ यावेळात जेवण, एखादी टिव्ही सिरीयल बघत असेल तर त्यांनी दिवा, टिव्ही बंद ठेवल्यानेटीव्ही, दिव्याला फार ऊर्जा नाही हो लागत. पोलादाचे, अल्युमिनमचे प्लॅंट्स यांना लागते. फर्टिलायझर्स, ट्रॅक्टर्स, आणि इतर इंडस्ट्रीसाठी लागते. दळणवळणासाठी लागते. भलीथोरली घरं उबदार किंवा थंड ठेवायला लागते.
कोट्यावधी बळींपैकी किती लोक २६ मार्चच्या अर्थ अवर मधे व मुळे गेलीपुन्हा इथे त्या तासातली ऊर्जा व ऊर्जा वाचवण्याचा संदेश यात गोंधळ होतो आहे. दर हजार जन्मांमागे पन्नास बालमृत्यू - पुढच्या वीस वर्षांसाठी इंटिग्रेट करा. किती कोटी येतील ते सांगा. हे थांबवायचं तर ऊर्जा वापरलीच पाहिजे.
बाकी कोण कशाला बांधील आहे हे दिसते आहे. कोणाचे कमीटमेंट किती आहे हेही ह्या निमीत्ताने दिसत आहे.कृपया बांधीलकीची भाषा करू नका. हे व्यक्तिगत होण्याच्या जवळ चाललेलं आहे. मी माझ्या तत्वांना बांधील आहे.
कोती व स्वार्थी मनोवृत्ती भारताबाहेर जितकी जाईल व राहील तितके भारताचे भविष्य उज्ज्वल आहे हे ही या निमित्ताने दिसून आलेशेवटचा परिच्छेद फारच व्यक्तिगत होत चालला आहे. तेव्हा हा संवाद माझ्यातर्फे इथेच थांबवतो.
In reply to शेवटचा प्रतिसाद by राजेश घासकडवी
In reply to दंगा???? by राजेश घासकडवी
In reply to >>भारतातल्या लोकांनी हे ऐकून by नगरीनिरंजन
सद्य परिस्थितीवरून तर असं वाटतंय की अजून १०-२० वर्षांमध्ये भारतातील मध्यमवर्गीय लोकांची क्रयशक्ती अमेरिकेच्या तोडीची होऊन वस्तूंचा वापर त्याच पातळीला पोचू शकतो.याबद्दलचा संदर्भ द्यावा. भारताचं जीडीपी १.३ ट्रिलियन डॉलर. अमेरिकेचं जीडीपी १४.१ ट्रिलियन डॉलर. भारताची लोकसंख्या अमरिकेच्या साडेतीन पट. पर कॅपिटामध्ये ३० पटीचा फरक. १०-२० वर्षाचं गणित काही जुळत नाही.
In reply to सद्य परिस्थितीवरून तर असं by राजेश घासकडवी
In reply to तात्विक विरोध by राजेश घासकडवी
In reply to साफ असहमत by रमताराम
In reply to व्हयं म्हाराज्या ... by छोटा डॉन
In reply to मुंबई तुमची औद्योगीक राजधानी by Nile
In reply to एक मिनिट ... by छोटा डॉन
In reply to वा वा.. तुमची नैतिकता पाहुन by Nile
देशाचं उत्पन्न बोंबलंल अनं उद्योगधंदे बंद पडले तर कारखान्याच्या कामरांच्या पोरांची पोटं तुमच्या नैतिकतेने भरणार आहेत का?=)) =)) =)) भरु भरु, अहो आम्ही वेळ पडली तर नैतिकतेने आमची पोटं भरु ;) बाकी ह्यावरुन तुमचे ह्या १ तासाचा काळात" अणु-उर्जाकेंद्राच्या चिलिंग टॉवर्सचा वीजपुरवठा बंद केला जातो, विमानतळावरच्या नेव्हिगेशन आणि कंट्रोल टॉवर्समधले कामकाम विजेअभावी बंद असते, राष्ट्रपती भवन आणि इतर अनेक महत्वाच्या ठिकाणाचे सीसीटिव्ही सर्व्हेलन्स बंद असते, हॉस्पिटलात ईमर्जन्सी वॉर्ड १ तासासाठी देवाच्या भरोश्यावर असतो" असे तर गैरसमज नाहीत ना ? अहो १ तास उर्जा वाचवा म्हणजे सगळे सरसकट बंद करुन बसा असा नव्हे, योग्य अर्थ तरी समजुन घ्या की राव ;) शेवटी कसे आहे की हे 'ऐच्छिक' आहे, म्हणजे कसे की ज्याला ज्याला जे जे पटते त्याने त्याने त्या त्या प्रकारे ते ते करावे, ओके ? - छोटा डॉन
In reply to वा वा.. तुमची नैतिकता पाहुन by Nile
In reply to एक प्रश्न by सहज
समजा हे रेस्टॉरंट ज्या इमारती मधे आहे त्यावरील मोठ्या गरज नसलेल्या काही निऑन साईन्स बंद झाल्या तर नक्की भारतीय अर्थव्यवस्था कशी ढासळेल?गरज नसलेल्या निऑन साईन्स त्यांनी लावल्याच कशा? त्या वर्षभरच बंद कराव्यात. आम्ही गरज नसलेला दिवा मिनिटभरसुद्धा चालु ठेवत नाही. रेस्टॉरंट एक धंदा आहे, त्यात नफा तोटा आहे. तोट्यामध्ये खर्चाचे गणित धरलेले असते. खर्चामध्ये मार्केटींग, गिर्हाइकं कशी मिळवावी याचा हिशेब असतो. त्यामुळे अनावश्यक दिवे लावुन धंदे करतात कसे हा मुळ प्रश्न आहे. त्यांना तासभर वीज वाचवुन काही फरक पडणार नाहीए. पण रेस्टॉरंटने अर्थ अवर पाळुन, तशी जाहीरात करुन वीज बजतीच्या अवेअरनेसचे प्रयत्न केले तर ते स्तुत्यच असतील.
का केवळ वाद घालायचा म्हणून नको त्या भिती दाखवून उर्जाबचत टाळायची?मुद्दा लक्षात घेतलात तर केवळ वाद घालत नसुन आमच्याकडे मुद्दे आहेत हे ध्यानात येइलच. पाश्चात्य देशात गरजेपेक्षा जास्त उर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. त्याचा ते पुरेपुर वापर करुन उर्जा निरर्थक वाया घालवतात.भारतात किती लोकांना गरजे इतकी उर्जा उपलब्ध आहे? वर्षात एकही दिवस लोड शेडिंग न अनुभवणारे कीती लोक आहेत इथे? म्हणजे मुळात हवी इतकी उर्जा मिळत नसताना, अरे उर्जा उधळु नका हा संदेश भारताला गरजेचा नाही हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मॅरेथॉन इ. अवेअरनेस प्रोग्रॅम्स मध्ये तुम्ही रस्त्यावर पळता, रस्त्यावर पळण्यार्यांचे फोटो पेप्रात बातम्यांत येतात. म्हणजे याचा प्रचार होतो. असा प्रचार करण्यास काहीच हरकत नाही. असा अर्थ अवर वैयक्तिक पातळीवर पाळुन हा प्रचार साध्य होतंच नाही. त्यात तुम्ही नेहमी काटकसरीने वागणारे असाल, किंवा गरजे इतकी उर्जाच न मिळणारे असाल तर त्यात काहीच हशील नाही हा मुद्दा आहे. अर्थ अवरचा उद्देश वीज वाचवा असा व्यापक संदेश देणे आहे, ह्या तासातच वीज बंद ठेवा असा संकुचित नाही. जिथे प्यायला पाणी नाही तिथे पाणी जपुन वापरा संदेश देण्याची आवश्यकता नसते असे वाटते.
In reply to समजा हे रेस्टॉरंट ज्या इमारती by Nile
In reply to चला by सहज
मी तर म्हणतो की पुणे, मुंबई, बंगरुळ, दिल्ली सारख्या शहरांना 'रट्टे देऊन' अर्थ अवर पाळायला सांगावे व त्यात वाचलेली उर्जा ही ग्रामिण भागाकडे वळवुन तिथले शेतपंप चालवावेत. बरं का, हे खरेखुरे प्रोडक्टिव्ह होईल.
In reply to कृपया by Nile
In reply to अवघड आहे by सहज
In reply to खरंच? उद्योगधंद्यांने by Nile
In reply to पुन्हा by सहज
In reply to व्हयं म्हाराज्या ... by छोटा डॉन
In reply to डॉन, रमताराम आणि मी स्वतः यांना काही प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
समजा आपल्याकडे पुरेशी ऊर्जा आहे आणि वसुंधरेसाठी आपण एक तासभर वीज वापरली नाही तर त्या वीजेचं नक्की काय होणार? तासाभरापुरती ऊर्जानिर्मिती कमी करता येईल काय? त्याचा खर्च काय होईल? आणि समजा असं करता येत नसेल तर तयार होणार्या वीजेचं काय करायचं?ते आपण उर्जा कशापासुन मिळवतो त्यावर डिपेंड आहे. म्हणजे कसे की आपल्या कर्तुत्वाने आपला देश आपल्याला लागणारी १००% उर्जा ही सुर्या / वारा / टायडल एनर्जी पासुन मिळवतो तर आपल्याला हा 'अर्थ अवर' पाळण्याची गरज नाही. पण आपण समजा कोळसा जाळुन, डिझेल जाळुन, अणु-उर्जा वापरुन हे मिळवत असु तर विचार कराल की नाही ? १ तासात वाचलेल्या विजेमुळे वाचलेला कोळसा किंवा डिझेल ह्याचा विदा तुर्तास माझ्याकडे नाही पण बिलिव्ह मी ते दखलघेण्यायोग्य नक्कीच असेल. बाकी काही जणांचा आक्षेप असा आहे की उर्जा साठवुन ठेवता येत नाही मग ती कशी वाचेल. सोप्पं आहे, मागणी आणि पुरवठा ह्यांचे जे हार्मोनायझिंग आहे ना त्या कामात ह्या '१ तासात वाचलेल्या उर्जेमुळे' पुरेसा 'बफर फॅक्टर' मिळेल. हे बहुतेक फायदेशीरच नाही का ?
झगमगाट, नीऑन साईन्स इत्यादींवर जी ऊर्जा जळते त्याचं बिल आपल्या घरात येणार्या बिलापेक्षा बरंच जास्त असतं.२ गोष्टी आहेत : १. मी ह्या प्रश्नाकडे 'बिझीनेस' म्हणुन पहात नाही व म्हणुन मी 'रेट्स'ची काळजी करत नाही २. मला 'निकड' ही जास्त महत्वाची वाटते, न्युऑन साईन्स जरी मला कितीही पैसा मिळवुन देणार असतील तरी उपयुक्ततेच्या बाबतीत माझा ह्या न्युऑन साईन्सना नेहमीच दुय्यम प्रेफरंस असेल. कारण तेच, मी नैतिक मुद्दे बघतो, बिझीनेस नव्हे. ( बाकी हा मुद्दा माझ्या दृष्टीने इथे विसंगत आहे, आपण इथे 'उर्जा वाचवण्याचे' बोलतो आहे न की 'पैसे वाचवणे', असो. ) स्वगत : च्यायला तिकडे १ तासात जेवढी उर्जा मी वाचवली होती ती इथे फुकट टंकण्यात वाया जातेय का काय अशी भिती वाटत आहे ;) - छोटा डॉन
In reply to वर उत्तर दिले आहेच ... by छोटा डॉन
सोप्पं आहे, मागणी आणि पुरवठा ह्यांचे जे हार्मोनायझिंग आहे ना त्या कामात ह्या '१ तासात वाचलेल्या उर्जेमुळे' पुरेसा 'बफर फॅक्टर' मिळेल. हे बहुतेक फायदेशीरच नाही का ?असहमत. १ तासात वाचवलेली वीज म्हणजे १/२४*३६५=०.०१४१% म्हणजे काहीच नाही.
In reply to सोप्पं आहे, मागणी आणि पुरवठा by Nile
In reply to ओके ... by छोटा डॉन
असो, आम्हीही उगाच एक आकडेवारी देतो, तुमच्याइतकी परफेक्ट नाय बरं का पण भारताच्या एकुण उर्जा उत्पादनापैकी आपण ५३% उर्जा कोळश्यापासुन, ८% उर्जा नैसर्गिक वायुपासुन आणि ३१% उर्जा ही तेलापासुन मिळवतो. आणि बरं का, हे जे सोर्सेस आहेत ना ते एक ना एक दिवस संपणार आहेत, बघा बॉ आता तुम्हीचहो का, बरं मग असं करा जंगलात जाउन रहा. ह्या कोळसा, वीज वापरुन केलेले कपडे, खाद्य वगैरे वापरु नका. झाडाच्या साली वगैरे वापरा. म्हणजे हे सगळ एका माणसाचं का होईना वाचेल, आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे इटस नॉट अॅज स्मॉल अॅज यु कॅन कन्सिल इन बिकिनी नाही का?
In reply to असो, आम्हीही उगाच एक आकडेवारी by Nile
In reply to सल्ल्यासाठी आभार ... by छोटा डॉन
In reply to डिनर by विनायक प्रभू
In reply to माझे मत. by Nile
In reply to +१ by सहज
नाईल तु सर्वात श्रेष्ठ महात्मा आहेसधन्यवाद, पण मी नाहीए.
एकाच वेळी आपले प्राणांचे मोल देउन स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या स्वातंत्र्य दिले म्हणून त्यांचे आभार मानतो व आपण आपल्या समाजासाठी, पृथ्वी साठी काही करायची वेळ आली की मी अमुक तमुक नेहमीच करतो त्यामुळे मला अमुक तमूक मधून सुटका मिळावी हे कारण देतो.मी सुटका मागितलीच नाही. मुळात मला कोणी बंधनात घातलेलंच नाही. मी नेहमीच काटकसर करतो त्यामुळे ह्या एक तास मी पाळला नाही म्हणजे मी पृथ्वीसाठी काही केलं नाही असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. (मी बचत कशी करतो असे मी इथेही अनेकदा इतर धाग्यांवर लिहलेलं आहे)
पण कुठल्या चांगल्या कामाला आपली अक्कल हुशारी दाखवुन हिणवणे हे चुकीचे आहे.माझ्या प्रतिसादात कुठे कोणाला हिणवले आहे? (हिणवण्यासाठी मला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, हिणवायचे असेल तर मी ते थेटच करतो.)
आपण जगातील सर्व ज्ञान कोळून प्यायलो आहे व प्रत्येक समस्येचे उत्तर व उकल आपल्याकडे आहे ह्या समजुतीत शब्दछल करत रहाणे यामुळे मराठी आंतरजाल प्रचंड प्रकाशीत आहे.अनावश्यक टिप्पणी. प्रसार करु नये, धागा काढु नये असे लिहलेलेच नाही. थंडपणाने प्रतिसाद वाचलेत तर मुद्दे लक्षात येतील असे वाटते. असो.
In reply to +१ by सहज
In reply to बापरे by नितिन थत्ते
In reply to व्वा चाचा by कुंदन
In reply to बापरे by नितिन थत्ते
वीजबचत?