लिहून काय साधले

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
20 Mar 2009 - 3:44 pm

आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल  जगून काय साधले लिहून काय साधले विचारतोस केशवा(निदान तू तरी असे म्हणू नकोस "केशवा")जरा कुठे लिहायला तजेलदार लागलेधुण्यापरी तरी  कशास बडवतोस केशवाअरे मला विचार ना, तिनेच बोंब मारलीपुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवाअजून वाटते नवल कशी असेल ती बयास्मरून जीस तू असा थरारतोस केशवानको अम्हास हे तुझे लिखाण रोज कोडगेअता हवा तुझ्यावरी उपाय ठोस केशवासुमार लेखकाहुनी सुमार वाटतोस तूनवी उमेद ही कुठून आणतोस केशवाकटेल का खरेच ह्या स्थळावरील ब्याद हीकिती अजून द्यायचे कळे न  ढोस केशवा

विडंबन

प्रतिक्रिया

कवटी's picture

20 Mar 2009 - 5:35 pm | कवटी

नवी उमेद ही कुठून आणतोस केशवा
सुंदर... उत्कृष्ठ झालय....
लगे रहो.

कवटी

घाटावरचे भट's picture

20 Mar 2009 - 9:56 pm | घाटावरचे भट

लै भारी...

चतुरंग's picture

20 Mar 2009 - 10:11 pm | चतुरंग

अरे मला विचार ना, तिनेच बोंब मारली
पुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवा

अजून वाटते नवल कशी असेल ती बया
स्मरून जीस तू असा थरारतोस केशवा

मस्तच! :)

चतुरंग

केशवसुमार's picture

21 Mar 2009 - 11:53 am | केशवसुमार

लिहून काही साधले नाही हे सांगणार्‍याचे आणि प्रतिसाद देणारांचे मनापासून आभार..
(आभारी)केशवसुमार.

भडकमकर मास्तर's picture

21 Mar 2009 - 2:26 pm | भडकमकर मास्तर

मस्त आहे.

मजा आली...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

यशोधरा's picture

21 Mar 2009 - 2:29 pm | यशोधरा

आवडले विडंबन. मूळ गझल ही अतिशय सुरेख आहे.