वय

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
18 Mar 2009 - 8:19 pm

खास माझ्या लेकींसाठी लिहिलेली कविता.

वय तुझे फुलण्याचे, वार्‍यासंगे बोलण्याचे
इवल्याशा पंखांवर आसमंत पेलण्याचे

आपल्याच सुरांमध्ये गात आपलीच गाणी
आपल्याच रचनेच्या सौंदर्याला भाळण्याचे

कधी खुळ्या वसंताचे, कधी दाहक ग्रीष्माचे
आग पिऊन सूर्याची, चंद्रबिंब माळण्याचे

वय तुझे भुलण्याचे, अधांतरी चालण्याचे
मनाच्या धुंदीत नव्या तालावर डोलण्याचे

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे

तुझी स्वप्ने जपताना ज्यांचे वय ओसरले,
त्यांनी भाग्य दिले तुला हिरेमोती तोलण्याचे

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

सँडी's picture

18 Mar 2009 - 8:25 pm | सँडी

सुंदर!
अप्रतिम!

वय तुझे भुलण्याचे, अधांतरी चालण्याचे
मनाच्या धुंदीत नव्या तालावर डोलण्याचे

क्रांतितै एकदम स्फुर्तीदायक काव्य!

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे

वा वा!

धनंजय's picture

18 Mar 2009 - 8:31 pm | धनंजय

तुमची लेक भाग्याची आहे.

बेसनलाडू's picture

19 Mar 2009 - 1:46 am | बेसनलाडू

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे

हे फार आवडले; महत्त्वाचे वाटले.
(सहमत)बेसनलाडू

प्राजु's picture

18 Mar 2009 - 9:10 pm | प्राजु

एक अतिशय तरल कविता/गझल.

कधी खुळ्या वसंताचे, कधी दाहक ग्रीष्माचे
आग पिऊन सूर्याची, चंद्रबिंब माळण्याचे

हा शेर या कवितेचा अत्युच्च बिंदू आहे.

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे

अतिशय आशादायक, स्फूर्तीदायक आहे हा शेर.

दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे.. हेच आठवलं

आवांतर - बाय द वे लेक टिन एजर झाली का?

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी's picture

19 Mar 2009 - 1:57 am | लवंगी

आईने आपल्या तारुण्यात पदार्पण करणार्या लेकिस किती योग्य सल्ला दिलाय. माझ्या पिटूकलीसाठि जपून ठेवेन हि कविता.

मदनबाण's picture

19 Mar 2009 - 4:40 am | मदनबाण

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे
सह्ह्ह्ही... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

अनिल हटेला's picture

19 Mar 2009 - 9:33 am | अनिल हटेला

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे

सह्ही !!
असेच म्हणतो !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दिपक's picture

19 Mar 2009 - 2:31 pm | दिपक

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे

सह्हीच! :)

जागु's picture

19 Mar 2009 - 2:42 pm | जागु

खुपच छान.

क्रान्ति's picture

19 Mar 2009 - 10:00 pm | क्रान्ति

इतक्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अविनाशकुलकर्णी's picture

19 Mar 2009 - 10:22 pm | अविनाशकुलकर्णी

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे

खुप छान

अवलिया's picture

19 Mar 2009 - 10:23 pm | अवलिया

वा ! मस्तच... :)

--अवलिया