आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
17 Mar 2009 - 6:39 pm

आई-बापच लेकरु
पंख फुट्ल पाखरु
दूर उडुनिया गेल
संगे काळीजही नेल

बाळ होता इवलासा
केला जीवाचा हिंदोळा
पापणीच्या पंखावर
त्यांनी बाळाला ठेवला

त्याची गरुडाची झेप
जग कवेमध्ये आल
कसा विसरला बाळा
बळ पंखाना दिलेल

घार हिंड्ते आकाशी
लक्ष्य तिचे पिलापाशी
पिलु उड्ता आकाशी
घार एकटी घराशी

दिसु लागे पैलतीर
पिलु दुरच्या आकाशी
वाट पाहते नजर
घोर लागला जीवासी

कारे उमजेना बाळा
वेडी माया माउलीची
पिलु तुलाही होउदे
ओढ कळेल आईची

हाती नक्षत्र धराव
मागे परत फिराव
माउलीच्या चोचीतल
दांण प्रेमाने टिपाव

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

17 Mar 2009 - 6:49 pm | विसुनाना

कविता अत्यंत सुंदर आहे.

पुष्कराज, तुम्ही प्रकाशित करत असलेल्या सर्वच कविता भाव आणि शब्द दोन्ही बाबतीत उत्कृष्ट आहेत.
या सर्व कविता तुमच्याच आहेत ना? या शंकेबद्दल राग मानू नये.
तसे असेल तर अशी शंका यावी हेच या कवीचे यश आहे.
बहिणाबाईंच्या कवितांची आठवण करून देण्याची ताकद या कवितांमध्ये आहे.

पुष्कराज's picture

18 Mar 2009 - 6:44 pm | पुष्कराज

प्रिय वासुनाना
मी मिपावर लिहलेल्या सर्व कविता माझ्याच आहेत्.असच प्रेम राहुदे,म्हण्जे आधिक काही चांगल लिहिन

लिखाळ's picture

17 Mar 2009 - 8:11 pm | लिखाळ

वा.. कविता छान आहे, आवडली.

धराव
फिराव
चोचीतल
टिपाव
या सारख्या शब्दांमध्ये अनुस्वार देऊन धरावं, फिरावं, टिपावं असे केले तर वाचताना सोईचे जाईल.
शब्दांमध्ये अश्या तर्‍हेने अनुस्वार असणे गरजेचे वाटते कारण मूळ धरावे, टिपावे, चोचितले या शब्दाचा बोलीभाषेतील बदल म्हणून धरावं, टिपावं, चोचितलं असा शब्द बनतो अशी माझी कल्पना.

-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

17 Mar 2009 - 8:19 pm | विनायक प्रभू

कविता बॉ.
साधी,सरळ सोपी*

क्रान्ति's picture

17 Mar 2009 - 8:38 pm | क्रान्ति

हाती नक्षत्र धराव
मागे परत फिराव
माउलीच्या चोचीतल
दाणं प्रेमानं टिपावं
खूपच खास! खूप खूप मनापासून आवडली कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

मराठमोळा's picture

17 Mar 2009 - 8:42 pm | मराठमोळा

चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली..

गरुड होऊन आकाशात
जेव्हा भरारी मारत असशील
पृथ्वीवर दोन आतुर डोळे
जग विसरुन पाहत असतील.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

प्राजु's picture

18 Mar 2009 - 1:42 am | प्राजु

चिठ्ठी आयी है.. या गाण्यानं नेहमीच डोळे पाणवतात.. तसंच काहीसं झालं.
खूप आवडली कविता.
विसुनाना म्हणतात त्याप्रमाणे बहिणाबाईंच्या लेखणीची ताकद काही प्रमाणात आपल्या लेखणीत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

18 Mar 2009 - 3:37 am | शितल

कविता आवडली.. :)

वेलदोडा's picture

18 Mar 2009 - 7:15 am | वेलदोडा

खूप सुंदर कविता. आवडली.

अनिल हटेला's picture

18 Mar 2009 - 7:37 am | अनिल हटेला

हाती नक्षत्र धराव
मागे परत फिराव
माउलीच्या चोचीतल
दांण प्रेमाने टिपाव

नकळत डोळे पाणावले !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण's picture

18 Mar 2009 - 8:05 am | मदनबाण

कारे उमजेना बाळा
वेडी माया माउलीची
पिलु तुलाही होउदे
ओढ कळेल आईची
मस्तच...

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

राघव's picture

18 Mar 2009 - 10:38 am | राघव

छान लिहिलंय :)

राघव

दत्ता काळे's picture

18 Mar 2009 - 10:40 am | दत्ता काळे

कविता फार आवडली

जागु's picture

18 Mar 2009 - 10:46 am | जागु

कारे उमजेना बाळा
वेडी माया माउलीची
पिलु तुलाही होउदे
ओढ कळेल आईची

खरे आहे. खुप छान

अविनाशकुलकर्णी's picture

18 Mar 2009 - 11:05 am | अविनाशकुलकर्णी

खुप छान कविता..भावली

अवलिया's picture

18 Mar 2009 - 11:07 am | अवलिया

मस्त आवडली... :)

--अवलिया

नितिन थत्ते's picture

18 Mar 2009 - 11:32 am | नितिन थत्ते

हेच म्हणतो
खराटा
(रंग माझा वेगळा)

नितिन थत्ते's picture

18 Mar 2009 - 2:40 pm | नितिन थत्ते

कविता चान आहे.
अवांतरः टंकन पाहून कवि सुरेश्चन्द्रा जोशि दोम्बिव्ली यांची आठवण झाली (मोकलाया दाहि दिशा)

खराटा
(रंग माझा वेगळा)

पुष्कराज's picture

18 Mar 2009 - 6:50 pm | पुष्कराज

सर्वांना धन्यवाद

चैत्राली's picture

19 Mar 2009 - 2:17 pm | चैत्राली

इ॑ग्रजीत काय ते 'स्पिचलेस' म्हणतात ना तशी आहे कविता.

सँडी's picture

19 Mar 2009 - 3:46 pm | सँडी

खुपचा छान!
शब्दभंबाळ केलतं तुम्ही मनाला.
श्वास घ्यायलाच सुद्धा विसरलो क्षणभर!

तुमच्या इतर कविता वाचायलाच हव्या.