पार्थीव

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
12 Mar 2009 - 1:35 pm

येते एक बांग मशिदीतून
चीरुन शांतीचा पडदा..
अन देवूळी, गोड भुपाळी
दंग उठविण्या दगडा...!!

अन इथे...
परि माणुसकीचे पार्थिव येथे
पडले हो बेवारस...
कुत्रे एक परि,करुनी तंगडी वरी
मुतले त्यावरी, फस..फस..!

पंचम्रुतं स्नानं करिश्ये...

पुरोहितांचा मंत्र गजर
देवळातल्या मुर्ती वरती
दह्या दुधाची संतत धार..

इथे..

घोंगवती प्रेतावरती
असंख्य माशा किती
अंग चोरुनी उभी माणसे.
दुरुनच जरा बघती...

तुळशी हार गळा
कासे पितांबर
आवडे निरंतर
हेची ध्यान..
मंदिरात चाले
किर्तन...

आली आली पोलीसाची,
गाडी आली कुठुन
करुनी पंचनामा, माणुसकीचा
नेले प्रेता उचलुन...!!

मंदिरातले संत शिरोमणी
गाती अम्रुत वाणी..
ॐ सर्वे भवन्तु सुखीना:
सर्वे सन्तु निरामया:.....

दिवस संपला त्याचा माझा
अन देवळातल्या देवाचाही....!!
ॐ शांती : शाती: शांती:

मुक्तकप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सँडी's picture

12 Mar 2009 - 1:41 pm | सँडी

अप्रतिम!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2009 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार

ज ह ब ह र्‍या !
एकदम डोक्यात गेली कविता !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

+१

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

निखिल देशपांडे's picture

12 Mar 2009 - 1:54 pm | निखिल देशपांडे

डोक्यात गेलि असेच म्हणतो....

जयवी's picture

12 Mar 2009 - 2:45 pm | जयवी

जळजळीत वास्तव वाचताना काटा येतो अंगावर !

प्राजु's picture

12 Mar 2009 - 9:37 pm | प्राजु

जळजळीत वास्तव..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागु's picture

12 Mar 2009 - 2:46 pm | जागु

चंद्रशेखरजी तुम्ही मस्तच आहे कविता.

प्रमोद देव's picture

12 Mar 2009 - 3:28 pm | प्रमोद देव

वास्तवावर नेमके बोट ठेवलंय!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 3:51 pm | लिखाळ

दोन भिन्न घडमोडींचा मेळ चांगला जमलाय.
कविता छान !
-- लिखाळ.

शिवापा's picture

12 Mar 2009 - 4:46 pm | शिवापा

फार दिवसांनतर प्रंचड आवडलेले काहि.

चन्द्रशेखर गोखले's picture

12 Mar 2009 - 5:13 pm | चन्द्रशेखर गोखले

मिपा वरिल माझ्या२५ व्या काव्य पुष्पाला मनापासुन दिलेल्या प्रतिसादा बाद्दल धन्यवाद !! आणि तात्यांचे विशेष आभार..!!!

विकास's picture

12 Mar 2009 - 10:14 pm | विकास

कविता छानच आहे!

एकदम भेदक वास्तव..

बेसनलाडू's picture

12 Mar 2009 - 11:02 pm | बेसनलाडू

(अस्वस्थ)बेसनलाडू

पक्या's picture

13 Mar 2009 - 1:50 am | पक्या

>>जळजळीत वास्तव
हेच म्हणतो.
२५ व्या काव्यपुष्पाबद्द्ल अभिनंदन आणि पुढील लेखनास शुभेच्छा !