अक्ष्रर ओळख

कालिन्दि मुधोळ्कर's picture
कालिन्दि मुधोळ्कर in जे न देखे रवी...
10 Mar 2009 - 3:44 am

अ ग ड

प तं ग

स र क स

ब्रि गे डि य र

मे ज र ज न र ल

डोळ्याच्या दवाखान्यातल्या फ्रेमवरची सरसरती अक्षरे...
म्हटलं तर सुटी-सुटी, म्हटलं तर एकमेकांना जोडलेली

ध्वनी आणि शब्दांमधल्या विरामात काय असतं?
आणि कुठून सुरूवात होते अर्थाच्या ओहोळाची?

क ट
म र क ट
अ च क ट वि च क ट

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

10 Mar 2009 - 3:48 am | मुक्तसुनीत

अरुण कोलटकर यांच्या "तक्ता" कवितेची आठवण झाली. त्यातली अक्षरे एकमेकांशी देवाणघेवाण करतात ; प्रसंगी हल्लाही - अशा प्रकारची कल्पना. अर्थात , तुमच्या कवितेत "बीटविन द लाईन्स" प्रमाणे "बिटविन द सिलॅबल्स" हा प्रकार दिसतो आहे...

कालिन्दि मुधोळ्कर's picture

10 Mar 2009 - 8:13 am | कालिन्दि मुधोळ्कर

कोलटकरांची "तक्ता" भन्नाट आहे. आपल्यालाकडे ती आहे का? मला काही ओळी आठवतायत.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.