नामवंत कवी प्रवीण दवणे यांचा एक आशयगर्भ लेख

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
23 Jan 2008 - 3:18 am

बर्‍याच दिवसांपूर्वी वाचनात आला होता. फारा दिवसांनी काही कारणाने त्याची आठवण जागी झाली.
मि.पा.करांनाही त्याचा आस्वाद घेता यावा ह्या कारणाने तो लेख येथे देत आहे. आपल्यापैकी काही जणांनी हा पूर्वी वाचलाही असेल.
अक्षरे थोडी छोटी आहेत त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या संगणकावर उतरवून घेऊन वाचावे लागेल, पण आशय मोठा असल्याकारणाने तुम्ही तेवढी अडचण सोसाल अशी अपेक्षा!

समाजलेख

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

23 Jan 2008 - 11:36 am | भडकमकर मास्तर

लेख छान आहे यात वादच नाही.... येथे दिल्याबद्दल धन्यवाद...गरीबीतून मोठा झालेला माणूस श्रीमंतीचा माज कधीच करणार नाही, हे खरंय.......
(पण आजची सगळीच मुले श्रीमंत आहेत आणि त्यांना पैशाची किंमत नाही, सगळीच आजची मुले पुस्तकांचे दोन सेट वापरतात आणि त्यासाठी हट्ट धरतात ...नोटा पर्स मध्ये बाळंत होतात असे आजच्या सर्व मुलांना वाटते का??? दवणे यांचे पुष्कळ लेख आणि पुस्तके सावर रे भाग १ भाग २ वाचले आहेत...बरेचसे पूर्वग्रहदूषित असतात, असे माझे मत का बरं बनते आहे ??....त्या पुस्तकांची लोकप्रियता शिक्षक आणि पालक यांच्यात प्रचंड आहे, पण युवकांना ते एकांगी का वाटणार नाहीत?)........कदाचित हा वयाचा परिणाम असावा.... मला वाटतं की पंचेचाळीस पन्नास या वयात सर्वच पालकांना मुलांच्या वागण्यामुळे असुरक्षित वाटते, त्यात ते प्राध्यापक ..ते असली खूप मुले पाहत असणार..!!! ...
..................."आजची तरूण पिढी वाया तर जात नाहीये ना?" असे गेल्या कित्येक शतकांपासून प्रत्येक प्रौढ पिढीला वाटत आलेले आहे....त्यांच्या तरूण वयात त्यांचे प्राध्यापक असेच म्हणत असतील्...फक्त संदर्भ बदललेले असतील्......आज वर्षाला पुस्तकांचे दोन सेट वापरणारा मुलगा जेव्हा पंचेचाळीस वयाला आपल्या पोराला सांगेल, "अरे आम्ही फक्त बाईक चालवत कष्टातून कोलेज केलं आणि तुला ११ वी त कार हवी....( तेव्हा कार चालवायचे कायदेशीर वय १६ झालेल असेल, त्यावर सुद्धा तो मन लावून वाचकांच्या पत्रांमध्ये आवाज उठवेल).....मुलगा म्हणेल , "शेजारचा **** आणायला सुद्धा लागलाय कार ".....
....................आणि जर तोच दोन सेट वर्षाला वापरणारा मुलगा आज प्राध्यापकांना म्हणाला, " सर, तुमच्या काळात मास्तर कसे डेडिकेटेड होते, शाळा कोलेजात मन लावून शिकवायचे....आज आमचे आदर्श कोण? ....वगैरे...". मग याच द्रुष्टिकोनातून एक एकांगी लेख पाडायचा, की आज कसे आदर्श नाहीत, त्यामुळे तरूण वाया चालले आहेत्....सगळं पैशांवर अवलंबून झालेलं आहे वगैरे....

माझ्या मते दोन्ही लेख छान होतील, परंतु सत्य या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे.....

सहज's picture

23 Jan 2008 - 3:22 pm | सहज

>>...बरेचसे पूर्वग्रहदूषित असतात, असे माझे मत का बरं बनते आहे ??....

+१

>>परंतु सत्य या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे.....

खरय.

पिवळा डांबिस's picture

26 Jan 2008 - 11:50 am | पिवळा डांबिस

सतलज,
तुमचं अगदी बरोबर आहे. अहो पिढ्यापिढ्यांमधील मतभेद हा तर खूपच जुना विषय आहे.
असं बघा,
नऊवारी नेसणारया आजीला आईची पाचवारी खटकायची,
पाचवारी नेसणारया आईला बायकोचा पंजाबी ड्रेस् पसंत नव्हता,
पंजाबी ड्रेस मधल्या बायकोला मुली/ सुनांचे स्पाघेट्टी टॉप्स बघवत नाहीत म्हणे!!!
(च्यायला! कुठुनतरी किटकिट करून पुरुषांची काशी करुन ठेवायची!! :))

पुरुषांचे म्हणाल तर फार फरक नाही,
वडिल चाळीतून ब्लॉक मध्ये आलेले आजोबांना पसंत नव्हतं....... ("नवराबायकोला झोपायला वेगळी खोली कशाला पाहिजे? आम्ही काय संसार केले नाहीत?")
चंदूने अमेरिकेला बंगला घेतलेला वडिलांना पसंत नाही.......("तिथे जाउन बसलाय! इथे काय नोकरया मिळत नाहित? आणि इनमिन तीन माणसांना करायचाय काय तो बंगला?")
चंदू म्हणतो माझा मुलगा सायन्स घ्यायचं सोडून लिबरल आर्टस घेतोय........("मूर्ख लेकाचा! मॅक्डोनाल्डस मध्ये फ्राईज विकायची लक्षणं दिसता आहेत")

तेंव्हा अश्या लोकाचं बोलणं फार गांभिर्याने घ्यायचं नाही. संस्क्रूती ही नदीप्रमाणे पुढेच वहात असते.

आपला,
(तत्वचिंतक) पिवळा डांबिस

भडकमकर मास्तर's picture

23 Jan 2008 - 11:45 am | भडकमकर मास्तर

कोणत्याही प्रश्नासाठी राजकारण्यांना शिव्या घालणं सेफ असतं, तसं कोणत्याही प्रश्नासाठी तरूण पिढीला शिव्या घातल्या तरी चालून जातं..........

विजय आचरेकर's picture

23 Jan 2008 - 12:21 pm | विजय आचरेकर

सलग वाचनासाठी..........

http://www.loksatta.com/daily/20040222/ch04.htm

विजय आचरेकर

चतुरंग's picture

23 Jan 2008 - 7:19 pm | चतुरंग

चतुरंग

वरदा's picture

23 Jan 2008 - 8:57 pm | वरदा

सतलज यांचं म्हणणं पटलं....

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 7:29 am | विसोबा खेचर

चांगला लेख आहे..

अवांतर - दवणेसर आणि अशोक वागवे सर आम्हाला इयत्ता अकरावी आणि बारावीला शिकवायला होते..

आपला,
(दवणेसरांचा आणि बागवेसरांचा विद्यार्थी) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

25 Jan 2008 - 4:14 pm | भडकमकर मास्तर

दवणेसर कोणता विषय शिकवत असत?

विसोबा खेचर's picture

25 Jan 2008 - 4:37 pm | विसोबा खेचर

मराठी विषय शिकवायचे...

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

25 Jan 2008 - 4:30 pm | भडकमकर मास्तर

प्रकाश घाटपांडे यांच्या पूर्वीच्या लेखामधली काही वाक्ये...फ़ारच छान. इथे चपखल बसतात...

<<<<<<<<<<<<<एकेकाळची विकृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2008 - 5:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग,
प्रवीण दवणे यांचा लेख डकवल्याबद्दल आभार !!!
लेखातील विचार सहीच आहेत.

सुधीर कांदळकर's picture

28 Jan 2008 - 7:32 pm | सुधीर कांदळकर

लेख. धन्यवाद. सतलजचे म्हणने बरोबर आहे. त्याचा व्यत्यास देखील सत्य आहे. कोणत्याहि प्रश्नावरून तरूण पिढीला तसेच माग्ल्याहि पिढीला शिव्या घालता येतात.