<<रात्र थोडी जाहली पण>>

नाटक्या's picture
नाटक्या in जे न देखे रवी...
4 Mar 2009 - 12:37 am

पुष्कराज यांनी केलेल्या "रात्र थोडी जाहली पण" याचे विडंबन.

पुष्कराज: ह. घ्या.

कोण म्हणतो रात्र झाली
आत्ताच आमुच्या पिण्याची
आत्ता कुठे सुरवात झाली
फिरुनी पुन्हा या चाकण्याची

नुकतीच वाटी सारी सरुनी
चाकण्याला केळी आली
कहर पुन्हा झाला असा की
जेवण्याची वेळ झाली

दारूस माझ्या आजवरी मी
गाली कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या सूराचा
नशा आजही राहीली

त्याच नशेने अजुनी
पिण्याला बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
सोंगे बाकी फार आहे

- नाटक्या

गैरसमज नको माझ वय फक्त ८५ आहे

कविताविडंबन

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

4 Mar 2009 - 10:14 am | पाषाणभेद

पुन्हा एकदा प्र. के. अत्रेंची आठवण झाली.
-( सणकी )पाषाणभेद

बबलु's picture

4 Mar 2009 - 10:46 am | बबलु

लै भारी... लै भारी... नाटक्याशेठ.

च्यायला... आता लवकरच आपली "पेताड पार्टी / कॉकटेल पार्टी " करायला पाहिजे.
उद्या फोन टाकतो. तारीख ठरवून टाकू. :)

....बबलु

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 10:48 am | विसोबा खेचर

त्याच नशेने अजुनी
पिण्याला बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
सोंगे बाकी फार आहे

वा! सुरेख..!

आपला,
(बाईबाटलीतला) तात्या.