भावडो.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
24 Feb 2009 - 12:41 am

"काय झालां तेतेबाय?"

"अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद. भांडाक काय तरी तेंका निमित्त लागता झाला."

"भावडो आता म्हातारो झालो.लहान पोरा सारखो भांडतां कित्या?
मोठ्ठ्या मोठ्ठ्यान सकाळी तुमच्या घरातून आवाज येय होते."

"कमळ्या,अगो ऐक तर खरां, काल गुंडू जोश्यांचा बायजा आपल्या घोवांक घेओन आमच्याकडे इला.बायजाचा आत्ताच लगिन झाला मां?.मी आपलो त्येंका चहाचो आग्रहकेलंय.होती नव्हती ती चहाची पूड घालून चहा केलंय.मग चहाची पूड संपतली नाय?
सकाळी हो उच्छाद.
"मी साखरपाणी पिंवचंय नाय."
आता माकां सांग आपल्या पुरतो हे चहाची पूड आणतत.आम्ही सगळ्यांनी साखरपाणी पिऊक व्होयां.
एकदिवस हेंनी पिलांतर काय झालां?"

"अगे तेतेबाय,तू माझ्याकडून चहाचीपूड न्हेवची होतंस."

"कित्याक?रोज रोज तुझ्याकडे कायनाकाय तरी मागूग लाज वाटतां.
गो कमळ्या,तो तेच्यापुरतीच पूड आणतां.आम्ही सगळे साखरपाणी सदीना पितो."

"मोठो कंजूष आसा भावडो."

"कंजूष? अगो महाकंजूष.
न्हाताना लाईफबॉयची खापटी आम्ही आंगाक चोळूची.आणि हो लक्स लावतलो."

"मेल्याच्या आंगांक घाण येत असतली."

"तसां नाय आपण छंदीफंदी र्‍हवतलो आणि बायकापोरा मरेनात."

"आता सहा पोरा झाली भावड्याक अक्कल कधी येतली.?"

"अगो कमळ्या,पोरां होवची काय आपल्या हातात असतां? देवाची करणी आणि नारळात पाणी."

"कसल्यो तेतेबाय तुझ्यो जुनाट समजुती?.अगे ह्या सगळां माणसाच्या हातात असता नाय तर कोणाच्या?"

"अगो कमळ्या,माकां "माणसाच्या हातात नाय" म्हणजे बायलमाणसाच्या हातात नाय असां म्हणूचा आसां.नाय तरी पुरूषाची आणि कुत्र्याची जात एक असां म्हणतंत तां काय चुकीचा नाय.कुत्रे तरी निदान फक्त मार्गशिर्षातच येतंत कांडावर.पुरूष मेलो दिवस नाय रात्र नाय.सदाचा आपला तांच.दुसरो धंदोच नाय.
तुझ्या मात्र घोवांक कमळ्या मी म्हणूचंय नाय हां! माका पाप लागात त्या देवपुरुषाक काय मी नांवां ठेवलंय तर.
तुझ्या घोवांसारखे आसत काही नायम्हटलां तरी पुरूष देवमाणासारखे."

"अगे तेतेबाय,माकां नेहमीच विचार येतां,रोजचे तुम्ही भांडतात.बारा महिने तेरा काळ तुमचा आपला तूं,तूं मी,मी चालूंच असतां, भावडो साळसूद कसो बाहेरच्या पडवीत झोपतां आणि तूं पोरांक घेऊन माजघरात झोपतंय तरी पण दर दोन दोन वर्षांक आपला तुझा चालूच आसां.?"

"काय सांगतंलय कमळ्या,माझी कर्मदशा! दुसरां काय?
घासत्याल बुदलीत घालून दिवो पेटतो ठेव्न माजघरात मी झोपतंय.ही सहाही पोरां आजूबाजूक लोळत असतंत.एकमेकाक लाथो मारीत असतंत झोपेत.ह्या आता दोन वर्षाचा कुसधुणा तेचां नांव शेवटचा समजून "सरला" म्हणून ठेवलंय.पण माका खात्री नाय तुझ्या भावड्याची.तालात इलो की रात्री माझघरात येव्न बुदली मालवतां, काम झाला की वाघासारखो घोरत पडता मग आंगा खाली मुलगी चिरडात हेंचो आगो नाय पिछो ठेवणा. सकाळ झाली की उठून जातां.
सकाळी साखरपाणी पितानां हो बारा वर्षाचो दाजी माका कसो सांगता,
"आये रात्री माझघरात वाघ खैसून येतां?माका रात्रभर झोप लागणा नाय."
ऐकून शरम वाटतां माकां.आता तेका मी काय सांगू माझा कर्म.?
कमळ्या,आतां तुमच्याकडे साधना इलीत.गोळ्यो काय?निरोध काय? काय काय सांगूक नको.
आमच्या वेळेक फक्त साधना नावाची नटी होती.आणि काय नाय."

"तेतेबाय,इतक्या होवून सुद्धा तुका विनोद बरे सुचतंत.
ह्या तुझ्याकडून शिकण्यासारख्या आसां हां!"

"वशाडपडो,गजालीन घो खाल्लो.अगो तांबे भटजी इलेतसां वाटता.ह्या रोजच्या क्लेषातून शांती मिळूची म्हणून भटजीक मी एकादशण्यो करूक सांगितलंय.
बरां जातंय मी.
बाकी तांबेळेश्वराक काळजी. "

श्रीकृष्ण सामंत.

कथालेख

प्रतिक्रिया

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Feb 2009 - 7:45 am | श्रीकृष्ण सामंत

मालवणीत लिवलेल्या माझ्या ह्या गजालीवर कोणाचोच बरो किंवा वाईट प्रतिसाद इलो नाय ह्याचां
जरा नवल वाटलां.तसो मी मिपावर खूप दिवसापूर्वी "अमिताभ बच्चनाक फुकटचो सल्लो" हो लेख ह्यापूर्वी लिवलो आसाय.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विंजिनेर's picture

28 Feb 2009 - 8:04 am | विंजिनेर

मिपावर तोंडाला पाणी सुटविणार्‍या पाकृ आणि नागरी भाषेतले नानाविध विषयांवरचे लिखाण ह्याच्या जोडीला तुम्ही/यशोधरा आदीनी कोकणी/मालवणी भाषेतले लिखाण चालु केले आहे. कालपरवाच ग्वाल्हेरच्या मराठीबद्दल लेख आला होता.
आता अस्सल वर्‍हाडी नाहीतर कोल्हापूरीबाजाच्या लेखाची वाट पाहतोय. :)
लिखते रहो.

यशोधरा's picture

28 Feb 2009 - 2:16 pm | यशोधरा

लक्षात आयला नसात हो काका... झकास लिवल्यात! मी नाय बघूक होतय..

मदनबाण's picture

28 Feb 2009 - 3:03 pm | मदनबाण

काका झकास लिवला असा.. :)

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.