सावर ग स्वतःला .....

मितालि's picture
मितालि in जे न देखे रवी...
16 Feb 2009 - 3:31 pm

सावर ग स्वतःला
आवर तुझ्या मनाला...

निघून गेलेले क्षण
मुठीतील वाळू
दोन्ही सारखेच
घट्ट पकडशिल
तितके वाहून जाती

आठवाणीचे झुले
मन झुलवता झुलवता
सरतील सांज वाति
निरव शांततेची उरेल
रात एकटीच भवती

गेले वाहून घर
लाटे सवे तरी
पुन्हा नवे बांधत होतो
बालपणीची जिद्द सखे
वापर या घडीला

सावर ग स्वतः ला
आवर तुझ्या मनाला...

कविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

16 Feb 2009 - 6:10 pm | मनीषा

निघून गेलेले क्षण
मुठीतील वाळू
दोन्ही सारखेच
घट्ट पकडशिल
तितके वाहून जाती ...सुंदर

प्राजु's picture

16 Feb 2009 - 7:56 pm | प्राजु

आठवाणीचे झुले
मन झुलवता झुलवता
सरतील सांज वाति
निरव शांततेची उरेल
रात एकटीच भवती

हे सुंदर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

16 Feb 2009 - 9:00 pm | शितल

सहमत.
कविता आवडली. :)

जागु's picture

17 Feb 2009 - 12:56 pm | जागु

निघून गेलेले क्षण
मुठीतील वाळू
दोन्ही सारखेच
घट्ट पकडशिल
तितके वाहून जाती

हे आवडले.
मिताली छानच आहे कविता.

सागर's picture

20 Feb 2009 - 6:59 pm | सागर

सुंदर कविता...

खास करुन

निघून गेलेले क्षण
मुठीतील वाळू
दोन्ही सारखेच
घट्ट पकडशिल
तितके वाहून जाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती देऊनी जाती.....
दोन दिसांची रंगत संगत , दोन दिसांची नाती....

या गीताची आठवण झाली....

शब्दसामर्थ्य खूप छान वापरले आहे....
अजून येऊ द्यात कविता....

(कविताप्रेमी) सागर

मितालि's picture

20 Feb 2009 - 7:03 pm | मितालि

धन्यवाद..

किरण जोशी's picture

22 Feb 2009 - 8:33 pm | किरण जोशी

निघून गेलेले क्षण
मुठीतील वाळू
दोन्ही सारखेच

खरं आहे ...
सावरलंस...
धन्यवाद....