साहित्य :
लोणी (बटर) : १०० ग्रॅम
रिकोटा चीझ : ४२५ ग्रॅम (Ricotta cheese)
मिल्क पावडर : ४२५ ग्रॅम
साखर :३०० ग्रॅम
कृती :
प्रथम एका भांड्यात( नॉनसस्टिक्) लोणी गरम करावे.
लोणी वितळल्यावर त्यात रिकोटा चीझ घालावे.
तेही छान वितळल्यावर त्यात मिल्क पावडर घालुन एकजिव करुन घ्यावे.
मग त्यात साखर घालावी.
मिश्रण सतत हलवत रहावे. ते भांड्यापासुन सुटु लागले की ताटलीत काढावे. (त्याचा घट्ट गोळा होत नाही. )
तयार मिश्रण थोडे गार झाल्यावर त्याचे लाडु वळावेत.
(लहान मुलांना खुप आवडतात) :)
हे लाडु मी माझ्या मैत्रिणी कडुन शिकले आहेत.
प्रतिक्रिया
31 Jan 2009 - 11:46 am | सुनील
लोणी + चीझ + साखर :?
तळवलकर जीम्सच्या मार्केटींगसाठी काम करता का आपण? ;)
बाकी लाडू दिसताहेत छान!
(सडपातळ होण्यासाठी काय करावे ह्या विवंचनेत असणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Jan 2009 - 12:02 pm | दशानन
मस्तच !
(वजन वाढू दे ह्या विवंचनेत असलेला) कार्टा
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
31 Jan 2009 - 2:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रिकोटा चीजमधे थोडं मीठ असतं ना? ते विचित्र नाही का लागत.
(रिकोटा चीज पुण्यात कुठे मिळेल या विवंचनेत, पालक-रिकोटा कॅनलोनीची फ्यान) अदिती
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
31 Jan 2009 - 2:48 pm | दशानन
अच्छा ?
त्यातलं मिठ पण कमी करण्यासाठी काही उपाय :?
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
31 Jan 2009 - 11:08 pm | समिधा
रिकोटा चीजमधे थोडं मीठ असल तरी चवित काही फरक जाणवत नाहि.
31 Jan 2009 - 11:12 pm | चतुरंग
लेकिन अपुनको बात कुछ हजम नहीं हुई! अजिबात आवडले नाहीत कारण लाडवाला तो चीझचा दुधी वास काहीतरीच वाटतो.
रव्याचे, बेसनाचे आणि रवा-बेसनाचे लाडू करुन खायला घालणारी घरवाली असताना मी हे लाडू का खाईन?
चतुरंग
1 Feb 2009 - 6:29 am | सुनील
रव्याचे, बेसनाचे आणि रवा-बेसनाचे लाडू करुन खायला घालणारी घरवाली असताना मी हे लाडू का खाईन?
चतुरंगशेठ, घरवालीचं ठीक आहे पण बाहरवाली ही काय "चीज" असते ते कळल्याशिवाय "चीझ"ची चव समजणार नाही!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Jan 2009 - 11:14 pm | चकली
रिकोटा चीज चे लाडू खव्याच्या लाडवांसारखे लागतात. छान रेसिपी !
चकली
आजची रेसिपी - कॉर्न अँड पनीर टोस्ट
1 Feb 2009 - 3:20 am | शुभान्गी
रेसिपि छान आहे.. फोटू तर एकदम झकास.....लागलीच खाऊन पहावेसे वाटत्तात.....
1 Feb 2009 - 3:29 am | प्राजु
माझी एक मैत्रीण अशाप्रकारे रिकोटा चीज वापरून कलाकंद करते. तो छान लागत होता.
एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून मी रिकोटा चीज वापरून रसमलाई केली. पण ती काही आवडली नाही. त्यानंतर कानाला खडा लावला की रिकोटा चीज फक्त लझान्यामध्येच पालकासोबत वापरायचं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Feb 2009 - 11:06 am | विसोबा खेचर
हम्म!
हे लाडू खाल्ले होते एकदा. अगदीच बंडल लागले! मोतीचुर, बेसन इत्यादी लाडवात जी खुमारी आहे त्यापुढे वरील लाडवांना 'लाडू' म्हणणेही कठीण जाते! छ्या! कैच्याबैच पाकृ. ह्या ऐवजी साधे तुपगूळ पोळीचे लाडू, गूळ चुरमुर्याचे लाडूदेखील खूप झकास लागतात..
असो, पाकृ मुळीच आवडली नाही. वैयक्तिक मत, राग नसावा. पुढीला पाकृंकरता शुभेच्छा! :)
तात्या.