मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चीझ लाडू

समिधा · · पाककृती
Image removed. साहित्य : लोणी (बटर) : १०० ग्रॅम रिकोटा चीझ : ४२५ ग्रॅम (Ricotta cheese) मिल्क पावडर : ४२५ ग्रॅम साखर :३०० ग्रॅम कृती : प्रथम एका भांड्यात( नॉनसस्टिक्) लोणी गरम करावे. लोणी वितळल्यावर त्यात रिकोटा चीझ घालावे. तेही छान वितळल्यावर त्यात मिल्क पावडर घालुन एकजिव करुन घ्यावे. मग त्यात साखर घालावी. मिश्रण सतत हलवत रहावे. ते भांड्यापासुन सुटु लागले की ताटलीत काढावे. (त्याचा घट्ट गोळा होत नाही. ) तयार मिश्रण थोडे गार झाल्यावर त्याचे लाडु वळावेत. (लहान मुलांना खुप आवडतात) :) हे लाडु मी माझ्या मैत्रिणी कडुन शिकले आहेत.

वाचन 5301 प्रतिक्रिया 11