माझ्या ओन्जळितल्या बकूळ फुलांना
ओन्जळित तूझ्या धरशील का?
या बकूळ फुलांचा मधूगंध मजला
सांग प्रीया तू देशील का?
ओन्जळितल्या त्या बकुळ फुलांना
पापणीत तूझ्या ठेवशील का?
पापणीतून अलगद त्यांना
मनात सामावून घेशील का?
अखेपर्यंत आठवणीने
मनात तू जपशील का?
सूखलेल्या निर्माल्यवत त्या फुलांना
ओन्जळित पून्हा धरशील का?
या बकूळ फुलांचा मधूगंध मजला
पून्हा प्रीया तू देशील का?
प्रतिक्रिया
30 Jan 2009 - 3:59 pm | बाकरवडी
मस्त !!!!!!!!
30 Jan 2009 - 4:10 pm | शंकरराव
कविता आवडली
कवीची प्रिया व बकूळ एकवटल्यावर
प्रियेला बकुळा म्हणनार का ?
बकुळराव
31 Jan 2009 - 1:40 am | सचिन
स्तुत्य प्रयत्न आहे.
कृपया शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे ही कळकळीची विनंती.
सूखलेल्या , पून्हा , प्रीया, तूझ्या - अशा ठिकाणी अडखळायला होते.
(हे माझे वैयक्तिक मत आहे. पटत नाहीसे वाटल्यास विसरून जा.)
31 Jan 2009 - 3:46 pm | मानसी मनोजजोशी
तूमचे मत योग्य आहे पण १० वी नंतर मराठीशी म्हणजे शुद्धलेखनाशी संपर्क तुटल्यामूळे अस होतय. सुधारणा करण्याचा प्रयत्न करतेय तेव्हा निदान थोडे दिवस समजून घ्यावे हि विनंती.
धन्यवाद
31 Jan 2009 - 5:08 am | धनंजय
बकुळीच्या फुलांचा सुगंध खूप दिवस राहातो. कोणास तो सुगंध जपण्यासाठी अमानती सामान म्हणून देण्याची उपमा फारच आवडली.
31 Jan 2009 - 5:32 am | शितल
बकुळीच्या फुलांची आणि त्याच्या सुगंधाची आठवण झाली. :)
31 Jan 2009 - 9:54 am | दशानन
छान कविता.... वर शितल म्हणते त्या प्रमाणेच बकुळाच्या फुलांची आठवण झाली... !
तुम्ही पाककृती करता करता कविता करता की कविता करता करता पाककृती .... नाय उगाच इचारलं आपलं काय बी इचारायचं म्हणून चालु द्या !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
31 Jan 2009 - 11:09 am | कोदरकर
अरेरे किती प्रश्न?
अरसिक कोदरकर