सारेगमप आणि प्रजासत्ताक दिन

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in जनातलं, मनातलं
29 Jan 2009 - 2:46 pm

या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी आला. नुकत्याच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बर्‍याचश्या भारतीयांना ही नुसतीच सुट्टीची मजा उपभोगण्यापलीकडे जाऊन देशप्रेम व्यक्त करण्याकरीता योग्य संधी वाटली. देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या वेळी झी मराठी ने सारेगमप लिटिल चॅम्प्स च्या माध्यमातून केले. एक तर या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. लहानच काय पण मोठेही या कार्यक्रमाच्या आधीन झालेले आहेत. त्यातूनही दुग्धशर्करा योग म्हणजे या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्ष बाळासाहेब मंगेशकरांनी मांडली आणि प्रत्यक्षातही आणली. स्वत: पंडीतजींच्या मार्गदर्शनाखाली गायची संधी मिळालेल्या या चिमुरडयांचा काही क्षण हेवाही वाटला आणि त्याच वेळी त्यांच्यावर असलेल्या दडपणाचे मलाही दडपण आले.
पण कार्यक्रम मात्र एकदम ’चाबूक’ झाला. लिटील चॅम्प्स बद्दल तर काही बोलणंच शक्य नाही पण सगळ्यात जास्त आनंद पंडितजींच्या तोंडून प्रत्येक गाण्यामागची पार्श्वभूमी समजावून घेताना. तसेही भावसरगम मध्ये त्यांच्याकडून गायल्या जाणार्‍या गाण्याची पार्श्वभूमी ऐकायला मिळाली होती, पण ती बहुतेक भावगीते होती. इथे मात्र एकामागोमाग एक अशी शौर्याचा इतिहास जागवणारी गाणी त्यामागच्या इतिहासासकट ऐकायला मिळाली. एक कायम जपून ठेवावा असा हृद्य कार्यक्रम बघायला मिळाला.

संगीतप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

mamuvinod's picture

29 Jan 2009 - 2:54 pm | mamuvinod

१००% सहमत

मी पण बघितला कार्यक्रम

जयस्तुते गाण छान

मैत्र's picture

29 Jan 2009 - 3:35 pm | मैत्र

दुसर्‍या दिवशीची गाणी जास्त चांगली झाली..
सागरा प्राण तळमळला, सरणार कधी रण प्रभो, शिवकल्याण राजा ही गाणी मुलांच्या वयाच्या पार जाणारी होती.
आर्याचं गाणं हे एका स्पर्धेतलं वाटतंच नव्हतं. हृदयनाथांनी एक कार्यक्रम बसवून काही चांगल्या गायकांकडून गाणी गाऊन घेतली आहेत असं वाटलं. जबरदस्त तयारी होती.

विसोबा खेचर's picture

29 Jan 2009 - 3:55 pm | विसोबा खेचर

सगळ्या छोट्याचं निश्चितच कौतुक आहे. फक्त एसएमएसच्या किडीपायी कुणाचं नुकसान न होवो ही इच्छा!

आपला,
(एसएमएस पद्धतीचा कट्टर विरोधक) तात्या.

माझी दुनिया's picture

29 Jan 2009 - 4:06 pm | माझी दुनिया

१००% सहमत.
माझी दुनिया

झेल्या's picture

29 Jan 2009 - 4:08 pm | झेल्या

सगळ्या छोट्याचं निश्चितच कौतुक आहे. फक्त एसएमएसच्या किडीपायी कुणाचं नुकसान होवो ही इच्छा!

आपला,
('न' सुधारणारा)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

माझी दुनिया's picture

29 Jan 2009 - 4:16 pm | माझी दुनिया

:-) मी ही सहमती देताना नीट बघितलं नाही. त्यामुळे आता पहिल्या प्रतिसादाला १००% असहमती आणि नंतरच्या प्रतिसादाला १००% सहमती.
माझी दुनिया

विसोबा खेचर's picture

29 Jan 2009 - 4:28 pm | विसोबा खेचर

धन्यवाद झेल्याकाका! आता सुधारणा केली आहे. साल 'न' टाकायचा राहूनच गेला! :)

आपला,
(अंमळ वेंधळा) तात्या.

अघळ पघळ's picture

31 Jan 2009 - 10:45 am | अघळ पघळ

राहीला तर राहीला न तिच्याआयला!! भाषेला कशाला जखड्ताय बंधनात? करा मुक्त.:)

चंबा मुतनाळ's picture

29 Jan 2009 - 4:10 pm | चंबा मुतनाळ

मी देखील हा कार्यक्रमाचे दुसर्‍या दिवशीचे पुन:प्रक्षेपण जपानात बघितले. फारच सुंदर कार्यक्रम झाला आहे. प्रत्येक गाण्यानंतरचे पंडित हृदयनाथांचे विवेचन फारच छान होते. मैत्र म्हणाले त्याप्रमाणे दुसर्‍या दिवसाची गाणी जास्त आवडली.
- चंबा

आनंद घारे's picture

29 Jan 2009 - 4:18 pm | आनंद घारे

एकूणएक गाणी तर झकास होतीच पण प्रत्येक गाण्यानंतर पं हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या गाण्यामागचा इतिहास सांगितला. त्यांचे ते निवेदन निव्वळ अप्रतिम होते. संगीतक्षेत्रावरील त्यांचे प्रभुत्व माहीत होतेच, त्यांचा अगाध व्यासंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, तसेच मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व हे सगळेच विस्मयकारक होते. अशा प्रकारचा कार्यक्रम क्वचितच पहायला मिळतो.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

अविनाशकुलकर्णी's picture

29 Jan 2009 - 4:22 pm | अविनाशकुलकर्णी

चाबुक

प्राची's picture

29 Jan 2009 - 5:16 pm | प्राची

या कार्यक्रमाच्या यशश्वितेला जोड मिळाली ती वीरमाता,वीरपिता आणि वीरपत्नींनी यांनी आपल्याशी साधलेल्या संवादाची.

मैत्र's picture

29 Jan 2009 - 5:39 pm | मैत्र

गाणी चालू असताना दाखवली गेलेली चित्रे ही बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या 'महाराज' या पुस्तकातील होती.
ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांनी काढलेली ही चित्रं आहेत. एकेका प्रसंगासाठी इतकी परिणामकारक, रेखीव आणि महाराजांच्या आयुष्याचं रिप्रेझेंटेशन (मराठी ?) ठरावीत अशी ही चित्रं आहेत.
शिवचरित्रा साठी ही चित्रं मानदंडच (बेंचमार्क) आहेत...

ढ's picture

30 Jan 2009 - 3:24 pm |

बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातील आहेत ती चित्रं.

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 3:29 pm | भडकमकर मास्तर

महाराज नव्हे.

अहो, ही दलालांची चित्रे दोन्ही पुस्तकांत होती...
राजा शिवछत्रपती हे पृष्ठसंख्येने मोठे पुस्तक होते... पण त्याचा आकार छोटा होता...

महाराज हे पुस्तक आकाराने मोठे होते.. पण पृष्ठसंख्या कमी... एका पानावर एक चित्र आणि त्याखाली त्याची कथा... महाराज या पुस्तकात तीच पण मोठ्या आकाराची चित्रे होती...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ढ's picture

30 Jan 2009 - 3:39 pm |

चूक कबूल मास्तर...

मॅन्ड्रेक's picture

30 Jan 2009 - 1:57 pm | मॅन्ड्रेक

अन अश्या कार्याक्रमात बेरंग आणणारि इतर कार्यक्रमान्चि जाहिरात.
छे !!!!!

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 3:30 pm | भडकमकर मास्तर

एकापेक्षा एक की काय??
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अनामिका's picture

30 Jan 2009 - 4:43 pm | अनामिका

मुले प्रचंड हुशार ,गुणी व प्रतिभासंपन्न आहेत ..............मराठी सा रे ग म प चे भाग म्हणजे एक संगीताचा अद्वितीय सोहळाच असतो सगळ्या रसिकांसाठी ...............प्रजासत्ताकदिनाचे औचित्यसाधुन झी मराठीने पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या मार्गदर्शनात या सुरेल मुलांना गायला लावलेली सगळी गाणी म्हणजे आनंदाची पर्वणीच होती ...........
"शुरा मी वंदिले "चे दोन्ही भाग म्हणजे मंदिरावर सोन्याचा कळस असेच होते ..........................
"अनामिका"

ज्योति's picture

30 Jan 2009 - 4:49 pm | ज्योति

सर्वच गाणी व त्याची पार्श्वभुमी या निमीत्ताने समजली.
मला वाटते ऩक्शत्रा॑चे देणे मधे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.

आपला अभिजित's picture

31 Jan 2009 - 9:26 am | आपला अभिजित

कार्यक्रमाची तारीफ मी अनेक ठिकाणी ऐकली. मी पूर्ण नाही पाहिला तो कार्यक्रम. त्यामुळे काही बोलू शकत नाही.

पण कमलाकर नाडकर्णींनी या कार्यक्रमावर काय प्रतिक्रिया लिहिलेय, ये बघा!

कोदरकर's picture

31 Jan 2009 - 10:35 am | कोदरकर

देखणा कार्यक्रम होता, मंगेशकरांनी आयोजन केल्यामुळे त्यांची गाणी बसवणे हे साहजिकच आहे.
" तळे राखणार तो पाणी चाखणार". शेवटी कलावंताच्या दुनियेतही 'उजवी' व 'डावी' विचारसरणी आहेच.