मृगजळ

सचिन's picture
सचिन in जे न देखे रवी...
29 Jan 2009 - 12:55 am

मृगजळामागे धावत राहिलो
वाळूचे इमले बांधत राहिलो
लाटेकडे दुर्लक्ष झाले अन्
चुकले हिशेब मांडत राहिलो

सुखांच्या बेरजा करता करता
समाधान वजा करत राहिलो
पत्त्यांचा बंगला सावरण्यासाठी
वार्‍याला विरोध करत राहिलो

पुढे जायचे अन् पुढेच जायचे
मागचे सारे विसरत राहिलो
काय सापडले माहीत नाही
खूप काही हरवून बसलो

कविता

प्रतिक्रिया

धनंजय's picture

29 Jan 2009 - 1:02 am | धनंजय

छान कल्पना.

*(पण पहिल्या दोन कडव्यांत प्रत्येकी दोन-दोन उपमा फार झाल्या - माझ्यासाठी तरी एकमेकांचे नुकसान करतात.)*