कोलंबी फ्राय

गणपा's picture
गणपा in पाककृती
24 Jan 2009 - 6:14 pm

नमस्कार लोक्स्..
आज म्या पामर मिपाच्या बल्लवाचार्यांच्या हद्दित धुसखोरी करत आहे. काय चुकल माकल तर माफ करा.
तर आजची डिश् कोलंबी फ्राय..

Prons Fry

साहित्य :
१/२ किलो. एक किलो पण कमीच पडते दर वेळी. कोलंबी न सोललेली (कोतासकट.)
३/४ मोठे चेमचे आलं + लसुण + मिरची + कोथिंबीर पेस्ट (हिरवा मसाला).
१ चमचा हळद.
२ मोठे चेमचे घरगुती मसाला. (नसल्यास फिश् मसाला).
१ लहान चमचा जिर पावडर.
१ मोठ्ठं लिंबू.
४/५ चेमचे तेल.
चवीनुसार मीठ.
२ उकडलेली अंडी सजावटी साठी. (नुसतीच सजावटी साठी नाहीत, खाल्ली तरी चालतील.)

कृती :
सर्व प्रथम कोलंबी साफ करुन घ्या. साफ करताना कोलंबी पाय आणि डोक्याचा (डोळ्या पर्यंतचा) भाग काढुन बाकी कोत तशीच राहु द्या.
कोलंबी स्वच्छ पाण्यात धुवून त्यात लिंबू पिळा.
हळद ,मसाला, हिरवा ओला मसाला, जिर पावडर, मीठ लावुन चांगल तासभर मुरत ठेवा.

तासानंतर एका फ्राईंग पॅन मध्ये तेल टाकून गॅस वर मध्यम आचेवर कोलंबी तळुन घ्या. साधारण १० मिनीटात शिजते. जास्त वेळ ठेवु नका.
तळलेली कोलंबी एका डिश् मध्ये घेउन उकडलेल्या अंड्यानी सजवा.
नाही पाहुण्याची लाळ गळली तर ....गळेना का तुम्ही फस्त करा..;) काय?

आवांतर : चकना म्हणुन नं.१ पदार्थ.

Prons Fry1

प्रतिक्रिया

वल्लरी's picture

24 Jan 2009 - 6:56 pm | वल्लरी

छानचं... गणपाजी...
मस्त दिसते आहे फ्राईड कोळंबी
---वल्लरी

धमाल नावाचा बैल's picture

24 Jan 2009 - 8:39 pm | धमाल नावाचा बैल

गणॊबा, हे मिपावर दोनदा येऊन गेले आहे. ’पाकक्रिया’ वर टिचकी मारुन आधी काय काय होउन गेले आहे ते पाहा ना. नविन ताजे काहीतरी टाका बॉ!

बैलोबा

लवंगी's picture

24 Jan 2009 - 9:12 pm | लवंगी

तोंडला पाणी सुटले रे..

सहज's picture

24 Jan 2009 - 11:30 pm | सहज

फोटो मस्त आहे.

विसोबा खेचर's picture

24 Jan 2009 - 11:50 pm | विसोबा खेचर

झ का स..!

विनोद's picture

28 Jan 2009 - 4:35 pm | विनोद

मस्त च......

खादाड's picture

29 Jan 2009 - 2:46 pm | खादाड

पाणी सुट्ले !

अवन्तिका's picture

3 Feb 2009 - 11:48 am | अवन्तिका

अरे...... रे..... आज मंगळ्वार आहे..... नाहीतर आजच केली असती.....
डीश बाकी फक्कड सजवली आहे....

समीर गोखले's picture

3 Feb 2009 - 3:42 pm | समीर गोखले

छान आहे ही पाक क्रुती. धन्यवाद.

नाना चेंगट's picture

15 Jun 2012 - 1:16 pm | नाना चेंगट

हल्ली आमच्या गणपाच्या कीबोर्डावर फार धुळ जमली आहे असे आमच्या विश्वसनीय सुत्रांकडून समजते.

असो. बदलीन....