मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोलंबी फ्राय

गणपा · · पाककृती
नमस्कार लोक्स्.. आज म्या पामर मिपाच्या बल्लवाचार्यांच्या हद्दित धुसखोरी करत आहे. काय चुकल माकल तर माफ करा. तर आजची डिश् कोलंबी फ्राय.. Prons Fry साहित्य : १/२ किलो. एक किलो पण कमीच पडते दर वेळी. कोलंबी न सोललेली (कोतासकट.) ३/४ मोठे चेमचे आलं + लसुण + मिरची + कोथिंबीर पेस्ट (हिरवा मसाला). १ चमचा हळद. २ मोठे चेमचे घरगुती मसाला. (नसल्यास फिश् मसाला). १ लहान चमचा जिर पावडर. १ मोठ्ठं लिंबू. ४/५ चेमचे तेल. चवीनुसार मीठ. २ उकडलेली अंडी सजावटी साठी. (नुसतीच सजावटी साठी नाहीत, खाल्ली तरी चालतील.) कृती : सर्व प्रथम कोलंबी साफ करुन घ्या. साफ करताना कोलंबी पाय आणि डोक्याचा (डोळ्या पर्यंतचा) भाग काढुन बाकी कोत तशीच राहु द्या. कोलंबी स्वच्छ पाण्यात धुवून त्यात लिंबू पिळा. हळद ,मसाला, हिरवा ओला मसाला, जिर पावडर, मीठ लावुन चांगल तासभर मुरत ठेवा. तासानंतर एका फ्राईंग पॅन मध्ये तेल टाकून गॅस वर मध्यम आचेवर कोलंबी तळुन घ्या. साधारण १० मिनीटात शिजते. जास्त वेळ ठेवु नका. तळलेली कोलंबी एका डिश् मध्ये घेउन उकडलेल्या अंड्यानी सजवा. नाही पाहुण्याची लाळ गळली तर ....गळेना का तुम्ही फस्त करा..;) काय? आवांतर : चकना म्हणुन नं.१ पदार्थ. Prons Fry1

वाचन 12976 प्रतिक्रिया 0