ओंजळ (देवद्वार छंद)

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
23 Jan 2009 - 10:10 am

मन का उदास
ओलावती डोळे
खिन्नतेचे जाळे
अंतरात...
नीरव शांतता
सुचेनात गाणी
विसावे लेखणी
कोरे सारे..
तडफड उरी
कळावी का कुणा
मनातल्या खूणा
पुसटशा...
शोधिते स्वतःला
गाभ्यात या खोल
देवुनीया मोल
आसवांचे..
समजेना काही
गेले कुठे सारे
चैतन्याचे झरे
मनातले...
वाळवंट रुक्ष
रणरण वाटा
आयुष्य फुफाटा
चोहीकडे..
थके जीव आता
दूर मृगजळ
रिती ही ओंजळ
वाट पाहे...

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

शोधिते स्वतःला
गाभ्यात या खोल
देवुनीया मोल
आसवांचे..

थके जीव आता
दूर मृगजळ
रिती ही ओंजळ
वाट पाहे...

हे विशेष आवडले..!

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

मनीषा's picture

23 Jan 2009 - 10:44 am | मनीषा

चैतन्याचे झरे
मनातले... ...........खूप छान !!

राघव's picture

23 Jan 2009 - 1:53 pm | राघव

खरंच कधी कधी असा काळ असतो की जीवनात काही रसच उरला नाही असे वाटू लागते.
छानच मांडलीये तगमग. शुभेच्छा.
मुमुक्षु

शितल's picture

23 Jan 2009 - 7:11 pm | शितल

संपुर्ण कविताच आवडली.
:)

लिखाळ's picture

23 Jan 2009 - 7:15 pm | लिखाळ

कविता आवडली.
-- लिखाळ.

प्राजु's picture

23 Jan 2009 - 9:04 pm | प्राजु

अतिशय सुरेख कविता. शेवट अतिशय सुंदर आहे कवितेचा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

23 Jan 2009 - 9:26 pm | मदनबाण

शोधिते स्वतःला
गाभ्यात या खोल
देवुनीया मोल
आसवांचे..

व्वा..मस्तच.

मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

चन्द्रशेखर गोखले's picture

23 Jan 2009 - 9:51 pm | चन्द्रशेखर गोखले

फार छान कविता

जृंभणश्वान's picture

23 Jan 2009 - 10:07 pm | जृंभणश्वान

मस्तच आहे कविता

धनंजय's picture

23 Jan 2009 - 10:28 pm | धनंजय

कविता आवडली.

बाकरवडी's picture

23 Jan 2009 - 10:34 pm | बाकरवडी

फार छान मस्तच आहे
कविता आवडली.

अवलिया's picture

23 Jan 2009 - 11:14 pm | अवलिया

आवडली

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

बेसनलाडू's picture

23 Jan 2009 - 11:16 pm | बेसनलाडू

आवडली
(आस्वादक)बेसनलाडू

आचरट कार्टा's picture

24 Jan 2009 - 8:47 pm | आचरट कार्टा

आवडली. विशेषतः शेवट जमून आलाय.

आनंदयात्री's picture

27 Jan 2009 - 1:02 pm | आनंदयात्री

काय सुरेख कविता !!
आधीही आपल्या कवितेवरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, नित्य नविन कल्पना मांडण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
ओळी अश्या असतात की पुन्हा पुन्हा वाचत रहाव्या वाटतात, गुणगुणाव्या वाटतात !!

थके जीव आता
दूर मृगजळ
रिती ही ओंजळ
वाट पाहे...

हॅट्स ऑफ्फ !!

श्रीकान्त पाटिल's picture

7 Feb 2009 - 1:31 pm | श्रीकान्त पाटिल

जे मी तुला मागे लिहीले होते त्याचेच उत्तर तु ह्या कवितेतुन दिलेस पद्मश्री .

नीरव शांतता
सुचेनात गाणी
विसावे लेखणी
कोरे सारे..
तडफड उरी
कळावी का कुणा
मनातल्या खूणा
पुसटशा...
हे मला नक्किच जाणवले होते आणि त्याच काळजीने मी तुला टेस्टिमोनिअल पण दिला होता.

एकन्दर कविता छान झाली आहे . तुझ्या मनाची तडफड कळु शकते , निदान मला तरी ....

उत्खनक's picture

6 Dec 2014 - 10:36 am | उत्खनक

उत्खनन :-
आवडलेले लेखन.